Saturday 20 October 2018

पुणे महापालिकेचा नवनिर्वाचित प्रभाग क्र. ४२ अंतिम ; रचना व सदस्य संख्येबाबत सविस्तरपणे ब्लॉग पहा

विचित्र अंतिम प्रभाग रचना कायम; हरकतीनां केराची टोपली; डिसेंबरला निवडणूक होणार!


पुणे महापालिकेचा नवनिर्वाचित प्रभाग क्र. ४२ ची अंतिम रचना जाहीर करण्यात आली असून २ सदस्य संख्येत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नागरीकांनी घेतलेल्या हरकती निवडणूक आयोगाने फेटाळून लावल्या आहेत. यापूर्वी जाहीर केलेली  विचित्र प्रारूप रचनाच अंतिम प्रभाग रचना कायम केलेली आहे. प्रभाग रचनेवर घेतलेल्या हरकतीनां केराची टोपली दाखवली आहे. दरम्यान अहमदनगर व धुळे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांबरोबर पुणे महापालिकेच्या नवनिर्वाचित प्रभाग क्र. ४२ मधील २ सदस्यीय प्रभागाची निवडणूक डिसेंबरला घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

प्रभाग रचना अखेर जैसे थे

पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांसाठी निश्‍चित केलेला नवीन प्रभाग महापालिकेतील सर्वांत मोठा प्रभाग ठरणार आहे. लोहगाव ते धायरी आणि शिवणे ते फुरसुंगी दरम्यानचे सरासरी अंतर 25 किलोमीटरपेक्षा अधिक आहे. भौगोलिक सलगता नसतानाही निवडणूक घेणं अपरिहार्य असल्याने ही रचना केली आहे. दरम्यान, या नवीन प्रभागाच्या प्रारूप रचनेवर नागरिकांनी 12 ऑक्‍टोबरपर्यंत हरकती आणि सूचना सादर केल्या होत्या त्यावर त्यावर सुनावणी होऊन अंतिम रचना जाहीर करण्यात आलेली आहे. नागरिकांनी घेतलेल्या हरकतीना केराची टोपली दाखवली आहे. यामुळे समाविष्ट गावातील नागरीकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या अंतिम रचनेवर न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पालिकेचा हा 42 वा प्रभाग असणार असून त्याची लोकसंख्याही सर्वाधिक 2 लाख 39 हजार असून यामुळे नगरसेवकांची संख्या 164 होणार आहे. मागील वर्षी महापालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम आयोगाकडून जाहीर केला आहे. त्यानुसार, ही गावे शहराच्या चारही दिशांना असल्याने महापालिकेकडून त्यांचा संयुक्त प्रभाग करण्यात आला असून त्याला फुरसुंगी-लोहगाव असे नाव देण्यात आले आहे. शहरात सर्वत्र हा प्रभाग विखूरलेला असला तरी, प्रत्यक्षात त्याची सलगता नसल्याने प्रशासनाकडून या गावांच्या हद्दीनुसार, तो जाहीर केला असून त्यात उत्तरेला लोहगाव (उर्वरित) पूर्वेला मुंढवा (उर्वरित केशवनगर) व हडपसर (साडेसतरानळी), उरळी, फुरसुंगी व उंड्री तर दक्षिण दिशेला आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द व धायरी आणि पश्‍चिम दिशेला शिवणे (उत्तमनगर) ही गावे असणार आहेत. 



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे





POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

------------ यापूर्वीचे सविस्तरपणे संबधित वृत्त खालीलप्रमाणे--------



पुणे महापालिकेत ११ गावांचा पहिला नगरसेवक/नगरसेविका कोण होणार?



