Friday 19 October 2018

बीड लोकसभा मतदारसंघात आमदार धनंजय मुंडे विरुद्ध खासदार प्रितम मुंडे अशी लढत शक्य

बीड लोकसभा मतदारसंघात मुंडे विरुद्ध मुंडे लढत होणार !


बीड लोकसभा मतदारसंघांत येणाऱ्या सहा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नसल्याने महाराष्ट्र विधान परिषदचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचा पर्याय समोर येत असून असे झाल्यास बीड लोकसभा मतदारसंघात आमदार धनंजय मुंडे विरुद्ध खासदार प्रितम मुंडे अशी लढत होण्याची शक्यता आहे. स्व. भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवलेले सुरेश धस यांनीच राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजप प्रवेश केल्यामुळे सक्षम उमेदवार राष्ट्रवादीकडे नाही. तसेच बीड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ६ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेले जयदत्त क्षीरसागर देखील भाजपच्या वाटेवर होते मात्र राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नुकतीच समजूत काढून पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीत समाधान केले होते. त्यांचा पक्ष प्रवेश चर्चा थांबलेली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर लोकसभा निवडणूक जबाबदारी देण्याची शक्यता नाही. तसेच एकेकाळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून प्रचलित असलेले विनायक मेटे यांनी शिवसंग्राम या संघटनेचे पक्षात रुपांतर करून भाजप प्रणीत आघाडीत सामील झाल्याने या बीड लोकसभा मतदारसंघात प्रभावशील नेतृत्व राष्ट्रवादीकडे राहिलेले नाही. अशा परिस्थितीत लोकसभेची एक एक जागा महत्वाची असल्याने सर्व ताकदीनिशी लढविण्याचा निर्धार केल्यामुळे महाराष्ट्र विधान परिषदचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचा पर्याय समोर येत आहे. नुकत्याच औरंगाबाद मध्ये संविधान बचाव, देश बचाव झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रियाताई सुळे यांनी विधान परिषदचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या अस्सलिखित हिंदींचे कौतुक करतांनाच तुम्हाला लोकसभा लढवायची आहे का? अशी त्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त करून धनंजय मुंडे एवढे चांगले हिंदी बोलतात, यावरून ते लोकसभेची तयारी तर करत नाही ना? अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. 

