Tuesday 4 July 2023

NCP Political Crisis राष्ट्रवादी पक्ष घटनेचा अभ्यास करूनच नियोजित उठाव; दोन्ही गटांचा कारवाईचा केवळ फार्स

घटनेत पक्ष विलीनीकरणाचीही तरतूद; फुटीमुळे राज्यभर कार्यकर्ते भांबावलेल्या स्थितीत

पक्षाच्या संकेतस्थळावरुन अजित दादांसह अन्य नेत्यांचे नावे व फोटो हटवले

राष्ट्रवादी पक्षात पहिल्या फळीतील जेष्ठ नेत्यांनी केलेल्या उठाव पूर्वनियोजित पक्ष घटनेचा अभ्यास करूनच केलेला असल्याचे उघड होत असून कोणत्याही निर्णयासाठी समितीच्या एक तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा असण्याची गरज घटनेत असल्याने दोन्ही गटांचा कारवाईचा केवळ फार्सच होत असल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादीच्या घटनेत पक्ष विलीनीकरणाचीही तरतूद देखील आहे. राष्ट्रवादी पक्षातील उभी फुट पडल्याने राज्यभरातील कार्यकर्ते व पदाधिकारी भांबावलेल्या स्थितीत आहेत. अशा परिस्थितीमुळे पक्षाचे अतोनात नुकसान होणार असून पक्ष संघटना खिळखिळी करण्यात सत्ताधारी पक्षांना यश येताना दिसत आहे. पक्षाच्या संकेतस्थळावरुन अजित दादांसह अन्य नेत्यांचे नावे व फोटो हटवले आहेत. विचारांशी गद्दारी केल्याचा ठपका ठेवून दोन्ही गटातील संघर्षाची धार तीव्र होताना दिसत असून यामध्ये कायदेशीर पातळीवर देखील लढाईला प्रारंभ झालेला आहे. दोन्ही गटातील संघर्ष आणखीन तीव्र झाल्यास सर्वसामान्य कार्यकर्त्यांचेच सर्वाधिक नुकसान होणार आहे. 
    राष्ट्रवादी पक्षाचे देशभरातील लोकप्रतिनिधीं संख्यात्मक स्थिती पाहता लोकसभा सदस्य 5, राज्यसभा सदस्य 4, महाराष्ट्र विधानसभा सदस्य 53, केरळ विधानसभा सदस्य 2, गुजरात विधानसभा सदस्य 1, नागालँड विधानसभा सदस्य 7, छत्तीसगढ विधानसभा सदस्य 4, महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य 9, तसेच पक्षाचे सदस्य संख्या २ लाख दर्शवलेली आहे. राष्ट्रवादीची राष्ट्रीय समिती, राष्ट्रीय फ्रंटल संघटना, राष्ट्रीय मदत समिती, राष्ट्रीय फ्रंटल संघटना, राष्ट्रीय मदत समिती, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय शिस्त समिती, राष्ट्रीय निवडणूक समिती, महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष, राज्य फ्रंटल संघटना कार्यरत आहेत.   
     10 जून रोजी राष्ट्रवादी पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनात मोठी घोषणा झाली. प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे या दोघांनाही कार्याध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. 10 जूनला ही घोषणा झाली त्यानंतर अवघ्या 20 दिवसांतच पक्षात दोन गट तयार झाले आहेत. राष्ट्रवादीच्या घटनेत जर कुठला घटनाबदल, घटनादुरुस्ती करायची असेल तर तो पक्षाच्या नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये म्हणजे राष्ट्रीय शिबिरातच करता येतो. त्यातही दोन तृतीयांश सदस्यांच्या बहुमतानेच हा बदल मंजूर होऊ शकतो. अशा शिबिरासाठीची पूर्वसूचना किमान एक महिना सदस्यांना दिली पाहिजे. नॅशनल कमिटीने एखादा घटनाबदल राष्ट्रीय शिबिराविना केलाच तर त्यांना राष्ट्रीय शिबिरात तो मंजूरही करावा लागतो. कोणत्याही निर्णयासाठी समितीच्या एक तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा असण्याची गरज घटनेत असल्याने दोन्ही गटांचा कारवाईचा केवळ फार्सच होत असल्याचे स्पष्ट होत आहे. पक्षात केवळ अध्यक्ष सुप्रीम नाही तर लोकशाहीनुसार इतर सदस्यांचंही स्थान महत्वाचे आहे हा बचाव केला अजित पवार गटाकडून केला जाऊ शकतो. दोन्ही बाजूंनी नियुक्त्या, प्रतिनियुक्त्या केल्या जात आहेत. आपापले गटनेते, व्हीप नेमले जातात या सगळ्या पार्श्वभूमीवर ही लढाई पुन्हा कायद्याच्या कचाट्याकडे वाटचाल होताना दिसत आहे.

