Monday, 8 October 2018

भाजप-सेना युती झाली नाहीतर मावळ मधून लोकसभेला भाजपचा उमेदवार- आमदार लक्ष्मण जगताप

भाजप पक्ष कदापि सोडणार नाही- आमदार लक्ष्मण जगताप यांचा खुलासा  


भारतीय जनता पार्टीव्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढणार नाही, असा खुलासा या पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व चिंचवडचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला आहे. यामुळे त्यांच्या संदर्भात उठलेल्या विविध चर्चांना त्यांनीच पूर्ण विराम दिला आहे. मात्र, भाजप-सेना युती झाली नाहीतर मावळ मधून लोकसभेला भाजपचे उमेदवार असतील याचाही खुलासा त्यांनी केला आहे. 



पिंपरी-चिंचवड मधील राजकीय सद्यस्थितीचे अवलोकन

* चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी मावळमधून लढविण्याचा मनोदय यापूर्वीच जाहीर केला आहे.
* शिवसेनेशी युती झाल्यास विद्यमान खासदार म्हणून सेनेकडे मावळ लोकसभा कायम राहण्याची शक्यता.
* मावळ लोकसभा मतदारसंघात आमदारांचे संख्याबळही भाजपचे मित्रपक्षापेक्षा मावळमध्ये अधिक आहे. पिंपरी-चिंचवडसह पनवेल या मतदारसंघातील महापालिका व वडगाव मावळ आणि लोणावळा नगरपरिषद पक्षाच्या ताब्यात आहे. अशी स्थिती असूनही सध्या शिवसेनेकडे असलेल्या मावळवर भाजपचा दावा युती होण्याच्या दृष्टीकोनातून टिकणारा नाही.
* भाजप-सेना युती झाल्यास सेनला मतदारसंघ गेल्यावर मावळमधून भाजपकडून लढविण्याची इच्छा/निर्धार आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना सोडून द्यावा लागेल.
* गेली 14 वर्षे आमदार असलेले लक्ष्मणभाऊ जगताप मंत्रिपदाचे प्रबळ हक्कदार आहेत परंतु भाजपमधील त्यांची पहिलीच टर्म आहे. जिल्ह्यातून मावळ विधानसभेचे आमदार भेगडे भाजपमधून सलग ३ वेळा निवडून आलेले आहेत. भाजप निष्ठावंत म्हणून भेगडे देखील मंत्रिपदाचे हक्कदार आहेत. तर अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री यांच्या जवळचे मानले जातात, पालिकेतील महापौरपदी समर्थकांची निवड करून वर्चस्व सिद्ध केलेले असून ते देखील महामंडळ अथवा मंत्रिपदाचे दावेदार आहेत. 
* आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना त्यांच्या समर्थकांना पालिकेतील प्रमुखपदी/महापौरपदी नियुक्ती करता आलेली नाही.
* मंत्रिपदाचे प्रबळ हक्कदार आहेत परंतु भाजपमधील निवड प्रक्रियेतील काही निकष/पात्रतेत त्यांचा समावेश होत नाही.
* आझम पानसरे स्थायी समिती अध्यक्ष, महापौर झाले पण त्या पुढे त्यांना राजकीय दृष्ट्या अपेक्षित यश मिळाले नाही.  महापालिका विजयात महत्वाचा वाटा उचलला असताना ही आझम पानसरे यांच्यावर भाजप मध्ये ही अन्याय होतो आहे ही  भावना समर्थकांमध्ये आहे. आझम पानसरे देखील चांगल्या पदाचे आशावादी आहेत. त्यांना भाजपामध्ये सामावून घेण्यात  आमदार लक्ष्मण जगताप यांची महत्वाची भूमिका होती. त्यांनाही काहीही देता आले नाही याचे देखील शल्य राहणारच.
* २०१४ निवडणुकपूर्व भाजपमध्ये प्रवेश केलेले विद्यमान आमदार मंत्रिमंडळ प्रतिक्षेत आहेत तसेच यांना महामंडळही दिलेले नाही- 
डॉ. अनिल बोंडे, डॉ. विजयकुमार गावित, राजेंद्र पाटणी, किसन कथोरे, डॉ. सुनील देशमुख, स्रेहलता कोल्हे, अनिल गोटे, मंदा म्हात्रे, प्रकाश भारसाकळे, अमल महाडिक, मोनिका राजळे, भारती लव्हेकर, प्रशांत ठाकूर, संजय सावकारे, लक्ष्मणभाऊ जगताप, महेश लांडगे हे भाजपात बाहेरून आलेले आमदार आहेत. यापैकी देशमुख व ठाकूर वगळता कुणालाही मंत्रीपद वा साधे महामंडळदेखील मिळालेले नाही.
* राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. साधारणत: नऊ नवे चेहरे मंत्रिमंडळात येतील. त्यात बाहेरून आलेल्यांपैकी किमान दोघांना तरी संधी दिली पाहिजे अशी मागणी आहे तरी देखील भाजपच्या मंत्रिपद निवड प्रक्रियेतील काही निकष/पात्रतेत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व अपक्ष आमदार महेश लांडगे यांचा समावेश होत नाही.
* कोणत्याही पक्षात जाणार नाही ; भाजपामध्येच शेवटपर्यंत कार्यरत राहणार असल्याचा आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा खुलासा
* वरील सर्व राजकीय सद्यस्थितीचे अवलोकन केल्यास कोणतेही मंत्रिपद व साधे महामंडळदेखील मिळणार नाही, समर्थकांची महत्वाच्या पदावर निवड करून घेता येत नाही, जागा वाटपात भाजपला मावळ लोकसभा मिळाला नाही तर खासदारकी लढविण्याची इच्छा पूर्ती करता येणार नाही, लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार सोडून द्यावा लागेल. महापालिकेतील एक हाती सत्ता केंद्र नाहीं, या सर्व राजकीय सद्यस्थितीचे अवलोकन करणे आवश्यक असल्याचे काही जाणकारांचे मत आहे.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

Saturday, 6 October 2018

पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर; 11 डिसेंबरला निकाल

मध्य प्रदेश, मिझोरम, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर



केंद्रीय निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, मिझोराम, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका १५ डिसेंबरपूर्वी घेण्याची घोषणा आज केली. तसेच या निवडणुकांसाठी आचारसंहिता आजपासून लागू होत असल्याचेही निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ओ. पी. रावत यांनी सांगितले. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्पा १२ नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान २० नोव्हेंबर रोजी होईल. मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये २८ नोव्हेंबर रोजी, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभेसाठी ७ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होणार असल्याचे रावत यांनी जाहीर केले आहे.या पाच विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ११ डिसेंबर रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, पत्रकार परिषदेची वेळ दुपारी साडे बारा ऐवजी बदलून दुपारी 3 वाजता करण्यात आल्याबद्दल निवडणूक आयोगाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
निवडणूक आयोगानं पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 28 नोव्हेंबरला मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. तर राजस्थान आणि तेलंगणामध्ये 7 डिसेंबरला निवडणूक होईल. छत्तीगसडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 12 नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होईल. या पाचही राज्यांचे निकाल 11 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आहे. तेलंगणामध्ये टीआरएसने नुकतीच विधानसभा विसर्जित केली होती. ठरलेल्या वेळेआधी निवडणुका व्हाव्या अशी त्यांची इच्छा होती. त्याठिकाणी पुढील वर्षी निवडणूक होणार होती. तर मिझोरममध्ये काँग्रेसची सत्ता आहे.