समाविष्ट ११ गावाचा एक प्रभाग करण्यात आला असून अवाढव्य भौगोलिकदृष्ट्या असणाऱ्या प्रभाग क्र ४२ फुरसुंगी-लोहगाव मधून नगरसेवक कोण होणार याची चाचपणी राजकीय पक्षांनी सुरु केलेली आहे. ११ गावांचा पहिला नगरसेवक/नगसेविका कोण होणार? याची उत्सुकता या गावामध्ये निर्माण झाली आहे. मात्र प्रभाग रचनाच या गावामधील नागरिकांना पचनी पडत नाही. नव्या प्रभागात सध्या असणाऱ्या मतदारसंख्येच्या तुलनेत आंबेगांव (बु/खुर्द) व आंबेगाव (बुद्रुक)-धायरी व फुरसुंगीमधील संख्या जास्त आहे. या भागातीलच उमेदवार या प्रभागावर वर्चस्व राखतील अशी शक्यता आहे.  आंबेगांव (बु/खुर्द) व आंबेगाव (बुद्रुक) या भागातील लोकसंख्या २०११ पेक्षा आजची मतदारसंख्या जास्त आहे. ४५१९९ ही समाविष्ट ११ गावातील भागातील सर्वाधिक जास्त मतदारसंख्या आहे. तर त्या खालोखाल फुरसुंगीतील ३९६६९ मतदारसंख्या असून धायरीची ३६०१८ मतदारसंख्या ही २०११ लोकसंख्येच्या तुलनेत जास्त आहे. लोहगावची लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंख्या नोंद कमी प्रमाणात आहे. शिवणे उत्तमनगर व इतर भागातील संख्या नवीन प्रभागाच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून प्रभावशील नाही. नवनिर्वाचित प्रभाग क्र ४२ मधील निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. 
२०११ जनगणना मधील लोकसंख्या प्रभाग रचनेत गृहीत धरण्यात येत असल्याने लोकप्रतिनिधीत्वाची संख्या कमी दर्शविण्यात आली आहे. या ११ समाविष्ट भागातील लोकसंख्या केवळ लोकसंख्या २,३९,४८३ असून अनुसूचित जातींची संख्या ३१,४७५ आहे तर अनुसूचित जमातींची संख्या ३५०१ नमूद केलेली आहे. मात्र या भागातील मतदारसंख्या काही भागात तुलनात्मकदृष्ट्या जास्त आहे. मतदारसंख्या विचारात घेतल्यास नगरसेवक संख्या नगण्य असून ती इतर प्रभागांच्या तुलनेत १० ते १२ सदस्यांचाचे किमान ३ प्रभाग करणे अपेक्षित होते. पुणे महापालिकेच्या पूर्वीच्या प्रभाग रचनेत २०११ जनगणना मधील लोकसंख्या प्रमाण सरासरी ८० ते ८५ हजार असे एका प्रभागासाठी सर्वाधिक असे घेण्यात आले आहे. प्रभाग क्र ४२ प्रारूप रचना प्रसिद्ध करताना ११ समाविष्ट भागातील लोकसंख्या केवळ लोकसंख्या २,३९,४८३ आहे तर पूर्वीच्या सरासरीच्या प्रमाणत ३ प्रभाग 4 सदस्याचे निर्माण होणे अपेक्षित आहे. मात्र 1 प्रभाग निर्माण करून त्यामध्येही २ सदस्यांना मान्यता राज्य निवडणूक आयोगाने दिल्याचे सांगण्यात येते हे या समाविष्ट भागातील नागरिकांवर अन्यायकारक आहे. विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्राप्रमाणे या प्रस्तावित प्रभागाची रचना व त्या तुलनेत मतदारसंख्या आहे. लोहगाव ते धायरी आणि शिवणे ते फुरसुंगी दरम्यानचे सरासरी अंतर २५ किलोमीटरपेक्षा अधिक आहे. भौगोलिक सलगता नसतानाही हा सर्व परिसर आता एका प्रभागाखाली सामावला जाणार आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व गावांचा मिळून एकच प्रभाग तयार होणार असल्याने येथून निवडून येणाऱ्या नगरसेवकांसमोर शहराच्या पूर्व-पश्चिम आणि दक्षिण-उत्तर अशा चारही दिशांच्या मतदारांशी संपर्क ठेवण्याचे कठीण  आव्हान असणार आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या प्रभागाच्या प्रा-रूप रचनेवर नागरिकांना येत्या शुक्रवारपर्यंत (१२ ऑक्टोबर) हरकती-सूचना मांडता येणार आहेत. शुक्रवारपर्यंत दाखल होणाऱ्या सर्व हरकतींवर १७ ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्यात येणार असून, त्यानंतर २० ऑक्टोबरला प्रभागाची रचना अंतिम केली जाणार आहे. ही प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर आगामी काळात निवडणूक आयोगातर्फे येथील निवडणूक जाहीर केली जाणार आहे.भाग चारही दिशांना - उत्तर : लोहगाव (उर्वरित) पूर्व : मुंढवा (उर्वरित केशवनगर) व हडपसर (साडेसतरानळी), उरळी, फुरसुंगी व उंड्री , दक्षिण : आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द व धायरी, पश्चिम : शिवणे (उत्तमनगर) अशी आहे. या समाविष्ट भागात पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे च्या वतीने नागरिकांचा अंदाज/प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता. दोन सदस्यांचा नवीन प्रभाग क्र ४२ तयार करण्यात येत आहे. या प्रभागाची रचना सांगितल्यावर सर्वसाधारण नागरिक डोक्यावर हात मारून घेत आहेत. नवीन प्रभाग रचनेबाबत फारसी माहिती नागरिकांना नाही. राजकीय व सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या प्रतिक्रिया देखील प्रतिकूल आहेत. प्रशासनावर तोंडसुख घेणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या सर्व प्रारूप प्रभाग रचना प्रक्रियेला हरकत घेण्यात येणार असल्याचे काही राजकीय पदाधिकारी यांनी सांगितले. नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये आगामी काळात निवडणूक झाल्यास मत जाणून घेण्यात आले असता राज्य व केंद्र आणि महापालिकेत सत्ता भाजपची असल्याने आमच्या भागात किमान निधी उपलब्ध करून देतील या आशेने आम्ही भाजपला प्राधान्यक्रम देऊ अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तर निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या काही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.  
=============================


