Tuesday, 9 April 2019

निवडणूक काळात एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई

निवडणूक काळात एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई

लोकसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय मतदान होणाऱ्या मतदारसंघात मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे जनमत चाचण्याचे अंदाज (ओपीनिअन पोल) जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे. देशात सध्या लोकसभा निवडणुकांबरोबरच काही राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक तर काही ठिकाणी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी दि. 11 एप्रिल 2019 रोजी  सकाळी 7 ते शेवटच्या टप्प्यातील मतदानच्या दिवशी दि. 19 मे 2019 रोजी सायं. 6.30 वाजेपर्यंत या पूर्ण कालावधीत कोणत्याही प्रकारच्या मतदानोत्तर अंदाज चाचण्यांचे सर्वेक्षण करण्यास तसेच वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे अथवा अन्य  कोणत्याही प्रकारे त्यातील अंदाज (एक्झिट पोल) प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच संबंधित मतदारसंघांमध्ये मतदानाच्या समाप्तीच्या वेळेआधी 48 तास कोणत्याही जनमत चाचणीचे अंदाज (ओपिनिअन पोल) किंवा अन्य कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाचे अंदाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्ध करता येणार नाहीत, असेही भारत निवडणूक आयोगामार्फत सूचीत करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण

लोकसभा निवडणूक अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान दि. 11 एप्रिल 2019 रोजी होत असून त्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अतिदुर्गम भागातील 35 मतदान केंद्रांसाठी निवडणूक कर्मचारी आज रवाना करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली. पहिल्या टप्प्यात राज्यातील 7 लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. त्यामध्ये वर्धा मतदार संघात 14 उमेदवार निवडणूक लढवत असून रामटेक- 16, नागपूर – 30, भंडारा- गोंदिया – 14, गडचिरोली- चिमूर – 5, चंद्रपूर – 13 आणि यवतमाळ-वाशिम मतदार संघात 24 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सर्व मनुष्यबळाची नेमणूक तसेच पोलीस बंदोबस्त व अन्य सुरक्षा बलांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिदुर्गम भागात मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी व सुरक्षा यंत्रणेची ने-आण करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येणार आहे.राज्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत 97 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 30 कोटी रुपयांची रोकड, 17 कोटी रुपयांची दारु, 4.61 कोटी रुपयांचे मादक पदार्थ, 44 कोटी  रुपयांचे  सोने, चांदी व इतर मौल्यवान जवाहीर यांचा  समावेश आहे.आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठी उपलब्ध करुन दिलेल्या सी-व्हिजिलराज्यभरात नागरिक प्रभावी उपयोग करीत असून आतापर्यंत 2 हजार 527 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 1 हजार 497 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून चौकशीअंती आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली आहे. सी-व्हिजिल अनधिकृत दारू, मतदारांना आमिष म्हणून दारुचे वाटप, पैशाचा वापर, विनापरवानगी पोस्टर लावणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आदी स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

‘सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेचे प्रकाशन


महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘सायबर सुरक्षा’ पुस्तिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य सचिव अश्वनी कुमार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, संचालक (माहिती) सुरेश वांदिले, महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधिक्षक डॉ. बाळसिंग राजपूत आणि  सचिन पांडकर, उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड आदी उपस्थित होते.समाज माध्यमांवरील फेक न्यूजची पडताळणी करण्यासाठी मोलाच्या टिप्स दिल्या आहेत.  फेसबुकपोस्टच्या वर उजव्या बाजूच्या कोपऱ्यात ‘ही फेक न्यूज स्टोरी आहे’ हा पर्याय तर व्हॉटसअपवर अफवा अथवा माहिती खातरजमा करण्यासाठी ‘व्हॉटसअप चेकपॉईन्ट टीपलाईन’ वर पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  व्हॉटसअप वर निवडणुकीच्या संदर्भातील खोट्या बातम्या, अफवा, प्रक्षोभक मजकूर, चित्रांबद्दल सतर्क राहण्यासह त्याविषयी महत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या आहेत.निवडणूक प्रक्रिया राबविताना कोणत्या गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे हे स्पष्ट करतानाच भारत सरकारने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या ४२ यादी प्रसिद्ध केली आहे. निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजिलसह इतर अधिकृत , संकेतस्थळे तसेच तक्रारींसाठी महत्वाच्या नोडल्स संस्थांची माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. हॅक अथवा हायजॅक झालेल्या सोशल मीडिया खात्यांच्या बाबतीत महाराष्ट्र सायबरशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  ही पुस्तिका राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ‘महाराष्ट्र सायबर’ कार्यालयाने तयार केली आहे.
‘सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेतून निवडणूक प्रक्रियेसाठी उपयुक्त टिप्स !
लोकसभा निवडणूकीत आयोगासह उमेदवार, आणि विविध राजकीय पक्ष सायबर जगताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. निवडणूक विषयक माहितीची सुरक्षितता, संरक्षित पासवर्ड, ईमेल्स, समाज माध्यम वापरताना घ्यावयाची काळजी, फेक न्यूजसह खोडसाळ प्रचार मोहीम राबविण्यासाठी ‘स्पिअर फिशिंग स्कॅम्स’ करणाऱ्यांपासून बचावासाठी कोणत्या दक्षता घ्याव्यात याच्या सूचना ‘महाराष्ट्र सायबर’ कार्यालयाने ‘सायबर सुरक्षा’ या पुस्तिकेद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया अधिक सुटसुटीतपणे करण्यासाठी आयोगाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा, नव्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. उमेदवारांसह राजकीय पक्षांनीही समाज माध्यमांचा  वापर प्रचारासाठी सुरु केला आहे. समाज माध्यमांचा गैरवापर होऊ नये आणि निवडणूक प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित रहावी यासाठी ‘महाराष्ट्र सायबर’ ने पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदार संघातील निवडणूक यंत्रणेला मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि ऊर्दू या भाषेतून प्रकाशित केलेल्या ‘सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेतून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याचे महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.या पुस्तिकेत समाजमाध्यमांवरील बातम्या, ट्रोलिंग, प्रायोजित मजकूर याबाबतीत जनजागृती करण्याच्या सूचना, फेक आणि संकेतस्थळांबद्दल जागृती करण्याबरोबरच व्यक्तिगत आणि बाह्य उपकरणांच्या वापराविषयी दक्षता घेण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.