राष्ट्रवादीचे माजी नेते तारिक अन्वर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
राष्ट्रवादीचे माजी नेते आणि खासदार तारिक अन्वर यांनी आज (ता.27) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रसचे राष्ट्रीय महासचिव आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत हेही उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राफेल डील प्रकरणावरुन पाठराखण केल्याच्या प्रकरणानंतर तारिक अन्वर नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला होता. अन्वर हे बिहारचे रहिवासी असून येथूनच ते राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर अन्वर यांच्यासमोर दोन प्रमुख पर्याय होते त्यांपैकी एक लालू प्रसाद यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि दुसरा पर्याय काँग्रेस. यांपैकी अन्वर यांनी राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसचा पर्याय निवडल्याचे बोलले जात आहे. अन्वर हे मुळचे काँग्रेसचेच असून राजीव गांधी यांच्यासोबत त्यांनी मंत्रीमंडळात काम केले आहे. या काळात त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले आहे.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.