परिपूर्ण बुथ रचना व प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून भाजपची निवडणूकपूर्व तयारी
पक्ष नेतृत्वा शिवाय राष्ट्रवादीतील प्रमुख कार्यकर्ते सुस्त ; निवडणूकपूर्व तयारीचा अभाव
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपकडून आगामी निवडणूक जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रातील बुथ रचना परिपूर्ण झाली असून प्रमुख पदाधिकारी व बुथ कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरु आहेत. पक्ष नेतृत्वाशिवाय सुरु असलेल्या प्रशिक्षण व निवडणूकपूर्व तयारीला कार्यकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षात विरोधी स्थिती दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या बुथ रचनेला पदाधिकाऱ्यांकडून चालढकल केली जात आहे. पक्ष नेतृत्वा शिवाय राष्ट्रवादीतील प्रमुख कार्यकर्ते व काही पदाधिकारी सुस्तावले असून निवडणूकपूर्व तयारीचा अभाव असल्याचे दिसून येते. वारंवार सूचना देऊनही बुथ कार्यकर्त्यांची नावे व माहिती स्थानिक पदाधिकारी समन्वयकांना देत नाहीत. पक्षात पद नाही या भावनेने आपला काही या कामाशी संबंध नसल्याचा अहिर्भाव व्यक्त होत आहे. दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाकडून देखील बुथ रचनेचे काम रडतखडत सुरु आहे. गेल्या निवडणुकीत चांगली मते घेतल्याने निवडणूकपूर्व तयारीत कार्यकर्त्यांना उत्साह आहे. मात्र पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांना विधानसभेतच रस आहे यामुळे ते लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे ठामपणे स्पष्ट करीत नाहीत त्यांनी आपण पक्षाध्यक्ष असून कोठूनही लढू शकतो असे स्पष्टीकरण दिले आहे. महादेव जानकर यांच्या शिवाय भाजप नवखा उमेदवार देखील देण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपकडून निवडणूक व्यूहरचना आखली जात असून शिवसेना, रासप, इतर पक्ष/संघटना आणि राष्ट्रवादी व कॉंग्रेसमधील असंतुष्ट यांच्या माध्यमातून यश मिळविण्याची तयारी केला जात असल्याचे समजते. या दृष्टीकोनातून पक्ष निहाय स्वतंत्रपणे बुथ कार्यकर्त्यांची नोंद भाजपकडून घेतली जात आहे. परिपूर्ण बुथ रचना व प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून भाजपची निवडणूकपूर्व तयारी सुरु आहे.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
परिपूर्ण बुथ रचना व प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून भाजपची निवडणूकपूर्व तयारी
परिपूर्ण बुथ रचना व प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून भाजपची निवडणूकपूर्व तयारी सुरु आहे. सासवड ( ता. पुरंदर ) येथील दादा जाधवराव सांस्कृतिक भवनात बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर, वेल्हा, मुळशी व पुरंदर या चार तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या प्रभारी व पुण्याच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करावयाचे आहे असे आवाहन केले होते. प्रत्येक तालुक्यात असणाऱ्या पक्षाच्या संघटना यांच्या माध्यमातून पक्षाची असणारी बांधिलकी मानणाऱ्या लोकांना एकत्र केल जात असून या लोकांच्या माध्यमातून गावातील बुथपर्यंत पक्ष विस्तार व पक्षाचा विचार पोहोचविला जात आहे. ज्या लोकांना विविध शासकीय माध्यमातून मदत केली आहे अशा सर्वांच्या संपर्कात राहून सकारात्मक मतामध्ये परिवर्तन करण्याचे काम केले जात आहे. बुथ कार्यकर्त्यांना नवीन मतदार नोंदणीसाठी पक्षाकडून मदत केली जात आहे. तर आज २१ ऑक्टोबरला भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघात भोर येथे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
निवडणूकपूर्व तयारीचा अभाव ; बुथ रचनेला पदाधिकाऱ्यांची चालढकल
