Tuesday 30 October 2018

मनोरा सोडण्यास काही आमदार आणि त्यांच्या पीए, कार्यकर्त्यांकडून चालढकल

उद्यापर्यंत सर्व कक्ष रिकामे करण्याच्या पुन्हा सूचना



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================
दोन्ही सभागृहांच्या सर्व सन्मानीय सदस्यांना प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी मनोरा आमदार निवास इमारतीमधील सर्व कक्ष ३१ ऑक्टोबर पूर्वी रिक्त करण्याची अंतिम सूचना काल दि. २९ ऑक्टोबर २०१८ रोजी जा.क्र.२६५८९/१८ या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. वारंवार सूचना देऊनही सन्मानीय सदस्य आमदार व  त्यांच्या पीए, कार्यकर्त्यांकडून चालढकल केली जात आहे. धोकादायक इमारत असून बांधकाम करण्यासाठी पाडण्यात येणार आहे. जे सदस्य कक्ष रिकामे करणार नाहीत ते आपल्या जबाबदारीवर त्या ठिकाणी वास्तव्य करीत आहेत असे समजण्यात येईल असेही या पत्रात म्हंटले आहे. तसेच सर्व सन्मानीय सदस्यांना सर्व कक्ष ३१ ऑक्टोबर पूर्वी रिक्त करण्याची अंतिम सूचना देण्यात आल्या असून  जे सदस्य कक्ष रिकामे करणार नाहीत त्यांच्यावर उपरोक्त कार्यवाही करण्याच्या सूचना  सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री.सगणे यांना दि.२९ ऑक्टोबर २०१८ रोजी जा.क्र.२६५९०/१८ या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