राष्ट्रवादीतील विधानसभेतील विद्यमान आमदार

अ.क्र

विद्यमान आमदार

मतदारसंघ

गट

1

श्री. अनिल भाईदास पाटील

अमळनेर

दादा गट

2

श्री. राजेंद्र भास्करराव शिंगणे

सिंदखेड राजा

साहेब गट

3

श्री. अनिल देशमुख

काटोल

साहेब गट

4

श्री. कारेमोरे राजू माणिकराव

तुमसर

 

5

श्री. चंद्रिकापुरे मनोहर गोवर्धन...

अर्जुनी-मोरगाव

 

6

श्री. आत्राम धरमरावबाबा भगवंत ...

अहेरी

दादा गट

7

श्री. नाईक इंद्रनील मनोहर

पुसद

 

8

श्री. चंद्रकांत उर्फ ​​राजूभैय्या ...

बासमथ

 

9

श्री. राजेश टोपे

घनसावंगी

साहेब गट

10

श्री. नितीन अर्जुन (ए. टी.) पवार

कळवण

 

11

श्री. छगन भुजबळ

येवला

दादा गट

12

अ‍ॅड. कोकाटे माणिकराव शिवाजीराव

सिन्नर

 

13

श्री. बनकर दिलीपराव शंकरराव

निफाड

 

14

श्री. झिरवाळ नरहरी सीताराम

दिंडोरी

दादा गट

15

श्रीमती. सरोज बाबुलाल अहिरे

देवलाली

दादा गट

16

श्री. भुसारा सुनील चंद्रकांत

विक्रमगड

 

17

श्री. दौलत भिका दरोडा

शहापूर

 

18

श्री. आवाड जितेंद्र सतीश

मुंब्रा-कळवा

साहेब गट

19

श्री. नवाब मलिक

अणुशक्ती नगर

साहेब गट

20

कु. आदिती सुनील तटकरे

श्रीवर्धन

दादा गट

21

श्री. अतुल वल्लभ बेनके

जुन्नर

 

22

श्री. दिलीप दत्तात्रय वळसे पाटील

आंबेगाव

दादा गट

23

श्री. दिलीप दत्तात्री मोहिते

खेड आळंदी

 

24

श्री. अशोक रावसाहेब पवार

शिरूर

दादा गट

25

श्री. दत्तात्रय विठोबा भरणे

इंदापूर

 

26

श्री. अजित अनंतराव पवार

बारामती

दादा गट

27

श्री. सुनील शंकरराव शेळके

मावळ

दादा गट

28

श्री. अण्णा दादू बनसोडे

पिंपरी

दादा गट

29

श्री. सुनील विजय टिंगरे

वडगाव शेरी

 

30

श्री. चेतन विठ्ठल तुपे

हडपसर

 

31

डॉ. किरण यमाजी लहामटे डॉ

अकोले

 

32

श्री. आशुतोष अशोकराव काळे

कोपरगाव

 

33

श्री. प्राजक्त प्रसादराव तनपुरे

राहुरी

 

34

श्री. निलेश ज्ञानदेव लंके

पारनेर

 

35

श्री. संग्राम अरुणकाका जगताप

अहमदनगर शहर

 

36

श्री. रोहित पवार

कर्जत जामखेड

साहेब गट

37

श्री. प्रकाश (दादा) सुंदरराव सोला ...

