Monday, 15 April 2019

सलग ३ दशकांपासून करतोय मतदान जनजागृती

ध्येयवेडा सलग ३ दशकांपासून करतोय मतदान जनजागृती


पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी गावचे रहिवासी बापूराव गुंड हे स्वखर्चाने राज्यभर बाईक प्रवास करून मतदान जागृतीचा संदेश देत आहेत. गेली ३५ वर्षे हा अवलिया स्वत:च्या खर्चातून लोकांमध्ये मतदानाबद्दलची जनजागृती करताना दिसत आहे. पुण्यातील फुरसुंगीपासून या अवलियाने ३५ वर्षापूर्वी बाईकवरून हा मतदान जागृतीचा प्रवास सुरू केला आहे. पूर्ण राज्यात मतदार जागृती करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. बाईकवरही मतदान जागृतीचे संदेश जागोजागी लिहिलेले दिसतात. गेल्या ३५ वर्षांपासून बापूराव यांनी मतदान जागृतीच्या या आगळ्या वेगळ्या मोहिमेतील खर्च स्वत:च केला आहे. बापूराव हे पेशाने कापड विक्रेते आहेत. निवडणुकांमध्ये मतदानाचा घसलेला टक्का त्यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी ही मोहीम सुरु केली. सरकार निवडीच्या प्रक्रियेत सर्वांनीच सहभागी व्हायला हवे, असं त्यांना वाटतं. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा तसेच लोकसभा या सर्वच निवडणुकांच्या काळात मतदानासाठी जागृती करण्याच्या हेतून बापूराव आपली दुचाकी घेऊन छोटे छोटे दौरे कररीत आहेत. ‘कुणाच्याही आमिषाला बळी न पडता मतदान करा, चोख कर्तव्य पार पाडा, प्रत्येक निवडणुकीत ६० ते ७० टक्के मतदान होते. बाकीचे ४० टक्के लोक मतदान करत नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये मतदानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी मी ३५ वर्षांपासून असा पोषाख घालून प्रचार करतो आहे असे बापूराव गुंड यांनी म्हंटले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

योगी आदित्यनाथ, मायावतींवर प्रचारबंदी; निवडणूक आयोगाची कारवाई

आता वाचाळवीर नेत्यांवर प्रचारबंदी


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाने आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारला आहे. निवडणूक आयोगाने  लोकसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांना तीन दिवसांची प्रचारबंदी घातली आहे. तर मायवती यांना दोन दिवसांच्या प्रचारावर बंदी घातली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ आणि मायावती यांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ आणि मायावती यांच्यावर आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला. तसेच, याप्रकरणी योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार मोहिमेवर पुढील 72 तास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे उद्या (16 एप्रिल) सकाळी 6 वाजल्यापासून योगी आदित्यनाथ निवडणूक प्रचार, रोड शो किंवा मुलाखत अशा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराशी निगडीत कोणत्याही कार्यक्रमात सहभाग घेऊ शकणार नाहीत. याशिवाय, मायावती यांच्यावरही आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा ठपका ठेवण्यात आला असून, त्यांना उद्या (16 एप्रिल) सकाळी 6 वाजल्यापासून 48 तास रोड शो किंवा मुलाखत अशा लोकसभा निवडणूक प्रचाराशी संदर्भात गोष्टी करता येणार नाहीत. धर्माच्या नावावर मतं मागत आचारसंहितेचं उल्लंघन करणं बसपा प्रमुख मायावती आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भोवलं आहे. निवडणूक आयोगाने मायवती यांना दोन दिवस तर योगींना तीन दिवस निवडणूक प्रचार करण्यास बंदी घातली आहे. या काळात हे दोन्ही नेते कोणताही रोड शो करू शकणार नाहीत. त्यांना निवडणूक प्रचार सभाही घेता येणार नसून निवडणूक रॅलीतही भाग घेता येणार नाही. १६ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजल्यापासून ही बंदी लागू होणार आहे. मायावती आणि योगींवर निवडणूक आयोगाने घातलेली बंदी ही २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात मोठी कारवाई आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार योगी आदित्यनाथ १६, १७ आणि १८ एप्रिल रोजी तर मायावती १६ आणि १७ एप्रिल रोजी प्रचार करू शकणार नाहीत. बंदीच्या काळात या दोन्ही नेत्यांना सोशल मीडियाचा वापर करता येणार नाही. त्यांना या काळात कोणतीही मुलाखत देता येणार नाही, असं आयोगानं स्पष्ट केले आहे. 

आरोप काय होते? 

मायावती यांनी उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये निवडणूक प्रचार सभेदरम्यान मुस्लिम समुदायाला सपा-बसपा महाआघाडीलाच मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. धर्माच्या नावावर मतदान मागण्याच्या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी मायवतींवर कारवाई करण्यात आली आहे. तर योगी यांनी विरोधकांना 'अली' आवडतो तर आम्हाला 'बजरंग' बली आवडतो, असं विधान करत धर्माच्या नावावर मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे दोन्ही नेत्यांकडून निवडणूक आयोगानं खुलासा मागत त्यांना फटकारले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मायावती यांच्या देवबंदमधील भाषणावर आक्षेप घेतला होता. धर्माच्या नावावर मतदान मागणाऱ्यांविरोधात आयोग काय कारवाई करत आहे? असा सवाल न्यायालयाने केला होता. या नेत्यांना केवळ नोटीस बजावण्यात आली आहे. कठोर कारवाई का केली जात नाही? असा सवाल करत न्यायालयाने आयोगाला फटकारले होते. त्यानंतर आयोगानं ही कारवाई केली. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

