Sunday, 14 October 2018

राजस्थाननंतर अंदाज घेण्यासाठी खासदार काकडे छत्तीसगड, मध्यप्रदेशात!

राजस्थाननंतर अंदाज घेण्यासाठी खासदार काकडे छत्तीसगड, मध्यप्रदेशात जाणार!




निवडणूकपूर्व अंदाज वर्तविण्याचा छंद जोपासण्यासाठी राजस्थानात गेलेल्या खासदार संजय काकडे यांनी छत्तीसगड व मध्यप्रदेशात देखील 'टीम' द्वारे भटकंती करून जनतेचा कौल जाणून घेणार आहे. अंदाज वर्तविण्यासाठी खासदार संजय काकडे राजस्थानमध्ये अशी प्रथम पोस्ट "प्राब" ने दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांच्याशी संवाद साधून सत्यतेची पडताळणी केली होती. तसेच "प्राब"ने त्यांच्याबाबत व्यक्त केलेल्या मनसुब्यांचे खासदार संजय काकडे यांनी खंडन केले आहे. "प्राब"च्या वृतांनंतर रेल्वे स्टेशन, मंदिर, बाजार पेठ, महाविद्यालयाच्या परिसरांत जाऊन जनतेचा कौल कुणाकडे आहे, याचा कानोसा घेतानाचे खासदार काकडे यांचे राजस्थानमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याबाबत काही प्रसारमाध्यमांनी त्याबाबत वृत्त देखील दिले आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेचा कौल जाणून घेतल्यानंतर छत्तीसगड व मध्यप्रदेशात देखील जनमताचा कानोसा घेण्याचा प्रयत्न ते करणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. केवळ आवड म्हणून हे कार्य करत असून यामध्ये कोणत्याही पक्षाने आपल्याला जबाबदारी दिलेली नसून कार्यपूर्तीनंतर आपले अंदाज व्यक्त करू असेही त्यांनी म्हंटले आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी आपल्या कार्य व्यस्ततेमधून केवळ छंद जोपासण्यासाठी निवडणूकपूर्व अंदाज घेण्यासाठी वेळ काढला आहे. सर्वसामान्य नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्याकडून प्रश्नावली भरून घेण्यात येत आहे. त्यामध्ये सत्ता कोणाची येणार, पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी, नागरिकांची सर्वाधिक पसंती कोणाला, असे विविध प्रश्न विचारण्यात येत असून सर्वच वयोगट, विद्यार्थी, व्यावसायिक, शेतकरी, सर्वसामान्य प्रवासी, अशा विविध घटकांमधून अंदाज घेण्यात येत आहे. राजस्थानमध्ये विधानसभेसाठी २०० जागांवर निवडणूक होत आहे. तसेच मध्यप्रदेशातील २३० आणि छत्तीसगडमधील ९० जागांवर निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनमताचा अंदाज घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

निवडणूक कार्यक्रम -

छत्तीसगड पहिला टप्पा (यात नक्षलग्रस्त भागात मतदान होणार) 
अधिसूचना : 16 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर
अर्जांची छाननी : 24 ऑक्टोबर
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख : 26 ऑक्टोबर
मतदान : 12 नोव्हेंबर
एकूण जागा : 18
छत्तीसगड दुसरा टप्पा 
एकूण जागा : 72
अधिसूचना : 26 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 2 नोव्हेंबर
अर्जांची छाननी : 3 नोव्हेंबर
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख : 5 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर

मध्यप्रदेश आणि मिझोरम 
अधिसूचना : 2 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 9 नोव्हेंबर
अर्जांची छाननी : 12 नोव्हेंबर
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर
मतदान : 28 नोव्हेंबर
राजस्थान आणि तेलंगाना
अधिसूचना : 12 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 19 नोव्हेंबर
अर्जांची छाननी : 20 नोव्हेंबर
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर
मतदान : 7 डिसेंबर
सर्व राज्यांचे निकाल 11 डिसेंबरला जाहीर होतील. 

कोणत्या राज्यात कधी संपणार विधानसभांचा कार्यकाळ 
छत्तीसगड : 5 जानेवारी 2019
मध्यप्रदेश : 7 जानेवारी 2019
राजस्थान : 20 जानेवारी 2019 
मिझोरम : 15 डिसेंबर 2018

2013 ची स्थिती

पक्षमध्यप्रदेशछत्तीसगडराजस्थान
भाजप16549163
काँग्रेस583921
बसपा413
इतर3113
एकूण23090200
सध्याचे सरकारभाजपभाजपभाजप

लोकसभा निवडणूक 2014 ची स्थिती

पक्षमध्यप्रदेशछत्तीसगडराजस्थान
भाजप271025
काँग्रेस210
बसपा000
एकूण291125
सत्तेचे दावेदार
मध्यप्रदेश - शिवराज सिंह चौहान, कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया
छत्तीसगड - रमन सिंह, अजित जोगी, भूपेष बघेल, टीएस सिंहदेव
राजस्थान - वसुंधरा राजे सिंधिया, अशोक गेहलोत, सचिन पायलट



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.