खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्दात शेरेबाजी ; रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या विरोधात दाखल गुन्हा विषयक माहिती निवडणूक शपथपत्रामध्ये लपविली असल्याचे उघड
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
निवडणूक दरम्यान वेल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. याप्रकरणाची नियमित सुनावणी पुणे येथील सह दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुरु आहे. वेल्हा पोलीस स्टेशन प्रथम माहिती अहवाल क्रमांक: 40 ने गुन्हा नोंद असून सन 2014 मध्ये दाखल केलेला आहे. संक्षिप्त फौजदारी खटला दाखल क्रमांक: 435494/2015 तारीख 28-12-2015 असा असून नोंदणी क्रमांक: 424727 असा आहे. या खटल्यातील पहिली सुनावणी 31 डिसेंबर 2015 रोजी घेण्यात आली. गेल्या महिन्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी न्यायालयात उपस्थिती दर्शवली असल्याची माहिती देखील पुढे येत आहे. या खटल्यातील पुढील सुनावणी तारीख 26 ऑक्टोबर 2018 आहे. सन २०१६ मध्ये ९ वेळा सुनावणी तारीख होती तर सन २०१७ मध्ये ६ वेळा सुनावणी तारीख नमूद असून २०१८ मध्ये सुनावणीच्या ५ तारखा झालेल्या आहेत. या न्यायालयात याचिकाकर्ता म्हणून महाराष्ट्र शासन विरुद्ध प्रत्युत्तरार्थी महादेव जगन्नाथ जानकर असे नमूद आहे. एकूण 20 वेळा झालेला सुनावणी तारखांपैकी गेल्या महिन्यात एक वेळ यांनी प्रत्यक्षात हजेरी लावली असल्याची माहिती आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर २०१५ मध्ये घेण्यात आले. यावेळी भाजपचे उमेदवार म्हणून विधानपरिषद सदस्य म्हणून नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल केले होते. दि. २०/१/२०१५ रोजी केलेल्या या शपथपत्रामध्ये कोणताही गुन्हा दाखल नसून निरंक असे नमूद केले होते. तर दुसऱ्यांदा जुलै २०१८ मध्ये महादेव जानकर यानी रासप या त्यांच्या पक्षाचा तिकिटावर निवडणूक लढवण्याचा हट्ट भाजपने पुरविला या वेळी विधानपरिषद सदस्य म्हणून नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल केले होते. दि. ५/६/२०१८ रोजी केलेल्या या शपथपत्रामध्ये केवळ गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील नगरपालिका निवडणूक आचारसंहिता भंगाचा दाखल गुन्हा प्रकरणाची माहिती देण्यात आलेली होती. मात्र प्रलंबित संक्षिप्त फौजदारी खटला दाखल प्रकरणाची माहिती निवडणूक शपथपत्रात दिली नसून लपविण्यात आल्याचे उघड झाले आहे. निवडणूक लढवताना शपथपत्रात खोटी माहिती माहिती देणे अथवा माहिती लपविणे लोकप्रतिनिधित्व कायदा प्रमाणे गुन्हा आहे. निवडणुकीत खोटे शपथपत्र सादर करणे हा भारतीय दंड विधाननुसार अपराध आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उमेदवाराने आपली संपत्ती, शिक्षण दाखल गुन्हे याबाबत खरी माहिती देणे उमेदवारावर बंधनकारक आहे. प्रतिज्ञापत्र खोटे असल्याचे सिद्ध झाल्यास संबधित व्यक्तींवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
अभियांत्रिकी पदवी मिळवलेले जानकर यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पळसावडे हे आहे. महादेव जानकर यांनी 2003 साली चोंडी (जि. अहमदनगर) येथे राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर 2004 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका लढविल्या. लोकसभेला बारामती, सातारा मतदारसंघात तर विधानसभेला परंडा (जि. उस्मानाबाद) मतदारसंघात दखलपात्र मते मिळाली. बीड जिल्ह्यातील अंबोजोगाई तालुक्यातून त्यांचा पहिला पंचायत समिती सदस्य आणि पहिला जिल्हा परिषद सदस्य निवडून आला होता. 2006 मध्ये स्वत: महादेव जानकर यांनी सांगलीमधून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली. यानिमित्ताने पक्षाची राज्यभर चर्चा झाली होती. 2009 मध्ये जानकर यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढले. त्यावेळी लाखभर मते मिळाली होती. त्यानंतर 2009 च्या विधानसभेला रासप हा रिपब्लीकन डावी लोकशाही समितीत (रिडालोस) सामील झाला होता. या युतीतून रासपचा पहिला आमदार अहमदपूर (लातूर) मतदारसंघातून निवडून आला होता. 2014 च्या लोकसभेपुर्वी दोन वर्षे महादेव जानकर हे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात होते. त्यांच्या माध्यमातून रासप लोकसभेला एनडीएचा घटक पक्ष बनला. महादेव जानकर स्वतः बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून लढले, मात्र पराभव झाला असलातरी अपेक्षेपेक्षा जास्त मते त्यांना मिळाली होती. तर विधानसभेला रासपचा दौंडमधून आमदार विजयी झाला. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची विधानपरिषद करीता भाजप मधून बिनविरोध निवड झालेली होती. स्वत: महादेव जानकर भाजप सरकारमध्ये पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास मंत्री काम करत आहेत. नुकतीच विधानपरिषद मुदत संपल्यावर पुन्हा विधानपरिषद करीता बिनविरोध निवड झालेली आहे. या निवडणुकांमध्ये दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये सदरील गुन्हे विषयक माहिती लपविली असल्याचे उघड झाले आहे.
गुन्ह्याची माहिती मला नुकतीच मिळाली - जानकर
याबाबत त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी याबाबत खुलासा व्यक्त केला आहे की, माझ्यावर जगात कोठेही गुन्हा दाखल नसून वेल्हा येथील दाखल गुन्ह्याची माहिती मला नुकतीच मिळाली आहे. सदरील तक्रार गैरसमजुतीने करण्यात आलेली असून आरोपामध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. निवडणूक विषयक शपथपत्र दाखल करताना सदरील प्रकरणाची माहिती माझ्याकडे नसल्याने मी नमूद केली नाही नुकतेच समन्स मिळाले त्यामुळे जाणीवपूर्वक माहिती लपविली नसल्याचा खुलासा पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी "पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)" शी दूरध्वनीवरून केला आहे. पुणे न्यायालयात दाखल प्रकरणाबाबत माहिती-
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
विधानपरिषद निवडणूक - २०१५ करीता दाखल शपथपत्र खालीलप्रमाणे-
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
विधानपरिषद निवडणूक - २०१८ करीता दाखल शपथपत्र खालीलप्रमाणे-
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.