निवडणूक कार्यक्रम असा

छत्तीसगड पहिला टप्पा (यात नक्षलग्रस्त भागात मतदान होणार) 
अधिसूचना : 16 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर
अर्जांची छाननी : 24 ऑक्टोबर
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख : 26 ऑक्टोबर
मतदान : 12 नोव्हेंबर
एकूण जागा : 18
छत्तीसगड दुसरा टप्पा 
एकूण जागा : 72
अधिसूचना : 26 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 2 नोव्हेंबर
अर्जांची छाननी : 3 नोव्हेंबर
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख : 5 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर

मध्यप्रदेश आणि मिझोरम 
अधिसूचना : 2 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 9 नोव्हेंबर
अर्जांची छाननी : 12 नोव्हेंबर
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर
मतदान : 28 नोव्हेंबर
राजस्थान आणि तेलंगाना
अधिसूचना : 12 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 19 नोव्हेंबर
अर्जांची छाननी : 20 नोव्हेंबर
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर
मतदान : 7 डिसेंबर
सर्व राज्यांचे निकाल 11 डिसेंबरला जाहीर होतील. 

कोणत्या राज्यात कधी संपणार विधानसभांचा कार्यकाळ 
छत्तीसगड : 5 जानेवारी 2019
मध्यप्रदेश : 7 जानेवारी 2019
राजस्थान : 20 जानेवारी 2019 
मिझोरम : 15 डिसेंबर 2018

2013 ची स्थिती

पक्षमध्यप्रदेशछत्तीसगडराजस्थान
भाजप16549163
काँग्रेस583921
बसपा413
इतर3113
एकूण23090200
सध्याचे सरकारभाजपभाजपभाजप

लोकसभा निवडणूक 2014 ची स्थिती

पक्षमध्यप्रदेशछत्तीसगडराजस्थान
भाजप271025
काँग्रेस210
बसपा000
एकूण291125
सत्तेचे दावेदार
मध्यप्रदेश - शिवराज सिंह चौहान, कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया
छत्तीसगड - रमन सिंह, अजित जोगी, भूपेष बघेल, टीएस सिंहदेव
राजस्थान - वसुंधरा राजे सिंधिया, अशोक गेहलोत, सचिन पायलट
प्रत्येक ठिकाणी प्रचाराचे तीनच चेहरे : नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राहुल गांधी


निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह

निवडणूक आयोग आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार आहे. यासाठीची पत्रकार परिषद पूर्वनियोजित वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता होणार होती. पण आयोगाने ती अचानक पुढे ढकलून ३ वाजता ठेवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज दुपारी १ वाजता अजमेर येथे रॅली आहे, त्या पार्श्वभूमीवर आयोगाने पत्रकार परिषद पुढे ढकलल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. 


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


भाजप - सेना युती झाल्यास लक्ष्मण जगताप यांची भाजपला सोडचिट्ठी!

कोणत्याही पक्षात जाणार नाही ; भाजपामध्येच शेवटपर्यंत कार्यरत राहणार

भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचा खुलासा



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

आमदार जगताप यांनी याबाबत प्रसिध्दीपत्रक दिले आहे. या पत्रकात नमूद केले आहे की, मी यापुढे कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. भाजपामध्येच राहून भाजपासाठीच शेवटपर्यंत कार्यरत राहणार आहे. माझ्या या पुढच्या सर्व निवडणुकाही मी भाजपातर्फेच लढणार आहे. त्यामुळे भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पिंपरी चिंचवड शहरातून राष्ट्रवादी आणि अन्य पक्षही हद्दपार झाले आहेत. त्यामुळेच विरोधक अस्वस्थ झाले आहेत. त्या अस्वस्थतेतूनच माझ्या विरोधात अशा अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. माझ्या विरोधकांनी सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी अशा काही चुकीच्या सर्व्हेंचा आधार घेतला आहे. चुकीचा प्रचार आणि प्रसार करणे त्यांचा नित्याचाच ‘उद्योग’ आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांनाही विरोधकांची ही खेळी माहीत झाली आहे. भाजपाच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे झपाट्याने होत आहेत. त्याच जोरावर भाजपाचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे. सर्वसामान्यांपर्यंत भाजपाला पोहचविण्यात आम्ही यशस्वी होत आहोत. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे. मी भाजपामध्ये शेवटपर्यंत राहणार असून यापुढच्याही सर्व निवडणुका भाजपातर्फेच लढविणार असल्याचे आमदार जगताप यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

पिंपरी-चिंचवड मधील राजकीय सद्यस्थितीचे अवलोकन

* चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी मावळमधून लढविण्याचा मनोदय यापूर्वीच जाहीर केला आहे.
* शिवसेनेशी युती झाल्यास विद्यमान खासदार म्हणून सेनेकडे मावळ लोकसभा कायम राहील.
* मावळ लोकसभा मतदारसंघात आमदारांचे संख्याबळही भाजपचे मित्रपक्षापेक्षा मावळमध्ये अधिक आहे. पिंपरी-चिंचवडसह पनवेल या मतदारसंघातील महापालिका व वडगाव मावळ आणि लोणावळा नगरपरिषद पक्षाच्या ताब्यात आहे. सध्या शिवसेनेकडे असलेल्या मावळवर भाजपचा दावा युती होण्याच्या दृष्टीकोनातून टिकणारा नाही.
* भाजप-सेना युती झाल्यास सेनला मतदारसंघ गेल्यावर मावळमधून भाजपकडून लढविण्याची इच्छा आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना सोडून द्यावी लागेल.
* गेली 14 वर्षे आमदार असलेले लक्ष्मणभाऊ जगताप मंत्रिपदाचे प्रबळ हक्कदार आहेत परंतु भाजपमधील त्यांची पहिलीच टर्म आहे. जिल्ह्यातून मावळ विधानसभेचे आमदार भेगडे भाजपमधून सलग ३ वेळा निवडून आलेले आहेत. भेगडे देखील मंत्रिपदाचे हक्कदार आहेत. तर अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री यांच्या जवळचे मानले जातात, पालिकेतील महापौरपदी समर्थकांची निवड करून वर्चस्व सिद्ध केलेले असून ते देखील महामंडळ अथवा मंत्रिपदाचे दावेदार आहेत. 
* आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना त्यांच्या समर्थकांना पालिकेतील प्रमुखपदी/महापौरपदी नियुक्ती करता आलेली नाही.
* मंत्रिपदाचे प्रबळ हक्कदार आहेत परंतु भाजपमधील निवड प्रक्रियेतील काही निकष/पात्रतेत त्यांचा समावेश होत नाही.
* आझम पानसरे स्थायी समिती अध्यक्ष, महापौर झाले पण त्या पुढे त्यांना राजकीय दृष्ट्या अपेक्षित यश मिळाले नाही.  महापालिका विजयात महत्वाचा वाटा उचलला असताना ही आझम पानसरे यांच्यावर भाजाप मध्ये ही अन्याय होतो आहे ही भावना समर्थकांमध्ये आहे. आझम पानसरे देखील चांगल्या पदाचे आशावादी आहेत. त्यांना भाजपामध्ये सामावून घेण्यात आमदार लक्ष्मण जगताप यांची महत्वाची भूमिका होती. त्यांनाही काहीही देता आले नाही याचे देखील शल्य राहणारच.
* २०१४ निवडणुकपूर्व भाजपमध्ये प्रवेश केलेले विद्यमान आमदार मंत्रिमंडळ प्रतिक्षेत आहेत तसेच यांना महामंडळही दिलेले नाही- 
डॉ. अनिल बोंडे, डॉ. विजयकुमार गावित, राजेंद्र पाटणी, किसन कथोरे, डॉ. सुनील देशमुख, स्रेहलता कोल्हे, अनिल गोटे, मंदा म्हात्रे, प्रकाश भारसाकळे, अमल महाडिक, मोनिका राजळे, भारती लव्हेकर, प्रशांत ठाकूर, संजय सावकारे, लक्ष्मणभाऊ जगताप, महेश लांडगे हे भाजपात बाहेरून आलेले आमदार आहेत. यापैकी देशमुख व ठाकूर वगळता कुणालाही मंत्रीपद वा साधे महामंडळदेखील मिळालेले नाही.
* राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. साधारणत: नऊ नवे चेहरे मंत्रिमंडळात येतील. त्यात बाहेरून आलेल्यांपैकी किमान दोघांना तरी संधी दिली पाहिजे अशी मागणी आहे तरी देखील भाजपच्या मंत्रिपद निवड प्रक्रियेतील काही निकष/पात्रतेत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व अपक्ष आमदार महेश लांडगे यांचा समावेश होत नाही.
* कोणत्याही पक्षात जाणार नाही ; भाजपामध्येच शेवटपर्यंत कार्यरत राहणार असल्याचा आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा खुलासा

