काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीचे वर्चस्व
शिरोळ नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना पुरस्कृत शाहू आघाडीने नगराध्यक्षपदासह १७ पैकी ९ जागांवर विजय मिळविला. भाजपला ७ तर अपक्ष १ उमेदवार विजयी झाले. नगराध्यक्षपदी शाहू आघाडीचे अमर पाटील ३५ मतांनी विजय झाले. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत सोमवारी झालेल्या मतमोजणीनंतर शिरोळमध्ये सत्तांतर झाल्याचे स्पष्ट झाले. या पालिकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीचे वर्चस्व निर्माण झाले. या पालिकेत भाजप ७, शाहू आघाडी ९ आणि अपक्ष १ असे बलाबल झाल्याने राजर्षी शाहू आघाडीचे अमरसिंह पाटील २२ मतांनी शिरोळचे नवे नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले. शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी चुरशीने ७९.९१ टक्के मतदान झाले़ २१७३१ मतदारांपैकी १७३६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला़ एकूण नगरसेवक पदाच्या १७ जागेसाठी ८३ उमेदवारांचे, तर नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद झाले होते. आज, सोमवारी झालेल्या मतमोजणीनंतर शिरोळची सत्ता कुणाकडे हे स्पष्ट झाले आहे़ पालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने नगरसेवक पदापेक्षा नगराध्यक्ष पदाच्या निकालाकडे उत्सुकता लागून राहिली होती. गोकुळचे संचालक अनिल यादव यांच्या नेतृत्वाखालील भाजप, खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व काँग्रेस पक्ष यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडी, आमदार उल्हास पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडी आणि प्रमोद लडगे यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीत चौरंगी लढत झाली. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, पाशा पटेल, शिवसेनेचे लक्ष्मण वडले या दिग्गजांच्या प्रचारातील सहभागामुळे निवडणुकीत रंगत आली होती.
शिरोळ नगरपालिका अंतिम निकाल
नगराध्यक्ष : अमरसिंह पाटील
शाहू आघाडी : ९
भाजप : ७
अपक्ष : १
शिरोळ नगरपालिका : विजयी उमेदवार
प्रभाग -१ : योगेश पुजारी ( शाहू आघाडी), विदुंला यादव ( भाजपा)
प्रभाग -२ : अरविंद माने ( अपक्ष ), अनिता संकपाळ (भाजपा)
प्रभाग -३ : कुमुदिनी कांबळे ( शाहू आघाडी), राजेंद्र माने ( शाहू आघाडी)
प्रभाग -४ : सुनिता आरगे ( भाजपा), तातोबा पाटील (शाहू आघाडी)
प्रभाग -५ : इमान अत्तार (भाजपा), कमलाकर शिंदे ( शाहू आघाडी)
प्रभाग- ६ : दादासो कोळी (भाजपा), कविता भोसले (भाजपा)
प्रभाग -७ : करूणा कांबळे (शाहू आघाडी), श्रीवर्धन माने देशमुख (भाजपा)
प्रभाग -८ : सुरेखा पुजारी, जयश्री धर्माधिकारी, प्रकाश गावडे (शाहू आघाडी)
शिरोळ नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून प्रथमच करण्यात आली. या पदासाठी सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. नगराध्यक्षपदासाठी दोन अपक्षांसह चौघे रिंगणात होते. त्यामध्ये पृथ्वीराज यादव (भाजप), अमरसिंह पाटील (शाहू आघाडी), प्रमोद नडगे (ताराराणी आघाडी), रणजितसिंह पाटील (बहुजन विकास आघाडी) आणि महंमद गनी कागवाडे, शिवाजीराव संकपाळ या दोन अपक्षांचा समावेश आहे. याचबरोबर एकूण आठ प्रभागांतून नगरसेवकपदाच्या सतरा जागांसाठी ८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.. भाजप, बहुजन विकास आघाडी, शाहू आघाडी, ताराराणी आघाडी या निवडणुकीस सामोरे गेले. भाजपाला शह देण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शाहू आघाडीची मोट बांधली होती. अनेक अपक्षही निवडणुकीच्या रिंगणात होते. एकूण २१७३१ पैकी १७३६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
===========================================
या पूर्वीचे संबधित वृत्त-
नवनिर्वाचित शिरोळ नगरपरिषदेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान
कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्मित शिरोळ नगरपरिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर 2018 रोजी मतदान; तर 22 ऑक्टोबर 2018 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. शिरोळ नगरपरिषदेच्या अध्यक्ष व 17 सदस्यपदांसाठी ही निवडणूक होत आहे. नामनिर्देनपत्रे 24 ते 29 सप्टेंबर 2018 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देनपत्रांची छाननी 1 ऑक्टोबर 2018 रोजी होईल. नामनिर्देनपत्रे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 21 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 22 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल.
कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित शिरोळ नगरपरिषदेचा निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून २१ ऑक्टोबरला मतदान घेण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्र २४ सप्टेंबर २०१८ ते २९ सप्टेंबर २०१८ दाखल करता येणार आहे. तर नामनिर्देशनपत्र छाननी १ ऑक्टोबर २०१८ रोजी करण्यात येईल. ६ ऑक्टोबर २०१८ पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. २१ ऑक्टोबरला मतदान घेण्यात येईल तर मतमोजणी २१ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने नवनिर्वाचित शिरोळ नगरपरिषदेचा निवडणुक कार्यक्रम काल जाहीर करण्यात आला.
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर शिरोळला नगरपालिका मंजूर झाली. जनतेतून नगराध्यक्ष आणि प्रभागातून सदस्य निवडी होणार आहेत. यापूर्वी ग्रामपंचायतीत १७ सदस्य होते. नगरपालिकेनंतर ८ प्रभाग असून, ७ प्रभागांत प्रत्येकी दोन, तर आठव्या प्रभागात ३ सदस्य निवडले जाणार आहेत. नगराध्यक्ष व २ स्वीकृत असे वीस सदस्य नगपरिषदेत असतील. २०११ च्या जनगणनेनुसार २७ हजार ६४९ इतकी लोकसंख्या आहे. ५० टक्के महिला सदस्यांना स्थान पालिकेत असेल. प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर करून ३ एप्रिलला प्रारुप प्रभाग रचना त्यानंतर १३ एप्रिलला पालिकेकडील सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे.ग्रामपंचायतीत यादव आघाडीची सत्ता होती, तर मागील निवडणुकीत यादव पॅनेल विरुद्ध राजर्षी शाहू आघाडी असा सामना झाला होता. यादव पॅनेलचे नेते अनिल यादव हे भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे भाजप विरुद्ध महाआघाडी अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिरोळ तालुक्यात पक्षापेक्षा गटा-तटाच्या राजकारणाला अधिक महत्त्व आहे. शिरोळमध्येही गटा-तटाचे राजकारण असले तरी काही प्रभागांत भाऊबंदकीच्या मतदारांवर निवडणूक होते. प्रथमच पालिकेच्या निमित्ताने थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी निवडणूक होत असल्याने इच्छुकांची संख्येत वाढ होणार आहे. शिरोळ पालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण, प्रभाग रचना व आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी २१ हजार ७३१ मतदारांची नोंद झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची नियुक्ती केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. एकूण आठ प्रभाग असून, प्रभाग आठमध्ये सर्वाधिक ४७९४, तर प्रभाग पाचमध्ये सर्वांत कमी १५०० मतदार आहेत. एकूण २१ हजार ७३१ मतदारांपैकी ११२६८ पुरुष तर १०४६१ महिला मतदार आहेत. प्रभाग एकमध्ये २०२४, प्रभाग दोनमध्ये २२८९, प्रभाग तीनमध्ये २५३३, प्रभाग चारमध्ये २७०५, प्रभाग सहामध्ये २९४०, प्रभाग सातमध्ये २९४६ मतदार आहेत.निवडणुकीसाठी अद्याप पक्ष तसेच गटा-तटांच्या आघाड्या निश्चित झाल्या नसल्या तरी प्रभाग रचना, प्रभागांचे आरक्षण यापूर्वीच निश्चित झाल्याने इच्छुक उमेदवार प्रचाराला लागले आहेत. त्यांनी मतदारांच्या थेट गाठीभेटीवर भर दिला आहे. निवडणुकीच्या तारखेकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते. काल निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. शिरोळ नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ शिरोळ नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे. यापूर्वीच राज्यातील नवनिर्मित 2 नगरपरिषद व 3 नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते काढण्यात आली होती.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.