भाजपच्या बालेकिल्यात कसबापेठ, कोथरूडमध्ये सर्वाधिक मतदान
बारामती लोकसभा मतदारसंघातील तुलनेत खडकवासला मध्ये सर्वाधिक कमी मतदान
पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा निवडणूक आयोगाने मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली. त्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा 49.84 टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर तर बारामती लोकसभा मतदारसंघात 61.54 मतदान झाल्याचे स्पष्ट केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 61.54 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. पुणे लोकसभा मतदारसंघात 49.84 टक्के मतदान झाले असून मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभानिहाय मतदान झाले यामध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात 46.41 टक्के तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात 46.94 टक्के आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघात 50.26 टक्के व पर्वती विधानसभा मतदारसंघात 52.07 टक्के तसेच पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात 48.79 टक्के आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 55.88 टक्के झाले आहे. सर्वाधिक मतदान कसबापेठ मतदारसंघात झाले असून वडगाव शेरी व शिवाजीनगर मतदारसंघात कमी मतदान झाले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात 20 लाख 75 हजार 39 मतदार त्यापैकी दहा लाख 34 हजार 154 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पुणे लोकसभा मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीत 54.14 टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यात चुरशीची लढत झाली. पुणे लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी 23 एप्रिलला मतदान झाले. मतदानाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत मतदानाची आकडेवारी एकत्रित करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू होते. जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी काल 52 टक्के जवळपास मतदान झाल्याची माहिती दिली होती. परंतु ही अंतिम आकडेवारी नसल्याचे स्पष्ट केले होते. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा प्रशासनाने मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली. त्यात वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात 46.41 टक्के, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात 46.94 टक्के, कोथरूड विधानसभा मतदारसंघात 50.26 टक्के, पर्वती विधानसभा मतदारसंघात 52.07 टक्के, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात 48.79 टक्के आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 55.88 टक्के मतदान झाले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात 20 लाख 75 हजार 39 मतदार आहेत. त्यापैकी दहा लाख 34 हजार 154 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. वडगाव शेरी आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन लाखाहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे बालेकिल्ला समजले जाणारे कसबापेठ आणि कोथरूड मतदारसंघात अनुक्रमे 55.88 टक्के आणि 50.26 मतदान इतर विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत सर्वाधिक झालेले आहे.
खडकवासला मध्ये सर्वाधिक कमी मतदान
बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 61.54 मतदानदौंड विधानसभा मतदारसंघात एकूण 64.05 टक्के मतदान झालेले आहे तर बारामती विधानसभा मतदारसंघात तुलनेने सर्वाधिक एकूण 70.24 टक्के मतदान झाले असून सर्वाधिक कमी मतदान खडकवासला विधानसभा मतदारसंघात एकूण 53.20 टक्के मतदान झालेले आहे. तर इंदापूर विधानसभा मतदारसंघात एकूण 64.39 टक्के मतदान झालेले आहे. तसेच पुरंदर विधानसभा मतदारसंघात एकूण 60.48 टक्के मतदान झालेले आहे.भोर विधानसभा मतदारसंघात एकूण 60.84 टक्के मतदान झालेले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 61.54 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.