* वरील सर्व राजकीय सद्यस्थितीचे अवलोकन केल्यास कोणतेही मंत्रिपद व साधे महामंडळदेखील मिळणार नाही, समर्थकांची महत्वाच्या पदावर निवड करून घेता येत नाही, जागा वाटपात भाजपला मावळ लोकसभा मिळाला नाही तर खासदारकी लढविण्याची इच्छा पूर्ती करता येणार नाही, लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार सोडून द्यावा लागेल. महापालिकेतील एक हाती सत्ता केंद्र नाहीं, या सर्व राजकीय सद्यस्थितीचे अवलोकन करणे आवश्यक आहे  असे काही जाणकारांचे मत आहे.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

================================

पार्थ अजित पवार यांच्या उमेदवारीला शरद पवार यांची असमर्थता ; अजित पवार यांचे बैठकीत सूचक मौन  



राष्ट्रवादी पक्षाकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास लक्ष्मण जगताप इच्छुक!




====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================


पार्थ अजित पवार यांच्या उमेदवारीला शरद पवार यांनी असमर्थता दर्शवली असून पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली, तर पक्षबांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याना संधी कधी मिळणार? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार यांच्या प्रतीप्रश्नावर अजित पवार यांनी या बैठकीत सूचक मौन बाळगले असल्याचे समजते. दरम्यान मावळ मतदारसंघातून लक्ष्मण जगताप यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक केली असल्याची माहिती समोर आली आहे.राष्ट्रवादी पक्षाकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. भाजप - सेना युती झाल्यास लक्ष्मण जगताप भाजपला सोडचिट्ठी देतील अशी शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे संभाव्य इच्छुक उमेदवार म्हणून लक्ष्मण जगताप यांचा सुरु झालेला प्रवास राष्ट्रवादी ते शेकाप असा होऊन पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत भाजप पक्ष प्रवेशापर्यंत पोहोचला हा प्रवास आगामी लोकसभा निवडणुकीत पूर्ण गोलाकार होऊन पुन्हा राष्ट्रवादी पक्षाकडे चक्राकार पद्धतीने सुरु राहणार की काय अशी चर्चा सुरु आहे. अशी राजकीय उलथापालथ झाल्यास पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण ढवळून निघेल. मावळ लोकसभा मतदार संघाचा पवार यांनी आढावा घेतला. मतदार संघात पक्षाची बांधणीची माहिती घेतली. कोण कोण इच्छुक आहे याची माहिती घेतली. राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी आपण मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. संजोग वाघेरे यांनी मतदार संघातील राजकीय परिस्थितीची माहिती शरद पवार यांना दिली. शरद पवार यांनी यावेळी मावळातून राष्ट्रवादीचा खासदार निवडून आलाच पाहिजे. सर्वांनी एकदिलाने काम करा, अशा सूचना दिल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत दोन दिवस बैठक होत आहे. दोन दिवसांच्या या बैठकीत काँग्रेसकडील मतदारसंघांवर दावा सांगताना राष्ट्रवादी हा मतदारसंघ कशा प्रकारे जिंकणार याचा आढावा घेतला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील 48 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे 25 जागांची मागणी केली आहे. त्यातली एक जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादी आपल्या कोट्यातून देण्यास तयार आहे. राष्टावादी काँग्रेसला काँग्रेसकडून काही जागा बदलून हव्या आहेत. 2019 ची निवडणूक महत्वाची असल्याने या निवडणुकीत काहीही करून दोन आकडी जागा जिंकण्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. पुणे, औरंगाबाद, हातकणंगले, जालना या जागा राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे मागितलेल्या आहेत. तर राजू शेट्टी यांना आपल्या कोट्यातून हातकणंगलेची जागा देण्यास राष्ट्रवादी तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसकडून परभणी आणि अमरावती या जागा बदली करून हव्या आहेत. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने लढलेल्या जागा पुढीलप्रमाणे आहेत जळगाव, रावेर, बुलढाणा, अमरावती, भंडारा, परभणी, दिंडोरी, नाशिक, कल्याण, ठाणे, ईशान्य मुंबई, रायगडमावळ, बारामती, शिरूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, माढा,सातारा,कोल्हापूर अशा आहेत याशिवाय मुंबईतही राष्ट्रवादीला एक जागा वाढवून हवी आहे. मुंबईतील मुंबई उत्तर पश्चिम म्हणजे जिथून गुरुदास कामत यांनी निवडणूक लढवली ती जागा किंवा प्रिया दत्त लढवत असलेली मुंबई उत्तर मध्यची जागा देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. या व्यतिरिक्त काही जागांवर उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत त्यामध्ये ईशान्य मुंबई -संजय दिना-पाटील, ठाणे -संजीव नाईक, रायगड-सुनील तटकरे, बारामती - सुप्रिया सुळे, कोल्हापूर - धनंजय महाडिक, भंडारा-गोंदिया - प्रफुल्ल पटेल, नाशिक - छगन भुजबळ किंवा समीर भुजबळ, दिंडोरी - डॉ. भारती पवार, जळगाव - मनिष जैन, माढा - विजयसिंह मोहिते-पाटील, उस्मानाबाद - पद्मसिंह पाटील या नावांचा समावेश असून यांची नावं निश्चित झाल्याचे समजते आहे.



