भाजपला पुण्यासह १८ मतदारसंघात फटका
महाआघाडी व युतीला अनुक्रमे ३१ आणि ३२ मतदारसंघात फटका
इव्हीएम मतदान यंत्रावरील बॅलेट पेपरवर हत्तीने प्रथमच सर्वाधिक जागांवर पहिले स्थान पटकावले आहे. राजकीयदृष्ट्या बॅलेट पेपरवर अग्रक्रमातील पसंतीला फार महत्व आहे. बसपच्या धूर्तपणाचा फटका भाजपला बसला असून त्याचे परिणाम येत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून दिसून येतील. बॅलेट पेपरवर प्राधान्यक्रम असल्यावर मतदारांची क्षणिक विचार करून मत देण्याची मानसिकता असते तर इतरत्र पसंतीच्या उमेदवाराचा शोध घेण्यास मतदार त्या परिस्थितीत फारसा रस दर्शवित नसतात असे आज पर्यंतच्या बॅलेट पेपरवरील प्राधान्यक्रम वरून दिसून आलेले आहे. बसपच्या धूर्तपणाचा फटका भाजपला पुण्यासह १८ मतदारसंघात बसला आहे तर महाआघाडी व युतीला अनुक्रमे ३१ आणि ३२ मतदारसंघात फटका बसला आहे. प्रत्यक्षात बसपला किती मतदानात फायदा होणार हे निकालावरून स्पष्ट होईलच. पुणे मावळसह १९ लोकसभा मतदारसंघात इव्हीएम मतदान यंत्रावरील बॅलेट पेपरवर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांना प्रथम क्रमांकावर स्थान मिळाले आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील ५ मतदारसंघात बहुजन समाज पार्टीने उमेदवार दिलेले नाहीत तर उर्वरीत सर्व 43 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. 43 लोकसभा मतदारसंघापैकी १९ ठिकाणी पहिल्या तर ९ मतदारसंघात दुसरया स्थानावर इव्हीएम मतदान यंत्रावरील बॅलेट पेपरवर बसप उमेदवार आहेत तर १३ ठिकाणी तिसऱ्या व २ ठिकाणी 4 थ्या स्थानावर बसपने जागा मिळवली आहे. बसप राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांना निवडणूक चिन्ह वाटप व अग्रक्रमात इतर राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांबरोबर नावाप्रमाणे पहिले स्थान मिळाले आहे. बहुतांश ठिकाणी उमेदवारी देताना इतर राजकीय पक्षांचे संभाव्य उमेदवारांची नावे गृहीत धरून अग्रक्रम येईल अशा नावाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. यामागील निवडणुकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बॅलेट पेपरवर पहिल्या स्थानावर उमेदवार नव्हते. इतर पक्षांच्या चाणक्यांना देखील बसपाच्या युक्तीने दणका दिला असल्याचे दिसून येत आहे. इतर राजकीय पक्षांचा विचार केल्यास प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना पहिल्या ३ मध्ये समावेश आहे त्यांचा तपशील दर्शविणारा तक्ता खालीलप्रमाणे-पुणे मावळसह १९ लोकसभा मतदारसंघात इव्हीएम मतदान यंत्रावरील बॅलेट पेपरवर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांना प्रथम क्रमांकावर स्थान मिळाले आहे. यामध्ये पुणे, मावळ, धुळे, बुलढाणा, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, दिंडोरी (अ.ज.), नाशिक, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या १९ मतदारसंघांचा समावेश आहे. या १७ मतदारसंघात इतर प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना चांगला फटका बसला आहे. बसपाच्या उमेदवारांमुळे काँग्रेस उमेदवारांना ७ ठिकाणी फटका बसला असून २ मतदारसंघात ३ रया स्थानावर जावे लागले आहे तर राष्ट्रवादीला ३ मतदारसंघात दुसरे स्थान तर ५ मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर जावे लागले आहे. तर भाजपला ५ ठीकाणी फटका बसला असून ३ ठिकाणी तिसऱ्या आणि दिंडोरी मतदारसंघात 4 थ्या स्थानावर जावे लागले आहे. शिवसेनेला ३ मतदारसंघात दुसरे स्थान मिळाले असून ७ ठीकाणी ३ रया स्थानावर जावे लागले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तर विद्यमान खासदारांना बॅलेट पेपरवर ७ क्रमाकावर स्थान मिळाले आहे. बसप दुसरया स्थानावर असलेले मतदारसंघ - नंदुरबार (अ.ज.), अमरावती (अ.जा.), भंडारा-गोंदिया,औरंगाबाद, पालघर (अ.ज.), कल्याण, दक्षिण मुंबई, बारामती, लातूर (अ.जा.). तर इव्हीएम मतदान यंत्रावरील बॅलेट पेपरवर तिसऱ्या स्थानावर जळगाव, रावेर, रामटेक (अ.जा.), नागपूर, गडचिरोली-चिमूर (अ.ज.), चंद्रपूर, जालना, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, रायगड, शिरुर, उस्मानाबाद या मतदारसंघांचा समावेश आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
राजकीय पक्षांना एक सारखीच निवडणूक चिन्ह कशी?
