Monday, 15 April 2019

सलग ३ दशकांपासून करतोय मतदान जनजागृती

ध्येयवेडा सलग ३ दशकांपासून करतोय मतदान जनजागृती


पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी गावचे रहिवासी बापूराव गुंड हे स्वखर्चाने राज्यभर बाईक प्रवास करून मतदान जागृतीचा संदेश देत आहेत. गेली ३५ वर्षे हा अवलिया स्वत:च्या खर्चातून लोकांमध्ये मतदानाबद्दलची जनजागृती करताना दिसत आहे. पुण्यातील फुरसुंगीपासून या अवलियाने ३५ वर्षापूर्वी बाईकवरून हा मतदान जागृतीचा प्रवास सुरू केला आहे. पूर्ण राज्यात मतदार जागृती करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. बाईकवरही मतदान जागृतीचे संदेश जागोजागी लिहिलेले दिसतात. गेल्या ३५ वर्षांपासून बापूराव यांनी मतदान जागृतीच्या या आगळ्या वेगळ्या मोहिमेतील खर्च स्वत:च केला आहे. बापूराव हे पेशाने कापड विक्रेते आहेत. निवडणुकांमध्ये मतदानाचा घसलेला टक्का त्यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी ही मोहीम सुरु केली. सरकार निवडीच्या प्रक्रियेत सर्वांनीच सहभागी व्हायला हवे, असं त्यांना वाटतं. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा तसेच लोकसभा या सर्वच निवडणुकांच्या काळात मतदानासाठी जागृती करण्याच्या हेतून बापूराव आपली दुचाकी घेऊन छोटे छोटे दौरे कररीत आहेत. ‘कुणाच्याही आमिषाला बळी न पडता मतदान करा, चोख कर्तव्य पार पाडा, प्रत्येक निवडणुकीत ६० ते ७० टक्के मतदान होते. बाकीचे ४० टक्के लोक मतदान करत नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये मतदानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी मी ३५ वर्षांपासून असा पोषाख घालून प्रचार करतो आहे असे बापूराव गुंड यांनी म्हंटले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.