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

लोकसभा निवडणूक लढविणार नाही - शरद पवार यांनी केले स्पष्ट 


मी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे पुण्यातूनही निवडणूक लढविण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्ट करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातून निवडणूक लढविण्याचा चर्चेला पूर्णविराम दिला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवार यांनी पुणे लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक मुंबईत घेतली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री छगन भुजबळ असे सर्व महत्त्‍वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रदेशाध्यक्षांनी पुण्यातून निवडणूक लढविण्यासाठी कोण इच्छुक आहे का? अशी विचारणा केली. त्यावर उपस्थितांमधून कोणीच पुढे आली नाही. त्यानंतर प्रवक्ते अंकुश काकडे यांनी उभे राहून शरद पवारसाहेब तुम्हीच पुण्यातून निवडणूक लढवावी, तुम्ही उमेदवार असेल तर कोणाचाच विरोध राहणार नाही, टीव्‍ही चॅनलच्या माध्यमातून मागणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले. मात्र, त्यावर पवार यांनी लगेच माईक हातात घेत मी या आधीही लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे माझ्या उमेदवारीचा प्रश्न येत नाही. काकडे यांना वृत्त वाहिन्यांवर चर्चेची निमंत्रण येत असतात त्याचा त्यांनी आनंद घ्यावा असे सांगून या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. 



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

माजी आमदार बापू पठारे यांनी शहराध्यक्ष चेतन तुपे यांचा दावा खोडला


आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवार यांनी पुणे लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक मुंबईत घेतली या 
आढावा बैठकीत पुण्याचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी पक्षाची ताकद काँग्रेसपेक्षा कशी जास्त आहे याचा सविस्तरपणे आढावा सादर केला. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे नगरसेवक कसे जास्त आणि पालिका निवडणुकीत मिळालेले मतदान आणि त्याची टक्केवारीही सादर केली. मात्र, त्यानंतर माजी आमदार बापू पठारे यांनी ही पुण्यात पक्षाची ताकद एवढी नसून चेतन तुपे यांनी जी माहिती दिली त्यात बारामती आणि शिरूर मतदार संघात मोडणाऱ्या खडकवासला व हडपसर या मतदार संघातील आकडेवारीचा समावेश आहे. प्रत्यक्ष पुणे लोकसभा मतदार संघात एवढे नगरसेवक नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून देत त्यांनी पक्षाच्या शहरातील ताकदीचा दावा खोडून काढला त्यानंतर ही बैठक काही वेळातच संपविण्यात आली.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

Friday, 5 October 2018

समाविष्ट ११ गावांसाठी एकाच प्रभागाचा प्रस्ताव; आज प्रभाग रचना जाहीर होणार; २ नगरसेवकांची भर

फुरसुंगी-लोहगाव या नावे पुणे महापालिकेचा ४२ वा प्रभाग ; प्रभाग रचनेचा होणार प्रताप !



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================


पुणे महापालिकेचा नगरसेवकांची संख्या १६४ होणार


फुरसुंगी-लोहगाव या नावे पुणे महापालिकेच्या ४२ व्या प्रभाग रचनेचा प्रताप होणार आहे. नव्याने समाविष्ट ११ गावांसाठी एकाच प्रभागाचा प्रस्ताव असून आज प्रभाग रचना जाहीर होणार आहे. यानुसार नव्याने २ नगरसेवकांची भर पडून पुणे महापालिकेचा नगरसेवकांची संख्या आता १६४ होणार आहे. या विचित्र प्रभाग रचनेवर १२ ऑक्टोबर पर्यंत हरकती/सूचना मागवण्यात येणार असून १७ ऑक्टोबरला सुनावणी घेण्यात येणार आहे तर अंतिम प्रभाग रचना 20 ऑक्टोबर २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी 4 ऑक्टोबर २०१७ रोजी ११ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली या भागात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र प्रभाग रचना करण्याच्या निकषाप्रमाणे कोणताही समाविष्ट भाग रचनेच्या संकल्पनेत बसत नाही. सलग क्षेत्रफळ नसल्याने भौगोलिकदृष्ट्या न्यायास पात्र ठरत नाही. निवडणुका झाल्यातरी चारही भागांमध्ये विखुरलेल्या प्रस्तावित प्रभागातील नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागणार आहे. तरीही समाविष्ट गावांच्या भागासाठी 1 नव्याने प्रभाग अस्तित्वात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार या समाविष्ट भागाची लोकसंख्या २ लाख ३९ हजार नमूद करण्यात आली प्रभाग रचना नियमाप्रमाणे नगसेवकांची संख्या २ ने वाढत आहे. २ नगरसेवकांचा पुणे महापालिकेतील ४२ प्रभाग असणार आहे. या प्रभागाची रचना सर्वाधिक विचित्र असणार आहे. अशी रचना महाराष्ट्र राज्याच्याच काय देशाच्या पातळीवर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत आढळून येणार नाही. पुणे शहरातील चारही दिशांना असणाऱ्या भाग मिळून अफलातून प्रभाग रचना केली जाणार असून त्याची प्रारूप रचना आज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रभाग रचनेच्या निकषानुसार व नियमानुसार अशी रचना न्यायालयीन प्रक्रीयेत कितपत टीकेल हे आगामी काळात समजेल.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

महापालिका हद्दीत चौतीस गावांचा समावेश करण्याची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून रखडली होती. या पार्श्वभूमीवर या गावांच्या समावेशाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीरंग चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी अकरा गावे महापालिका हद्दीत घेणार असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने न्यायालयात सादर केले होते. ‘उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे पूर्णत: महापालिका हद्दीत घेण्यात आली आहेत. लोहगांव, साडेसतरा नळी, केशवनगर, धायरी, आंबेगाव, बावधन, शिवणे, उत्तमनगर, उंड्री ही गावे महापालिका हद्दीमध्ये अंशत: समाविष्ट करण्यात आली होती.उर्वरित तेवीस गावांचा समावेश करताना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, घनकचरा व्यवस्थापन, प्रस्तावित वर्तुळाकार मार्ग आणि अन्य पायाभूत सुविधांचा विचार करण्यात येईल आणि तीन वर्षांत त्याबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्यात येईल,’ असे राज्य शासनाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते.उरुळी देवाची, फुरसुंगी, लोहगांव (उर्वरित), शिवणे (उत्तमनगर), मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (साडेसतरानळी), शिवणे, आंबेगांव (खुर्द), आंबेगाव (बुद्रुक), उंड्री आणि धायरी या गावांचा समावेश करण्यात आला होता. तर अजून तेवीस गावांच्या समावेशाची प्रतीक्षा आहे. महापालिका हद्दीत गावांचा समावेश करावा यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार भीमराव तापकीर, योगेश टिळेकर आणि जगदीश मुळीक आग्रही होते. पालकमंत्री गिरीश बापट यांचा मात्र गावांच्या समावेशाला विरोध होता. त्यामुळे ही गावे टप्याटप्प्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातील काही गावे या आमदारांच्या मतदारसंघात असल्यामुळे त्यांची आग्रही भूमिका होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गावांच्या समावेशाला तत्त्वत: मंजुरी दिली होती. या संदर्भातील प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने सादर केल्यामुळे अकरा गावे महापालिका हद्दीत समावेश करण्याची अधिसूचना काढण्यात आली. मात्र उर्वरित तेवीस गावांच्या समावेशासाठी किमान तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. उर्वरित तेवीस गावांच्या समावेश केल्यानंतर पुन्हा सुधारीत प्रभाग रचना करावी लागणार आहे. त्यामुळे पुणे महापालिका प्रभाग संख्येत वाढ होऊन नगरसेवकांची संख्या देखील १० ते 15 ने वाढ होईल. महापालिकेचे क्षेत्रफळाच्या आकारात मोठ्या प्रमाणत वाढ होऊन महापालिकेचे देखील विभाजन सरकारच्या विचारात आहे. आगामी काळात या बदलाचा परिणाम राजकारणावर निश्चितच होईल.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

Wednesday, 3 October 2018

राजकारणातील घराणेशाही व घराणेशाहीतील राजकारण!

पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून लढणार!


राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणूकांची सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली असून, येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्यात येणार आहे. या बैठकीत स्थानिक पातळीवर नेत्यांचा कानोसा घेतला जाणार आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतरच अध्यक्ष शरद पवार उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेतील असे वाटते. मावळ लोकसभा मतदारसंघात अनेक प्रयोग करूनही राष्ट्रवादी कॉँग्रेसला यश मिळत नसल्याने आता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपला मुलगा पार्थ पवार  यांना येथून लढविण्याची तयारी केली असल्याची चर्चा आहे. मात्र अशा राजकीय चर्चा घडवून आणल्या जातात. गेल्या निवडणुकीतही शरद पवार शिरूर व इतर मतदारसंघातून चाचपणी करीत असल्याच्या चर्चा मध्यमातून केल्या जात होत्या. अनुकूल वातावरण तयार करणे व पक्षांतर्गत गट-तट प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. 
(मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी दिली तर यशाचे प्रमाण जाणून घेण्यासाठी अहवाल- पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संपर्क साधावा.)
महाराष्ट्रात व्यक्तीनिष्ठ आधारित प्रमुख राष्ट्रवादी व शिवसेना हे २ राजकीय पक्ष आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेची तिसरी पिढी सध्या कार्यरत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्रे शरद पवार, खासदार कन्या सुप्रिया सुळे, आमदार पुतण्या अजित पवार या पवार कुटुंबातील व्यक्तिंकडेच आहे. आता तिसरी पिढी सध्या कार्यरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तिसर्‍या पिढीतील दोन युवक राजकारणात आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या या दोघांवरच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पार्थ अजित पवार आणि रोहित राजेंद्र पवार हे दोन युवक आहेत. पार्थ हे अजित पवार यांचे जेष्ठ चिरंजीव आहेत. तर रोहित हे शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब यांचे नातू आहेत. रोहित पवार हे सध्या पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत; तर पार्थ पवार हे उद्योजक आहेत. त्यांचे परदेशात व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण झाले आहे. पार्थ दादा पवार युवा मंच महाराष्ट्रच्या माध्यमातून सामाजिकदृष्ट्या कार्यरत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ अजित पवार यांनी त्याचे मामा पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी तुळजापूर येथे गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचारात सहभाग घेऊन पदयात्रा काढली. या निमिताने राजकारणात सक्रीय झाल्याचेसमोर आले होते. पार्थ पवार अनेक दिवसांपासून शरद पवारांसोबत राजकीय कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नागपुरात विधिमंडळाचे कामकाज पाहण्यासाठी हजेरी लावली होती.  पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित राजेंद्र पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूक अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून लढविण्याचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र त्यांचे सासरे हडपसर मतदारसंघातून लढविण्याचा आग्रह करीत आहेत. पक्षातील काही पदाधिकारी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून लढविण्याचा आग्रह करीत आहेत. अशी चर्चा पक्षात आहे. अजित पवार यांनी मी बारामती मतदारसंघाशिवाय इतर कोणत्याही मतदारसंघात उभा राहणार नाही, अशी घोषणा दोन महिन्यांपूर्वी बारामती तालुक्यातील पणदरे येथील एका जाहीर सभेत बोलताना केली होती; त्यामुळे रोहित पवार यांना सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागत आहे.  अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा राजकारणात प्रवेश होऊ शकतो, असे सूतोवाच अजित पवार यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले होते. 'आताची पिढी मोठी झाली असून, त्यांचे निर्णय घेण्यास ते सक्षम आहेत. राजकारणात काम करताना स्थानिक कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतले जाते. माझ्या मुलांनी राजकारणात येऊ नये, असे मी मध्यंतरी म्हणालो होतो, परंतु जग आता बदलत आहे. मी कोणावर निर्णय लादणार नाही, कुणी आपल्या करियरचा निर्णय घेत असेल तर मी रोखू शकत नाही,'' असे सांगत अजित पवार यांनी पार्थच्या राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले. मावळ लोकसभा मतदारसंघातून गेल्या वेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आलेले राहुल नार्वेकर लढले होते; परंतु ते तिसर्‍या क्रमांकावर राहिले होते. या वेळी लोकसभा निवडणूक निकराने लढवायचा निर्धार राष्ट्रवादीने केला असल्याने पार्थ पवार यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय होऊ शकतो. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या शहरावर स्वतः अजितदादा पवार यांनी १५ वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवले आहे. परंतु, २०१४ पासून अजितदादांच्या पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वर्चस्वाला धक्का बसला आहे. हे सर्व पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे झाले. मावळ लोकसभा मतदार संघात पिंपरी-चिंचवडचा परिसर येतो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या परिसराचे अनेक वर्ष लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. 2009 पर्यंत शहराचा भाग बारामती लोकसभा मतदार संघात येत होता. त्यानंतर पुर्नरचना झाल्यानंतर मावळ लोकसभा मतदार संघाची स्थापना झाली आहे. 2009 मध्ये शिवसेनेकडून गजानन बाबर आणि 2014  मध्ये श्रीरंग बारणे निवडून आले आहेत.मावळ हा मतदारसंघ पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यांत विभागला गेला आहे. पुण्यातील चिंचवड, मावळ आणि पिंपरी हे तीन विधानसभा मतदारसंघ यात येतात. येथे राष्ट्रवादीची ताकद २०१४ पैकी मोठ्या प्रमाणात होती. तरीही २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांत येथे पक्षाला विजय मिळाला नाही. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. याशिवाय पिंपरी-चिंचवड, पनवेल या दोन मोठ्या महापालिकांसह लोणावळा, तळेगावदाभाडे या नगरपालिका आणि ग्रामपंचायती भाजपने काबिज केलेल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपची राजकीय स्थिती भक्कम आहे. तरीही भाजपची सर्व मदार पिंपरी-चिंचवड शहरावर असणार आहे. या मतदारसंघातून भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप हे निवडणुकीच्या मैदानात असतील अशी चर्चा आहे तर राष्ट्रवादीचे शहारध्यक्ष संजोग वाघेरे यांचे एकमेव नाव मावळच्या मतदारसंघात चर्चेत आहे.  या मतदारसंघात भाजपखालोखाल राष्ट्रवादीची ताकद आहे. लोकसभा मतदारसंघांची २००८ मध्ये पुनर्ररचना झाली. या पुनर्रचनेनुसार २००९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. पुनर्ररचनेत मावळ लोकसभा मतदारसंघ पिंपरी-चिंचवडपासून ते रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यापर्यंत विस्तारला आहे. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण आणि पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड आणि पिंपरी हे विधानसभा मतदारसंघ येतात. २००९ आणि २०१४ अशा दोन निवडणुका भाजप व शिवसेनेने एकत्र लढविल्या. या दोन्ही निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. दोन्ही वेळेस या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मावळ लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभवाला सामोर जावं लागल्यानंतर आता अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. पिंपरी चिंचवड तत्कालीन शहराध्यक्ष योगेश बेहल यांनीच दादांचे निर्णय चुकले असं सांगत दादांना घराचा आहेर दिला होता. आगामी निवडणुकीत स्वतः अजितदादांचे पुत्र मैदानात उतरल्यास राष्ट्रवादीचे सर्व नेते एकदिलाने पक्षाचेच काम करतीलच असे नाही. दुसरीकडे या मतदारसंघात भाजप प्रथम क्रमांकावर असल्याने अजितदादांचे पुत्र मैदानात आल्यास विजयासाठी झुंजावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
====================