माजलगाव

 

38

श्री. संदीप रवींद्र क्षीरसागर

बीड

 

39

श्री. आजबे बाळासाहेब भाऊसाहेब

आष्टी

 

40

श्री. धनजय पंडितराव मुंडे

परळी

दादा गट

41

श्री. बाबासाहेब मोहनराव पाटील

अहमदपूर

 

42

श्री. बनसोडे संजय बाबुराव

उदगीर

दादा गट

43

श्री. शिंदे बबनराव विठ्ठलराव

मधा

 

44

श्री. माने यशवंत विठ्ठल

मोहोळ

 

45

श्री. दिपक प्रल्हाद चव्हाण

फलटण

 

46

श्री. मकरंद लक्ष्मणराव जाधव (पाट...

वाई

 

47

श्री. बाळासाहेब उर्फ ​​शामराव पांडुरा ...

कराड उत्तर

 

48

श्री. शेखर गोविंदराव निकम

चिपळूण

 

49

श्री. राजेश नरसिंगराव पाटील

चंदगड

 

50

श्री. मुश्रीफ हसन मियालाल

कागल

दादा गट

51

श्री. जयंत राजाराम पाटील

इस्लामपूर

साहेब गट

52

श्री. मानसिंग फत्तेसिंगराव नाईक

शिराळा

 

53

श्रीमती. सुमन आर.आर पाटील

तासगाव-कवठे महांकाळ

साहेब गट

राष्ट्रवादीतील विधानपरिषदेतील विद्यमान आमदार

अ.क्र

विद्यमान आमदार

मतदारसंघ

1

श्री. रामराजे नाईक निंबाळकर

आमदारांमार्फत निवड

2

श्री. अमोल मिटकरी

आमदारांमार्फत निवड

3

श्री. बाबाजानी दुराणी

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था

4

श्री. शशिकांत शिंदे

आमदारांमार्फत निवड

5

श्री. एकनाथ खडसे

आमदारांमार्फत निवड

6

श्री अनिकेत तटकरे

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग - स्थानिक स्वराज्य संस्था

7

श्री. विक्रम काळे

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ

8

श्री. सतीश चव्हाण

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ

9

श्री. अरुण लाड

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ

राष्ट्रवादीतील लोकसभा खासदार

अ.क्र

विद्यमान लोकसभा खासदार

मतदारसंघ

1

श्री सुनील तटकरे

रायगड, महाराष्ट्र

2

श्रीमती. सुप्रिया सुळे

बारामती, महाराष्ट्र

3

श्री.पी.पी.मोहम्मद फैजल

लक्षद्वीप महाराष्ट्र

4

डॉ अमोल कोल्हे

शिरूर, महाराष्ट्र

5

श्री. श्रीनिवास पाटील

सातारा, महाराष्ट्र

राष्ट्रवादीतील राज्यसभा खासदार

अ.क्र

विद्यमान राज्यसभा खासदार

मतदारसंघ

1

श्री.शरदचंद्र गोविंदराव पवार

 महाराष्ट्र

2

श्री प्रफुल्ल पटेल

 महाराष्ट्र

3

श्रीमती. फौजिया खान, खासदार

 महाराष्ट्र

4

श्रीमती. वंदना चव्हाण

 महाराष्ट्र

राष्ट्रवादी केंद्रीय समिती पदाधिकारी

NAME

POSITION

Mr. Sunil Tatkare

Chairman

Mr. Hemant Takle

Convenor

Mr. T.P.Peethambaran Master

Member

Mr. Y.P.Trivedi

Member

Mr. S.R.Kohli

Member

Dr. Fauzia Khan

President, Nationalist Mahila Congress

Mr.Dheeraj Sharma

President, Nationalist Youth Congress

Smt. Supriya Sule

MP, President, Rashtrwadi Yuvati Congress

Mr.Shabbir Ahmed Vidrohi

Chairman Minorities Department

Mr.Mani C. Kappan

Convenor, Department Of Overseas Indians

Mr. Virendra Singh

Chairman, Cooperative Department

Mr. Prakash Mandotia

Chairman, Foreign Affairs Department

Mr. Y.P.Trivedi

Convenor, Economic Affairs Cell

Shri Jai Bhagwan

Convenor,Panchayati Raj Cell

Shri D. P. Sharma

Chairman Consumers Affairs Department

Shri Govindbhai Parmar

Chairman Safai Kamgar

Shri Shyamal Kumar Saha

Secretary National Kisan Cell

Ms. Sonia Doohan,

President, Nationalist Student Congress

राष्ट्रवादी पक्षाचे राज्य प्रमुख पदाधिकारी

अ.क्र.