निवडणुका लढणाऱ्या प्रत्येक पक्षाला भारतीय निवडणूक आयोगामार्फत चिन्हांच वाटप केलं जाते. सामान्यत: प्रत्येक पक्षाचं निवडणूक चिन्ह वेगवेगळं असते. पण जेव्हा आपण समाजवादी पार्टी आणि तेलगु देसम पार्टीचं चिन्ह पाहतो तेव्हा मात्र आपण बुचकळ्यात पडतो. कारण दोहोंच निवडणूक चिन्ह एकच आहे ते म्हणजे ‘सायकल’! सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दोन्ही पक्ष हे देशातील जरी दोन मातब्बर पक्ष असले तरी ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये सक्रीय आहेत. समाजवादी पार्टीचे उत्तर भारत आणि कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अस्तित्व आहे. तर तेलगु देसम पार्टीचे आंध्रप्रदेश आणि तेलंगणा मध्ये अस्तित्व आहे. हे दोन्ही पक्ष ज्या ज्या प्रदेशांमध्ये त्यांचे अस्तित्व आहे तेथेच निवडणुका लढवतात. त्यामुळे हे दोन्ही पक्ष कधीही एकमेकांसमोर उभे ठाकलेले नाहीत. याच कारणामुळे दोन्ही पक्षांना एकाच निवडणूक चिन्हाचा त्रास कधीच सहन करावा लागत नाही. तेलगु देसम पार्टीने आंध्रप्रदेशामधील एखाद्या मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी आपला उमेदवार उभा केला असेल आणि त्याच मतदारसंघात समाजवादी पार्टीने देखील आपला उमेदवार उभा केला तर मात्र निवडणूक आयोग समाजवादी पार्टीला सायकल हे निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी देणार नाही, कारण तेलगु देसम पार्टी हा आंध्रप्रदेशातील प्रादेशिक पक्ष आहे आणि म्हणून बाहेरून आलेल्या समजवादी पार्टीपेक्षा त्यांचे बलस्थान त्या प्रदेशामध्ये वरचढ आहे. त्याचप्रकारे जर तेलगु देसम पार्टीला जर समाजवादी पार्टीचे ज्या प्रदेशामध्ये बलस्थान वरचढ आहे त्या प्रदेशातील मतदारसंघात आपला उमेदवार उभा करायचा झाल्यास त्यांना सायकल चिन्ह वापरण्याची परवानगी निवडणूक आयोगामार्फत मिळणार नाही. जम्मू आणि काश्मीर मधील नॅशनल पँथर्स पार्टी आणि मणिपूर मधील मणिपूर पीपल्स पार्टी आणि केरळमधील केरळ कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचे निवडणूक चिन्ह देखील ‘सायकल’ होते. परंतु आता दोन्ही पक्ष स्वतंत्ररित्या सक्रीय नाहीत.एवढेच नाही तर भारतातील अजून ६ राजकीय पक्ष विविध राज्यात ३ समान निवडणूक चिन्हांसह अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि झारखंड मधील शिबू सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा या दोन्ही पक्षांचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ आहे. मायावतींची बहुजन समाज पार्टी आणि आसाम मधील असोम गाना परिषद या दोन्ही पक्षांचे चिन्ह ‘हत्ती’ आहे. केरळ मधील केरळ कॉंग्रेस एम (प्रादेशिक पक्ष) आणि दिवंगत नेत्या जयललिता यांचा ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्रा काझागम (एआयएडीएमके) या दोन्ही पक्षांचे चिन्ह ‘झाडाची दोन पाने’ आहेत.