Thursday, 11 April 2019

स्वीप कार्यक्रम व्यवस्थापन समिती मतदार जनजागृती अभियानांतर्गत (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण उपक्रम

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या वतीने

अल्प मतदान झालेल्या केंद्रातील मतदारांचे सर्वेक्षण व जनजागृती





स्वीप (SVEEP - Systematic Voters’ Education and Electoral Participation)  कार्यक्रम व्यवस्थापन समिती मतदार जनजागृती अभियानांतर्गत पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या वतीने अल्प मतदान झालेल्या केंद्रातील मतदारांचे सर्वेक्षण व जनजागृती प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा निवडणूक अधिकारी नवलकिशोर राम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग, स्वीप कार्यक्रम व्यवस्थापन समितीचे मुख्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर व समन्वयक अधिकारी श्रीमती आशाराणी पाटील आणि स्वीप कार्यक्रम व्यवस्थापन समिती संपर्क अधिकारी यशवंत मानखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 करीता मतदार जनजागृती अभियान अंतर्गत लोकसभा निवडणूक 2014 मधील अल्प मतदान झालेल्या मतदान केंद्रातील मतदारांचे सर्वेक्षण व जनजागृती करून अल्प मतदानाच्या प्रमाणाची कारणे व उपाय योजनांचा अहवाल तयार करण्यात आलेला आहे सदर अहवाल नुकताच सुपूर्त करण्यात आला. पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या वतीने दरवर्षी मतदार जनजागृती व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येतात.  

सर्वेक्षण अहवालात काय आहे?- 

1. लोकसभा निवडणुकीतील अल्प मतदान प्रमाणाचे सर्वेक्षण करण्याचा उद्देश
2. लोकसभा निवडणुक 2014 मतदान दृष्टीक्षेप 
3. कमी मतदान झालेल्या प्रमाणानुसार मतदान केंद्र संख्या दर्शवणारा तक्ता
4. मतदान केंद्रांमध्ये 62 टक्के पेक्षा कमी मतदान झालेले आहे या मतदान केंद्रावरील स्थिती व तपशील दर्शवणारा तक्ता
5. मतदारांनी सर्वेक्षणा दरम्यान मतदान न करण्याची दिलेली कारणे
6. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
7. मतदान जनजागृती अभियानांतर्गत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वेक्षणातील उपाययोजना
8. मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत निरुत्साहाची कारणे व मतदार यादीतील दोष
9. लोकसभा निवडणूक 2014 मध्ये अल्प मतदान झालेला भाग
10. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 मधील  मतदारसंघ निहाय मतदानाचे प्रमाण दर्शविणारा तक्ता
11. लोकसभा निवडणूक 2014 मध्ये काही कारणांनी मतदानात सहभाग न घेतलेल्या मतदारांची संख्या व प्रमाण तक्ता
12. विधानसभा मतदारसंघ निहाय अल्प मतदानाचे प्रमाण असलेली मतदान केंद्र तपशील
(1) 195 - जुन्नर विधानसभा मतदारसंघ
(2) 196 - आंबेगाव विधानसभा मतदारसंघ
(3) 197 - खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ
(4) 198 - शिरूर विधानसभा मतदारसंघ
(5) 199 - दौंड विधानसभा मतदारसंघ
(6) 200 - इंदापूर विधानसभा मतदारसंघ
(7) 201 - बारामती विधानसभा मतदारसंघ
(8) 202 - पुरंदर विधानसभा मतदारसंघ
(9) 203 - भोर विधानसभा मतदारसंघ
(10) 204 - मावळ विधानसभा मतदारसंघ
(11) 205 - चिंचवड विधानसभा मतदारसंघ
(12) 206 - पिंपरी विधानसभा मतदारसंघ
(13) 207 - भोसरी विधानसभा मतदारसंघ
(14) 208 - वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ
(15) 209 - शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
(16) 210 - कोथरुड विधानसभा मतदारसंघ
(18) 212 - पर्वती विधानसभा मतदारसंघ
(19) 213 - हडपसर विधानसभा मतदारसंघ
(20) 214 - पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ
(21) 215 - कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ
13. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 मधील मतदारसंघ निहाय मतदानाचे प्रमाण तक्ता.
14. लोकसभा निवडणूक 2014 मध्ये काही कारणांनी मतदानात सहभाग न घेतलेल्या मतदारांची संख्या व प्रमाण.
15. सर्वेक्षण कार्यपद्धत व संदर्भ
==================