महापालिका समाविष्ट भागातील जिल्हा परिषद गट व गण रद्द होणार!

हवेली  तालुक्यातील पुणे जिल्हा परिषदेचा 1 गट व  पंचायत समितीचे गण 8 संपुष्टात येणार 


पुणे महापालिका समाविष्ट भागातील जिल्हा परिषद गट व गण रद्द होणार आहेत. हवेली तालुक्यातील काही गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला असून या समाविष्ट भागात नव्याने प्रभाग रचना करून निवडणूक घेण्यात येणार आहे. हवेली तालुक्यातील १३ गट व २६ पंचायत समिती गण आहेत यामधील हवेली तालुक्यातील एकूण ८ गण संपुष्टात येणार आहेत. तर जिल्हा परिषदेचा 1 गट संपुष्टात येत आहे. ९ लोकप्रतिनिधीचे भवितव्य विस्तापित होणार आहे. आगामी काळात उर्वरित भाग घेतल्यास हवेली तालुक्याचे जिल्हा परिषद मधील वर्चस्व देखील संपुष्टात येणार आहे. नुकत्याच जाहीर झालेला पुणे महापालिकेतील नवनिर्वाचित प्रभाग प्रारूप रचनेनुसार केवळ २ लोकप्रतिनिधीत्व करणार आहेत तर सध्या समाविष्ट भागातून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ९ जण लोकप्रतिनिधीत्व करीत आहेत. आगामी काळात म्हणजेच २०२२ साली पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गट व गण पुनर्रचना होईल. सद्यस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य या भागातील नेतृत्व करीत असले तर महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार त्यांचे अधिकाराना कात्री लागणार आहे. सध्या हवेली पंचायत समिती सभापती- वैशाली महाडीक (राष्ट्रवादी काँग्रेस) उपसभापती- अजिंक्य घुले (राष्ट्रवादी काँग्रेस) म्हणून कार्यरत आहेत.

हवेली तालुक्यातील १३ गट व २६ पंचायत समिती गण आहेत ते खालीलप्रमाणे- 

                35 - देहू-लोहगाव (लोहगाव भाग पालिकेत)
    36 - वाघोली - आव्हाळवाडी (सध्या बदल नाही)
    37 - पेरणे-वाडेबोल्हाई (सध्या बदल नाही)
    38 - उरुळीकांचन-सोरतापवाडी (सध्या बदल नाही)
    39 - थेऊर-लोणीकाळभोर (सध्या बदल नाही)
    40 - फुरसुंगी-कदमवाकवस्ती (फुरसुंगी भाग पालिकेत)
    41 - मांजरी बु.-शेवाळवाडी (सध्या बदल नाही)
    42 - केशवनगर-साडेसतरानळी (केशवनगर व साडेसतरानळी भाग पालिकेत)
    43 - उरुळीदेवाची-वडकी (उरुळीदेवाची भाग पालिकेत)
    44 - आंबेगाव बु.-न-हे  (आंबेगाव बु.भाग पालिकेत)
    45 - धायरी - नांदेड (धायरी भाग पालिकेत)
    46 - शिवणे-कोंढवे धावडे (शिवणे भाग पालिकेत)
    47 - मांगडेवाडी - डोणजे (सध्या बदल नाही)