बीड लोकसभा मतदारसंघात आमदार धनंजय मुंडे विरुद्ध खासदार प्रितम मुंडे अशी लढत होण्याची शक्यता आहे. बीड लोकसभा मतदारसंघांत येणाऱ्या सहा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नसल्याने महाराष्ट्र विधान परिषदचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचा पर्याय समोर येत असल्याचे वृत्त आहे. बीड जिल्ह्यातील राजकारणात राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या दिवंगत वडील व ओबीसी नेते गोपीनाथ मुंढे यांच्या राजकीयदृष्ट्या वारसदार म्हणून मिळवलेला प्रभाव व पकड दिवसेंदिवस मजबूत करण्याचा प्रयत्न यशस्वीपणे होत असताना दिसत आहे. बीड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा सmaवेश होतो यामध्ये ५ विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार लोकप्रतिनिधीत्व करीत आहेत. तर एकमेव बीड या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहे. दिवंगत ओबीसी नेते गोपीनाथ मुंढे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार म्हणून खा. प्रीतम मुंडे यांनी सहा लाख ९६ हजार ३२१ मतांनी दणदणीत विजय मिळवला होता. प्रितम मुंडे यांना नऊ लाख २२ हजार ४१६ अशी घवघवीत मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार अशोकराव पाटील यांना केवळ दोन लाख २६ हजार ३२१ मते मिळाली होती. बीड लोकसभा मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे त्यावेळी सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंडे परिवारातील कोणी उमेदवार पोटनिवडणुकीत उभे राहिल्यास राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार नाही असे म्हटले होते. राष्ट्रवादीचा हा अप्रत्यक्ष पाठींबा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मतदारांकडून मिळालेली सहानुभूती यामुळेच बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने साडेसहा लाख मतांची आघाडी घेतली होती. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे, काँग्रेसचे अशोक पाटील, प्रा.सुशीला मोराळे यांच्यासह १२ उमेदवार त्यावेळी निवडणूक रिंगणात होते. विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे या राजकारणात येण्या पूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या गैरहजेरीत कामकाज पाहत होत्या त्यामुळे त्यांना लोकांची कामे करून घेणे व समस्यांचे निरासरण करण्याचे कौशल्य आहे. केवळ सहानभुतीच्या जोरावर निवडून आलेल्या आहेत अशी त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होते. आगामी निवडणुकीत त्यांना गेल्या निवडणुकीप्रमाणे सहानभुतीचे वातावरण नसेल त्यामुळे या जागेवर यश मिळेल असा आशावाद राष्ट्रवादी पक्षाला आहे. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवलेले सुरेश धस यांनीच राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजप प्रवेश केल्यामुळे सक्षम उमेदवार राष्ट्रवादीकडे नाही. तसेच बीड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ६ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेले जयदत्त क्षीरसागर देखील भाजपच्या वाटेवर होते मात्र राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नुकतीच समजूत काढून पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीत समाधान केले होते या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर लोकसभा निवडणूक जबाबदारी देण्याची शक्यता नाही. तसेच एकेकाळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून प्रचलित असलेले विनायक मेटे यांनी शिवसंग्राम या संघटनेचे पक्षात रुपांतर करून भाजप प्रणीत आघाडीत सामील झाल्याने या बीड लोकसभा मतदारसंघात प्रभावशील नेतृत्व राष्ट्रवादीकडे राहिलेले नाही. अशा परिस्थितीत लोकसभेची एक एक जागा महत्वाची असल्याने सर्व ताकदीनिशी लढविण्याचा निर्धार केल्यामुळे महाराष्ट्र विधान परिषदचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचा पर्याय समोर येत आहे. परळी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा २६ हजार १८३ मतांनी पंकजा मुंडे यांनी पराभव केला होता. त्यानंतर ते विधानपरिषदेवर कार्यरत आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात व जिल्ह्यात अनेकदा फोडाफोडीचे राजकारण होत असते. बीड मतदारसंघात मुंडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने सुरेश धस यांना मदानात उतरवून मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न केला होता . पण उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुंडेंनी राष्ट्रवादीचे अनेक मोहरे गळाला लावण्यात यश  त्यांनी मिळवले होते. आधी फुलचंद कराड, माजलगावचे तत्कालीन तालुकाध्यक्ष बबन सिरसाट यांच्या पाठोपाठ आष्टीचे माजी आमदार दरेकर यांचा भाजप प्रवेश करून घेतला होता. माजलगावचे माजी आमदार होके पाटील यांची भेट घेऊन त्यांचे मन वळवण्यात मुंडे यशस्वी झाले होते. बीड मतदारसंघातील माजी आमदार राजेंद्र जगताप, जनार्दन तुपे, तसेच तत्कालीन राष्ट्रवादीच्या नेत्या सुशीला मोराळे यांनीही स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून मुंडेंच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यांनी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेली बीड लोकसभेची पोटनिवडणूक लढविणाऱ्या सुशील मोराळे या आगामी निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. त्यांना लोकतांत्रिक जनता दलाच्या कोट्यातून कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीची उमेदवारी हवी आहे. पुरोगामी विचारांच्या नेत्या अशी मोराळेंची ओळख आहे. खासदार शरद यादव यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या लोकतांत्रिक जनता दलाच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या पक्षाच्या त्या राष्ट्रीय महासचिव आहेत. देशपातळीवर पक्षबांधणीची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्या मूळ बीडच्या असल्याने त्यांना लोकसभा निवडणुकीतही रस आहे. मात्र हि जागा लोकतांत्रिक जनता दलाला सोडण्याची सुतराम शक्यता नाही. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमाणेच विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना विरोधकांपेक्षा पक्षांतर्गत कुरघोडीचा सामना करावा लागत आहे. विरोधक व पक्षांतर्गत विरोधकांना जशाच तसे उत्तर देऊन आपले निर्विवाद वर्चस्व राखण्याचा प्रयत्न ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या यशस्वीपणे करीत आहेत मात्र खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी अजून आक्रमकता दर्शवली नसल्याने त्यांचा पाढाव करण्याची संधी साधण्याचा प्रयत्न होत असतो त्याचा प्रत्यय नुकत्याच कथित सर्वेक्षणातून समोर आला होता. ‘सर्व्हे बघून लोक मतदान करत नाहीत, तर माणूस बघून मतं दिली जातात.’असे सांगून तथाकथित सर्वेक्षणाच्या आधारावर प्रसारमाध्यमांमधून आलेल्या वृतांचे खंडन करून खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांची बाजू ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी जनसमुदायासमोर व्यक्त केली. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी लोकसभेत २९ वेळा चर्चेत वादविवाद मध्ये सहभाग दर्शविला असून ३४८ मतदारसंघाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत तर 1 खासगी विधेयक देखील दाखल केले आहे. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी देखील व्यासपीठावर जाहीररित्या पती डॉ. गौरव खाडे यांची उपस्थिताना ओळख करून देऊन आगामी राजकारणाचे संकेत दिले आहेत. सावरगावकरांनी केलेल्या स्वागताचे कौतुक करून त्यांनी स्वागत करण्यासाठी ऐपत नाही, तर नियत चांगली लागते असे एका वाक्यात महंताच्या वागणुकीचे टीकात्मक विश्लेषण भाषणात केले. बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नसल्याने त्यांचा विजय सुकर मानला जात नाही कारण जिल्ह्यातील ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे भाजपचे नेतृत्व असून खासदार पद देखील कुटुंबातील सदस्यांकडे आहे याचे पक्षांतर्गत सल काही जणांना सतावत आहे. या विरोधातूनच त्यांच्या विषयी वेगवेगळ्या कारणांनी प्रभाव कमी असल्याचे प्रसारमाध्यमांमधून वृत्त प्रसारित होत असतात. या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी मानलेले भाऊ यांचा पक्ष रासपचा जाणीवपूर्वक उल्लेख करून पतींना तुमच्या पक्षात घ्या असे भाष्य केले. डॉ. गौरव खाडे यांनी जनतेला अभिवादन करावे, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार ते पुढे आले. मंत्री जानकर यांनी डॉ. खाडे यांना उचलून घेतले होते. ही घटना बरेच काही सांगून जात आहे. तर औरंगाबाद मध्ये संविधान बचाव, देश बचाव झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याआधी धनंजय मुंडे यांचे भाषण झाले. आपल्या तडाखेबंद भाषणाचा शेवट मुंडे यांनी हिंदी शायरीने केला. हाच धागा पकडत सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्या अस्सलिखित हिंदींचे कौतुक करतांनाच तुम्हाला लोकसभा लढवायची आहे का? असा चिमटा देखील काढला होता. धनंजय मुंडे एवढ चांगले हिंदी बोलतात, यावरून ते लोकसभेची तयारी तर करत नाही ना? असे मला वाटले. पण ते औरंगाबादेत बोलत आहेत, आणि हा त्यांचा मतदारसंघ नाही असे त्यांनी म्हंटले होते. गेल्या निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघातून जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात विनायक मेटे यांनी निवडणूक लढवली होती तर आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघातून भिमराव धोंडे यांच्या विरोधात सुरेश धस यांनी निवडणूक लढवली होती. विनायक मेटे यांना भाजपने विधानपरिषदेवर घेतलेले आहे तर सुरेश धस यांनी विधानपरिषद निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने विशेषतः धनंजय मुंडे यांच्यावर नाराज होऊन भाजप प्रवेश केला होता.  

बीड लोकसभा मतदारसंघ व त्यां अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान लोकप्रतिनिधी- 

लोकसभेत विजयी उमेदवार - डॉ. प्रितम गोपीनाथ मुंडे -६ लाख ९२ हजाराने विजयी (भारतीय जनता पार्टी) 
परळी विधासभा मतदार संघ - पंकजा मुंडे - २६ हाजार १८४ मतांनी विजयी(भारतीय जनता पार्टी) 
गेवराई विधानसभा मतदारसंघात विजयी उमेदवार- लक्ष्मण पवार -६० हजार ३२ मतांनी विजयी (भारतीय जनता पार्टी) 
माजलगाव विधासभा मतदार संघ- आर.टी.देशमुख -३७ हजार ६३६ मतांनी विजयी (भारतीय जनता पार्टी) 
केज विधासभा मतदार संघ- संगिता ठोबंरे -४३ हजार ४३६ मतांनी विजयी (भारतीय जनता पार्टी) 
आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदार संघ- भिमराव धोंडे -५७५६ मतांनी विजयी (भारतीय जनता पार्टी) 
बीड विधानसभा मतदारसंघ- जयदत्त क्षीरसागर - ६०८५ मतांनी विजयी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.