लोकसभा निवडणुकीतील अल्प मतदान झालेल्या प्रमाणाचे सर्वेक्षण करण्याचा उद्देश - 

पुणे जिल्ह्यामधील 21 विधानसभा मतदारसंघामध्ये 3 पूर्ण लोकसभा मतदारसंघ असून 1 मावळ मतदारसंघामध्ये 3 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. एकूण 4 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृती व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी स्वीप (SVEEP - Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रम व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. या समितीमार्फत विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांना आवाहन करण्यात आले. या आवाहनाला बहूतांश स्वयंसेवी संस्थांनी प्रतिसाद दिला. स्वीप कार्यक्रम व्यवस्थापन समितीचे उपजिल्हाधिकारी तथा मुख्य समन्वयक सुभाष बोरकर, जिल्हा निवडणूक अधिकारी नवलकिशोर राम आणि उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांच्या मार्गदर्शनामुळे गेल्या लोकसभा निवडणूकीत मतदानाचे प्रमाण कमी झालेल्या मतदानकेंद्रावर कारणांचा शोध घेण्याचे सूनिश्‍चित करण्यात आले. मतदान न केलेल्या मतदारांकडून कारणे जाणून घेऊन त्यावर उपाय योजना राबविण्याचा संकल्प केल्याने या कार्याची जबाबदारी नेहरू युवा केंद्राचे प्रमुख व स्वीपचे सहाय्यक श्री. यशवंत मानखेडकर यांनी स्वीकारून मतदारांमध्ये प्रबोधनात्मक उपक्रम राबविणारी संस्था पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) ची निवड करण्यात आली. त्यांच्या आग्रहास्तव संबंधित जबाबदारी स्वीकारण्याची तयारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भुजबळ यांनी स्वीकारली. प्रामुख्याने स्वीप कार्यक्रम व्यवस्थापन समितीचे उपजिल्हाधिकारी तथा मुख्य समन्वयक सुभाष बोरकर यांची सर्वेक्षणाची मूळ संकल्पना असल्याने त्यांनी अपेक्षित सर्वेक्षणाबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये सर्व भागात शहर व ग्रामीण भागासह दूर्गम भाग आणि शहरातील दूर्लभ व झोपडपट्टी भागामध्ये सर्वेक्षणाचे नियोजन त्यांनी अचूकपणे करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. पुणे शहर व जिल्ह्यातील 21 पैकी 20 विधानसभा मतदारसंघात लोकसभा मतदारसंघ निहाय सर्वेक्षण करून अल्प कालावधीत या निवडणूकीत उपाययोजना व प्रबोधन करण्याचे कार्य पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) यासंस्थेच्या वतीने करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. मतदारांमध्ये जनजागृती व प्रबोधनात्मक उपक्रमांचा या अहवालात जाणीवपूर्वक उल्लेख व विस्तारीत वृत्त व छायाचित्रे टाळण्यात आलेली आहेत. मुख्य उद्देश मतदान न केलेल्या मतदारांचा शोध घेणे व त्यामागील कारणे जाणून घेणे हा असल्याने तसेच त्यांच्यामध्ये असलेले गैरसमज दूर करणे व मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे ही भावना मतदारांमध्ये जागृत करून सध्याच्या वातावरणात राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधींच्या अविश्‍वासार्ह वातावरणामुळे निराश झालेल्या काही मतदारांमध्ये मतदान करण्याची भावना निर्माण करण्यात यश मिळाल्याचा आनंद सर्व स्वीम व्यवस्थापन कमिटी पदाधिकारी व सदस्य आणि संस्थेला झाला आहे. सर्वेक्षणाबरोबरच मतदारांमध्ये मतदान करण्याबद्दल जनजागृती करून मतदान प्रक्रियेचे स्वरूप व ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी यंत्राबाबत प्रबोधन करण्यात आले. या उपक्रमामुळे निश्‍चितच लोकसभा निवडणुकीमध्ये 23 व 29 एप्रिल 2019 रोजी होणार्‍या मतदानाच्या टक्केवारीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.
==================

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष-

* मतदारयादी किमान 5 टक्के ते 18 टक्के दोषपूर्ण (मयत, दुबार, स्थलांतरित नावे)
* मतदान केंद्रावर जाण्याचे अंतर जास्त व प्रवास साधन अपेक्षापूर्ती नसल्याने शहरात 6 टक्के तर ग्रामीण भागात 15 टक्के मतदारांचे मतदानाकडे दुर्लक्ष. 
* रुग्ण/वयोवृद्ध/अपंग/इतर घटकांना कुटुंबातून योग्य मदत/सहकार्य मिळत नसल्याने 2 टक्के मतदार मतदानापासून वंचित.
* अपरिचित उमेदवार व भ्रष्टाचारामुळे राजकीय व्यवस्थेविरुद्ध चीड/स्थानिक प्रश्न म्हणून राजकीय पदाधिकारी/पक्षांवर रोष असलेल्या मतदारांचे प्रमाण 4 टक्के आहे.
* सलग सुट्टी/आयपीएल क्रिकेट/मनोरंजन कार्यक्रम/बाहेर गावी पर्यटन/परदेशात/उच्च शिक्षण व नोकरी निमित्त बाहेर गावी अशा स्वरूपांच्या मतदारांचे शहरात 3 टक्के प्रमाण हे ग्रामीण भागाच्या (1.5 टक्के) दुप्पटीने जास्त आहे.  
* स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना राजकीय पदाधिकारी जास्त सक्रीय असून केंद्रावर जाण्याचे अंतर जास्त व प्रवास साधन अपेक्षापूर्ती करीत असल्याने लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान जास्त होते. 
* सर्व घटकांचा विचार केला तरच मतदानाची टक्केवारी वाढू शकते.
* शाळा, महाविद्यालयामध्ये जनजागृती करून केवळ युवा मतदारांपर्यंत प्रसार होत आहे, इतर मतदारांच्या वर्गवारीनुसार मतदान प्रक्रियेतील त्यांच्या अडचणी जाणून त्या प्रकारे सुविधा देण्याची गरज असून प्रशासकीय व सर्वसामान्यांचा व्यवस्थेतील सक्रीय सहभागच मतदानाची टक्केवारी वाढवू शकेल.
==================