हवेली तालुक्यातील १३ गट व २६ पंचायत समिती गण आहेत यामधील गट क्र. ३५ मधील लोहगाव भाग महापालिकेत समाविष्ठ होत असल्याने लोहगाव गण संपुष्टात येत आहे. तर गट क्र. 40 मधील फुरसुंगी भाग महापालिकेत समाविष्ठ होत असल्याने फुरसुंगी गण संपुष्टात येत आहे. गट क्र. 42 मधील केशवनगर-साडेसतरानळी हा संपूर्ण भाग महापालिकेत समाविष्ठ होत असल्याने केशवनगर-साडेसतरानळी हा गट व त्यांतर्गत येणारे २ गण संपुष्टात येणार आहे. गट क्र. 43 मधील उरुळीदेवाची भाग महापालिकेत समाविष्ठ होत असल्याने उरुळीदेवाची हा गण संपुष्टात येत आहे. गट क्र. 44 मधील आंबेगाव बु. भाग महापालिकेत समाविष्ठ होत असल्याने आंबेगाव बु. हा गण संपुष्टात येणार आहे. गट क्र. 45 मधील धायरी भाग महापालिकेत समाविष्ठ होत असल्याने धायरी हा गण संपुष्टात येणार आहे. गट क्र. 46 मधील शिवणे भाग महापालिकेत समाविष्ठ होत असल्याने शिवणे हा गण संपुष्टात येणार आहे. अशाप्रकारे हवेली तालुक्यातील एकूण ८ गण संपुष्टात येणार आहेत. तर जिल्हा परिषदेचा 1 गट संपुष्टात येत आहे. ९ लोकप्रतिनिधीचे भवितव्य विस्तापित होणार आहे. आगामी काळात उर्वरित भाग घेतल्यास हवेली तालुक्याचे जिल्हा परिषद मधील वर्चस्व देखील संपुष्टात येणार आहे. नुकत्याच जाहीर झालेला पुणे महापालिकेतील नवनिर्वाचित प्रभाग प्रारूप रचनेनुसार केवळ २ लोकप्रतिनिधीत्व करणार आहेत तर सध्या समाविष्ट भागातून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ९ जन लोकप्रतिनिधीत्व करीत आहेत. आगामी काळात म्हणजेच २०२२ साली पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गट व गण पुनर्रचना होईल. सद्यस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य या भागातील नेतृत्व करीत असले तर महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार त्यांचे अधिकाराना कात्री लागणार आहे. पुणे महापालिकेतील नवनिर्वाचित प्रभाग क्र ४२ म्हणून समाविष्ट भाग ओळखला जाणार आहे. अंतिम प्रभाग रचना 20 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. प्रारूप रचनेनुसार केवळ २ व्यक्ती या भागात लोकप्रतिनिधीत्व करून ९ लोकप्रतिनिधीचे काम करणार आहेत. काम कसे होणार हे आगामी काळात त्यांच्या व प्रशासनाच्या कार्य कुशलतेवरून दिसून येईलच. 


