Monday 22 October 2018

भाजप-सेना युती न झाल्यास निवडणुकीतून खासदार बारणे यांची माघार शक्य

मावळ लोकसभा मतदारसंघ - खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार जगताप यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणात रंगत 





====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची चाचपणी शिवसेनेने केल्यानंतर हमखास निवडणून येऊ शकतो अशी भूमिका न घेता गुळमुळीत भूमिका पक्षाध्यक्षांपुढे घेतल्याने भाजप-सेना युती न झाल्यास निवडणुकीतून खासदार बारणे  माघार घेणे शक्य आहे. भाजप-सेना युती न झाल्यास निवडणुक लढविण्यास खासदार श्रीरंग बारणे उत्सुक नसल्याची चर्चा  आहे. दरम्यान शिवसेना-भाजपच्या युतीचा निर्णय काही दिवसांपासून प्रलंबित आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेला अल्टिमेटम दिला आहे. युतीबाबत लवकर निर्णय घ्या, अन्यथा दोन्ही निवडणुकांना एकत्रित सामोरे जा, असा इशारा भाजपने शिवसेनेला दिला असल्याने याबाबत लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजप-सेना युती झाल्यास खासदार श्रीरंग बारणे यांना राजकीयदृष्ट्या निश्चितच दिलासा मिळेल. खासदार श्रीरंग बारणे यांनी रविवारी (दि. २१) आकुर्डीत झालेल्या कार्यक्रमात 'लोकसभा निवडणुकीत भाजपच्या निष्ठावंतानी माझे काम केले, पण आज त्या कार्यकर्त्यांवर अतिक्रमण झाले आहे, अशी टिका केली होती. या आरोपांना भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रत्युत्तर दिले की, खासदारकीची लॉटरी लागलेले मावळचे निष्क्रिय खासदार श्रीरंग बारणे यांना  महापालिका निवडणुकीत शहरातील जनतेनेच फटकारले होते. शिवसेनेची पुर्ण वाट लावलेल्या बारणे यांनी घरातली माणसे सोडल्यास एक सुद्धा शिवसैनिक मोठा केला नाही. आता बारणे भाजपमध्ये दुही माजवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे दिवास्वप्न पाहत आहेत. भाजपबद्दल एवढेच प्रेम होते, तर त्यांनी गेल्या साडेचार वर्षांत भाजपच्या एका तरी कार्यकर्त्याला केंद्राच्या समितीवर किंवा इतर ठिकाणी संधी देणे गरजेचे होते. येत्या  निवडणुकीत बारणे यांना कायमचे घरी बसावे लागेल, असा पलटवार आमदार जगताप यांनी केला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यापैकी पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशांत ठाकूर, मावळात बाळा भेगडे, चिंचवडला लक्ष्मण जगताप हे भाजपचे आमदार निवडून आले आहेत, तर कर्जतला राष्ट्रवादीचे सुरेश लाड, उरण व पिंपरीत सेनेचे अनुक्रमे मनोहर भोईर व गौतम चाबुकस्वार निवडून आले आहेत.  मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड महापालिका, पनवेल, लोणावळा, तळेगाव नगरपरिषद अशी महत्त्वाची सत्तास्थाने भाजपाच्या हातात आहेत. या मतदारसंघातील सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे काम चांगले आहे. सलग तीनदा त्यांना संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे; मात्र या मतदारसंघात भाजपची वाढलेली ताकद ही खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी धोकादायक आहे म्हणून भाजप-सेना युती झाल्यास खासदार श्रीरंग बारणे यांचा विजय सुकर होउ शकतो. भाजप-सेना युती न झाल्यास विजयाची शाश्वती नसल्याने आर्थिकदृष्ट्या व राजकीयदृष्ट्या हानिकारक ठरेल या शक्यतेने खासदार बारणे निवडणुकीची जोखीम पत्करण्यास धजावणार नाहीत अशी शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे मतदारांच्या संपर्कात येऊन विरोधकांवर टीका करीत आहेत यामुळे प्रतिस्पर्धी प्रमुख लोकप्रतिनिधी व चिंचवड विधानसभेचे आमदार, भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप त्यांना प्रत्युत्तरादाखल आरोप करून राजकीयदृष्ट्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये रंगत निर्माण करीत आहेत यामुळे नागरिकांच्या मनोरंजनात देखील भर पडत आहे. चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह पनवेलचे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर किंवा मावळचे आमदार बाळा भेगडे हे प्रभावशील इच्छुक उमेदवार आहेत. भाजप स्वतंत्रपणे लढल्यास आमदार बाळा भेगडे यांना प्राधान्य देण्याचा भाजपमध्ये जास्त खल आहे. तर गेल्या वेळी राष्ट्रवादीतून ऐनवेळी लढलेले राहुल नार्वेकर हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील, भाऊसाहेब भोईर देखील इच्छुक आहेत. मात्र भाऊसाहेब भोईर यांनी कुणबी ओबीसी निवडणूक लढविल्यामुळे त्यांना ओबीसीच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. एकंदरीत लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचा कालावधी राहिला असल्याने आत्तापासूनच सगळ्या राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. 

मावळ लोकसभा मतदारसंघ निकाल-



उमेदवारपक्षमिळालेली मते
 राहुल नार्वेकर राष्ट्रवादी१,८२,२९३
 श्रीरंग बारणे शिवसेना५,१२,२२६(आघाडी)
 लक्ष्मण जगताप शेकाप(मनसे पाठिंबा)३,५४,८२९
 मतदानाची टक्केवारी ६३.१०% (४४.७१%)


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे




====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.