Tuesday 2 April 2019

राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये 28 एप्रिलपर्यंत राबविणार अभियान

पुणे जिल्ह्यातील कमी मतदान झालेला मतदान केंद्रावर सर्वेक्षण व जागृती अभियान

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या वतीने अभियानात सहभाग


पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या वतीने अभियानात सहभाग घेतला असून पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये ज्या मतदान केंद्रावर अल्प मतदान झालेले आहे त्या कारणांचा शोध घेणे, मतदारांची उदासीनता सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेणे आदि. तसेच अशा केंद्रावरील मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी उपाय योजना राबविणे आणि मतदारांमध्ये जागृती करण्याचे कार्य संस्थेच्या वतीने या अभियानाद्वारे करण्यात येत आहे. 
लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदार जागृतीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जात आहेत. त्याअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘महा मतदार जागृती अभियाना’चा प्रारंभ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांच्या हस्ते आज झाला. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत क्षेत्रीय बाह्य प्रचार कार्यालय, महाराष्ट्र व गोवा यांच्यातर्फे (रिजनल आऊटरीच ब्युरो) हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ब्युरो ऑफ आऊटरीच अॅण्ड कम्युनिकेशन, नवी दिल्लीचे महासंचालक सत्येंद्र प्रकाश, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक आर. एन. मिश्रा, रिजनल आऊटरीच ब्युरोचे अतिरिक्त महासंचालक डी. जे. नारायण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ श्री. कुमार यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी श्री. कुमार यांच्या हस्ते मतदार जागृती अभियान वाहनाला झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. हवेमध्ये फुगे सोडून मतदार जागृती अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचा संदेश दिला गेला.संगीत आणि नाट्य विभागातर्फे (साँग अँड ड्रामा डि‍व्हिजन) मतदान जनजागृतीसाठी ‘एक पाऊल लोकशाहीचे’  हे पथनाट्य आणि लोकसंगीत कायक्रमाचे आयोजनही यावेळी  करण्यात आले.मुंबई दक्षिण, पुणे, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, जळगाव, धुळे आणि कल्याण मतदारसंघामध्ये दि. 2 ते 28 एप्रिल, 2019 या दरम्यान हे अभियान राबविण्यात येणार आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान जनजागृतीचा शुभारंभ

मतदारांना जागृत करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राज्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आऊटरिच ब्यूरोव्दारे महा मतदार जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नवी दिल्लीचे ब्यूरो ऑफ आऊटरीच कम्यूनिकेशनचे महासंचालक सत्येंद्र प्रकाश यांनी दिली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जनजागृती मोहिमेंतर्गत फिरते चित्रवाहन व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पत्र सूचना कार्यालय व रिजनल आऊटरिच ब्यूरोचे अतिरिक्त महासंचालक डी.जे.नारायण, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग, पुणे रिजनल आऊटरिच ब्यूरोचे  संचालक संतोष अजमेरा, स्वीपचे समन्वयक सुभाष बोरकर, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक महेश अय्यंगार, सहाय्यक संचालक भारत देवमनी, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, व्यवस्थापक जितेंद्र पानपाटील, प्रशासकीय अधिकारी सुनिल डहाके आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हमणाले की, पुणे जिल्हयात स्वीप उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती काम नियोजनबध्द पध्दतीने चालू असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ७० टक्याहून अधिक मतदान व्हावे यासाठी विविध माध्यमाचा वापर केला जात आहे असे सांगून रिजनल आऊटरिज ब्यूरो व्दारे हाती घेण्यात आलेल्या मोहिमेव्दारे मतदानाची टक्केवारी वाढवण्यास नक्कीच मदत हाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.या कार्यक्रमाचा शुभारंभ महासंचालक सत्येंद्र प्रकाश व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी फित कापून व हवेत फुगे सोडून केला. राज्यातील जिल्हयांमध्ये या जनजागृती मोहिमेस प्रारंभ झाला असून सांस्कृतिक कार्यक्रम, नाटीका, संगीत अशा वेगवेगळया कार्यक्रमांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राज्यात मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ; ९७ हजार ६४० केंद्रांवर होणार आता मतदान

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात नव्याने दोन हजारांहून अधिक मतदान केंद्र वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात एकूण 97 हजार 640 मतदान केंद्र असणार आहेत.नाशिकमध्ये 274 वाढीव मतदान केंद्र, पुण्यामध्ये 237 आणि ठाण्यामध्ये 227 वाढीव मतदान केंद्र असणार आहेत. मात्र सिंधुदुर्गमध्ये एकही वाढीव मतदान केंद्र नसेल.साधारणपणे 1 हजार 400 मतदारांमागे 1 मतदान केंद्र असण्याचे प्रमाण आहे. गेल्या काही दिवसात मतदारांना नाव नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. यामध्ये मतदारांची वाढ झाल्याचे दिसून आल्याने मतदान केंद्रांचीही वाढ करण्यात आली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी यापूर्वी 95 हजार 473 मतदान केंद्र स्थापन करण्याचे नियोजन होते. आता मात्र मतदारांची संख्या वाढली असल्याने नव्याने 2 हजार 167 मतदान केंद्र राज्यभरात वाढविण्यात आली आहेत. याचाच अर्थ आता एकूण 97 हजार 640 मतदान केंद्र असणार आहेत.2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64 हजार 508 मतदार केंद्र होती. तर 2009 मध्ये  एकूण 83 हजार 986 मतदार केंद्र स्थापन करण्यात आली. 2014 मध्ये एकूण 91 हजार 329 मतदार केंद्र स्थापन करण्यात आली. यंदाच्या निवडणुकीमध्ये 97 हजार 640 मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिद्धी,संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो.  मतदार केंद्रांची 'संवेदनशीलता' बघून त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येते.केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 15 प्रकारच्या मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

राज्यात सी-व्हिजिल अॅपवर १ हजार ८६२ तक्रारी दाखल;75.79 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

राज्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करता यावी आणि नागरिकांनादेखील या संदर्भात तक्रारी दाखल करण्यात याव्यात या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल (cVIGIL) हे मोबाईल अॅप उपलब्ध करुन दिले आहे. या अॅपवर आतापर्यंत एकूण 1 हजार 862 तक्रारी नागरिकांकडून दाखल करण्यात आल्या आहेत. या संदर्भात जिल्हास्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांनी दिली. निवडणुकीमध्ये मतदारांना निर्भय व मुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याअंतर्गत पोलीस, आयकर, अबकारी विभाग इत्यादी विभागांमार्फत निगराणी ठेवण्यात येत आहे. या विभागांनी आतापर्यंत 19.82 कोटी रुपये इतकी रोख रक्कम, 38.36 कोटी रुपये इतक्या किमतीचे सोने व इतर जवाहिर, 13.64 कोटी रुपये इतक्या किमतीची दारु, 3.96 कोटी रुपये इतक्या किमतीचे मादक पदार्थ याप्रमाणे एकूण 75.79 कोटी रुपये इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. निवडणुकीचे काम आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आणि संबंधित कायदा व नियमांनुसार पार पाडण्यात येत आहे, हे पाहण्याकरिता आयोगाकडून प्रत्येक लोकसभा मतदार संघाकरिता विविध निरीक्षक  नेमण्यात येत आहेत, अशीही माहिती श्री. मोहोड यांनी दिली. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सात मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून यात वर्धा मतदारसंघात 14, रामटेकमध्ये 16, नागपूरमध्ये 30, भंडारा-गोंदिया मध्ये 14, गडचिरोली-चिमूरमध्ये 5, चंद्रपूरमध्ये 13 तर यवतमाळ-वाशिममध्ये 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================







No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.