अ.क्र.तालुकाजिल्हा परिषद सदस्य संख्यापंचायत समिती सदस्य संख्यामहसूली गावेग्रा. पं. ची  संख्याग्रा. पं. सदस्य संख्या
1आंबेगाव510143103889
2बारामती714117100990
3भोर48195155986
4दौंड71410379795
5हवेली1020108101995
6इंदापूर7141431131048
7जुन्नर8161831421246
8खेड7141881631350
9मावळ510187103845
10मुळशी3614495742
11पुरंदर4810890752
12शिरुर61211793903
13वेल्हा2413070619

एकुण751501866140712160

जिल्हा परिषद, पंचायत समिती- 


फेब्रुवारी 2017 मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या होत्या, या निवडणुकीसाठी गट-गणांच्या फेररचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राबविण्यात आला होता त्यात हवेलीतील त्या 34 गावांनाही गृहीत धरले होते. शासनाने ही गावे महापालिकेत घेण्यासंदर्भात अधिसूचना काढली असताना व जिल्हा परिषदेने गावे वगळली असताना आमच्या गावात निवडणूक कशी? असा सवाल हवेली तालुका नागरी कृती समितीने केला त्यावेळी केला होता व  न्यायालयात पुनर्याचिका दाखल करण्यात आली होती. पुणे महापालिकेत हवेलीतील ही 34 गावे समाविष्ट करण्याची अधिसूचना शासनाने 30 मे -2014 रोजी काढली होती.
त्यानंतर या 34 गावांनी शासनाकडे महापालिकेत समाविष्ट करून घ्यावे, याविषयी विनंती व मागणी केली मात्र त्याची दखल घेतली न गेल्याने उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती. २०१७ मधील 9 सप्टेंबर रोजी प्रारूप गट-गण रचना जाहीर करण्यात आली यामध्ये या 34 गावांना गृहीत धरून हवेली तालुक्यात नव्याने गट निर्माण केले होते. पुणे जिल्हा परिषदेचे ७५ गट व पंचायत समितीचे १५० गण सध्या आहेत. २०११ प्रमाणे जिल्ह्याची लोकसंख्या ३८ लाख ४७ हजार इतकी आहे. या लोकसंख्येनुसार पन्नास ते साठ हजार लोकसंख्येचा एक गट करण्यात आलेला आहे. हवेली तालुक्यात जिल्हा परिषदेचे सर्वाधिक १३ गट आणि पंचायत समितीचे २६ गण आहेत. तसेच जुन्नरमध्ये सात गट (१४ गण), आंबेगाव तालुक्यात पाच गट (१० गण), शिरूरमध्ये सात गट (१४ गण), खेडमध्ये सात गट (१४ गण), मावळमध्ये पाच गट (१० गण), मुळशीत तीन गट (सहा गण), दौंडमध्ये सहा गट (१२ गण), पुरंदर तालुक्यात चार गट (८ गण), वेल्हा दोन गट (४ गण), भोर ३ गट (६ गण), बारामतीमध्ये सहा गट (१२ गण) व इंदापूर तालुक्यात सात गट आणि १४ गण सध्या आहेत.

* जिल्हा परिषदेचे ७५ गट व पंचायत समितीचे १५० गण
* जिल्ह्याची लोकसंख्या (२०११ जनगणनेनुसार)- ३८ लाख ४७ हजार इतकी आहे.
* लोकसंख्येनुसार पन्नास ते साठ हजार लोकसंख्येचा एक गट.
* हवेली तालुक्यात जिल्हा परिषदेचे गट - १३
* पंचायत समितीचे गण - २६ गण
* जुन्नर - सात गट (१४ गण)
* आंबेगाव तालुक्यात पाच गट (१० गण)
*  शिरूरमध्ये सात गट (१४ गण)
* खेडमध्ये सात गट (१४ गण)
* मावळमध्ये पाच गट (१० गण)
* मुळशीत तीन गट (सहा गण)
*  दौंडमध्ये सहा गट (१२ गण)
* पुरंदर तालुक्यात चार गट (८ गण)
* वेल्हा दोन गट (४ गण)
* भोर ३ गट (६ गण)
* बारामतीमध्ये सहा गट (१२ गण)
इंदापूर तालुक्यात सात गट आणि १४ गण
* खेड व जुन्नर पंचायत समितीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा आरक्षित
वरीलप्रमाणे पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती रचना सांख्यिकी माहिती आहे.


