आगामी निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनाच सर्वाधिक पसंती!
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनातील सरकारची प्रतिमा याबाबतचे सर्वेक्षण सरकारनामा या पहिल्या दिवाळी अंकातून आज प्रसिद्ध करण्यात आले आहे. यानुसार मतदारांच्या भूमिकेत बदल होत असल्याचे जाणवत असले तरी आज निवडणूक झाली तरीही सर्वाधिक २८ टक्के पसंती भाजपलाच या महासर्वेक्षणात व्यक्त केलेली आहे. पुढील निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत असे आपल्याला वाटते? या प्रश्नावर सर्वाधिक 20 टक्के सरासरी पसंती मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली असल्याचे नमूद केले आहे. व्यापारी व शेतकरी या दोन वर्गवारीनुसार पसंती विषद केली असून सरासरी नुसार मुख्यमंत्री फडणवीस यांना सर्वाधिक पसंती दिल्याचे म्हंटले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना तीनही वर्गाने केवळ 1 टक्का पसंती दर्शवली आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे सर्वाधिक 23 टक्के पसंती शेतकरीवर्गाने दिली आहे. तर अशोक चव्हाण यांच्या पेक्षा 1 टक्का जास्त पसंती पृथ्वीराज चव्हाण यांना १३ टक्के तर अजित पवार यांना १६ टक्के आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांना केवळ १० टक्के सरासरी पसंती दिल्याचे म्हंटले आहे. आज निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला मत द्याल? असा प्रश्न असून त्यावर पसंतीचे प्रमाण देण्यात आलेले आहे यानुसार भाजप-28%, काँग्रेस-25%, शिवसेना-17%, राष्ट्रवादी-23%, मनसे-02%, अन्य-05% असे दिले आहे. वयोगटानुसार देखील भाजपला २८ टक्के पसंती मतदारांनी व्यक्त केलेली असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये व्यापारी-उद्योजक व शेतकरी या दोन वर्गातील पसंतीचे प्रमाण देण्यात आले असून व्यापारी-उद्योजक यांनी देखील भाजपला सर्वाधिक ३१ टक्के पसंती दिली आहे तर शेतकरी वर्गाने भाजपला २३ तर सर्वाधिक ३0 टक्के पसंती देऊन शिवसेनेला मात्र दोन्ही वर्गाने अनुक्रमे अल्प १७ व १६ टक्के पसंती व्यक्त केल्याचे नमूद करण्यात आले आहे. व्यापारी-उद्योजक वर्गाने राष्ट्रवादी पेक्षा काँग्रेसला जास्त पसंती दिली आहे. आज निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला मत द्याल? या प्रश्नावर व्यापारी-उद्योजक वर्गाने पुढीलप्रमाणे पसंती व्यक्त केली आहे की, भाजप-31%, काँग्रेस-23%, शिवसेना-17%, राष्ट्रवादी-21%, मनसे-3%, अन्य-5%, आज निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला मत द्याल? या प्रश्नावर शेतकरी वर्गाने भाजप-23%, काँग्रेस-26%, शिवसेना-16%, राष्ट्रवादी-30%, मनसे-1%, अन्य-4% याप्रमाणे पसंती व्यक्त केली आहे. भाजप आणि शिवसेना या पक्षांनी आगामी लोकसभा-विधानसभा निवडणूक युती करावी का? याप्रश्नावर युती करू नये असे सर्वाधिक 53 टक्के व्यापारीवर्ग, शेतकरीवर्ग व नोकरदार या वर्गाने व्यक्त केलेल्याचे सरासरी प्रमाण नाही असे आहे. तर युती करावी याबाबत होय असे ४७ टक्के व्यापारीवर्ग, शेतकरीवर्ग व नोकरदार या वर्गाने मत व्यक्त केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आगामी लोकसभा-विधानसभा निवडणूक आघाडी करावी का? याप्रश्नावर दोन्ही पक्षाने आघाडी करावी असे मत सर्वाधिक 66 टक्के व्यापारीवर्ग, शेतकरीवर्ग व नोकरदार या वर्गाने व्यक्त केलेल्याचे सरासरी प्रमाण होय असे आहे. तर 34 टक्के नाही असे व्यापारीवर्ग, शेतकरीवर्ग व नोकरदार या वर्गाने मत व्यक्त केले आहे. व्यापारीवर्ग, शेतकरीवर्ग व नोकरदार