=========================================
loksabha 2019 BSP LIST
अ.क्र.
|
मतदारसंघ
नाव
|
बॅलेट पेपर स्थान
|
लोकसभा
निवडणूक
उमेदवाराचे नाव
|
1
|
1-
NANDURBAR
|
2
|
Rekha
Suresh Desai
|
2
|
2- Dhule
|
1
|
Aparanti
Sanjay Yashwant
|
3
|
3-Jalgaon
(GEN)
|
3
|
Rahul
Narayan Bansode
|
4
|
4-Raver
(GEN)
|
3
|
Dr.
Yogendra Vitthal Kolte
|
5
|
5 -
Bhuldhana
|
1
|
Abdul
Hafeez Abdul Ajij
|
6
|
6 - Akola
|
1
|
Bhai
B.C.Kamble
|
7
|
7 -
Amravati (SC)
|
2
|
Arun
Motiramji Wankhede
|
8
|
8- SHIRDI
|
4
|
Suresh
Eknath Jagdhane
|
9
|
9 - Ramtek
(SC)
|
3
|
Subhash
Dharmdas Gajbhiye
|
10
|
10 -
Nagpur
|
3
|
Mohammad
Jamal
|
11
|
11 -
Bhandara-Gondiya
|
2
|
Dr. Vijaya
Rajesh Nandurkar
|
12
|
11 -
Bhandara-Gondiya
|
3
|
Harichandra
Nagoji Mangam
|
13
|
11 -
Bhandara-Gondiya
|
3
|
Shushil
Segoji Wasnik
|
14
|
14 -
Yavatmal-Washim
|
1
|
Arun
Sakharam Kinwatkar
|
15
|
15 -
Hingoli
|
1
|
Dr. Dhanve
Datta Maroti
|
16
|
17 -
Parbhani
|
4
|
Dr.
Vaijnath Sitaram Phad
|
17
|
18-Jalna
(GEN)
|
3
|
Mahendra
Kachru Sonavane
|
18
|
19-Aurangabad
(GEN)
|
2
|
Jaya Balu
Rajkundal
|
19
|
20-DINDORI
|
1
|
Ashok
Tryambak Jadhav [SirD
|
20
|
21-Nashik
|
1
|
Adv. Ahire
Vaibhav Shantaram
|
21
|
22-PALGHAR
|
2
|
Sanjay
Laxman Tambda
|
22
|
24-KALYAN
|
2
|
Ravindra
[PintuDKene
|
23
|
25-THANE
|
3
|
Rajeshchanna
Baijnath Jaiswar
|
24
|
26-MUMBAI
NORTH
|
3
|
Manojkumar
Jayprakash Singh
|
25
|
28-
MUMBAI NORTH EAST
|
3
|
Sanjay
Chandrabahadur Singh (Kunwar)
|
26
|
29- MUMBAI
NORTH CENTRAL
|
1
|
Imran
Mustafa Khan
|
27
|
30- MUMBAI
SOUTH CENTRAL
|
1
|
Ahmed
Shakil Sagir Ahmed Shaikh
|
28
|
32-Raigad
(GEN)
|
3
|
Milind B.
Salvi
|
29
|
33- MAVAL
|
1
|
Adv.
Kanade Sanjay Kisan
|
30
|
34-Pune
(GEN)
|
1
|
Uttam
Pandurang Shinde
|
31
|
35-Baramati
(GEN)
|
2
|
Adv.Mangesh
Nilkanth Vanshiv
|
32
|
37-Ahmednagar
(GEN)
|
1
|
Wakale
Namdeo Arjun
|
33
|
36-SHIRUR
|
3
|
Kagadi
Jamirkhan Afjal
|
34
|
40-Osmanabad
|
3
|
Dr.
Shivaji Pandharinath Oman
|
35
|
41. Latur
(SC)
|
2
|
Dr.
Siddharthkumar Digamberrao Suryawanshi
|
36
|
43-Madha
|
1
|
Aappa Aaba
Lokare
|
37
|
44-Sangli
|
1
|
Shankar
(dada) Mane
|
38
|
45-Satara
|
1
|
Ananda
Ramesh Thorawade
|
39
|
46-Ratnagiri-Sindhudurg
|
1
|
Kishor
Sidu Varak
|
40
|
47-Kolhapur
|
1
|
Dundappa
Kundappa Shrikant Sir
|
41
|
48-Hatkanangle
|
1
|
Ajay
Prakash Kurane
|
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.