प्रभाग रचना-

२०११ जनगणना मधील लोकसंख्या प्रभाग रचनेत गृहीत धरण्यात येत असल्याने लोकप्रतिनिधीत्वाची संख्या कमी दर्शविण्यात आली आहे. या ११ समाविष्ट भागातील लोकसंख्या केवळ लोकसंख्या २,३९,४८३ असून अनुसूचित जातींची संख्या ३१,४७५ आहे तर अनुसूचित जमातींची संख्या ३५०१ नमूद केलेली आहे. मात्र या भागातील मतदारसंख्या काही भागात तुलनात्मकदृष्ट्या जास्त आहे. मतदारसंख्या विचारात घेतल्यास नगरसेवक संख्या नगण्य असून ती इतर प्रभागांच्या तुलनेत १० ते १२ सदस्यांचाचे किमान ३ प्रभाग करणे अपेक्षित होते. पुणे महापालिकेच्या पूर्वीच्या प्रभाग रचनेत २०११ जनगणना मधील लोकसंख्या प्रमाण सरासरी ८० ते ८५ हजार असे एका प्रभागासाठी सर्वाधिक असे घेण्यात आले आहे. प्रभाग क्र ४२ प्रारूप रचना प्रसिद्ध करताना ११ समाविष्ट भागातील लोकसंख्या केवळ लोकसंख्या २,३९,४८३ आहे तर पूर्वीच्या सरासरीच्या प्रमाणत ३ प्रभाग 4 सदस्याचे निर्माण होणे अपेक्षित आहे. मात्र 1 प्रभाग निर्माण करून त्यामध्येही २ सदस्यांना मान्यता राज्य निवडणूक आयोगाने दिल्याचे सांगण्यात येते हे या समाविष्ट भागातील नागरिकांवर अन्यायकारक आहे. विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्राप्रमाणे या प्रस्तावित प्रभागाची रचना व त्या तुलनेत मतदारसंख्या आहे. लोहगाव ते धायरी आणि शिवणे ते फुरसुंगी दरम्यानचे सरासरी अंतर २५ किलोमीटरपेक्षा अधिक आहे. भौगोलिक सलगता नसतानाही हा सर्व परिसर आता एका प्रभागाखाली सामावला जाणार आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व गावांचा मिळून एकच प्रभाग तयार होणार असल्याने येथून निवडून येणाऱ्या नगरसेवकांसमोर शहराच्या पूर्व-पश्चिम आणि दक्षिण-उत्तर अशा चारही दिशांच्या मतदारांशी संपर्क ठेवण्याचे कठीण  आव्हान असणार आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या प्रभागाच्या प्रा-रूप रचनेवर नागरिकांना येत्या शुक्रवारपर्यंत (१२ ऑक्टोबर) हरकती-सूचना मांडता येणार आहेत. शुक्रवारपर्यंत दाखल होणाऱ्या सर्व हरकतींवर १७ ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्यात येणार असून, त्यानंतर २० ऑक्टोबरला प्रभागाची रचना अंतिम केली जाणार आहे. ही प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर आगामी काळात निवडणूक आयोगातर्फे येथील निवडणूक जाहीर केली जाणार आहे.भाग चारही दिशांना - उत्तर : लोहगाव (उर्वरित) पूर्व : मुंढवा (उर्वरित केशवनगर) व हडपसर (साडेसतरानळी), उरळी, फुरसुंगी व उंड्री , दक्षिण : आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द व धायरी, पश्चिम : शिवणे (उत्तमनगर) अशी आहे. 



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

---------------------------------------------------------------------------------------------------------

हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद लोकप्रतिनिधी सदस्य

हवेली35 - देहू-लोहगावअनुसूचित जातीमा.श्रीमती.जंगम मंगल नितीन
सदस्य, जिल्हा परिषद पुणे
स.नं. 66, अवधूत बिल्डींग, पहारेवस्ती, लोहगांव, जि. पुणे
राष्ट्रवादी कॉग्रेस
36 - वाघोली - आव्हाळवाडीसर्वसाधारणमा. श्री.कटके ज्ञानेश्वर पंढरीनाथ
सदस्य, जिल्हा परिषद पुणे
मु.पो.वाघोली, ता.हवेली, जि.पुणे
शिव सेना