मतदार यादीतील दोष काय आहेत-

* दुबार नावे वगळली नाहीत
* काही मयत नावे वगळली नाहीत
* स्थलांतरित झाल्यामुळे परगावी/दुसर्‍या जिल्ह्यात नाव दाखल तरीही     मूळ गावात दुबार नाव
* मतदारयादी पुनर्निरीक्षण कामात काही बीएलओ यांचा हलगर्जीपणा 
* ठराविक स्थानिक लोकप्रतिनिधीचा हस्तक्षेप व दबावामुळे बीएलओ यांच्याकडून दुर्लक्ष
* मतदान केंद्र माहिती ओळख चिठ्ठी पोहोच कार्यात अनियमितता
* मतदारयादीत नाव असूनही केंद्र माहिती सुविधांचा अभाव 
* पुरवणी यादीतील मतदारांची नावे मुळ अंतीम यादीत समावेश होण्यास विलंब. 
==================

लोकसभा निवडणूक 2014 मध्ये अल्प मतदान झालेला भाग खालीप्रमाणे- 

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघापैकी 20 मतदारसंघातील मागील लोकसभा निवडणूक 2014 मध्ये अल्प मतदान झालेल्या केंद्रावरील सुक्ष्म सर्वेक्षण करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात येणार्‍या विधानसभा मतदारसंघात दुर्गम भागामध्ये तसेच प्रमुख काही गावांमध्ये अल्प मतदान झाल्याचे दिसून आले. पुणे शहरातील अल्प मतदान झालेल्या भागांमध्ये पर्वती विधानसभा क्षेत्रातील बिबवेवाडी, घोरपडेपेठ, गुलटेकडी, हिंगणे खुर्द, अप्पर व लोअर इंदिरानगर, महर्षीनगर, मुकुंदनगर, पद्मावती, पर्वती जनता वसाहत आणि लक्ष्मीनगर, सहकारनगर, सिंहगडरोड परिसर या भागात अल्प मतदान झालेले आहे. तसेच पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा क्षेत्रातील वानवडी, कॅम्प परिसर, कोरेगाव पार्क, भवानी पेठ भाग, घोरपडी, ताडीवाला रोड, रास्तापेठ भाग, वाडिया कॉलेज परिसर या भागात अल्प मतदान झालेले आहे. कोथरूड विधानसभा क्षेत्रातील पाषाण, एरंडवणा, जयभवानीनगर, कोथरूड, बाणेर, बालेवाडी समाविष्ट असलेला भाग, औंध, पौड फाटा, कर्वे रोड, कर्वेनगर काही भाग, सिंधू सोसायटी औंध आदि या भागात अल्प मतदान झालेले आहे. शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रातील औंध गाव, पुणे विद्यापीठ परिसर, रेंजहिल्स या भागात अल्प मतदान झालेले आहे. वडगावशेरी विधानसभा क्षेत्रातील येरवडा परिसर, वडगावशेरी भाग, खराडी, आणि समाविष्ट लोहगाव भाग या भागात अल्प मतदान झालेले आहे.भोसरी विधानसभा क्षेत्रातील इंद्रायणीनगर भोसरी परिसर, कुदळवाडी, तळवडे व दिघी गावठाण भाग, चक्रपाणी वसाहत रस्ता भोसरी कृष्णानगर, चिखली, नेवाळे वस्ती, दिघी रोड भोसरी, धावडे वस्ती, निगडी गावठाण, नेहरुनगर, मासुळकर कॉलनी, म्हेत्रेवस्ती, लांडेवाडी भोसरी भाग, अजंठानगर, सॅन्डविक कॉलनी, सेक्टर रोड अजमेरा कॉलनी या भागात अल्प मतदान झालेले आहे चिंचवड विधानसभा क्षेत्रातील चिंचवडगाव, विकासनगर, काळेवाडी, नवी सांगवी, विजयनगर काळेवाडी, जयमल्हारनगर, संतोषनगर थेरगाव परिसर, तापकीर नगर, थेरगाव भाग, सांगवी गाव, वाकड, पिंपळे सौदागर व गुरव काही भाग, श्रीनगर रहाटणी, कस्पटे वस्ती, सुदर्शन नगर, कीर्तिनगर थेरगाव परिसर या भागात अल्प मतदान झालेले आहे. मावळ विधानसभा क्षेत्रातील शिरगाव, महागाव, वडगाव, देहूरोड, लोणावळा काही भाग, धालेवाडी, माळवाडी, शिलींब, उधेवाडी, कुरवंदे, कान्हे, वाळकाईवाडी या भागात अल्प मतदान झालेले आहे. जुन्नर विधानसभा क्षेत्रातील आगर (विठ्ठलवाडी), राजूर, अंजनाळे, ढोलवाड, जुन्नर काही परिसर, ओतुर भाग, इंगलोन, खटकळे, डिंगोरे, वरवली (नारायणगांव), घाटघार, रणमाळवाडी (बेल्हा), धालेवाडी हवेली, चव्हाद, कातेडे, माणकेश्वर, अहिनावेवाडी, हिवरे मिन्हेर, हडसर, आलमे, केवडी, तालमचीवाडी या भागात अल्प मतदान झालेले आहे. 
==================

