Monday, 1 October 2018

कॉंग्रेसने मनसेला महाआघाडीत घेतले नाही तर राष्ट्रवादीकडून छुप्पी युती शक्य!

पुणे जिल्ह्यात दौंड व खडकवासला विधानसभा मतदारसंघात होईल फायदा 


आगामी लोकसभा व विशेषतः विधानसभा निवडणुकांमध्ये मनसे बरोबर युती करण्याचा मनोदय राष्ट्रवादीकडून व्यक्त होत आहे. नवतरुणांना आकर्षित करण्यात मनसे काही प्रमाणात यशस्वी ठरला आहे तर नवतरुणांना आकर्षित करण्यात राष्ट्रवादी नेतृत्वाला अद्यापही यश आलेले नाही. शहरी विशेषतः मुंबई, ठाणे, नवीमुंबई व राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये मनसेची मदत घेतल्यास राजकीय लाभ किती होऊ शकतो याची चाचपणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. कॉंग्रेसने मनसेला महाआघाडीत घेतले नाही तर राष्ट्रवादीकडून छुप्पी युतीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २०१४ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीप्रमाणे सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढल्यास व मनसेने राष्ट्रवादीबरोबर युती केल्यास चांगला परिणाम दिसून येईल. भाजप-सेना युती झाल्यास व कॉंग्रेसने महाआघाडी करून निवडणूक लढवल्यास राष्ट्रवादी स्वत:च्या कोट्यातून पक्षांतर्गत काही मतदारसंघ मनसेला देऊ करेल. अशी शक्यता आहे. सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या जनाधार कमी झालेला आहे. बहुतांश ठेकेदार, उद्योजक, गुंड व बेकायदा व्यवसाय करणारे तसेच सत्तेचे लोभी राजकीय व्यक्तींनी भाजपचा राजाश्रय घेतला आहे. सत्ता नसल्याने आर्थिकदृष्ट्या मदतीचा ओघ वसरलेला आहे. नुकतेच औरंगाबादेत बुधवारी युवक राष्ट्रवादी कॉग्रेसचा मेळावा पार पडला. मेळाव्‍यात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना सुनावले कि, 'एखादा मेळावा घ्यायचे म्हणले की, काही पदाधिकारी मोबाईल बंद करुन ठेवतात. मेळावा संपला की मोबाईल सुरु होतो. पक्षाच्या नावावर एवढे कमावले, 5-10 टक्के तरी पक्षाला द्या', अशा शब्‍दांत त्यानी सुनावले होते. हे राष्ट्रवादीचे वास्तव आहे. मनसेबरोबर युती केली नाही तर राष्ट्रवादीला गेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या जागांच्या पेक्षा अपेक्षितपणे यश मिळणे दुरापस्त आहे. 
मनसे ने २०१४ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत केवळ 1 जागा जिंकली होती तर ६ ठिकाणी दुसरया क्रमांकाची तर 15 ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविण्यात आलेली होती. मोदींच्या लाटेत देखील २२ मतदारसंघात चांगली मते प्राप्त केलेली होती. मनसेला राज्यात एकूण ३.७ टक्के मते मिळाली होती. २००९ मध्ये १३ आमदार जिंकलेल्या मनसेला ५.७१ टक्के मते मिळाली होती. पाच वर्षांने मनसेची मते घट झालेली होती. राष्ट्रवादीने २०१४ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत 41 जागा जिंकून ५६ ठिकाणी दुसरया क्रमांकाची तर ५१ मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविण्यात आलेली होती. एकूण १४८ मतदारसंघात प्रभावी मते प्राप्त केलेली होती. मनसे आणि राष्ट्रवादी मध्ये युती झाल्यास मनसेला २७ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मतांचा लाभ होईल तर राष्ट्रवादीला ३५ मतदारसंघात प्रभावी मतांचा लाभ होईल. कॉंग्रेसने मनसेला महाआघाडीत घेतले नाही तरी राष्ट्रवादी स्वत:च्या कोट्यातून पक्षांतर्गत काही मतदारसंघ मनसेला देऊ करेल. अशी शक्यता आहे. गेल्या ३ विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारामुळे इतर पक्षांना अप्रत्यक्षपणे फायदा मिळाला मात्र त्या लाभाचा मनसेला काहीही लाभ व राजकीय उपयोग झाला नाही. या अनुभवातूनच मनसेने जास्तीत जास्त आपल्या जनादेशाचा राजकीय लाभ घेऊन आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा उभारी घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मदत घेण्यास प्रयत्नशील आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेतल्यास भाजप (२७.८ टक्के), शिवसेना (१९.३ टक्के), काँग्रेस (१८ टक्के) तर राष्ट्रवादीला १७.२ टक्के मते मिळाली होती. या व्यतिरिक्त मनसेला ३.७ टक्के मते मिळाली होती. यानंतर बसपाला २.३ टक्के मते पडली होती. अन्य राजकीय पक्षांना एक टक्के किंवा त्यापेक्षा कमीच मते पडली आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाला ०.९ टक्के मिळाली होती. शेकापच्या पारडय़ात एक टक्का मते पडली होती. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाची अकोला, वाशीम या जिल्ह्यामध्ये चांगली ताकद आहे. राज्यातील छोटय़ा पक्षांच्या गेल्या दोन-तीन निवडणुकांच्या निकालांचा आढावा घेतल्यास मतांमध्ये फार काही फरक पडलेला नाही. २००९ मध्ये १३ आमदार जिंकलेल्या मनसेला ५.७१ टक्के मते मिळाली होती. पाच वर्षांने मनसेची मते घटली. बहुजन समाज पक्षाला २००४ मध्ये (४ टक्के), २००९ मध्ये (२.३५ टक्के) तर २०१४ मध्ये (२.३ टक्के) मते मिळाली आहेत. 


