Wednesday 17 October 2018

अहमदनगर व धुळे महानगरपालिकेसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक!

धुळे व अहमदनगर महानगरपालिकेसाठी 25 ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करणार 


 धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 25 ऑक्टोबर 2018 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. या निवडणुकांकरिता विधानसभा मतदारसंघाच्या 1 सप्टेंबर 2018 रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 25 ऑक्टोबर 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. तेव्हापासून त्यावर 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 6 नोव्हेंबर 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 12 नोव्हेंबर 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या हरकती व सूचनांच्या अनुषंगाने करण्यात येतात, अशीही माहिती राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी दिली.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.