राजकारणातील घराणेशाही व घराणेशाहीतील राजकारण


राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्रे शरद पवार, खासदार कन्या सुप्रिया सुळे, आमदार पुतण्या अजित पवार या पवार कुटुंबातील व्यक्तिंकडेच आहे. आता तिसरी पिढी सध्या सक्रीय होत आहे. दुसरया पिढीतील राजकीय वारसदारांची स्पर्धा आता तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचलेली आहे. 
स्वातंत्र्य चळवळीनंतर कॉंग्रेसचा चळवळीशी असलेला संबंध संपुष्टात आला आणि त्यामुळे तळागाळातील जनाधार टिकवणे यासाठी जाती, कुटुंब, सरंजाम, घराणे इ. पारंपारिक सामाजिक रचना यांचा आधार घेणे आले. जे कॉंग्रेसचे झाले तेच कमी-जास्त फरकाने इतर पक्षांचे झाले. आणीबाणी विरोधी, आणि मंडल आंदोलनातून उदयाला आलेले प्रादेशिक, समाजवादी नेते हे देखील घराणेशाहीचे राजकारण करताना दिसत आहेत. आज राहुल गांधी भले ‘युवराज’ म्हणून मिरवत असतील किंवा टीकांचे धनी होत असतील. पण गावोगावी असे युवराज, साहेब, सरकार आपापल्या घराण्याच्या गौरवशाली वारशाचा टिळा लावून मिरवू लागले त्याला पुष्कळ काळ लोटला. त्याला कारण राजकारणातील ‘चळवळ’ हे अधिष्ठान संपुष्टात येणे हे आहे. राष्ट्रीय स्तरावर भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची कन्या इंदिरा गांधी यांच्या आणि राज्यपातळीवर बाळासाहेब विखे-पाटील यांच्यापासून राजकारणातील घराणेशाहीचा अध्याय सुरू झाला. आज घराणेशाही नसलेला पक्ष शोधूनही सापडणार नाही. या घराणेशाहीचे केवळ राजकीयच नव्हे, तर अनेक सामाजिक-आर्थिक दुष्परिणाम आज देशाला भोगावे लागत आहेत. येत्या लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील घराणेशाहीच्या वाटचालीचा घेतलेला हा आढावा..भारतीय राजकारणाचा प्रवास लोकशाही नावाखाली सुरू असला, तरी त्याच्या नाडय़ा मात्र काही मोजक्या घराण्यांच्याच ताब्यात आहेत. त्यात नेहरू-गांधी घराणे अग्रस्थानी आहे. सर्वच पक्षांतील नेत्यांनी घराणेशाहीचा स्वीकार केला. त्यातूनच राजकारणात प्रस्थापित अशा मोजक्या कुटुंबांची सरशी होत राहिली आहे. सत्तास्थानी असलेल्या या कुटुंबांतील केवळ पहिली नावे बदलत गेली; मात्र वारशाच्या रूपाने आडनाव कायम राहिले. विश्वजित कदम, राजीव सातव, प्रतीक पाटील, प्रिया दत्त, मुकुल वासनिक, नीलेश राणे, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, राजीव राजळे, विजयसिंह मोहिते-पाटील, मनीष जैन, आनंद परांजपे, संजीव नाईक, संजय महाडिक, पूनम महाजन, हीना गावित इत्यादी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय उमेदवारांना घराण्याची राजकीय पाश्र्वभूमी आहे. मागील लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले ५४३ पकी १५६ खासदार हे कौटुंबिक राजकीय पाश्र्वभूमीतून आलेले होते. त्यात एकटय़ा काँग्रेसचे २०८ पकी ७८, राष्ट्रीय लोकदलाचे ५ पकी ५, राष्ट्रवादीचे ७ पकी ५, बिजू जनता दलाचे १४ पकी ६, बसपाचे २१ पकी ७, सपाचे २२ पकी ६, माकपचे १६ पकी ४ आणि भाजपचे ११६ पकी २२ खासदार हे राजकीय घराण्याच्या पाश्र्वभूमीचे होते. याच्या प्रमाणाची टक्केवारी काढली तर अजित सिंग यांचा राष्ट्रीय लोकदल प्रथम, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा द्वितीय, काँग्रेसचा तृतीय, तर भाजपचा शेवटून पहिला क्रमांक लागतो. मात्र, या घराणेशाहीबद्दल मत-मतांतरेही आहेत. काहींना राजकीय घराणेशाही ही लोकशाहीला मारक वाटते, काहींना ती समाजमनाने स्वीकारलेली अपरिहार्यता वाटते. तर नव्याने नेतृत्व करू इच्छिणाऱ्यांना घराणेशाही हा अडथळा वाटतो. राजकीय कुटुंबांचे राजकारण देशभरात कमी-अधिक प्रमाणात अस्तित्वात आहे. महाराष्ट्राचे राजकारण हे ठाकरे, पवार, पाटील, चव्हाण, मोहिते अशा मोजक्या कुटुंबांभोवती फिरत असल्याची चर्चा होते. महाराष्ट्राचे सध्याचे एकंदर राजकारण वरील चार-पाच घराण्यांभोवती फिरते आहे. त्या चार-पाच घराण्यांनी इतर जिल्हास्तरावरील घराण्यांना आपल्याशी एकरूप करून घेतले आहे. शरद पवार कुटुंब राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिले आहे. पवार कुटुंबाने स्थापन केलेल्या संस्था त्यांना राजकारणासाठी पूरक ठरल्या. मात्र, त्यापुढे जाऊन राज्याचे नेतृत्व किंवा इतर महत्त्वाच्या भूमिका कुटुंबाभोवतीच राहण्याचा महत्त्वाचा धागा आहे. प्रथम शहरी भागात आणि नंतर मराठवाडय़ात फोफावलेल्या शिवसेनेच्या नेतृत्वाने स्वत:ची आणि पक्षातील घराणेशाही सतत नाकारली. १९९२ साली शिवसेनेच्या संस्थापक सदस्यांपकी एक असलेले माधवराव देशपांडे यांनी उद्धव आणि राज यांच्या शिवसेनेतील राजकीय प्रवेशाला आक्षेप घेतला होता. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सामना’तून अग्रलेख लिहून त्यांच्यावर कडवी टीका केली होती. पुण्यात शरद पवारांची तिसरी पिढी, सांगलीत वसंतदादा पाटील यांची तिसरी पिढी, साताऱ्यात भोसले घराणे , सोलापुरात मोहितेंची तिसरी पिढी, सुशीलकुमार शिदे यांची दुसरी पिढी, नगरमध्ये विखेंची तिसरी पिढी, थोरात, राजळे, ढाकणे, गडाख, घुलेंची दुसरी पिढी, कोल्हापुरात मंडलिक, महाडिक, माने यांची दुसरी पिढी, नाशिकमध्ये भुजबळांची दुसरी पिढी, भाऊसाहेब हिरेंची तिसरी पिढी, जळगावात जैनांची दुसरी, विदर्भात नाईकांची दुसरी पिढी, तर मराठवाडय़ात शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांची दुसरी पिढी, गोपीनाथ मुंडेंची दुसरी पिढी, कोकणात शेकापच्या पाटील घराण्याची तिसरी पिढी, नारायण राणेंची दुसरी पिढी, अमरावतीत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची दुसरी पिढी, मुंबई-ठाणे पट्टय़ात गणेश नाईक, प्रकाश परांजपे यांची दुसरी पिढी अशी ही यादी भरपूर आहे. घराणेशाहीच्या प्राबल्यामुळे नवे नेतृत्व घडण्यात एक प्रकारे शिथिलता आली आहे. तालुका पातळीवर नव्या नेत्याची भावी आमदार म्हणून चर्चा होण्याच्या टप्प्यावरच राजकीय घराण्यांकडून त्याचे एकतर खच्चीकरण केले जाते किंवा सत्तास्थानात दुय्यम पद देऊन बोळवण केली जाते. घराणेशाहीच्या प्रभावावर मात करून राजू शेट्टी, बच्चू कडू यांनी केलेली कामे आणि अनुभव समोर ठेवता येतात. पण अशी उदाहरणे दुर्मीळच आहेत. राजकीय घराण्यांबाहेरच्या लोकांना सत्तेची संधी मिळाली तरच राजकारणाचे शुद्धीकरण होईल. घरातील वातावरणामुळे पुढच्या पिढीला त्या-त्या क्षेत्रातील बाळकडू मिळणे स्वाभाविक आहे. प्रोत्साहन आणि संधीही मिळणे साहजिक आहे राजकारणात गुणवत्ता नव्हे, घराणेशाही हीच मुख्य पात्रता ठरते. विशिष्ट घराण्यात जन्म घेतल्याने राजकारणाचे, नेतृत्वगुणाचे, संघटन कौशल्याचे, निर्णयक्षमतेचे बाळकडू आपसूकच मिळत असते, अशी स्तुति करणारांची धारणा आहे. राजकीय सत्ता ही लोकशाही मार्गाने, समाजातील अधिकाधिक लोकांना सामील करून घेत मिळविणे आणि लोकांच्या भल्यासाठीच राबविणे अभिप्रेत आहे. त्याच-त्या घराण्यांतील लोक राजकारणात दिसत असतील, तर सत्तास्थान विशिष्ट लोकांपुरतेच मर्यादित आहे आणि त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने सरंजामशाही टिकून राहिली आहे. असेही काहींचे मत आहे.
========================================