पदाधिकारी नाव

पद

1

श्री डी.डी. अधिकारी

आसाम अध्यक्ष

2

श्री. राणा रणवीर सिंग

संयोजक, बिहार

3

श्री नोबेल वर्मा

छत्तीसगडचे अध्यक्ष

4

श्री जोस फिलिप डिसूझा

गोव्याचे अध्यक्ष

5

श्री जयंत पटेल (बॉस्की)

गुजरातचे अध्यक्ष

6

मराठा वीरेंद्र वर्मा

हरियाणाचे अध्यक्ष माकार्यवाह

7

श्री कमलेश कुमार सिंह

झारखंडचे अध्यक्ष

8

श्री आर हरी

कर्नाटक अध्यक्ष

9

श्री. पी.सी. चाको

केरळचे अध्यक्ष

10

श्री. हेमंत पटेल

मध्यप्रदेशचे अध्यक्ष

11

श्री जयंत राजाराम पाटील

महाराष्ट्र अध्यक्ष

12

श्री सोराम इबोयामा सिंग

मणिपूरचे अध्यक्ष

13

श्री सालेंग ए संगमा, आमदार

मेघालय अध्यक्ष, माजी मंत्री, मेग...

14

श्री वान्थुंगो ओडियुयो

नागालँड संयोजक

15

श्री बिक्रम स्वेन

ओरिसाचे अध्यक्ष

16

श्री गुरिंदर सिंग रूपराय

पंजाब संयोजक

17

श्री उम्मेद सिंग चंपावत

राजस्थानचे अध्यक्ष

18

श्री. पी. के. नरेश कुमार

तामिळनाडूचे अध्यक्ष

19

श्री समला रवेंदर

तेलंगणाचे अध्यक्ष

20

श्री दिव्या नौटियाल

उत्तराखंडचे अध्यक्ष

21

श्री प्रबोधचंद्र सिन्हा

पश्चिम बंगालचे अध्यक्ष

22

डॉ. आर. एस. उमा भारती

अंदमान आणि निकोबार (बेट UT)) प्

23

श्री धवल देसाई

दादरा आणि नगर हवेली (UT) अध्यक्ष

24

श्री धवल देसाई

दमण आणि दीव अध्यक्ष

25

श्री के.एम. अब्दुल मुतालिफ

लक्षद्वीपचे अध्यक्ष

26

श्री एस. स्वामीनाथन

पुद्दुचेरी संयोजक

27

डॉ योगानंद शास्त्री यांनी

दिल्ली (N.C.R.) अध्यक्ष

राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा प्रमुख पदाधिकारी

अ.क्र.

पदाधिकारी नाव

पद

1

श्री माणिकराव विधाते

अहमदनगर शहर

2

श्री अभिजीत भगवान खोसे (कार्याध्यक्ष)

अहमदनगर शहर

3

श्री राजेंद्र फाळके

अहमदनगर ग्रामीण

4

श्री संदीप देशमुख

अहमदनगर ग्रामीण

5

श्री. विजय देशमुख

अकोला शहर

6

श्री. सय्यद युसूफ अली (कार्याध्यक्ष)

अकोला शहर

7

श्री. संग्राम गावंडे

अकोला ग्रामीण

8

श्री. प्रशांत डावरे

अमरावती शहर

9

श्री. सुनील वराधे

अमरावती ग्रामीण

10

श्री. ख्वाजा शरीफउद्दीन मुल्ला

औरंगाबाद शहर

11

श्री. अभिषेक देशमुख (कार्याध्यक्ष)

औरंगाबाद शहर

12

श्री. कैलास पाटील

औरंगाबाद ग्रामीण

13

श्री. राजेश्वर चव्हाण

बीड

14

श्री. नाना पंचबुद्धे

भंडारा

15

श्री. शोहेब अशफाक खान

भिवंडी शहर

16

श्री. नजीर काझी

बुलढाणा

17

श्री. राजीव कक्कड

चंद्रपूर शहर

18

श्री. राजेंद्र वैद्य

चंद्रपूर ग्रामीण

19

श्री. रणजीत राजे भोसले

धुळे शहर

20

श्री. प्रशांत गुलबराव भदाणे

धुळे ग्रामीण (कार्याध्यक्ष) अध्यक्ष)

