Tuesday, 9 October 2018

पुणे महापालिकेत ११ गावांचा पहिला नगरसेवक/नगरसेविका कोण होणार?

पुणे महापालिकेत ११ गावांचा पहिला नगरसेवक/नगरसेविका कोण होणार?



समाविष्ट ११ गावाचा एक प्रभाग करण्यात आला असून अवाढव्य भौगोलिकदृष्ट्या असणाऱ्या प्रभाग क्र ४२ फुरसुंगी-लोहगाव मधून नगरसेवक कोण होणार याची चाचपणी राजकीय पक्षांनी सुरु केलेली आहे. ११ गावांचा पहिला नगरसेवक/नगसेविका कोण होणार? याची उत्सुकता या गावामध्ये निर्माण झाली आहे. मात्र प्रभाग रचनाच या गावामधील नागरिकांना पचनी पडत नाही. नव्या प्रभागात सध्या असणाऱ्या मतदारसंख्येच्या तुलनेत आंबेगांव (बु/खुर्द) व आंबेगाव (बुद्रुक)-धायरी व फुरसुंगीमधील संख्या जास्त आहे. या भागातीलच उमेदवार या प्रभागावर वर्चस्व राखतील अशी शक्यता आहे.  आंबेगांव (बु/खुर्द) व आंबेगाव (बुद्रुक) या भागातील लोकसंख्या २०११ पेक्षा आजची मतदारसंख्या जास्त आहे. ४५१९९ ही समाविष्ट ११ गावातील भागातील सर्वाधिक जास्त मतदारसंख्या आहे. तर त्या खालोखाल फुरसुंगीतील ३९६६९ मतदारसंख्या असून धायरीची ३६०१८ मतदारसंख्या ही २०११ लोकसंख्येच्या तुलनेत जास्त आहे. लोहगावची लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंख्या नोंद कमी प्रमाणात आहे. शिवणे उत्तमनगर व इतर भागातील संख्या नवीन प्रभागाच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून प्रभावशील नाही. नवनिर्वाचित प्रभाग क्र ४२ मधील निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. 
२०११ जनगणना मधील लोकसंख्या प्रभाग रचनेत गृहीत धरण्यात येत असल्याने लोकप्रतिनिधीत्वाची संख्या कमी दर्शविण्यात आली आहे. या ११ समाविष्ट भागातील लोकसंख्या केवळ लोकसंख्या २,३९,४८३ असून अनुसूचित जातींची संख्या ३१,४७५ आहे तर अनुसूचित जमातींची संख्या ३५०१ नमूद केलेली आहे. मात्र या भागातील मतदारसंख्या काही भागात तुलनात्मकदृष्ट्या जास्त आहे. मतदारसंख्या विचारात घेतल्यास नगरसेवक संख्या नगण्य असून ती इतर प्रभागांच्या तुलनेत १० ते १२ सदस्यांचाचे किमान ३ प्रभाग करणे अपेक्षित होते. पुणे महापालिकेच्या पूर्वीच्या प्रभाग रचनेत २०११ जनगणना मधील लोकसंख्या प्रमाण सरासरी ८० ते ८५ हजार असे एका प्रभागासाठी सर्वाधिक असे घेण्यात आले आहे. प्रभाग क्र ४२ प्रारूप रचना प्रसिद्ध करताना ११ समाविष्ट भागातील लोकसंख्या केवळ लोकसंख्या २,३९,४८३ आहे तर पूर्वीच्या सरासरीच्या प्रमाणत ३ प्रभाग 4 सदस्याचे निर्माण होणे अपेक्षित आहे. मात्र 1 प्रभाग निर्माण करून त्यामध्येही २ सदस्यांना मान्यता राज्य निवडणूक आयोगाने दिल्याचे सांगण्यात येते हे या समाविष्ट भागातील नागरिकांवर अन्यायकारक आहे. विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्राप्रमाणे या प्रस्तावित प्रभागाची रचना व त्या तुलनेत मतदारसंख्या आहे. लोहगाव ते धायरी आणि शिवणे ते फुरसुंगी दरम्यानचे सरासरी अंतर २५ किलोमीटरपेक्षा अधिक आहे. भौगोलिक सलगता नसतानाही हा सर्व परिसर आता एका प्रभागाखाली सामावला जाणार आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व गावांचा मिळून एकच प्रभाग तयार होणार असल्याने येथून निवडून येणाऱ्या नगरसेवकांसमोर शहराच्या पूर्व-पश्चिम आणि दक्षिण-उत्तर अशा चारही दिशांच्या मतदारांशी संपर्क ठेवण्याचे कठीण  आव्हान असणार आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या प्रभागाच्या प्रा-रूप रचनेवर नागरिकांना येत्या शुक्रवारपर्यंत (१२ ऑक्टोबर) हरकती-सूचना मांडता येणार आहेत. शुक्रवारपर्यंत दाखल होणाऱ्या सर्व हरकतींवर १७ ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्यात येणार असून, त्यानंतर २० ऑक्टोबरला प्रभागाची रचना अंतिम केली जाणार आहे. ही प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर आगामी काळात निवडणूक आयोगातर्फे येथील निवडणूक जाहीर केली जाणार आहे.भाग चारही दिशांना - उत्तर : लोहगाव (उर्वरित) पूर्व : मुंढवा (उर्वरित केशवनगर) व हडपसर (साडेसतरानळी), उरळी, फुरसुंगी व उंड्री , दक्षिण : आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द व धायरी, पश्चिम : शिवणे (उत्तमनगर) अशी आहे. या समाविष्ट भागात पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे च्या वतीने नागरिकांचा अंदाज/प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता. दोन सदस्यांचा नवीन प्रभाग क्र ४२ तयार करण्यात येत आहे. या प्रभागाची रचना सांगितल्यावर सर्वसाधारण नागरिक डोक्यावर हात मारून घेत आहेत. नवीन प्रभाग रचनेबाबत फारसी माहिती नागरिकांना नाही. राजकीय व सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या प्रतिक्रिया देखील प्रतिकूल आहेत. प्रशासनावर तोंडसुख घेणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या सर्व प्रारूप प्रभाग रचना प्रक्रियेला हरकत घेण्यात येणार असल्याचे काही राजकीय पदाधिकारी यांनी सांगितले. नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये आगामी काळात निवडणूक झाल्यास मत जाणून घेण्यात आले असता राज्य व केंद्र आणि महापालिकेत सत्ता भाजपची असल्याने आमच्या भागात किमान निधी उपलब्ध करून देतील या आशेने आम्ही भाजपला प्राधान्यक्रम देऊ अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तर निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या काही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.  

विचित्र प्रभाग रचनेस विरोध;सर्व गावांचा समावेश केल्यावरच निवडणुका घेण्याची मागणी


समाविष्ट 34 गावांच्या निवडणुका एकत्रितपणे घ्याव्यात अशी मागणी हवेली तालुका कृती समितीने केली आहे. फक्त ११ गावामध्ये निवडणुका घेतल्यास न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे धायरी येथील समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे. 



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.