 गेली २ वर्षापासून मनोरा इमारत पडण्याचे काम रखडले आहे. न्यायालयीन अडचणीनंतर काही आमदार आणि त्यांच्या पीए, कार्यकर्त्यांकडून चालढकल केली जात आहे. दरम्यान तुतीय हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबर २०१८ रोजी मुबईत होणार आहे. काही आमदारांना यापूर्वीच 1 लाख रु. प्रती महा भाडे देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर काही आमदारांची सोय घाटकोपर येथील निवासस्थानात केलेली आहे.  मनोरा आमदार निवास इमारती पाडून तेथे बहुमजली टॉवर बांधण्याचे काम केंद्र सरकारच्या नॅशनल बिल्डिंग कॉर्पोरेशनकडे दिलेले आहे. पुढील दोन महिन्यांत मनोरा इमारती पाडण्यात येतील. तेथे राहत असलेल्या आमदारांची व्यवस्था घाटकोपर येथील इमारतींत करण्यात येईल. घाटकोपर येथे परिवहन विभागाचा भूखंड असून तेथे काही इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. त्यातील काही सदनिका राज्य सरकारच्या मालकीच्या आहेत. तेथे मनोरा मधील काही आमदारांची व्यवस्था करण्यात येईल. मात्र ज्या आमदारांना तेथील सदनिका घ्यायच्या नसतील त्यांना दर महिन्याला एक लाख रुपये निवासस्थानासाठीचे भाडे राज्य सरकार व विधिमंडळ सचिवालयाकडून देण्यात येईल. मनोरा येथे निवासस्थान असलेल्या मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील आमदारांना एक लाख रुपये दिले जातील. त्यांना सध्या सदनिका दिली जाणार नाही. एक लाख रुपयांत हे आमदार दक्षिण मुंबई किंवा अन्यत्र कुठेही सदनिका भाड्याने घेवून राहू शकतात. याबाबतचा निर्णय त्यांच्यावर सोपविण्यात आला आहे. मनोरा येथे राहणाऱ्या महिला आमदारांना मंत्रालयालगतच्या आकाशवाणी आमदार निवासासह अन्य आमदार निवासस्थानात सदनिका देण्यास प्राधान्य दिले जाईल. काही आमदारांची मनोरा येथे एक सदनिका आणि अन्य आमदार निवासस्थानात एक सदनिका असेल त्यांना मनोरा येथील एका सदनिकेचे भाडे म्हणून ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. गेल्या नागपूरच्या अधिवेशनात पावसाचे पाणी सभागृह परिसरात घुसल्याने पूर्णवेळ कामकाज झाले नव्हते.या सत्रातील कामकाजात तेरा कामकाजाच्या दिवसांमध्ये एकूण ८६ तास १९ मिनीटे कामकाज झाले होते. त्यामध्ये ८ तास १९ मिनीटांचे कामकाज तहकूबीमुळे वाया गेले होते. सरासरी रोज ६.३९ मिनीटे कामकाज झाले असून त्यात तारांकीत प्रश्न ९६६९ स्विकृत करण्यात आले होते तर ८१३ प्रश्न चर्चेला आले त्यापैकी ३७ प्रश्नाची तोंडी उत्तरे देण्यात आली होती. लक्षवेधीच्या २१६० सूचना प्राप्त झाल्या होत्या तर १९४ सूचना चर्चेला आल्या होत्या आणि ४३ सूचनांवर प्रत्यक्ष चर्चा झाली होती. एकूण ३३ विधेयकांचे कामकाज विधानसभेत झाले होते तसेच दोन्ही सभागृहात १५ विधेयके मंजूर करण्यात आली होती. २९३ च्या तीन चर्चा करण्यात आल्या तर २९२ च्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आल्या होत्या. मनोरा आमदार निवासातील इमारती मोडकळीस आलेल्या असल्याने राज्य सरकार व विधिमंडळ सचिवालयाने ही इमारत पाडून तेथे बहुमजली टॉवर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बाधणीत आमदारांना १००० चौरस फुटांच्या सदनिका देण्यात येणार आहेत. त्यापैकी ६०० चौरस फुटांची सदनिका आमदारासाठी व ४०० चौरस फुटांची सदनिका त्यांचे स्वीय साहाय्यक व कार्यकर्त्यांसाठी राहणार आहे. बांधकामाच्या काळात विस्थापित होणाऱ्या आमदारांसाठी दक्षिण मुंबईत एक टॉवर भाडय़ाने घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. राज्य विधानसभेचे २८८ व विधान परिषदेचे ७८ असे एकूण ३६६ आमदार आहेत. त्यांच्या मुंबईतील निवासासाठी आकाशवाणी, मनोरा, मॅजेस्टिक व जुने किंवा विस्तारित आमदार निवास आहे. मॅजेस्टिक आमदार निवास धोकादायक जाहीर केल्याने त्या इमारतीत सध्या कुणीही राहात नाहीत असे वारंवार खोटे सांगण्यात येत आहे. काही आमदार यांचे पीए, स्वीय सहायक व कार्यकर्त्यांकडून चालढकल केली जात आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये कक्ष खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र 1 ते २ वर्ष कक्ष खाली न करता वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान न्यायालयात एक याचिका दाखल असल्याने त्याची पुनर्बाधणीही करता येत नव्हती.आमदारांची राहण्याची चांगली सोय व्हावी, यासाठी मंत्रालयाच्या व विधानभवनाच्या जवळ १९९५ च्या दरम्यान ‘मनोरा’ आमदार निवास बांधण्यात आले. अवघ्या 25 वर्षात या मनोरा आमदार निवासामध्ये अनेक समस्या पुढे यायला सुरुवात झाली. प्लास्टर निघणे, स्वच्छतागृहातमध्ये पाणी गळती पासून अनेक समस्या पुढे आल्या. त्यातच इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही इमारत दुरुस्त करणे अवघड असल्याचेही समोर आले होते परंतु वीस वर्षांतच ही इमारत खराब झाल्याने ती पाडून त्या जागी नवीन टॉवर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आमदार निवासात एकूण चार टॉवर असून एकूण 336 फ्लॅट आहेत. पहिल्या दोन विंगचं 1994 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.उर्वरित दोन विंगचे उद्घाटन मनोहर जोशी यांनी 1995 रोजी केले होते. इमारत धोकादायक परिस्थितीत असल्याचा मुद्दा नेहमी चर्चेला आला असून, गतवर्षी न्यायाधीश एम एल तहलियानी यांनी बांधकाम विभागाला हलक्या दर्जाचे बांधकाम करण्यावरुन फटकारले होते. दरम्यान हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबर २०१८ रोजी मुबईत होणार आहे. सन्मानीय व स्वीय सहाय्यक यांची सोय होणार असल्याने फुकट्यांची गैरसोय होणार असल्याने सचिवांच्या सूचनांच्या पत्राची चर्चा मंत्रालयातील कडगुळानामध्ये होती.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

---------------------------------------------------------------


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

विधिमंडळ सचिव यांचे सूचना पत्र खालीलप्रमाणे- 




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.