Saturday, 27 October 2018

विमान प्रवासातील मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जवळकी कशासाठी?

मनसेच्या सलगीचा राष्ट्रवादीलाच जास्त फायदा! 






====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

औरंगाबाद-मुंबई दरम्यानच्या विमानप्रवासातील शरद पवार आणि राज ठाकरेंच्या भेटीने राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच यातील वास्तव समोर आले आहे. शरद पवार आणि राज ठाकरे यांची विमानात भेट झाल्याचा फोटो समोर येतात एकच राजकीय खलबते सुरु झाली पण त्यादिवशी विमानात त्यांच्यात आगामी निवडणुकांविषयी कोणतीही महत्वपूर्ण चर्चा झालेली नसल्याचा खुलासा समोर आलेला आहे. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच राज्यमंत्री अर्जुन खोतकरांना विनंती केल्याने राज ठाकरे त्यांच्या सीटवर बसले होते. औरंगाबाद विमानतळाहून मुंबईकडे निघालेल्या विमानात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा ते त्यांच्या सीटवर बसत होते. राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्या सीट्स उजवीकडे बाजूबाजूला होत्या, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे आमदार तथा राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या सीट्स डावीकडच्या रांगेत बाजूबाजूला होत्या. विमानातील आपल्या सीटवर शरद पवार बसल्यावर त्यांच्या बाजूच्या सीटवर अर्जून खोतकर बसणार…एवढ्यात इतक्यात शरद पवार त्यांना म्हणाले, “तुम्ही (खोतकर) तिथे बसा, राजला इथे (माझ्या बाजूला) बसू द्या.”पवार यांच्या या बोलण्याचा मान राखत राज्यमंत्री खोतकर उजवीकडच्या रांगेत म्हणजे बाळा नांदगावकरांच्या बाजूला जाऊन बसले आणि त्यानंतर पुढच्या साधारण तास-दीड तासाच्या विमान प्रवासात शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या गप्पा रंगल्या. पवार आणि ठाकरे यांच्या गप्पा सुरु असताना त्यात थोड़ा वेळ का होईना पण सहभागी होण्याचा मोह राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि मनसे नेता बाळा नांदगावकर यांनाही आवरला नाही. त्यासाठी सीट सोडून हे दोघे लोकल ट्रेनप्रमाणे विमानातही उभे राहिले होते.  


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

कॉंग्रेसने मनसेला महाआघाडीत घेतले नाही आणि  राष्ट्रवादीकडून सलगी केली तर फायदा होईल!


कॉंग्रेसने मनसेला महाआघाडीत घेतले नाही तर राष्ट्रवादीकडून सलगी केली तर  पुणे जिल्ह्यात दौंड व खडकवासला विधानसभा मतदारसंघात  राष्ट्रवादीला निश्चित फायदा होऊ शकतो. जिल्ह्यातील अन्य मतदारसंघातही मनसे-राष्ट्रवादीला एकमेकांना लाभ होऊ शकतो. मनसेला जिल्ह्यात एका जिल्ह्यातील एकमेव जागा मिळाली होती तर तिसऱ्या स्थानावर ३ मतदारसंघातील मते प्राप्त केली होती ती दुसरया स्थानावरील राजकीय पक्षाला पराभवाला कारणीभूत ठरलेली आहे तर ६ ठिकाणी चौथ्या स्थानावरील मनसेची मते देखील इतर पराभूत पक्षांच्या दृष्टीकोनातून प्रभावशाली आहेत.  मनसे ने २०१४ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत केवळ 1 जागा जिंकली होती तर ६ ठिकाणी दुसरया क्रमांकाची तर 15 ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविण्यात आलेली होती. मोदींच्या लाटेत देखील २२ मतदारसंघात चांगली मते प्राप्त केलेली होती. मनसेला राज्यात एकूण ३.७ टक्के मते मिळाली होती. २००९ मध्ये १३ आमदार जिंकलेल्या मनसेला ५.७१ टक्के मते मिळाली होती. पाच वर्षांने मनसेची मते घट झालेली होती. राष्ट्रवादीने २०१४ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत 41 जागा जिंकून ५६ ठिकाणी दुसरया क्रमांकाची तर ५१ मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविण्यात आलेली होती. एकूण १४८ मतदारसंघात प्रभावी मते प्राप्त केलेली होती. मनसे आणि राष्ट्रवादी मध्ये युती झाल्यास मनसेला २७ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मतांचा लाभ होईल तर राष्ट्रवादीला ३५ मतदारसंघात प्रभावी मतांचा लाभ होईल. कॉंग्रेसने मनसेला महाआघाडीत घेतले नाही तरी राष्ट्रवादी स्वत:च्या कोट्यातून पक्षांतर्गत काही मतदारसंघ मनसेला देऊ करेल. अशी शक्यता आहे. गेल्या ३ विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारामुळे इतर पक्षांना अप्रत्यक्षपणे फायदा मिळाला मात्र त्या लाभाचा मनसेला काहीही लाभ व राजकीय उपयोग झाला नाही. या अनुभवातूनच मनसेने जास्तीत जास्त आपल्या जनादेशाचा राजकीय लाभ घेऊन आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा उभारी घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मदत घेण्यास प्रयत्नशील आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेतल्यास भाजप (२७.८ टक्के), शिवसेना (१९.३ टक्के), काँग्रेस (१८ टक्के) तर राष्ट्रवादीला १७.२ टक्के मते मिळाली होती. या व्यतिरिक्त मनसेला ३.७ टक्के मते मिळाली होती. यानंतर बसपाला २.३ टक्के मते पडली होती. अन्य राजकीय पक्षांना एक टक्के किंवा त्यापेक्षा कमीच मते पडली आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाला ०.९ टक्के मिळाली होती. शेकापच्या पारडय़ात एक टक्का मते पडली होती. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाची अकोला, वाशीम या जिल्ह्यामध्ये चांगली ताकद आहे. राज्यातील छोटय़ा पक्षांच्या गेल्या दोन-तीन निवडणुकांच्या निकालांचा आढावा घेतल्यास मतांमध्ये फार काही फरक पडलेला नाही. २००९ मध्ये १३ आमदार जिंकलेल्या मनसेला ५.७१ टक्के मते मिळाली होती. पाच वर्षांने मनसेची मते घटली. बहुजन समाज पक्षाला २००४ मध्ये (४ टक्के), २००९ मध्ये (२.३५ टक्के) तर २०१४ मध्ये (२.३ टक्के) मते मिळाली आहेत. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.