Wednesday 17 October 2018

दिवाळीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार;नव्या मंत्रिमंडळात आशिष शेलार यांचा समावेश होणार

लोणीकर,विष्णू सावरा,प्रवीण पोटे,विनोद तावडे, ठाकूर, संभाजी पाटील यांचा पत्ता कट होण्याची शक्यता!






====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

गेली कित्येक महिने प्रतिक्षा असलेल्या मंत्रिंमडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. दसऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सोलापूरात दिली. मात्र त्यात कुणाचा समावेश असेल आणि एकनाथ खडसे यांचा पुन्हा प्रवेश होणार का याबाबत मात्र काहीही सांगण्यास त्यांनी नकार दिला. दरम्यान माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस सहमत नाहीत. मंत्रिमंडळात पुन्हा स्थान देण्यापेक्षा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवायची यावर विचारविनिमय सुरू आहे. तर आशिष शेलार यांचा समावेश नव्या मंत्रिमंडळात होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कमकुवत कामगिरी असणारे स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री प्रवीण पोटे या तिघांवर टांगती तलवार असल्याची चर्चा आहे. भाजपच्या दोन ते तीन मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. यात शिक्षण मंत्री विनोद तावडे, कामगार मंत्री संभाजी पाटील यांचे देखील नावे चर्चिले जात आहे. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना पुन्हा स्थान द्यायचे की भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवायची यावर विचारविनिमय सुरू असल्याची माहिती आहे. एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजूनही हिरवा कंदील दिलेला नाही. त्यामुळे थेट प्रदेशाध्यक्षपदाचीच जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. या दृष्टीने पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून काही ठोस मार्ग काढण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. विशेषत: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षीय पातळीवर हा बदल करण्याचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे समजते. खडसेंवर आरोप आहेत. शिवाय शिवसेनेकडून आगामी निवडणुकीत युती करण्याची तयारी असल्यास त्यांना विस्तारात अधिक स्थान द्यावे लागेल, त्यामुळे भाजपला कमी खात्यांवर समाधान मानावे लागणार आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी झाली व शिवसेना, भाजप स्वतंत्र लढले तर खडसेंचे वक्तृत्व व नेतृत्वाचा उपयोग पक्षाला होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी मुहूर्त सापडला आहे. दिवाळीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोलापुरात एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. याआधी नवरात्रीत विस्तार केला जाणार असल्याची चर्चा होती. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. भाजपाचे संघटन महामंत्री रामलाल यांच्यासोबत फडणवीस आणि दानवे यांनी दिल्लीतील लीला पॅलेस या हॉटेलमध्ये प्रदीर्घ चर्चा केली होती. या बैठकीत शिवसेनेबरोबर जागावाटप, एकनाथ खडसेंच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली होती. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत दाखल झाल्याने चर्चेला अधिकच वेग आला आहे. ज्यांची मंत्री म्हणून कामगिरी कमी दर्जाची आहे, त्यांना वगळले जाण्याची धास्ती लागून राहिली आहे, तर ज्यांना आपला मंत्रिमंडळात प्रवेश होईल, असे वाटते त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी सायंकाळी दिल्लीत जाऊन भाजपाचे संघटन महामंत्री रामलाल यांच्यासोबत दिल्लीतील लीला पॅलेस या हॉटेलमध्ये प्रदीर्घ चर्चा केली होती. पक्षाध्यक्ष अमित शहा हे निवडणूक प्रचार निमित्ताने दिल्लीच्या बाहेर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नव्हती. या पार्श्वभूमीवर अमित शाह मंगळवारी सायंकाळी मुंबईत आले आहेत. ते अचानक मुंबई भेटीवर आल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. शाह यांच्या या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदे पालट यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कमकुवत कामगिरी असणारे स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री प्रवीण पोटे या तिघांवर टांगती तलवार असल्याची चर्चा आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसह भाजपाच्या वाटय़ाचे चार मंत्रीपदे रिक्त आहेत. भाजपामधून अनेक नवे चेहरे मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार हे मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. गेले अनेक दिवस नाराज असणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर खडसे यांना बाहेर ठेवणे परवडणारे नाही, त्यामुळे त्यांचा समावेश नक्की होणार असे मानले जात आहे. तसेच आदिवासी विकास मंत्रालयावर अनेक दिवसांपासून डोळा लावून बसलेले डॉ. विजयकुमार गावित यांची वर्णी लागेल असे बोलले जाते. आताचा विस्तार निवडणुका डोळय़ासमोर ठेऊन केला जाणार असून जे लोक आपल्याशिवाय इतर दोन-तीन उमेदवार निवडून आणू शकतात, अशाच लोकांची निवड नवीन बदलात केली जाण्याची शक्यता आहे. कामगिरी हा निकष भाजपने अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कार्यक्षम आणि पक्ष संघटना वाढीला पूरक ठरतील अशा चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे भाजपच्या दोन ते तीन मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. यात शिक्षण मंत्री विनोद तावडे, कामगार मंत्री संभाजी पाटील आणि महिला बाल कल्याण राज्य मंत्री विद्या ठाकूर यांचा समावेश असल्याची शक्यता भाजप वर्तुळात चर्चिली जात आहे. शिवसेनेला अंगावर घेणारा आक्रमक मराठी चेहरा म्हणून आशिष शेलार यांचा समावेश नव्या मंत्रिमंडळात होण्याची शक्यता आहे. 


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.