21

श्री. रवींद्र वसेकर

गडचिरोली

22

श्री. गंगाधर परशुरामकर

गोंदिया

23

श्री. दिलीप चव्हाण

हिंगोली (प्रभारी)

24

श्री. अशोक सीताराम लाडवंजारी

जळगाव शहर

25

श्री. रवींद्र पाटील

जळगाव ग्रामीण

26

श्री. विलास पाटील (कार्याध्यक्ष)

जळगाव ग्रामीण

27

श्री. बाळासाहेब वाकुळणीकर (कार्याध्यक्ष)

जालना

28

श्री. निसार देशमुख

जालना

29

श्री. आर.के. पोवार

कोल्हापूर शहर

30

श्री. ए.वाय. पाटील

कोल्हापूर ग्रामीण

31

श्री. मकरंद सावे

लातूर शहर

32

श्री. प्रशांत पाटील (कार्याध्यक्ष)

लातूर शहर

33

श्री. अफसर शेख (कार्याध्यक्ष)

लातूर ग्रामीण

34

श्री. बाबासाहेब पाटील

लातूर ग्रामीण

35

श्री. अरुण बाबाजी कदम

मीरा भाईंदर

36

श्रीमती फैमिदा खान (कार्याध्यक्ष)

मुंबई उत्तर

37

श्री. इंद्रपाल सिंग

मुंबई उत्तर

38

श्री. अर्शद अमीर

मुंबई उत्तर मध्य

39

श्री. धनंजय पिसाळ

मुंबई ईशान्य

40

श्री. अजित रावराणे

मुंबई उत्तर पश्चिम

41

श्री. मानव वैंकटेश (कार्याध्यक्ष)

मुंबई दक्षिण मध्य

42

श्री. रमेश परब

मुंबई दक्षिण मध्य

43

श्री. दुनेश्‍वर पेठे

नागपूर शहर

44

श्री. राजू राऊत (कार्याध्यक्ष)

नागपूर ग्रामीण

45

श्री. शिवराज बाबा गुजर

नागपूर ग्रामीण

46

डॉ सुनील कदम यांनी

नांदेड शहर

47

श्री. हरिहर भोसीकर

नांदेड ग्रामीण

48

डॉ अभिजीत मोरे

नंदुरबार

49

श्री. रवींद्र पगार

नाशिक (दिंडोरी लोकसभा)

50

श्री. रंजन ठाकरे

नाशिक शहर

51

श्री. कोंडाजी आव्हाड

नाशिक लोकसभा

52

श्री. विष्णुपंत म्हैसधुणे (कार्याध्यक्ष)

नाशिक लोकसभा

53

श्री. शेख आशिफ शेख रशीद

मालेगाव

54

श्री. अनंत भोसले (कार्याध्यक्ष)

मालेगाव

55

श्री. एजाज अहमद मोहम्मद उमर (कार्याध्यक्ष)

मालेगाव

56

श्री. शकील अहमद फतेह मोहम्मद शाह (कार्यकारी अध्यक्ष)

मालेगाव

57

श्री. शाहिद अहमद रफिक अहमद रेशमवाला (कार्यकारी अध्यक्ष)

मालेगाव

58

श्री. नामदेव भगत

नवी मुंबई शहर

59

श्री. जी एस पाटील (कार्याध्यक्ष)

नवी मुंबई शहर

60

श्री. सुरेश बिराजदार

उस्मानाबाद

61

श्री. संजय पाटील दुधगावकर (कार्याध्यक्ष)

उस्मानाबाद

62

श्री. सुनील भुसारा

पालघर

63

श्री. सतीश पाटील

पनवेल शहर

64

श्री. शिवदास कांबळे (कार्याध्यक्ष)

पनवेल शहर

65

श्री. ताहिर अब्दुल रहमान पटेल (कार्याध्यक्ष)

पनवेल शहर

66

श्री. जाकर अहमद मोईन खान (कार्याध्यक्ष)

परभणी शहर

67

श्री. प्रताप देशमुख

परभणी शहर

68

श्री. संतोष बोबडे (कार्याध्यक्ष)

परभणी शहर

69

श्री. बाबाजानी दुर्राणी

परभणी ग्रामीण

70

श्री. किरण सोनटके (कार्याध्यक्ष)