राष्ट्रवादीच्या बुथ रचनेला पदाधिकाऱ्यांकडून चालढकल केली जात आहे. पक्ष नेतृत्वा शिवाय राष्ट्रवादीतील प्रमुख कार्यकर्ते व काही पदाधिकारी सुस्तावले असून निवडणूकपूर्व तयारीचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. वारंवार सूचना देऊनही बुथ कार्यकर्त्यांची नावे व माहिती स्थानिक पदाधिकारी समन्वयकांना देत नाहीत. पक्षात पद नाही या भावनेने आपला काही या कामाशी संबंध नसल्याचा अहिर्भाव त्यांच्याकडून व्यक्त होत असल्याची वस्तुस्थिती आहे. बारामती विधानसभा मतदारसंघ वगळता इतर ५ विधानसभा मतदारसंघातील बुथ निहाय कमिटी परिपूर्ण नसून इंदापूर विधानसभा मतदारसंघात 40 टक्के; पुरंदर विधानसभा मतदारसंघात २५ टक्के; दौंड विधानसभा मतदारसंघात ५० टक्के; भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघात 20 टक्के तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात ३० टक्के बुथ निहाय माहिती संकलन झाल्याची माहिती असून यामध्ये काही पदाधिकार्यांनी चुकीची नावे व संपर्क क्र. दिलेले आहेत असे समजते. स्थानिक पदाधिकारी बुथ निहाय कार्यकर्त्यांची माहिती न देण्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता इतर पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी याचा लाभ घेऊ शकेल या भीतीने बुथ निहाय माहिती संकलन कामात दुर्लक्ष केले जात असल्याचे कारण समोर आले. राष्ट्रवादीकडून पुणे शहर व जिल्हा अध्यक्ष बदलल्यानंतर माजी पदाधिकारी देखील पक्ष कार्यापासून निष्क्रिय दिसून येत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य दिसून येत नाही. राष्ट्रवादीत केवळ पदे मिरवणाऱ्यांना, काम न करणाऱ्यांना यापुढे घरचा रस्ता दाखवण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देऊनही काही पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्याना फरक पडत नाही. आपल्याशिवाय या भागात दुसरा कोणीही पक्षाला मिळणार नाही अशा समजुतीने पक्ष संघटनेच्या कार्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याची असलेली मानसिकतेत बदल होत नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक खुले पत्र लिहून त्याद्वारे भविष्यात सातत्याने पक्षांतर्गत सुधारणा करण्याचे तसेच काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अधिक संधी आणि जबाबदारी सोपवण्याचे संकेत देतानाच काम न करणाऱ्या आणि केवळ पदे मिरवणाऱ्या व्यक्तींना जबाबदारीतून मुक्त करण्याचा थेट इशाराच त्यांनी दिला होता. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदलाचा प्रयत्न केला जात आहे तरी पदावरून हटवलेले पदाधिकारी यांच्यात निष्क्रियता दिसून येत आहे. तर नवनिर्वाचित पदाधिकारी पक्ष संघटनेच्या सुचनेनुसार कार्य करताना दिसत आहेत. पक्ष नेतृत्वाकडून सुचविलेले आंदोलन व भूमिका केवळ नवनिर्वाचित पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून नागरिकांपुढे मांडत आहेत. इतर यापूर्वी सत्तेची पदे व पक्ष पदे उपभोगलेली पदाधिकारी आपला याच्याशी काही संबंध नसल्यासारखे वागत आहेत. सत्ता नसल्याने मरगळ आलेले काही कार्यकर्ते इतर सक्रीय कार्यकर्त्यांना देखील अंतर्गत हेवे-दावे व स्थानिक राजकारणामुळे सहकार्य करीत नसल्याचे वास्तव आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात अनेकांना पक्षाने संधी दिली सत्तेची पदे व पक्षाची पदे देऊनही पक्षनेतृत्वाला अशा स्थितीला सामोरे जावे लागत आहे. अजूनही निवडणुकांना मुबलक वेळ असल्याने त्रुटी दूर करून निवडणूकपूर्व तयारी होऊ शकते आणि बारामती लोकसभा मतदारसंघावर प्रभाव कायम राहू शकेल असा आशावाद काही पदाधिकारी यांना आहे.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
बारामती लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदान केंद्र संख्या- 2303 (वाढ झालेल्यानुसार)
* बारामती विधानसभा मतदारसंघ - एकूण मतदान केंद्र - 363* इंदापूर विधानसभा मतदारसंघ - एकूण मतदान केंद्र - 328
* पुरंदर विधानसभा मतदारसंघ - एकूण मतदान केंद्र - 356
* दौंड विधानसभा मतदारसंघात - एकूण मतदान केंद्र - 300
* भोर विधानसभा मतदारसंघ - एकूण मतदान केंद्र - 525
* खडकवासला विधानसभा मतदारसंघ - एकूण मतदान केंद्र - 431
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.