सर्वेक्षण कार्यपद्धत व संदर्भ ....असे केले सर्वेक्षण

* पुणे लोकसभा निवडणूक 2014 मधील मतदानाच्या प्रमाणाचे विश्‍लेषण करून अल्प  (62 टक्के च्या आतमधील) मतदान झालेल्या मतदान केंद्रातील भागात सर्वेक्षण करण्यात आले.  
* अल्प मतदान केंद्र विधानसभा मतदारसंघ निहाय निर्धारित करण्यात आली. 
* 2014 मधील निवडणूकीतील निश्‍चित केलेली मतदान केंद्र व त्यांचा भाग सर्वेक्षणासाठी निश्‍चित करण्यात आला. 2014 च्या अंतिम मतदार यादीतील संबंधित मतदारांच्या काही प्रमाणात प्रश्‍नावलीतून मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला.
* संबंधित मतदार यादीतील मतदारांची वर्गवारी करून मतदान न करणार्‍या मतदारांचा प्रश्‍नावलीतून शोध घेण्यात आला व मतदान न करण्याची कारणे समजावून घेण्यात आली. 
* मतदान न केलेल्या व प्रत्यक्ष भेटलेल्या मतदारांना त्यांच्या गैरसमजूती दूर करून त्यांचे मतदानाविषयी महत्व व कर्तव्य समजावून सांगून त्यांचे प्रबोधन व जनजागृती करण्यात आली. 
* पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील 20 मतदारसंघात सर्वेक्षण करण्यात आले. अल्प काळात माहितीचा अभाव व संबंधित मतदारसंघातील असहकार्यामुळे खडकवासला मतदारसंघातील कोणत्याही भागामध्ये सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. उर्वरित सर्व मतदारसंघामध्ये अहवालात नमुद केलेल्या मतदान केंद्र निहाय सखोल सर्वेक्षण करण्यात आले आहे. 
* संबंधित मतदार केंद्र निहाय यादीमधील मतदारांमध्ये प्रश्‍नावलीतून मतदान विषयी 21 प्रश्‍नांद्वारे अपेक्षित त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वेक्षणातून निष्कर्ष व उपाय योजना आणि प्रशासकीय त्रुटी निदर्शनास आल्या त्या अल्प काळातील छोट्याशा अहवालामध्ये नमूद करण्यात आला आहे. 
* सर्वेक्षणासंदर्भातील अधिक तपशील वार माहिती प्राब या संस्थेकडे उपलब्ध आहे. 
* सर्वेक्षण 27 मार्च 2019 ते 8 एप्रिल 2019 या कालावधीमध्ये करण्यात आले. यामध्ये 13 दिवसांच्या कालावधीमध्ये सर्वेक्षणाबरोबरच संबंधित मतदारांमध्ये जनजागृती व प्रबोधन करण्यात आले. 
* सर्वेक्षणात एकूण 122 सहकार्‍यांचा सहभाग, स्थानिक नागरिकांचा सहभाग, संबंधित मतदान केंद्रावर सरासरी 2 ते 5 टक्के मतदारांकडून प्रश्‍नावलीतून माहिती घेण्यात आली. या दरम्यान 7395 मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला.
* या अहवालामध्ये विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाचे प्रमाण, झालेले मतदान, मतदान केंद्र तत्कालिन यादी, निवडणूक विषयक इतंभूत माहितीचे स्त्रोत व संदर्भ केंद्रीय निवडणूक आयोग संकेतस्थळ व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय व संबंधित सहकारी कर्मचारी अधिकारी वर्ग यांनी माहिती उपलब्ध करून दिलेल्या आधारावर सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच नमूद केलेली अनुषंगिक अधिकृत आकडेवारी निवडणूक कार्यालयातून घेण्यात आलेली आहे. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================





अल्प मतदान झालेल्या मतदान केंद्रातील मतदारांचे सर्वेक्षण व जनजागृती करून अल्प मतदानाच्या प्रमाणाची कारणे व उपाय योजनांचा अहवाल पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या वतीने पुणे शहर पोलीस आयुक्त मा. डॉ. के. वेंकटेशम यांना देताना अध्यक्ष चंद्रकांत भुजबळ

Tuesday, 9 April 2019

ब्रिटिश उच्च आयोगाचे अधिकारी निवडणुकीच्या निरीक्षणासाठी पुण्यात

ब्रिटिश उच्च आयोगाचे अधिकारी निवडणुकीच्या निरीक्षणासाठी पुण्यात
"पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)" संस्थेला भेट


लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीतील प्रचार व राजकीय सद्यस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी ब्रिटिश उच्च आयोगाचे दिल्ली कार्यालयातील अधिकारी Mr. Kieran Drake –Minister Counsellor, British High Commission in New Delhi आणि Mr. Sachin Nikarge, Political Advisor, British Deputy High Commission, Mumbai हे पुणे येथे दाखल झाले असून "पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)" संस्थेला भेट देऊन निवडणूक विषयक माहिती जाणून घेण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भुजबळ यांनी त्यांचे स्वागत करून महाराष्ट्रातील राजकीय सद्यस्थितीची माहिती व सर्वेक्षण अहवाल सुपूर्त केले.  Mr. Kieran Drake –Minister Counsellor, British High Commission in New Delhi यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ब्रिटिश उच्च आयोगातील अधिकारी पुणे येथे ९ आणि १० एप्रिल २०१९ या दोन दिवसांच्या दौऱ्यात शहर व जिल्ह्यात पाहणी करणार आहेत. तसेच मान्यवरांकडून माहिती जाणून घेणार आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकांचा अभ्यास व निरीक्षण करण्यासाठी "पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)" संस्थेने निमंत्रित केलेले होते. उमेदवारांच्या प्रचार रॅली, सभा, कशास्वरुपात असतात. तसेच उमेदवारांच्या भेटींचे देखील नियोजन संस्थेतर्फे करण्यात आलेले होते. मंगळवार दिनांक ९ एप्रिल २०१९ रोजी सकाळी मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे व पार्थ पवार यांच्या रॅलीतील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या सहभागाचे निरीक्षण नोंदवले. पुणे शहरातील मुख्य वर्तमानपत्रातील संपादकांशी भेटी घेऊन माहिती जाणून घेण्यात आली तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या भेटी आणि मुख्यमंत्री यांची प्रचार सभा व इतर उमेदवारांचे प्रचार उपक्रमांसह स्थिती जाणून घेणार आहेत. महाराष्ट्रातील राजकारण, लोकसभा निवडणुक, प्रचार पद्धत, निपक्ष निवडणूक प्रक्रिया, मतदारांचा मतदानातील सहभाग, राजकीय घडामोडी, राजकीय सद्यस्थिती याबाबत ते मान्यवरांशी सवांद साधून चर्चा करणार आहेत. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

निवडणूक काळात एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई

निवडणूक काळात एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई

लोकसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय मतदान होणाऱ्या मतदारसंघात मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे जनमत चाचण्याचे अंदाज (ओपीनिअन पोल) जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे. देशात सध्या लोकसभा निवडणुकांबरोबरच काही राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक तर काही ठिकाणी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी दि. 11 एप्रिल 2019 रोजी  सकाळी 7 ते शेवटच्या टप्प्यातील मतदानच्या दिवशी दि. 19 मे 2019 रोजी सायं. 6.30 वाजेपर्यंत या पूर्ण कालावधीत कोणत्याही प्रकारच्या मतदानोत्तर अंदाज चाचण्यांचे सर्वेक्षण करण्यास तसेच वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे अथवा अन्य  कोणत्याही प्रकारे त्यातील अंदाज (एक्झिट पोल) प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच संबंधित मतदारसंघांमध्ये मतदानाच्या समाप्तीच्या वेळेआधी 48 तास कोणत्याही जनमत चाचणीचे अंदाज (ओपिनिअन पोल) किंवा अन्य कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाचे अंदाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्ध करता येणार नाहीत, असेही भारत निवडणूक आयोगामार्फत सूचीत करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण

लोकसभा निवडणूक अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान दि. 11 एप्रिल 2019 रोजी होत असून त्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अतिदुर्गम भागातील 35 मतदान केंद्रांसाठी निवडणूक कर्मचारी आज रवाना करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली. पहिल्या टप्प्यात राज्यातील 7 लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. त्यामध्ये वर्धा मतदार संघात 14 उमेदवार निवडणूक लढवत असून रामटेक- 16, नागपूर – 30, भंडारा- गोंदिया – 14, गडचिरोली- चिमूर – 5, चंद्रपूर – 13 आणि यवतमाळ-वाशिम मतदार संघात 24 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सर्व मनुष्यबळाची नेमणूक तसेच पोलीस बंदोबस्त व अन्य सुरक्षा बलांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिदुर्गम भागात मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी व सुरक्षा यंत्रणेची ने-आण करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येणार आहे.राज्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत 97 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 30 कोटी रुपयांची रोकड, 17 कोटी रुपयांची दारु, 4.61 कोटी रुपयांचे मादक पदार्थ, 44 कोटी  रुपयांचे  सोने, चांदी व इतर मौल्यवान जवाहीर यांचा  समावेश आहे.आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठी उपलब्ध करुन दिलेल्या सी-व्हिजिलराज्यभरात नागरिक प्रभावी उपयोग करीत असून आतापर्यंत 2 हजार 527 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 1 हजार 497 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून चौकशीअंती आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली आहे. सी-व्हिजिल अनधिकृत दारू, मतदारांना आमिष म्हणून दारुचे वाटप, पैशाचा वापर, विनापरवानगी पोस्टर लावणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आदी स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