परभणी ग्रामीण

71

श्री. अजित दामोदर गव्हाणे

पिंपरी चिंचवड ग्रामीण

72

श्री. प्रशांत जगताप

पुणे शहर

73

श्री. प्रदिप गरटकर

पुणे ग्रामीण

74

श्री. प्रशांत कृष्णराव शितोळे (कार्याध्यक्ष)

पिंपरी चिंचवड शहर

75

श्री. सुरेश लाड

रायगड

76

फजल दस्तगीर शेख (कार्याध्यक्ष)

पिंपरी चिंचवड (शहर)

77

श्री. राहुल हनुमंत भोसले (कार्याध्यक्ष)

पिंपरी चिंचवड शहर

78

श्री. जगदीश शंकर शेट्टी (कार्याध्यक्ष)

पिंपरी चिंचवड शहर

79

श्री. बाबाजी जाधव

रत्नागिरी

80

श्री. संजय बजाज

सांगली शहर

81

श्री. अविनाश पाटील

सांगली ग्रामीण

82

श्री. बाबासाहेब मुळीक (कार्याध्यक्ष)

सांगली ग्रामीण

83

श्री. सुनील माने

सातारा

84

श्री. सागर साळुंखे

सातारा लोकसभा

85

श्री. अमित सामंत

सिंधुदुर्ग

86

श्री. भरत जाधव

सोलापूर शहर

87

श्री. संतोष पवार (कार्याध्यक्ष)

सोलापूर शहर

88

श्री. बळीरामकाका साठे

सोलापूर ग्रामीण

89

श्री. उमेश पाटील (कार्याध्यक्ष)

सोलापूर ग्रामीण

90

श्री. आनंद परांजपे

ठाणे शहर

91

श्री. सुरेश गोपीचंद म्हात्रे

ठाणे ग्रामीण

92

श्री. जगन्नाथ आप्पा शिंदे

कल्याण डोंबिवली

93

श्री. वंडार पुंडलिक पाटील (कार्याध्यक्ष)

कल्याण डोंबिवली

94

श्रीमती. पंचम ओमी कलानी

उल्हासनगर शहर

95

श्री. राजाराम मुळीक

वसई विरार

96

श्री. सुनील राऊत

वर्धा

97

श्री. बाळासाहेब जयवंतराव पाटील

यवतमाळ

98

श्री. चंद्रकांत ठाकरे

वाशिम

राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख आघाडीचे पदाधिकारी

अ.क्र.

पदाधिकारी नाव

पद

1

श्रीमती. विद्याताई चव्हाण

प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

2

श्री. महेबुब शेख

प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी

3

श्री. सुरज चव्हाण

प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

4

श्री. रविकांत वर्पे

प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

5

श्री. सुनील गव्हाणे

प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी

6

कुमारी. सक्षणा सलगर

प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी

7

डॉ जानबा म्हस्के

कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सेवादल)

8

श्री. राजेंद्र लवणघरे (देशमुख)

कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सेवादल)

9

अॅड. जयदेव गायकवाड

राज्य प्रमुख, सामाजिक न्याय विभाग

10

प्राध्यापक श्री. सुनील मगरे

कार्याध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग

11

श्री. ईश्वर बाळबुधे

राज्यप्रमुख, इतर मागासवर्गीय

12

अ‍ॅड. मोहम्मद खान पठाण

राज्यप्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभाग

13

अॅड. आशिष देशमुख

प्रदेश प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कायदेशीर सेल

14

श्री. शंकर अण्णा धोंडगे

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा

15

डॉ सुनील जगताप

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल

16

डॉ समीर दलवाई

प्रदेश समन्वयक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर्स सेल

17

श्री. सारंग पाटील

आय.टी.चे प्रमुख. सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

18

श्री. प्रदिप सोळुंके

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष प्रशिक्षण विभाग

19

श्री. शिवाजी खटकाळे

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल

20

श्री. उमेश पाटील

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय सेल

21

श्री. भारद्वाज पगारे

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहकार सेल

22

श्री. जयंत जळगावकर

कार्य प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहकार सेल

23

श्री. बाबासाहेब पाटील

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चित्रपट, कला व सांस्कृतिक सेल

24

श्री. सुहास तेंडुलकर

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शारीरिक अपंग सेल

25

श्री. धनराज फ्यूसे

अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (विदर्भ उद्योग व व्यापार सेल)