37 - पेरणे-वाडेबोल्हाईसर्वसाधारण स्त्रीमा.श्रीमती.कल्पना सुभाष जगताप
सदस्य, जिल्हा परिषद पुणे
मु.पो. आष्टापूर, ता. हवेली, जि.पुणे
राष्ट्रवादी काँग्रेस
38 - उरुळीकांचन-सोरतापवाडीनागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्रीश्रीमती.कांचन किर्ती अमित
सदस्य, जिल्हा परिषद पुणे
उरुळीकांचन, ता. हवेली, जि. पुणे
राष्ट्रवादी कॉग्रेस
39 - थेऊर-लोणीकाळभोरअनुसूचित जाती स्त्रीमा. श्रीमती.सुनंदा रघुनाथ शेलार
सदस्य, जिल्हा परिषद पुणे
मु.पो.लोणीकाळभोर ता.हवेली,जि.पुणे
अपक्ष

40 - फुरसुंगी-कदमवाकवस्तीसर्वसाधारण स्त्रीमा.श्रीमती.कामठे अर्चना प्रविण
सदस्य, जिल्हा परिषद पुणे
चंद्रलोक, कामठेमळा, फुरसुंगी ता.हवेली जि.पुणे
राष्ट्रवादी काँग्रेस

41 - मांजरी बु.-शेवाळवाडीनागरीकांचा मागास प्रवर्गमा. श्री.घुले दिलीप परशुराम
सदस्य, जिल्हा परिषद पुणे
वेताळवाडी, प्राथमिक शाळेजवळ, मांजरी बु ता.हवेली जि.पुणे
राष्ट्रवादी काँग्रेस
42 - केशवनगर-साडेसतरानळीनागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्रीमा.श्रीमती.वंदना महादेव (डॉ.दादा) कोद्रे
सदस्य, जिल्हा परिषद पुणे
स.न. 41, केशवनगर, मुंढवा ता.हवेली जि.पुणे
भारतीय जनता पार्टी

43 - उरुळीदेवाची-वडकीअनुसूचित जाती स्त्रीमा. श्रीमती.चौरे सुरेखा शैलेंद्र
सभापती,
समाज कल्याण समिती, जिल्हा परिषद पुणे
सिध्दार्थनगर, वडकी, ता. हवेली जि.पुणे
राष्ट्रवादी कॉग्रेस

44 - आंबेगाव बु.-न-हेनागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्रीमा. श्रीमती.जयश्री सत्यवान भुमकर
सदस्य, जिल्हा परिषद पुणे
स.न. 2/2,केशन रुक्मीणी निवास, नऱ्हेगाव, ता. हवेली, जि. पुणे
भारतीय जनता पार्टी
45 - धायरी - नांदेडनागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्रीमा.श्रीमती.जयश्री बाबासाहेब पोकळे
सदस्य, जिल्हा परिषद पुणे
स.न. 11, कुंभार चावडी, मु. पो. धायरी, ता.हवेली जि. पुणे
भारतीय जनता पार्टी
46 - शिवणे-कोंढवेधावडेसर्वसाधारण स्त्रीमा.श्रीमती.अनिता तुकाराम इंगळे
सदस्य, जिल्हा परिषद पुणे
मु.पो. शिवणे, इंगळे कॉलनी, ता. हवेली जि.पुणे
राष्ट्रवादी कॉग्रेस
47 - मांगडेवाडी - डोणजेसर्वसाधारण स्त्रीमा.श्रीमती.पारगे पुजा नवनाथ
सदस्य, जिल्हा परिषद पुणे
अमृतनिवास, सिंहगड रोड, डोणजे, ता. हवेली, जि. पुणे
राष्ट्रवादी कॉग्रेस



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे




नव्याने समाविष्ट ११ गावांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर; दोन्हीही सदस्य सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले


नव्याने समाविष्ट ११ गावांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. दोन्हीही सदस्य सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले राहणार असून महिलांसाठी एक जागा राखीव असेल.फुरसुंगी-लोहगाव या या विचित्र प्रभाग रचनेवर १२ ऑक्टोबर पर्यंत हरकती/सूचना मागवण्यात येणार असून १७ ऑक्टोबरला सुनावणी घेण्यात येणार आहे तर अंतिम प्रभाग रचना 20 ऑक्टोबर २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप रचनेनुसार या प्रभागाची लोकसंख्या २,३९,४८३ असून अनुसूचित जातींची संख्या ३१,४७५ आहे तर अनुसूचित जमातींची संख्या ३५०१ नमूद केलेली आहे.
"फुरसुंगी-लोहगाव" पुणे महापालिकेचा ४२ वा प्रभाग असणार आहे दोन सदस्यांचा हा प्रभागातून एक महीला प्रतिनिधित्व करू शकणार आहे. दोन्हीही सदस्य सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले आहे. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांमधील समाविष्ट भागाप्रमाणे चतुर्सिमा दर्शविण्यात आल्या आहेत. महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अकरा गावांमधून निवडून आलेला लोकप्रतिनिधी नाही. दरम्यान, या वाढीव हद्दवाढीसाठी प्रभाग रचना तयार करणे गरजेचे असल्याने पालिका प्रशासनाने त्यासाठी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता. हापालिकेने केलेल्या पत्रव्यवहारानुसार निवडणूक आयोगाने या समाविष्ट परिसरासाठी दोन सदस्यांना परवानगी दिली आहे. या दोन सदस्यांचा एक प्रभाग तयार करण्यात यावा, असेही आयोगाने स्पष्ट केल्याने प्रभाग रचना करण्यात आली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यांत ही गावे पालिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत.


विचित्र प्रभाग रचनेस विरोध;सर्व गावांचा समावेश केल्यावरच निवडणुका घेण्याची मागणी

समाविष्ट 34 गावांच्या निवडणुका एकत्रितपणे घ्याव्यात अशी मागणी हवेली तालुका कृती समितीने केली आहे. फक्त ११ गावामध्ये निवडणुका घेतल्यास न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे धायरी येथील समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे.





दरम्यान महापालिका हद्दीत चौतीस गावांचा समावेश करण्याची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून रखडली होती. या पार्श्वभूमीवर या गावांच्या समावेशाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीरंग चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी अकरा गावे महापालिका हद्दीत घेणार असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने न्यायालयात सादर केले होते. ‘उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे पूर्णत: महापालिका हद्दीत घेण्यात आली आहेत. लोहगांव, साडेसतरा नळी, केशवनगर, धायरी, आंबेगाव, बावधन, शिवणे, उत्तमनगर, उंड्री ही गावे महापालिका हद्दीमध्ये अंशत: समाविष्ट करण्यात आली होती.उर्वरित तेवीस गावांचा समावेश करताना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, घनकचरा व्यवस्थापन, प्रस्तावित वर्तुळाकार मार्ग आणि अन्य पायाभूत सुविधांचा विचार करण्यात येईल आणि तीन वर्षांत त्याबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्यात येईल,’ असे राज्य शासनाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते.उरुळी देवाची, फुरसुंगी, लोहगांव (उर्वरित), शिवणे (उत्तमनगर), मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (साडेसतरानळी), शिवणे, आंबेगांव (खुर्द), आंबेगाव (बुद्रुक), उंड्री आणि धायरी या गावांचा समावेश करण्यात आला होता. तर अजून तेवीस गावांच्या समावेशाची प्रतीक्षा आहे. महापालिका हद्दीत गावांचा समावेश करावा यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार भीमराव तापकीर, योगेश टिळेकर आणि जगदीश मुळीक आग्रही होते. पालकमंत्री गिरीश बापट यांचा मात्र गावांच्या समावेशाला विरोध होता. त्यामुळे ही गावे टप्याटप्प्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातील काही गावे या आमदारांच्या मतदारसंघात असल्यामुळे त्यांची आग्रही भूमिका होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गावांच्या समावेशाला तत्त्वत: मंजुरी दिली होती. या संदर्भातील प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने सादर केल्यामुळे अकरा गावे महापालिका हद्दीत समावेश करण्याची अधिसूचना काढण्यात आली. मात्र उर्वरित तेवीस गावांच्या समावेशासाठी किमान तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. उर्वरित तेवीस गावांच्या समावेश केल्यानंतर पुन्हा सुधारीत प्रभाग रचना करावी लागणार आहे. त्यामुळे पुणे महापालिका प्रभाग संख्येत वाढ होऊन नगरसेवकांची संख्या देखील १० ते 15 ने वाढ होईल. महापालिकेचे क्षेत्रफळाच्या आकारात मोठ्या प्रमाणत वाढ होऊन महापालिकेचे देखील विभाजन सरकारच्या विचारात आहे. आगामी काळात या बदलाचा परिणाम राजकारणावर निश्चितच होईल.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.