यांचे सरासरी प्रमाण आहे. इतर वर्गवारीबाबत उल्लेख करण्यात आलेला नाही. मतदान करताना कोणत्या मुद्याला आपण सर्वाधिक महत्व द्याल? याप्रश्नावर सर्वाधिक ३० टक्के महागाईला महत्व दिले आहे. तर शिक्षण व नोकरी आरक्षण - 22%, शेतमालाला भाव - 27%, बेरोजगारी - 21 टक्के महत्व दिले आहे. व्यापारीवर्ग, विद्यार्थी, गृहिणी या तीन वर्गवारीत घेतलेल्या सर्वेक्षणामधील सरासरी प्रमाण देण्यात आले आहे. शिक्षण व नोकरी आरक्षण या मुद्याला विद्यार्थी वर्गाने सर्वाधिक 40 टक्के महत्व दिले आहे तर महागाई या मुद्याला गृहिणीनी सर्वाधिक 42 टक्के महत्व दिले आहे. विद्यार्थी वर्गाने महागाईला महत्व दिले नसून त्यांच्या दृष्टीने केवळ १४ टक्के महत्व आहे. राज्य सरकारच्या कारभाराविषयी आपण समाधानी आहात का? याप्रश्नावर समाधानी आहे असे 32 टक्के तर नाही म्हणून 48 टक्के तसेच सांगता येत नाही असे 20 टक्के नमूद केले आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या आज निवडणुका झाल्या तर कोणाची सत्ता येईल? या प्रश्नावर व्यापारी व शेतकरी या दोन वर्गाने सरासरी सर्वाधिक भाजपला ३५ टक्के सत्ता येईल असे मत व्यक्त केले आहे. इतर मध्ये सरासरी प्रमाण काँग्रेस-24%, शिवसेना-20%, राष्ट्रवादी-21%, भाजप-सेना युती केल्यास- 34%, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी केल्यास- 66%, असे प्रमाण देण्यात आलेले आहे. विधानसभेच्या आज निवडणुका झाल्या तर कोणाची सत्ता येईल? या प्रश्नावर केवळ व्यापारी वर्गाने भाजप-40%, काँग्रेस-23%, शिवसेना-20%, राष्ट्रवादी-17%, भाजप-सेना युती केल्यास- 35%, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी केल्यास- 65% असे तर निवडणुका झाल्या तर कोणाची सत्ता येईल? या प्रश्नावर केवळ शेतकरी वर्गाने भाजप-29%, काँग्रेस-27%, शिवसेना-17%, राष्ट्रवादी-30%, भाजप-सेना युती केल्यास- 30%, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी केल्यास- 70%, भाजपच्या बाजूने मतदान करणाऱ्या ३५ टक्के प्रतिसाद कर्त्यांपैकी 40 टक्के व्यापारी-उद्योजक आणि २९ टक्के शेतकरी आहेत असेही म्हंटले आहे. विरोधकांनी कोणत्या मुद्याकडे सर्वाधिक लक्ष वेधले आहे? असा प्रश विचारण्यात आला यावर शेतीचे प्रश्न - 24%, आरक्षण - 15%, बेरोजगारी - 13%, रस्त्यावरील खड्डे - 6%, पेट्रोल-डीझेल दरवाढ - 28%, धार्मिक तेढ - 5%, महिलावरील अत्याचार - 8%, गुंतवणूक - 1% अशा प्रमाणात विविध मुद्याकडे लक्ष वेधले आहे. भाजप विरोधकांची आघाडी हा विश्वासाहार्य पर्याय होईल का? या प्रश्नावर होय असे 36 टक्के तर नाही असे 40 टक्के आणि 24 टक्के जणांनी सांगता येत नाही असे उत्तर दिल्याचे म्हंटले आहे. सर्वाधिक 31 टक्के व्यापारीवर्ग तर ३९ टक्के शेतकरीवर्गाने आघाडी हा विश्वासाहार्य पर्याय नाही असे मत व्यक्त केले आहे. विद्यमान राज्य सरकारबद्दल आपल्या मनात काय प्रतिमा आहे? याबाबत व्यापारी व शेतकरी या दोन वर्गात मत घेण्यात आल्याचे नमूद केले आहे. दोन्ही वर्गाच्या सरासरीनुसार सर्वाधिक कमी ६ टक्के सर्वसामान्यांचे सरकार म्हणून नमूद केले आहे तर सरासरीनुसार सर्वाधिक जास्त 33 टक्के प्रमाण वेळकाढूपणा हा पर्याय निवडला असल्याचे म्हंटले आहे. इतर पर्यायामध्ये पारदशी - 12%, अभ्यासू - 9%, वेळकाढूपणा - 33%, सनातनी - 9%, कार्यक्षम - 9%, संधीसाधू - 22%, सर्वसामान्यांचे सरकार - 6% असे प्रमाण विषद केले आहे. सदरील सर्वेक्षण अधिक माहीतीसाठी प्रसिद्ध झालेल्या सरकारनामा दिवाळी अंकातील राजकीय फराळ चोखंदळावा.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.