26

श्री. हिरालाल राठोड

राज्य प्रमुख, व्हीजेएनटी सेल

27

श्री. राजेंद्र जाधव

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जलसिंचन सेल

28

श्री. मुकेश गांधी

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (भाषिक अल्पसंख्यांक सेल)

29

श्री. चंदू पाटील

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मच्छीमार सेल

30

श्री. सुभाष मालपाणी

प्रदेश प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी सेल

31

श्री. नागेश साळुंखे

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी टॅक्स प्रॅक्टिशनर सेल

32

श्री. सरदार जर्नेलसिंग गाडीवाले

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शीख समाज

33

श्रीमती. प्रिया पाटील

राज्य प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एलजीबीटी सेल

34

श्री. नीरज महांकाळ

राज्य प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डिजिटल मीडिया रिसर्च आणि कम्युनिकेशन विभाग

35

श्री. नागेश एकनाथ फाटे

अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग व व्यापार सेल)

36

डॉ. संदिप माणिकराव तांबारे

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यसनमुक्ती सेल

37

श्री. सोनबा शिवाजी चौधरी

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-ज्येष्ठ नागरिक सेल

38

प्राध्यापक श्री. राजू तोडसाम

प्रदेश प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आदिवासी सेल

39

श्री. विलास बडवाईक

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, असंघटित कामगार

40

श्री. सुहास नानासासाहेब उभे

फ्रंटल आणि सेल समन्वयक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

41

श्री. दीपक शिर्के

प्रदेश प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माळी सैनिक विचार सेल

42

श्री. अमित देसाई

निमंत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अभियंता सेल

43

श्री. प्रभाकर देशमुख

निमंत्रित राष्ट्रवादी काँग्रेस, कृषी पदवीधर सेल

    दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स झळकत आहेत. या बॅनर्सवर शरद पवारांचेही फोटो आहेत. यामुळे संतापलेल्या शरद पवारांनी अजित पवारांच्या गटाला परवानगीशिवाय फोटो वापरण्यास मनाई केली आहे. माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरण्यात यावा. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. याऊलट ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझे आता वैचारिक मतभेद आहेत. त्यांनी यापुढे माझ्या परवानगीनेच माझा फोटा वापरावा. त्या पक्षानेच माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरू नये, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे उद्या मुंबईत शक्तिप्रदर्शन होत आहे. शरद पवार आणि अजित पावर यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. पण यामुळे राज्यभरातला कार्यकर्ता संभ्रमात सापडल्याचे दिसून येत आहे. शरद पवारांनी उद्या राष्ट्रवादीची मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. अजित पवारांसह गेलेल्या आमदारांनाही परत येण्याच्या अल्टिमेटमचा उद्याचा अखेरचा दिवस आहे. तर दुसरीकडे उद्याच अजित पवारांनीही मोठे शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरवले आहे. वांद्रे एमईटी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादीतल्या फुटीमुळे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संभ्रमात आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता पक्षनाव व चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला पुढील काही महिन्यात सुनावणी घेऊन निर्णय द्यावा लागेल. आयोग कोणत्या गटाला पक्षनाव व चिन्ह देणार, त्यानुसार विधानसभा अध्यक्षही व्हिप, अपात्रता व अन्य मुद्द्यांचा विचार करतील. विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाचा निर्णय अजित पवारांच्या बाजूने दिला गेल्यास शरद पवार गटाला उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याशिवाय पर्याय नाही. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत असून विधानसभा अध्यक्षांना व्हिप कोणाचा चालणार आणि विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे याबाबतही निर्णय द्यावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार असून ते काही आमदारांबरोबर सत्ताधारी पक्षाबरोबर गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. मूळ पक्ष कोणाचा,या वादावर निर्णयासाठी बराच कालावधी लागेल. तोपर्यंत ४५ आमदार असलेला काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याने विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. पक्षप्रमुखाला प्रतोद नियुक्तीचा अधिकार असल्याचा निर्वाळा शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला आहे. 

अधिक विश्लेषण लवकरच.....


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी-
पुस्तक किंमत-750/-रु.
प्रकाशनपूर्व सवलतीची किंमत-500/-रु.
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.