Wednesday, 17 October 2018

परराष्ट्र राज्यमंत्री एमजे अकबर यांचा अखेर राजीनामा

परराष्ट्र राज्यमंत्री एमजे अकबर यांचा अखेर राजीनामा


लैंगिक शोषणाचा आरोप झालेले परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी एम. जे. अकबर यांनी आपल्या पदावरून पायउतार होणे गरजेचे असल्याचे विरोधी पक्षांसह पत्रकारांच्या विविध संघटनांनी म्हटले होते. त्यानंतर अकबर यांनी आज राजीनामा दिल्याचे जाहीर केले.
अकबर नायजेरियात असताना भारतात मी टूचं वादळ घोंघावलं. नाना पाटेकर व तनुश्री दत्ता प्रकरणापासून सुरू झालेलं हे वादळ हा हा  म्हणता सगळ्या क्षेत्रांमध्ये पसरलं. एम. जे. अकबर पत्रकारितेत असताना त्यांनी नवोदित महिला पत्रकारांची लैंगिक छळवणूक केल्याचे आरोप झाले. प्रिया रमाणी या पत्रकारानं धाडस दाखवत एशियन एजचे संपादक असताना अकबर यांनी केलेल्या छळाचा पाढा ट्विटरवर वाचला आणि अनेक महिलांनी पुढे येत अकबर यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, अकबर विदेशातून परत आले आणि त्यांनी सगळे आरोप फेटाळत मानहानीचा दावा केला. मात्र, रमाणी यांच्या मागे तब्बल १९ महिला उभ्या राहिल्या आणि त्यांनी अकबर यांना जशास तसं उत्तर देण्याचा निर्धार केला. याच दरम्यान, मोदी सरकारनं अशा लैंगिक छळ करणाऱ्या अतिरेक्यांना पाठिशी का घालावं असा सवाल करत काँग्रेससह विरोधकांनी भाजपाची कोंडी केली. परिणामी आधी ताठ भूमिका घेणाऱ्या अकबरना राजीनामा देणे भाग पडले आहे. लॉ फर्म च्या नुसार संदीप कपूर, वीर संधू, निहारिका करनजावाला, अपूर्व पांडेय, मयंक दत्ता आणि गुड़िपति जी. कश्यप पातियाळा कोर्टत परराष्ट्र राज्यमंत्री एमजे अकबर यांचा खटला लढवतील. भारतीय दंड संहितेच्या कलम 499, 500 नुसार या खटल्यात दोषी आढळल्यास दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. आपल्याविरूद्धचे सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचा खुलासा अकबर यांनी केला होता. #MeToo च्या मोहिमेत 15 महिला पत्रकारांनी त्यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे.हे आरोप होत असताना अकबर हे नायजेरीयाच्या दौऱ्यावर होते. रविवारी भारतात परत आल्यानंतर त्यांनी एक पत्रक काढून खुलासा केला आणि सर्व आरोप फेटाळून लावले. अकबर हे ज्येष्ठ पत्रकार असून अनेक वृत्तपत्रांचं संपादकपदही त्यांनी भुषवलं होतं.अकबर हे संपादक असल्याच्या काळात या सर्व घटना घडल्याचा दावा महिला पत्रकारांनी केला होता. अकबर भारतात परत आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला असंही म्हटलं जात होतं. मात्र त्यांनी राजीनामा न देता खटला दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला होता.#MeToo या मोहिमेत आरोप करणाऱ्या सर्व पत्रकार या प्रतिष्ठीत वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या आहेत. चौफेर दबाव वाढत असतानाही सरकारने अकबर यांची पाठराखण केली आहे. आपल्या विरूद्धचे सर्व आरोप हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि प्रतिमा मलिन करण्यासाठीच आहेत असही अकबर यांनी आपल्या खुलाश्यात म्हटलं आहे.अकबर हे 'द टेलिग्राफ', 'एशियन एज' आणि 'द संडे गार्डियन' या वृत्तपत्रांचे संपादक होते. सध्या ते भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. संपादक असतानाच्या कार्यकाळात नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलेल्या आणि त्यांच्या काही महिला सहकाऱ्यांनीच त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.हॉटेलच्या खोलीत बोलावून अश्लिल संभाषण करणं, मद्य पिण्यासाठी आग्रह करणं, आक्षेपार्ह शेरेबाजी करणं असे अनेक आरोप एम.जे. अकबर यांच्यावर लावण्यात आले आहेत. 
दैनिक वृत्तपत्र 'द टेलिग्राफ' आणि 'संडे' नियतकालिकाचे संपादक म्हणून काम पाहिलेले एम. जे. अकबर १९८९ मध्ये राजकारणात आले. तत्पूर्वी अकबर यांचे पत्रकारितेत मोठे नाव झाले होते. त्यांनी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते खासदारही झाले. पुढे अकबर यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपत प्रवेश केला. मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेलेले एम. जे. अकबर जुलै २०१६मध्ये परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री झाले. 


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.