पुणे जिल्ह्यात दौंड व खडकवासला विधानसभा मतदारसंघात होईल फायदा 

मनसे बरोबर युती करण्याचा राजकीय लाभ पुणे जिल्ह्यात बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड व खडकवासला विधानसभा मतदारसंघात घेण्याचा प्रयत्न आहे. विरोधात्मक सर्व जातीय राजकारण गृहीत धरून हा विचार केला जात आहे. मनसेची मदत घेतली तर या विधानसभा मतदारसंघात हमखास यश लाभेल अशी आशा राष्ट्रवादीला आहे. दौंड व खडकवासला विधानसभा मतदारसंघात मनसेला अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाची मते प्राप्त झालेली होती. ही मते राष्ट्रवादीच्या मिळालेल्या मतांमध्ये एकत्रित केल्यावर विजयी उमेदवारापेक्षा जास्त होत आहेत. दौंड विधानसभा मतदारसंघात मनसेला १७०९८ मते मिळाली होती तर राष्ट्रवादीला ७६३०४ मते मिळवून पराभवाला सामोरे जावे लागले होते. रासपला ८७६४९ मते मिळून विजय प्राप्त केला होता. राष्ट्रवादी व मनसे ला २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांची बेरीज केली तर ९३४०२ होत आहेत. जे ११३४५ मताधिक्य पेक्षा ५७५३ मतांनी जास्त होत आहे. कायमस्वरूपी या मतदारसंघावर वर्चस्व राखण्यासाठी मनसेला सोबत घेणे सोयीचे ठरेल. विरोधात्मक सर्व जातीय राजकारण गृहीत धरून हा विचार केला जात आहे. 
   खडकवासला विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक नगरसेवक व कार्यकर्ते असूनही राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागत आहे. याची खंत पवार कुटुंबीयांना आहे. सर्व राजकीय लाभ देऊनही काही घटक विरोधात जात असल्याने मनसेची मदत घेण्याचा पर्याय चांगला वाटत आहे. अक्राळ-विक्राळ अशी रचना असलेला खडकवासला विधानसभा मतदारसंघात कोणत्या भागात कोणत्या व्यक्तीला महत्व किती द्यावे हे देखील पदाधिकार्यांना समजत नाही. राजकीय ताकद, जनाधार असूनही पराभवाचे शल्य राष्ट्रवादी नेतृत्वाला आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत खडकवासला विधानसभा मतदारसंघात मनसेला ३४५७६ मते मिळाली होती तर राष्ट्रवादीला ४८५०५ मते मिळवून पराभवाला सामोरे जावे लागले होते. भाजपला १११५३१ मते मिळून विजय प्राप्त केला होता. राष्ट्रवादी व मनसे ला २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांची बेरीज केली तर ८३०८१ होत आहेत. या मतदारसंघात मनसेने राष्ट्रवादीच्या तुलनेत चांगली मते प्राप्त केलेली होती. 

लोकसभा निवडणुकीसाठी देखील युतीच फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो. दौंड व खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला रासप पेक्षा कमी मतदान झाले होते. दौंड विधानसभा मतदारसंघात लोकसभेला २५५४८ मतांचा प्रभावी फरक होता तर  खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला लोकसभेला २८१२७ मतांचा प्रभावी फरक होता. मतांची झालेली घट व विरोधात्मक सर्व जातीय राजकारण गृहीत धरून मनसेशी युती निश्चितच फलदायक ठरेल.

Mr.Chandrakant Bhujbal - 9422323533

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

महाआघाडीत मनसेला सोबत घ्या: राष्ट्रवादी काँग्रेस

देशपातळीवर भाजपा विरोधात महाआघाडी करून निवडणुका लढण्याची तयारी काँग्रेस तसेच समविचारी पक्षांनी सुरू केली आहे. भाजपाविरोधी पक्षांची एकजूट करत असताना राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांसमोर ठेवला आहे. मात्र या प्रस्तावास काँग्रेसने विरोध केला आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीने राज्यातील समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांची एकजूट करून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका  लढण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारिप बहुजन महासंघ, लोकभारती आदी पक्षांच्या नेत्यांसोबत प्राथमिक चर्चा देखील करण्यात आली आहे. आघाडीच्या नेत्यांच्या अलिकडेच झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनसेला महाआघाडीत सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मनसेला सोबत घेतल्यास उत्तर भारतीय मतदार दुरावण्याची भीती काँग्रेसला आहे.पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने पुकारलेल्या देशव्यापी बंदला राज ठाकरे यांच्या मनसेने पाठिंबा दिला होता. नुसता पाठिंबाच नाही, तर हा बंद करण्यात सक्रिय सहभाग मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. शहरीभागात आजही मनसेची पकड मजबूत असून त्यांना सोबत घेतल्यास भाजपा विरोधातील लढाईस बळ मिळून आगामी निवडणुकांत त्याचा फायदा होईल, अशी भूमिका राष्ट्रवादीने मांडली आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी उघडपणे कोणतीही प्रतिक्रीया व्यक्त केलेली नाही. मात्र मुंबई काँग्रेस अध्यक्षांनी या प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध असून मनसे महाआघाडीचा भाग नसेल असे म्हटले आहे.महाराष्ट्रात येणार्‍या उत्तर भारतीयांच्या लोढ्यांना विरोध हा मनसेचा मुख्य अजेंडा आहे. मनसेनेच्या आंदोलनाचा फटका आजवर उत्तर भारतीय समाजातील लोकांना नेहमीच बसला आहे. त्यामुळे त्यांचा मनसेवर राग आहे. काँग्रेस हा देशव्यापी पक्ष असून अशी आघाडी झाल्यास उत्तरेकडील राज्यांत निवडणुकीत काँग्रेसला जोरदार फटका बसू शकतो. त्यामुळे मनसेला आघाडीतसोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे. मनसेशी आघाडी केल्यास मराठी मतांमध्ये फूट पडून त्याचा फायदा महाआघाडीतील घटक पक्षांना होईल अशी आशा राष्ट्रवादीला आहे. असे वृत्त प्रकाशित झालेले आहे.


महाआघाडीत काँग्रेसला नको मनसेची साथ

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधातील महाआघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या समावेशावरून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणातणी सुरू झाली आहे. महाआघाडीत मनसेला सामील करून घेण्याची भूमिका राष्ट्रवादीने मांडली आहे, तर उत्तर भारतीयांची मते गमाविण्याच्या भीतीपोटी काँग्रेसने मनसेला विरोध केला आहे. मनसेला सोबत घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रस्ताव आला आहे. मात्र, मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसचा केंद्र आणि राज्यस्तरावर विरोध असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्पष्ट केले आहे. मनसे महाआघाडीचा भाग नसेल. मनसे आणि आमची विचारधारा जुळत नाही. मनसे कायद्याचे पालन करत नाही, हिंसेचे राजकारण करतात. २०१४ मध्ये राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता, आताही त्यांनी मोदींनाच पाठिंबा द्यावा. भाजपाचे आणि मनसेचे जवळचे संबंध असल्याचा आरोपही निरुपम यांनी केला. उत्तर भारतीय मतदारांमध्ये राज ठाकरे यांची प्रतिमा खलनायकापेक्षा कमी नाही. उत्तर भारतीय हे काँग्रेसचे परंपरागत मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत हे मतदार भाजपासोबत गेले होते. या वेळी ते पुन्हा काँग्रेससोबत येण्याची शक्यता आहे. अशा वेळी राज ठाकरे यांना सोबत घेतल्यास उत्तर भारतीय मतदार पुन्हा नाराज होतील आणि याचा फायदा भाजपालाच होईल, असेही संजय निरुपम मत व्यक्त केले आहे. असे वृत्त प्रकाशित झालेले आहे.
====================================

महाआघाडी/ आघाडी/युती शक्यता......................

शक्यता क्र.1 (सद्यस्थितीत विरोधकांची वाटचाल यशस्वी ठरल्यास खालीलप्रमाणे लढत शक्य)
राष्ट्रवादी+कॉंग्रेस+भारिप बहुजन महासंघ+एमआयएम+बसप+मनसे+सप+बहुजन विकास आघाडी+शेकाप+अपक्ष
विरुद्ध
भाजप+शिवसेना+आरपीआय(आ)+रासप+अपक्ष(उर्वरित)+इतर पक्ष/संघटना

शक्यता क्र.1 प्रमाणे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ मध्ये पहिल्या क्रमांकाची प्राप्त मते व निवडून आलेली पक्ष निहाय संख्या प्रमाणे स्थिती
41+42+1+2+0+1+1+3+3+0=94
विरुद्ध
122+63+0+1+7+0=193
(इतर मध्ये सीपीएम-1 जागा गृहीत धरण्यात आलेली नाही.) 


शक्यता क्र.1 प्रमाणे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ मध्ये दुसरया क्रमांकाची प्राप्त मते प्रमाणे पक्ष निहाय संख्या स्थिती
56+71+4+3+4+6+0+0+3+3=150
विरुद्ध
60+69+0+2+3+0=134
(उवर्रीत इतर पक्ष जागा गृहीत धरण्यात आलेली नाही.) 

शक्यता क्र.2 ( राजकीय पक्षांची सद्यस्थितीतील भूमिका कायम राहिल्यास खालीलप्रमाणे लढत शक्य)

राष्ट्रवादी+कॉंग्रेस+बसप+सप+बहुजन विकास आघाडी+शेकाप+अपक्ष
विरुद्ध
भारिप बहुजन महासंघ+एमआयएम
विरुद्ध
भाजप+शिवसेना+आरपीआय(आ)+रासप+अपक्ष(उर्वरित)+इतर पक्ष/संघटना
विरुद्ध
मनसे

शक्यता क्र.2 प्रमाणे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ मध्ये पहिल्या क्रमांकाची प्राप्त मते व निवडून आलेली संख्या प्रमाणे स्थिती

41+42+0+1+3+3+0=90
विरुद्ध
1+2=3
विरुद्ध
122+63+0+1+7+0=193
विरुद्ध
1=1
(इतर मध्ये सीपीएम-1 जागा गृहीत धरण्यात आलेली नाही.) 

शक्यता क्र.2 प्रमाणे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ मध्ये दुसरया क्रमांकाची प्राप्त मते प्रमाणे पक्ष निहाय संख्या स्थिती
56+71+4+0+3+3+0=137
विरुद्ध
4+3=7
विरुद्ध
60+69+0+2+3+0=134
(उवर्रीत इतर पक्ष जागा गृहीत धरण्यात आलेली नाही.) 

शक्यता क्र.3 ( मनसे व शिवसेना स्वतंत्रपणे प्रमुख आघाडी अशी स्थिती झाल्यास खालीलप्रमाणे लढत शक्य)

राष्ट्रवादी+कॉंग्रेस+बसप+सप+बहुजन विकास आघाडी+शेकाप+अपक्ष
विरुद्ध
भारिप बहुजन महासंघ+एमआयएम
विरुद्ध
भाजप+आरपीआय(आ)+रासप+अपक्ष(उर्वरित)+इतर पक्ष/संघटना
विरुद्ध
मनसे
विरुद्ध
शिवसेना+अपक्ष(उर्वरित)+इतर पक्ष/संघटना

शक्यता क्र.3 प्रमाणे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ मध्ये पहिल्या क्रमांकाची प्राप्त मते व निवडून आलेली संख्या प्रमाणे स्थिती
41+42+0+1+3+3+0=90
विरुद्ध
1+2=3
विरुद्ध
122+0+1+7+0=130
विरुद्ध
1=1
विरुद्ध
63+0=63
(इतर मध्ये सीपीएम-1 जागा गृहीत धरण्यात आलेली नाही.) 

शक्यता क्र.4 (काँग्रेस राष्ट्रवादी इतर पक्ष व मनसे आघाडीत सामील झाल्यास तसेच भारिप/एमआयएम स्वतंत्र लढत दिल्यास खालीलप्रमाणे लढत शक्य) 

राष्ट्रवादी+कॉंग्रेस+बसप+सप+बहुजन विकास आघाडी+शेकाप+अपक्ष+मनसे
विरुद्ध
भारिप बहुजन महासंघ+एमआयएम
विरुद्ध
भाजप+शिवसेना+आरपीआय(आ)+रासप+अपक्ष(उर्वरित)+इतर पक्ष/संघटना

शक्यता क्र.4 प्रमाणे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ मध्ये पहिल्या क्रमांकाची प्राप्त मते व निवडून आलेली संख्या प्रमाणे स्थिती
41+42+0+1+3+3+0+1=91
विरुद्ध
1+2=3
विरुद्ध
122+63+0+1+7+0=193
(इतर मध्ये सीपीएम-1 जागा गृहीत धरण्यात आलेली नाही.) 



शक्यता क्र.5 ( राष्ट्रवादी/मनसे या राजकीय पक्षांना विरोध करून इतर कॉंग्रेसेतर आघाडी व भाजप सेना युती झाल्यास खालीलप्रमाणे लढत शक्य) 

कॉंग्रेस+बसप+सप+बहुजन विकास आघाडी+शेकाप+अपक्ष+भारिप बहुजन महासंघ+एमआयएम
विरुद्ध
राष्ट्रवादी/मनसे
विरुद्ध
भाजप+शिवसेना+आरपीआय(आ)+रासप+अपक्ष(उर्वरित)+इतर पक्ष/संघटना


शक्यता क्र.5 प्रमाणे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ मध्ये पहिल्या क्रमांकाची प्राप्त मते व निवडून आलेली संख्या प्रमाणे स्थिती

42+0+1+3+3+0+1+2=52
विरुद्ध
41+1=42
विरुद्ध
122+63+0+1+7+0=193
(इतर मध्ये सीपीएम-1 जागा गृहीत धरण्यात आलेली नाही.) 

सूचना- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ मध्ये पहिल्या/दुसरया व तिसऱ्या क्रमांकाची प्राप्त मते नमूद करण्यात आलेली नाहीत.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ मध्ये 1 ते 3 स्थान मिळवलेल्या पक्ष निहाय जागांची संख्या(कंसात निवडून आलेली संख्या) खालीलप्रमाणे-

भारिप बहुजन महासंघ-9 (1)
एमआयएम-13 (2)
बसप-20 (0)
मनसे-22 (1)
रासप-4 (1)
सप-2 (1)
बहुजन विकास आघाडी-3 (3)
शेकाप-6 (3)
अपक्ष-22 (7)
राष्ट्रवादी-148 (41)
कॉंग्रेस-166 (42)
शिवसेना-193 (63)

भाजप-238 (122)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे



काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे विधानसभा
निवडणूक २०१९ करिता संभाव्य जागा वाटप असे होऊ शकते.


89 कॉंग्रेस संभाव्य जागा निश्चित सहमती
80 राष्ट्रवादी संभाव्य जागा निश्चित सहमती
169 दोन्ही पक्षांची सहमती
119 इतर मित्र पक्ष व नंतर वाटाघाटी
288 एकूण जागा


संभाव्य जागा वाटपात राष्ट्रवादीला मिळणाऱ्या जागा खालीलप्रमाणे-

विधानसभा मतदारसंघ निहाय संभाव्य यादी


मतदारसंघ सहमती झालेल्याअसे असेल संभाव्यविधानसभा निवडणूकराजकीय सद्यस्थिती
क्रमांकमतदारसंघाचे नावजागा वाटप २०१४ मिळालेली मतेविद्यमान आमदार /क्रमांक २ मते



7
Dhule City
राष्ट्रवादी
44852
क्रमांक २ मते
8
Sindkheda
राष्ट्रवादी
50636
क्रमांक २ मते
14
Jalgaon Rural
राष्ट्रवादी
52653
क्रमांक २ मते
16
Erandol
राष्ट्रवादी
55656
विद्यमान आमदार
17
Chalisgaon
राष्ट्रवादी
72374
क्रमांक २ मते
18
Pachora
राष्ट्रवादी
59117
क्रमांक २ मते
19
Jamner
राष्ट्रवादी
67730
क्रमांक २ मते
30
Akola West
राष्ट्रवादी
26981
क्रमांक २ मते
43
Morshi
राष्ट्रवादी
31449
क्रमांक २ मते
48
Katol
राष्ट्रवादी
64787
क्रमांक २ मते
50
Hingna
राष्ट्रवादी
60981
क्रमांक २ मते
60
Tumsar
राष्ट्रवादी
45273
क्रमांक २ मते
79
Digras
राष्ट्रवादी
41352
क्रमांक २ मते
81
Pusad 
राष्ट्रवादी
94152
विद्यमान आमदार
83
Kinwat
राष्ट्रवादी
60127
विद्यमान आमदार
92
Basmath
राष्ट्रवादी
58295
क्रमांक २ मते
95
Jintur
राष्ट्रवादी
106912
विद्यमान आमदार
97
Gangakhed
राष्ट्रवादी
58415
विद्यमान आमदार
100
Ghansawangi
राष्ट्रवादी
98030
विद्यमान आमदार
103
Bhokardan
राष्ट्रवादी
62847
क्रमांक २ मते
105
Kannad
राष्ट्रवादी
60981
क्रमांक २ मते
110
Paithan
राष्ट्रवादी
41952
क्रमांक २ मते
112
Vaijapur
राष्ट्रवादी
53114
विद्यमान आमदार
113
Nandgaon
राष्ट्रवादी
69263
विद्यमान आमदार
116
Baglan 
राष्ट्रवादी
68434
विद्यमान आमदार
119
Yevla
राष्ट्रवादी
112787
विद्यमान आमदार
121
Niphad 
राष्ट्रवादी
74265
क्रमांक २ मते
122
Dindori 
राष्ट्रवादी
68284
विद्यमान आमदार
135
shahapur
राष्ट्रवादी
56813
विद्यमान आमदार
139
Murbad
राष्ट्रवादी
59313
क्रमांक २ मते
141
Ulhasnagar
राष्ट्रवादी
43760
विद्यमान आमदार
145
Mira Bhayandar
राष्ट्रवादी
59176
क्रमांक २ मते
149
Mumbra-Kalwa
राष्ट्रवादी
86533
विद्यमान आमदार
150
Airoli
राष्ट्रवादी
76444
विद्यमान आमदार
151
Belapur
राष्ट्रवादी
53825
क्रमांक २ मते
172
Anushakti Nagar
राष्ट्रवादी
38959
क्रमांक २ मते
182
Worli
राष्ट्रवादी
37613
क्रमांक २ मते
189
Karjat
राष्ट्रवादी
57013
विद्यमान आमदार
193
Shrivardhan
राष्ट्रवादी
61038
विद्यमान आमदार
196
Ambegaon
राष्ट्रवादी
120235
विद्यमान आमदार
197
Khed alandi
राष्ट्रवादी
70489
क्रमांक २ मते
198
Shirur
राष्ट्रवादी
81638
क्रमांक २ मते
199
Daund
राष्ट्रवादी
76304
क्रमांक २ मते
201
Baramati
राष्ट्रवादी
150588
विद्यमान आमदार
204
Maval 
राष्ट्रवादी
67318
क्रमांक २ मते
211
Khadakwasala
राष्ट्रवादी
48505
क्रमांक २ मते
216
Akole 
राष्ट्रवादी
67696
विद्यमान आमदार
221
Nevasa
राष्ट्रवादी
79911
क्रमांक २ मते
222
Shevgaon 
राष्ट्रवादी
81500
क्रमांक २ मते
224
Parner
राष्ट्रवादी
45841
क्रमांक २ मते
225
Ahmednagar City
राष्ट्रवादी
49378
विद्यमान आमदार
226
Shrigonda
राष्ट्रवादी
99281
विद्यमान आमदार
228
Georai
राष्ट्रवादी
76383
क्रमांक २ मते
229
Majalgaon
राष्ट्रवादी
75252
क्रमांक २ मते
230
Beed
राष्ट्रवादी
77134
विद्यमान आमदार
231
Ashti
राष्ट्रवादी
114933
क्रमांक २ मते
233
Parli
राष्ट्रवादी
71009
क्रमांक २ मते
236
Ahmadpur 
राष्ट्रवादी
57951
क्रमांक २ मते
242
Osmanabad
राष्ट्रवादी
88469
विद्यमान आमदार
243
Paranda 
राष्ट्रवादी
78548
विद्यमान आमदार
244
Karmala
राष्ट्रवादी
60417
क्रमांक २ मते
245
Madha
राष्ट्रवादी
97803
विद्यमान आमदार
246
Barshi 
राष्ट्रवादी
97655
विद्यमान आमदार
247
Mohol 
राष्ट्रवादी
62120
विद्यमान आमदार
248
Solapur City North
राष्ट्रवादी
17999
क्रमांक २ मते
254
Malshiras 
राष्ट्रवादी
77179
विद्यमान आमदार
255
Phaltan 
राष्ट्रवादी
92910
विद्यमान आमदार
256
Wai 
राष्ट्रवादी
101218
विद्यमान आमदार
257
Koregaon 
राष्ट्रवादी
95213
विद्यमान आमदार
259
Karad North
राष्ट्रवादी
78324
विद्यमान आमदार
261
Patan
राष्ट्रवादी
85595
क्रमांक २ मते
262
Satara
राष्ट्रवादी
97964
विद्यमान आमदार
263
Dapoli
राष्ट्रवादी
52907
विद्यमान आमदार
264
Guhagar 
राष्ट्रवादी
72525
विद्यमान आमदार
265
Chiplun
राष्ट्रवादी
69627
क्रमांक २ मते
271
Chandgad 
राष्ट्रवादी
51599
विद्यमान आमदार
272
Radhanagari
राष्ट्रवादी
93077
क्रमांक २ मते
273
Kagal
राष्ट्रवादी
123626
विद्यमान आमदार
280
Shirol
राष्ट्रवादी
50776
क्रमांक २ मते
283
Islampur
राष्ट्रवादी
113045
विद्यमान आमदार



अधिक तपशीलवार माहितीसाठी- 
राज्यातील 48 लोकसभा व 288 विधानसभा मतदारसंघांतील  अहवाल "प्राब" कडे उपलब्ध आहे.


Mr.Chandrakant Bhujbal - 9422323533

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

===================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.