उमेदवार निश्चित करताना राजकीय पक्ष लोकशाही पद्धतीचा अवलंब करीत नाही म्हणून याचिका!

पंचायत समिती ते लोकसभेच्या निवडणुकीचे उमेदवार निश्चित करताना कोणतेही राजकीय पक्ष लोकशाही पद्धतीचा अवलंब करीत नाहीत. घराणेशाही आणि परंपरागत पद्धतीनेच उमेदवार देण्यात येतात. तेव्हा लोकशाही मार्गाने उमेदवार निवडण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर करण्यात आली होती. गोंदिया येथील मिलिंद कोतवाल यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. झेड.ए. हक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. हायकोर्टाने सदर याचिका जनहिताच्या श्रेणीत मोडणारी आहे अथवा नाही, त्याची शहानिशा करण्याचा आदेश रजिस्टारला दिला होता. कालांतराने याचिका तांत्रिक मुद्द्यांवर फेटाळण्यात आली होती. याचिकाकर्त्यानुसार, स्थानिक स्वराज्य संस्था ते संसदेपर्यंतच्या निवडणुकीत राजकीय पक्षाला वाटेल त्या उमेदवाराला तिकीट देण्यात येते. त्यावेळी तो उमेदवार जनतेच्या अथवा त्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पसंतीचा असेलच त्याची हमी देता येत नाही. त्यास्थितीत लोकशाही मूल्यांचे आणि धोरणांचे राजकीय पक्षांद्वारे पालन होत नाही, असा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे. अनेकदा निव्वळ घराणेशाहीने उमेदवार निवडले जातात. त्यामुळे उमेदवार हा जनतेवर थोपवल्या जातो. त्यास्थितीत लोकशाही मार्गाने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीच विविध मतदारसंघातील उमेदवार निवडावा. निवडून आलेल्या उमेदवारालाच राजकीय पक्षाने निवडणूक लढण्याचे तिकीट द्यावे. विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळवण्याकरिता राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ होते. तसेच गैरप्रकारदेखील होतात. ते टाळण्याकरिता पक्षांतर्गत निवडणुकीच्या मार्गाने निवडून आलेल्या उमेदवारालाच अधिकृत उमेदवारी देण्याबाबतचा आदेश निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना द्यावा, आदी मुद्दे या याचिकेत नमूद केले होते. (माहिती व संदर्भासाठी)
=============================================


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) pune

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

Monday, 1 October 2018

आता आमदार/खासदारांना देखील भरावे लागणार ऑनलाइन उमेदवारी अर्ज व शपथपत्र

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाइन शपथपत्र बंधनकारक!


सरपंच/नगरसेवकांप्रमाणे आता आमदार/खासदारांना देखील भरावा लागणार ऑनलाइन उमेदवारी अर्ज व शपथपत्र दाखल करावे लागणार आहे. हिमाचल प्रदेश व गुजरातच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरणे एनआयसी सेवांद्वारे ऑनलाइन शपथपत्र सादर करण्याचा यशस्वीपणे प्रयोग झाल्यानंतर आता आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी आता ऑनलाइन उमेदवारी अर्ज व शपथपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी आता ऑनलाइन शपथपत्र निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना दाखल करावे लागणार आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या (जिल्हा परिषद/पंचायत समिती/महापालिका/नगरपरिषद/ग्रामपंचायत) निवडणुकांसाठी यापूर्वीच ऑनलाइन उमेदवारी अर्ज व शपथपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया अंगीकृत केलेली नव्हती. गेल्या वर्षी झालेला हिमाचल प्रदेश व गुजरातच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरणे एनआयसी सेवांद्वारे ऑनलाइन शपथपत्र सादर करण्याचा यशस्वीपणे प्रयोग झाल्यानंतर आता आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी आता ऑनलाइन उमेदवारी अर्ज व शपथपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

सूचना :  अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने काळजीपूर्वक सूचना वाचाव्यात. ऑनलाईन फॉर्म भरताना उमेदवाराने सर्व आवश्यक  तपशीलांची पूर्तता करावि लागणार आहे. अचूकपणे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संपर्क साधावा.


शपथपत्र ई-फाइलिंग भरण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले मार्गदर्शकतत्त्वे (फॉर्म -16) खालीलप्रमाणे -: 

परिशिष्ट - ए. शपथपत्र ई-फाइलिंग भरण्यासाठी मार्गदर्शकतत्त्वे (फॉर्म -16)

नोंदणीचे पुढीलप्रमाणे टप्पे-: 

टप्पा क्र.1 -1: ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी आणि आपला शपथपत्र ऑनलाइन सबमिट करण्यासाठी www.eci.nic.in वर क्लिक करा.