‘सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेचे प्रकाशन


महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘सायबर सुरक्षा’ पुस्तिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य सचिव अश्वनी कुमार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, संचालक (माहिती) सुरेश वांदिले, महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधिक्षक डॉ. बाळसिंग राजपूत आणि  सचिन पांडकर, उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड आदी उपस्थित होते.समाज माध्यमांवरील फेक न्यूजची पडताळणी करण्यासाठी मोलाच्या टिप्स दिल्या आहेत.  फेसबुकपोस्टच्या वर उजव्या बाजूच्या कोपऱ्यात ‘ही फेक न्यूज स्टोरी आहे’ हा पर्याय तर व्हॉटसअपवर अफवा अथवा माहिती खातरजमा करण्यासाठी ‘व्हॉटसअप चेकपॉईन्ट टीपलाईन’ वर पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  व्हॉटसअप वर निवडणुकीच्या संदर्भातील खोट्या बातम्या, अफवा, प्रक्षोभक मजकूर, चित्रांबद्दल सतर्क राहण्यासह त्याविषयी महत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या आहेत.निवडणूक प्रक्रिया राबविताना कोणत्या गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे हे स्पष्ट करतानाच भारत सरकारने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या ४२ यादी प्रसिद्ध केली आहे. निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजिलसह इतर अधिकृत , संकेतस्थळे तसेच तक्रारींसाठी महत्वाच्या नोडल्स संस्थांची माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. हॅक अथवा हायजॅक झालेल्या सोशल मीडिया खात्यांच्या बाबतीत महाराष्ट्र सायबरशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  ही पुस्तिका राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ‘महाराष्ट्र सायबर’ कार्यालयाने तयार केली आहे.
‘सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेतून निवडणूक प्रक्रियेसाठी उपयुक्त टिप्स !
लोकसभा निवडणूकीत आयोगासह उमेदवार, आणि विविध राजकीय पक्ष सायबर जगताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. निवडणूक विषयक माहितीची सुरक्षितता, संरक्षित पासवर्ड, ईमेल्स, समाज माध्यम वापरताना घ्यावयाची काळजी, फेक न्यूजसह खोडसाळ प्रचार मोहीम राबविण्यासाठी ‘स्पिअर फिशिंग स्कॅम्स’ करणाऱ्यांपासून बचावासाठी कोणत्या दक्षता घ्याव्यात याच्या सूचना ‘महाराष्ट्र सायबर’ कार्यालयाने ‘सायबर सुरक्षा’ या पुस्तिकेद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया अधिक सुटसुटीतपणे करण्यासाठी आयोगाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा, नव्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. उमेदवारांसह राजकीय पक्षांनीही समाज माध्यमांचा  वापर प्रचारासाठी सुरु केला आहे. समाज माध्यमांचा गैरवापर होऊ नये आणि निवडणूक प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित रहावी यासाठी ‘महाराष्ट्र सायबर’ ने पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदार संघातील निवडणूक यंत्रणेला मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि ऊर्दू या भाषेतून प्रकाशित केलेल्या ‘सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेतून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याचे महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.या पुस्तिकेत समाजमाध्यमांवरील बातम्या, ट्रोलिंग, प्रायोजित मजकूर याबाबतीत जनजागृती करण्याच्या सूचना, फेक आणि संकेतस्थळांबद्दल जागृती करण्याबरोबरच व्यक्तिगत आणि बाह्य उपकरणांच्या वापराविषयी दक्षता घेण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================




Friday, 5 April 2019

तिसऱ्या टप्प्यासाठी ३९३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल; पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी १४ हजार ९१९ मतदान केंद्र

तिसऱ्या टप्प्यासाठी ३९३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल


लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील तिसऱ्या टप्प्याअंतर्गत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी 14 मतदारसंघात 197 उमेदवारांनी तर आजपर्यंत एकूण 393 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. चौथ्या टप्प्यासाठी आज 16 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. तिसऱ्या टप्प्यात मतदारसंघनिहाय आज दाखल आणि कंसात आजपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. जळगाव मतदारसंघात आज 14 (आजपर्यंत 22 उमेदवार), रावेर-9 (16), जालना-18 (39), औरंगाबाद 16 (42), रायगड 15 (27), पुणे-34 (47), बारामती-18 (31), अहमदनगर- 19 (31), माढा-12 (41), सांगली-11 (21), सातारा 3 (12), रत्नागिरी-सिंधुदुर्ग-6 (13), कोल्हापूर 9 (26) आणि हातकणंगले मतदारसंघात आज 13 उमेदवारांनी तर आजपर्यंत 25 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. उद्या दि. 5 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील अर्जांची छाननी होणार असून 8 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे.  

चौथ्या टप्प्यासाठी आज 16 नामनिर्देशनपत्रे दाखल

चौथ्या टप्प्यात 17 मतदारसंघात आज 16 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली असून आतापर्यंत एकूण 25 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. मतदारसंघनिहाय आज दाखल आणि कंसात आजपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. दिंडोरी मतदारसंघात आज एक (1), नाशिक 1 (4), पालघर 2 (3), भिवंडी 1 (1), कल्याण 2 (2), ठाणे 1 (1), मुंबई उत्तर (1), मुंबई उत्तर-पूर्व 1 (1), मुंबई उत्तर-मध्य 1 (2), मुंबई दक्षिण-मध्य 1 (1), मुंबई दक्षिण 1 (3), मावळ 1 (1), शिरुर 2 (2), शिर्डी 1 (2). चौथ्या टप्प्यात 2 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया 9 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या टप्प्यातील अर्जांची छाननी 10 एप्रिल रोजी होणार असून 12 एप्रिलला अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.

पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी १४ हजार ९१९ मतदान केंद्र

44 हजार ईव्हीएम आणि 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात मतदारसंघांमध्ये दि. 11 एप्रिल रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी सुरु आहे.  पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण 116 उमेदवार आहेत. सात मतदारसंघात 14 हजार 919 मतदान केंद्र आहेत तर 1 कोटी 30 लाख 35 हजार मतदार आहेत. त्यामध्ये 66 लाख 71 हजार पुरुष तर 63 लाख 64 हजार महिला आणि 181 तृतीयपंथी मतदार आहेत. सुमारे 44 हजार ईव्हीएम यंत्र आणि 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत. सुमारे 73 हजार 837 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.राज्यात एकूण 4 टप्प्यात मतदान होणार असून वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघांमध्ये 11 एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. वाढते तापमान लक्षात घेता या मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी तसेच सावलीची व्यवस्था करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.मतदानासाठी लागणारे साहित्य जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गडचिरोली- चिमूर या नक्षलग्रस्त भागात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 अशी करण्यात आली आहे. वर्धा मतदारसंघात सुमारे 2 हजार 26 एवढे मतदान केंद्र असून 8 लाख 93  हजार पुरुष तर 8 लाख 48 हजार महिला मतदार आहेत. या मतदार संघात 17 लाख 41 हजार एकूण मतदार आहेत. रामटेक मतदार संघात 2 हजार 364 मतदान केंद्र असून 9 लाख 96 हजार पुरुष तर 9 लाख 24 हजार महिला असे एकूण 19 लाख 21 हजार मतदार आहेत. नागपूर मतदारसंघात 2 हजार 65 मतदान केंद्र आहेत. 10 लाख 96 हजार पुरुष तर 10 लाख 63 हजार महिला असे एकूण 21 लाख 60 हजार एकूण मतदार आहेत. भंडार-गोंदिया मतदारसंघात 2 हजार 184 मतदान केंद्र आहेत. 9 लाख 5 हजार पुरुष तर 9 लाख 3 हजार महिला असे एकूण 18 लाख 8 हजार मतदार आहेत.गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी 1 हजार 881 मतदान केंद्र असून 7 लाख 99 हजार पुरुष आणि 7 लाख 80 हजार महिला असे एकूण 15 लाख 80 हजार मतदार आहेत. चंद्रपूर मतदार संघामध्ये 2 हजार 193 मतदान केंद्र असून 9 लाख 86 हजार पुरुष आणि 9 लाख 22 हजार महिला असे एकूण 19 लाख 8 हजार मतदार आहेत. यवतमाळ-वाशिम मतदार संघामध्ये 2 हजार 206 मतदान केंद्र आहेत. 9 लाख 93 हजार पुरुष मतदार तर 9 लाख 21 हजार महिला असे एकूण 19 लाख 14 हजार मतदार आहेत. ज्या मतदारसंघात 15 पेक्षा जास्त उमेदवार आहेत, अशा मतदान केंद्रांवर 2 बॅलेट युनिट बसविण्यात येतात. त्यासोबत 1 कंट्रोल युनिट असते. पहिल्या टप्प्याकरिता 26 हजार बॅलेट युनिट आणि 18 हजार कंट्रोल युनिट देण्यात आले असून 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. बहुतांश सर्वच मतदान केंद्रांवर राखीव यंत्र देण्यात आली आहेत.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================






Parties in state pick just 15 women for polls to 48 seats

Baramati An Exception In The District

The Times of India Pune Edition Dt-5 April 2019
Pune: Nisha.Nambiar@timesgroup.com 


Political parties have betrayed their inability to bridge the gender divide in the poll arena by fielding just 15 women candidates for the elections to the 48 Lok Sabha constituencies in the state.
According to the nominations filed by party candidates, in the Pune district, only Baramati will see two women contestants face off, while Maval, Pune and Shirur will have men take on each other. There might be some women who join the fray as Independents.
The image does not improve at the state level. While the BJP has nominated seven women, the Congress has fielded four. Their respective allies — the Shiv Sena and the NCP — have put up just one name each. The Vanchit Bahujan Aghadi (VBA), meanwhile, has named three women.
The number of woman voters has gone up, but political parties still seem hesitant to allot tickets to women. Though the parties claim that a candidate is chosen based only on “experience and merit” and not gender, research experts feel the lack of 33% reservation in parliamentary elections is reflected in women’s share in party tickets.
Political research expert Chandrakant Bhujbal, from the Political Research and Analysis Bureau, siad the parties are hesitant to field women candidates, especially new ones, as the constituencies are huge and “winnability” is paramount. “There is no mandate on the parties, as the proposal of 33% reservation for women in parliamentary elections is yet to be passed by the Rajya Sabha,” he said.
“Women do a lot of good work at the grassroots level, and if entrusted with the responsibility, they will do well in parliamentary polls,” said another political observer.
Neelam Gorhe, the convenor, MLC and spokesperson of the Shiv Sena, added, “If we are able to create mass base representation for women in politics, either in a political or individual capacity, there would be more meaningful representation of women in LS and assembly polls. Otherwise, it will be reduced to tokenism.”
A senior woman candidate, in an interview, had said that many women also opt out of the race fearing attacks on their personal lives.
A party worker, meanwhile, said, “Only the women candidates who won the past elections, and stand to win again, are selected by the party.”
However, there have been incidences of parties deciding to not let a woman contest even after she has filed her nomination — as seen in the case of BJP’s Smita Wagh in Jalgaon. Though Wagh was named the Jalgaon candidate in an earlier list, on Thursday, the BJP replaced her candidature with its Chalisgaon MLA Unmesh Patil’s. Party sources explained the choice was altered based on the chances of a win against NCP’s Gulabrao Patil.
A party loyalist, who too was an aspirant, said politics has always been male-dominated and added, “The names are ultimately decided by senior male party members.”
Family lineage also matters. NCP chief Sharad Pawar’s daughter Supriya Sule is contesting from Baramati. Also in the fray are Pritam Munde, daughter of Gopinath Munde; Poonam Mahajan, Pramod Mahajan’s daughter; Heena Gavit, Vijaykumar Gavit’s daughter, and Priya Dutt, Sunil Dutt’s daughter. Smita Wagh is Jalgaon district president’s Uday Wagh’s wife.
==================================================================

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)