Monday 8 October 2018

भाजप-सेना युती झाली नाहीतर मावळ मधून लोकसभेला भाजपचा उमेदवार- आमदार लक्ष्मण जगताप

भाजप पक्ष कदापि सोडणार नाही- आमदार लक्ष्मण जगताप यांचा खुलासा  


भारतीय जनता पार्टीव्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढणार नाही, असा खुलासा या पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व चिंचवडचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला आहे. यामुळे त्यांच्या संदर्भात उठलेल्या विविध चर्चांना त्यांनीच पूर्ण विराम दिला आहे. मात्र, भाजप-सेना युती झाली नाहीतर मावळ मधून लोकसभेला भाजपचे उमेदवार असतील याचाही खुलासा त्यांनी केला आहे. 



पिंपरी-चिंचवड मधील राजकीय सद्यस्थितीचे अवलोकन

* चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी मावळमधून लढविण्याचा मनोदय यापूर्वीच जाहीर केला आहे.
* शिवसेनेशी युती झाल्यास विद्यमान खासदार म्हणून सेनेकडे मावळ लोकसभा कायम राहण्याची शक्यता.
* मावळ लोकसभा मतदारसंघात आमदारांचे संख्याबळही भाजपचे मित्रपक्षापेक्षा मावळमध्ये अधिक आहे. पिंपरी-चिंचवडसह पनवेल या मतदारसंघातील महापालिका व वडगाव मावळ आणि लोणावळा नगरपरिषद पक्षाच्या ताब्यात आहे. अशी स्थिती असूनही सध्या शिवसेनेकडे असलेल्या मावळवर भाजपचा दावा युती होण्याच्या दृष्टीकोनातून टिकणारा नाही.
* भाजप-सेना युती झाल्यास सेनला मतदारसंघ गेल्यावर मावळमधून भाजपकडून लढविण्याची इच्छा/निर्धार आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना सोडून द्यावा लागेल.
* गेली 14 वर्षे आमदार असलेले लक्ष्मणभाऊ जगताप मंत्रिपदाचे प्रबळ हक्कदार आहेत परंतु भाजपमधील त्यांची पहिलीच टर्म आहे. जिल्ह्यातून मावळ विधानसभेचे आमदार भेगडे भाजपमधून सलग ३ वेळा निवडून आलेले आहेत. भाजप निष्ठावंत म्हणून भेगडे देखील मंत्रिपदाचे हक्कदार आहेत. तर अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री यांच्या जवळचे मानले जातात, पालिकेतील महापौरपदी समर्थकांची निवड करून वर्चस्व सिद्ध केलेले असून ते देखील महामंडळ अथवा मंत्रिपदाचे दावेदार आहेत. 
* आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना त्यांच्या समर्थकांना पालिकेतील प्रमुखपदी/महापौरपदी नियुक्ती करता आलेली नाही.
* मंत्रिपदाचे प्रबळ हक्कदार आहेत परंतु भाजपमधील निवड प्रक्रियेतील काही निकष/पात्रतेत त्यांचा समावेश होत नाही.
* आझम पानसरे स्थायी समिती अध्यक्ष, महापौर झाले पण त्या पुढे त्यांना राजकीय दृष्ट्या अपेक्षित यश मिळाले नाही.  महापालिका विजयात महत्वाचा वाटा उचलला असताना ही आझम पानसरे यांच्यावर भाजप मध्ये ही अन्याय होतो आहे ही  भावना समर्थकांमध्ये आहे. आझम पानसरे देखील चांगल्या पदाचे आशावादी आहेत. त्यांना भाजपामध्ये सामावून घेण्यात  आमदार लक्ष्मण जगताप यांची महत्वाची भूमिका होती. त्यांनाही काहीही देता आले नाही याचे देखील शल्य राहणारच.
* २०१४ निवडणुकपूर्व भाजपमध्ये प्रवेश केलेले विद्यमान आमदार मंत्रिमंडळ प्रतिक्षेत आहेत तसेच यांना महामंडळही दिलेले नाही- 
डॉ. अनिल बोंडे, डॉ. विजयकुमार गावित, राजेंद्र पाटणी, किसन कथोरे, डॉ. सुनील देशमुख, स्रेहलता कोल्हे, अनिल गोटे, मंदा म्हात्रे, प्रकाश भारसाकळे, अमल महाडिक, मोनिका राजळे, भारती लव्हेकर, प्रशांत ठाकूर, संजय सावकारे, लक्ष्मणभाऊ जगताप, महेश लांडगे हे भाजपात बाहेरून आलेले आमदार आहेत. यापैकी देशमुख व ठाकूर वगळता कुणालाही मंत्रीपद वा साधे महामंडळदेखील मिळालेले नाही.
* राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. साधारणत: नऊ नवे चेहरे मंत्रिमंडळात येतील. त्यात बाहेरून आलेल्यांपैकी किमान दोघांना तरी संधी दिली पाहिजे अशी मागणी आहे तरी देखील भाजपच्या मंत्रिपद निवड प्रक्रियेतील काही निकष/पात्रतेत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व अपक्ष आमदार महेश लांडगे यांचा समावेश होत नाही.
* कोणत्याही पक्षात जाणार नाही ; भाजपामध्येच शेवटपर्यंत कार्यरत राहणार असल्याचा आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा खुलासा
* वरील सर्व राजकीय सद्यस्थितीचे अवलोकन केल्यास कोणतेही मंत्रिपद व साधे महामंडळदेखील मिळणार नाही, समर्थकांची महत्वाच्या पदावर निवड करून घेता येत नाही, जागा वाटपात भाजपला मावळ लोकसभा मिळाला नाही तर खासदारकी लढविण्याची इच्छा पूर्ती करता येणार नाही, लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार सोडून द्यावा लागेल. महापालिकेतील एक हाती सत्ता केंद्र नाहीं, या सर्व राजकीय सद्यस्थितीचे अवलोकन करणे आवश्यक असल्याचे काही जाणकारांचे मत आहे.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.