टप्पा क्र. 2 - प्रथम, वापरकर्त्याने "नोंदणी करण्यासाठी सीटीसी" candidateaffidavit.nic.in क्लिक करून प्रथमच नोंदणी  करावी
अ) वापरकर्त्याने वैध मोबाइल नंबर आणि ईमेल-आयडी प्रविष्ट केला पाहिजे आणि पुढे जाणे आवश्यक आहे
बी) वापरकर्त्यास ओटीपी (वन टाइम पासवर्ड) मोबाइल नंबरवर आणि विशिष्ट ईमेल-आयडीवर एसएमएस मिळेल.
सी) वापरकर्त्यास ओटीपी प्रविष्ट करण्याची आणि पुढे जाण्याची आवश्यकता आहे.
डी) नंतर राज्य, प्रथम नाव, आडनाव यासारख्या तपशीलांमध्ये भरा.
ई) संकेतशब्द सेट करा
एफ) "नोंदणी" वर क्लिक करा आणि यशस्वी नोंदणीनंतर, लॉग इन करा आणि फाइल प्रतिज्ञापत्र.

टप्पा क्र.- 3. नोंदणीकृत मोबाइल नंबरसह लॉग इन करा. (वापरकर्ता नाव मोबाइल नंबर असेल)

टप्पा क्र. 4. उमेदवार, राज्य, जिल्हा आणि मतदारसंघ जेथे नामांकन नामांकन केले जात आहे त्याचे नाव निर्दिष्ट करा. एकदा प्रविष्ट केले जाऊ शकत नाही


टप्पा क्र.5: खालील माहिती फॉर्म भरा (तपशीलवार डाउनलोड मॅन्युअल आणि शपथ पत्रांसाठी तपशीलवार सूचना वाचा)

अ) उमेदवाराचा तपशील i) पुढे जाण्यापूर्वी उमेदवार / स्वत: च्या / आश्रित तपशीलांचा तपशील भरा.
बी) कोर्टाच्या प्रकरणांची माहिती असल्यास
सी) जंगम मालमत्तेचा तपशील, जर असेल तर
डी) अचल मालमत्तेचा तपशील, जर असेल तर
ई) सार्वजनिक वित्त संस्थांना देय / देय तपशील आणि
सरकार असल्यास
एफ) व्यवसाय किंवा व्यवसाय तपशील, असल्यास
जी) शैक्षणिक पात्रता, असल्यास
एच) अंतिम आणि सबमिट


टीपः

1. सॉफ्टवेअर नोंदणी करण्यापूर्वी स्पर्धकांना वन टाइम पासवर्ड (ओटीपी) म्हणून नोंदणी करण्यापूर्वी, वैध मोबाइल फोन नंबर आणि ई-मेल एलडी असणे आवश्यक आहे जे उमेदवारांच्या मोबाइल नंबरवर पाठवले जाईल. या ई-मेलला एलडी उमेदवाराकडून  सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी आणि लॉग इन करणे आवश्यक असेल.

2. संकेतशब्द गुप्त ठेवणे, जेणेकरुन अनधिकृत वापरकर्त्यांनी खाते उघडण्यास नकार दिला पाहिजे. कोणतीही संस्था आपली माहिती ऍक्सेस / अपडेट करू शकत नाही आपले प्रमाणपत्र सामायिक केले गेले आहेत.

3. सबमिशन सादर करताना सर्व कागदपत्रे तयार करावीत, कारण शपथपत्रांमध्ये बरेच तपशील आवश्यक आहेत.

4. कृपया सुनिश्चित करा की प्रविष्ट केलेले सर्व गुप्त सत्य आणि सत्य आहेत.

5. अंतिम चरण, "अंतिम आणि सबमिट करा - - सर्व तपशील प्रविष्ट केल्यास अंतिम माहिती बटण क्लिक करा." "लेफ्टिनेंट" वर क्लिक केल्यानंतर, "अंतिम आणि सबमिट" केल्यानंतर एकदा डेटा क्लिक केला जाऊ शकत नाही आणि संपादित केला जाईल आणि अंतिम मानला जाईल.

6. शपथपत्र सादर करणे म्हणजे नामांकन सबमिशन. हार्ड कॉपी रेकॉर्ड करणे आवश्यक आहे आणि आरओला सादर करणे आवश्यक आहे. लिखित वेळेत लिहित आहे

7. एनआरसी डेटा सेंटर आणि नॅशनल सिक्युरिटी डी'एपॉझरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे ऑनलाइन सेवा पुरविल्या जात आहेत. त्यांना आवश्यक समर्थन देखील प्रदान केला जातो. शाळेच्या स्वाइनिन सबमिशनच्या समर्थनासाठी सरकारला पैसे द्यावे लागणार नाहीत.

अधिक माहिती व सेवेसाठी संपर्क- prab.election@gmail.com 
============================


Annexure - A

Guidelines For the E-filling of Affidavits (Form-26) by the Candidates


STEPS:


Step - 1 Register online, by visiting www.eci.nic.in and clicking on , online submission of candidate affidavits,,.

Step - 2 First time user should first register by clicking on "Click to Register,

A) User should enter valid mobile number and email-id and proceed
B) user will receive orP (one Time password) as sms on mobile number and to specified email-id.
C) User need to enter the OTP and proceed.
D) Then fill details like state, First name, Last name.
E) Set the Password
F) click on "Register" and after successful registration, go to login and fill affidavit.

Step - 3. Login with the registered Mobile Number.(User Name will be the mobile Number)

Step -4. specify the Name of the candidate, state, District and constituency for which the candidate is nominating. once entered cannot be

Step - 5 Fill the following details in sequence(for Detail download manual and read details instruction for filling  the affidavit) 

A) Candidate Details i) Please fill Self/Spouse/Dependent Details in Candidate Detail before proceeding to  further.
B) Details of court cases, if any
C) Details of movable assets, if any
D) Details of immovable assets, if any
E) Details of liabilities/dues to public financiat institutions and
government, if any
F) Details of profession or occupation, if any
G) Educational Qualification, if any
H) Finalize and Submit

Note: .

1. Contesting candidate need to have a valid mobile phone number and E-Mail I D before registering in the software as one Time Password (OTP), which will be sent to candidate's mobile number. This E-Mail I D will be  required by the candidate to get registered and login in the software.

2. Password has to be kept confidential so that unauthorized users will not be able to login to the account. No other entity can access/modify your details until your credentials are shared.

3. All the documents should be kept ready while filing, as a number of details are required to be filled up in the affidavit.

4. Please make sure that allthe detaits entered are true and correct.

5. ln the last step, "Finalize and submit,, - click the Finalize button, if and only if all the details are entered. lt may be noted that once you click the "finalize and submit", then the data, cannot be edited further and will be considered as final.

6. Mere submission of affidavit online does not mean submission of nomination. The hard copy has to be anotorised and submitted to the R.O. within the.prescribed time limit.

7. The on line services are being provided through Nic data center and National security Depository Limited  (NSDL)" The necessary support for the same is also provided by them. The cost of online submission of their support shall be borne by the government. Candidate does not have to pay for it. (Ref - ECI Web.)

For any query on Others issue: please contact- prab.election@gmail.com



Mr.Chandrakant Bhujbal - 9422323533

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे