कोणत्याही पक्षात जाणार नाही ; भाजपामध्येच शेवटपर्यंत कार्यरत राहणार
भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचा खुलासा
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
आमदार जगताप यांनी याबाबत प्रसिध्दीपत्रक दिले आहे. या पत्रकात नमूद केले आहे की, मी यापुढे कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. भाजपामध्येच राहून भाजपासाठीच शेवटपर्यंत कार्यरत राहणार आहे. माझ्या या पुढच्या सर्व निवडणुकाही मी भाजपातर्फेच लढणार आहे. त्यामुळे भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पिंपरी चिंचवड शहरातून राष्ट्रवादी आणि अन्य पक्षही हद्दपार झाले आहेत. त्यामुळेच विरोधक अस्वस्थ झाले आहेत. त्या अस्वस्थतेतूनच माझ्या विरोधात अशा अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. माझ्या विरोधकांनी सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी अशा काही चुकीच्या सर्व्हेंचा आधार घेतला आहे. चुकीचा प्रचार आणि प्रसार करणे त्यांचा नित्याचाच ‘उद्योग’ आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांनाही विरोधकांची ही खेळी माहीत झाली आहे. भाजपाच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे झपाट्याने होत आहेत. त्याच जोरावर भाजपाचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे. सर्वसामान्यांपर्यंत भाजपाला पोहचविण्यात आम्ही यशस्वी होत आहोत. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे. मी भाजपामध्ये शेवटपर्यंत राहणार असून यापुढच्याही सर्व निवडणुका भाजपातर्फेच लढविणार असल्याचे आमदार जगताप यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
पिंपरी-चिंचवड मधील राजकीय सद्यस्थितीचे अवलोकन
* चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी मावळमधून लढविण्याचा मनोदय यापूर्वीच जाहीर केला आहे.* शिवसेनेशी युती झाल्यास विद्यमान खासदार म्हणून सेनेकडे मावळ लोकसभा कायम राहील.
* मावळ लोकसभा मतदारसंघात आमदारांचे संख्याबळही भाजपचे मित्रपक्षापेक्षा मावळमध्ये अधिक आहे. पिंपरी-चिंचवडसह पनवेल या मतदारसंघातील महापालिका व वडगाव मावळ आणि लोणावळा नगरपरिषद पक्षाच्या ताब्यात आहे. सध्या शिवसेनेकडे असलेल्या मावळवर भाजपचा दावा युती होण्याच्या दृष्टीकोनातून टिकणारा नाही.
* भाजप-सेना युती झाल्यास सेनला मतदारसंघ गेल्यावर मावळमधून भाजपकडून लढविण्याची इच्छा आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना सोडून द्यावी लागेल.
* गेली 14 वर्षे आमदार असलेले लक्ष्मणभाऊ जगताप मंत्रिपदाचे प्रबळ हक्कदार आहेत परंतु भाजपमधील त्यांची पहिलीच टर्म आहे. जिल्ह्यातून मावळ विधानसभेचे आमदार भेगडे भाजपमधून सलग ३ वेळा निवडून आलेले आहेत. भेगडे देखील मंत्रिपदाचे हक्कदार आहेत. तर अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री यांच्या जवळचे मानले जातात, पालिकेतील महापौरपदी समर्थकांची निवड करून वर्चस्व सिद्ध केलेले असून ते देखील महामंडळ अथवा मंत्रिपदाचे दावेदार आहेत.
* आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना त्यांच्या समर्थकांना पालिकेतील प्रमुखपदी/महापौरपदी नियुक्ती करता आलेली नाही.
* मंत्रिपदाचे प्रबळ हक्कदार आहेत परंतु भाजपमधील निवड प्रक्रियेतील काही निकष/पात्रतेत त्यांचा समावेश होत नाही.
* आझम पानसरे स्थायी समिती अध्यक्ष, महापौर झाले पण त्या पुढे त्यांना राजकीय दृष्ट्या अपेक्षित यश मिळाले नाही. महापालिका विजयात महत्वाचा वाटा उचलला असताना ही आझम पानसरे यांच्यावर भाजाप मध्ये ही अन्याय होतो आहे ही भावना समर्थकांमध्ये आहे. आझम पानसरे देखील चांगल्या पदाचे आशावादी आहेत. त्यांना भाजपामध्ये सामावून घेण्यात आमदार लक्ष्मण जगताप यांची महत्वाची भूमिका होती. त्यांनाही काहीही देता आले नाही याचे देखील शल्य राहणारच.
* २०१४ निवडणुकपूर्व भाजपमध्ये प्रवेश केलेले विद्यमान आमदार मंत्रिमंडळ प्रतिक्षेत आहेत तसेच यांना महामंडळही दिलेले नाही-
डॉ. अनिल बोंडे, डॉ. विजयकुमार गावित, राजेंद्र पाटणी, किसन कथोरे, डॉ. सुनील देशमुख, स्रेहलता कोल्हे, अनिल गोटे, मंदा म्हात्रे, प्रकाश भारसाकळे, अमल महाडिक, मोनिका राजळे, भारती लव्हेकर, प्रशांत ठाकूर, संजय सावकारे, लक्ष्मणभाऊ जगताप, महेश लांडगे हे भाजपात बाहेरून आलेले आमदार आहेत. यापैकी देशमुख व ठाकूर वगळता कुणालाही मंत्रीपद वा साधे महामंडळदेखील मिळालेले नाही.
* राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. साधारणत: नऊ नवे चेहरे मंत्रिमंडळात येतील. त्यात बाहेरून आलेल्यांपैकी किमान दोघांना तरी संधी दिली पाहिजे अशी मागणी आहे तरी देखील भाजपच्या मंत्रिपद निवड प्रक्रियेतील काही निकष/पात्रतेत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व अपक्ष आमदार महेश लांडगे यांचा समावेश होत नाही.
* कोणत्याही पक्षात जाणार नाही ; भाजपामध्येच शेवटपर्यंत कार्यरत राहणार असल्याचा आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा खुलासा
* वरील सर्व राजकीय सद्यस्थितीचे अवलोकन केल्यास कोणतेही मंत्रिपद व साधे महामंडळदेखील मिळणार नाही, समर्थकांची महत्वाच्या पदावर निवड करून घेता येत नाही, जागा वाटपात भाजपला मावळ लोकसभा मिळाला नाही तर खासदारकी लढविण्याची इच्छा पूर्ती करता येणार नाही, लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार सोडून द्यावा लागेल. महापालिकेतील एक हाती सत्ता केंद्र नाहीं, या सर्व राजकीय सद्यस्थितीचे अवलोकन करणे आवश्यक आहे असे काही जाणकारांचे मत आहे.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
================================
पार्थ अजित पवार यांच्या उमेदवारीला शरद पवार यांची असमर्थता ; अजित पवार यांचे बैठकीत सूचक मौन
राष्ट्रवादी पक्षाकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास लक्ष्मण जगताप इच्छुक!
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत दोन दिवस बैठक होत आहे. दोन दिवसांच्या या बैठकीत काँग्रेसकडील मतदारसंघांवर दावा सांगताना राष्ट्रवादी हा मतदारसंघ कशा प्रकारे जिंकणार याचा आढावा घेतला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील 48 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे 25 जागांची मागणी केली आहे. त्यातली एक जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादी आपल्या कोट्यातून देण्यास तयार आहे. राष्टावादी काँग्रेसला काँग्रेसकडून काही जागा बदलून हव्या आहेत. 2019 ची निवडणूक महत्वाची असल्याने या निवडणुकीत काहीही करून दोन आकडी जागा जिंकण्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. पुणे, औरंगाबाद, हातकणंगले, जालना या जागा राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे मागितलेल्या आहेत. तर राजू शेट्टी यांना आपल्या कोट्यातून हातकणंगलेची जागा देण्यास राष्ट्रवादी तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसकडून परभणी आणि अमरावती या जागा बदली करून हव्या आहेत. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने लढलेल्या जागा पुढीलप्रमाणे आहेत जळगाव, रावेर, बुलढाणा, अमरावती, भंडारा, परभणी, दिंडोरी, नाशिक, कल्याण, ठाणे, ईशान्य मुंबई, रायगडमावळ, बारामती, शिरूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, माढा,सातारा,कोल्हापूर अशा आहेत याशिवाय मुंबईतही राष्ट्रवादीला एक जागा वाढवून हवी आहे. मुंबईतील मुंबई उत्तर पश्चिम म्हणजे जिथून गुरुदास कामत यांनी निवडणूक लढवली ती जागा किंवा प्रिया दत्त लढवत असलेली मुंबई उत्तर मध्यची जागा देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. या व्यतिरिक्त काही जागांवर उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत त्यामध्ये ईशान्य मुंबई -संजय दिना-पाटील, ठाणे -संजीव नाईक, रायगड-सुनील तटकरे, बारामती - सुप्रिया सुळे, कोल्हापूर - धनंजय महाडिक, भंडारा-गोंदिया - प्रफुल्ल पटेल, नाशिक - छगन भुजबळ किंवा समीर भुजबळ, दिंडोरी - डॉ. भारती पवार, जळगाव - मनिष जैन, माढा - विजयसिंह मोहिते-पाटील, उस्मानाबाद - पद्मसिंह पाटील या नावांचा समावेश असून यांची नावं निश्चित झाल्याचे समजते आहे.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
लोकसभा निवडणूक लढविणार नाही - शरद पवार यांनी केले स्पष्ट
मी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे पुण्यातूनही निवडणूक लढविण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्ट करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातून निवडणूक लढविण्याचा चर्चेला पूर्णविराम दिला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवार यांनी पुणे लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक मुंबईत घेतली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री छगन भुजबळ असे सर्व महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रदेशाध्यक्षांनी पुण्यातून निवडणूक लढविण्यासाठी कोण इच्छुक आहे का? अशी विचारणा केली. त्यावर उपस्थितांमधून कोणीच पुढे आली नाही. त्यानंतर प्रवक्ते अंकुश काकडे यांनी उभे राहून शरद पवारसाहेब तुम्हीच पुण्यातून निवडणूक लढवावी, तुम्ही उमेदवार असेल तर कोणाचाच विरोध राहणार नाही, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून मागणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले. मात्र, त्यावर पवार यांनी लगेच माईक हातात घेत मी या आधीही लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे माझ्या उमेदवारीचा प्रश्न येत नाही. काकडे यांना वृत्त वाहिन्यांवर चर्चेची निमंत्रण येत असतात त्याचा त्यांनी आनंद घ्यावा असे सांगून या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
माजी आमदार बापू पठारे यांनी शहराध्यक्ष चेतन तुपे यांचा दावा खोडला
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवार यांनी पुणे लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक मुंबईत घेतली या
आढावा बैठकीत पुण्याचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी पक्षाची ताकद काँग्रेसपेक्षा कशी जास्त आहे याचा सविस्तरपणे आढावा सादर केला. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे नगरसेवक कसे जास्त आणि पालिका निवडणुकीत मिळालेले मतदान आणि त्याची टक्केवारीही सादर केली. मात्र, त्यानंतर माजी आमदार बापू पठारे यांनी ही पुण्यात पक्षाची ताकद एवढी नसून चेतन तुपे यांनी जी माहिती दिली त्यात बारामती आणि शिरूर मतदार संघात मोडणाऱ्या खडकवासला व हडपसर या मतदार संघातील आकडेवारीचा समावेश आहे. प्रत्यक्ष पुणे लोकसभा मतदार संघात एवढे नगरसेवक नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून देत त्यांनी पक्षाच्या शहरातील ताकदीचा दावा खोडून काढला त्यानंतर ही बैठक काही वेळातच संपविण्यात आली.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.