Tuesday 9 April 2019

ब्रिटिश उच्च आयोगाचे अधिकारी निवडणुकीच्या निरीक्षणासाठी पुण्यात

ब्रिटिश उच्च आयोगाचे अधिकारी निवडणुकीच्या निरीक्षणासाठी पुण्यात
"पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)" संस्थेला भेट


लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीतील प्रचार व राजकीय सद्यस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी ब्रिटिश उच्च आयोगाचे दिल्ली कार्यालयातील अधिकारी Mr. Kieran Drake –Minister Counsellor, British High Commission in New Delhi आणि Mr. Sachin Nikarge, Political Advisor, British Deputy High Commission, Mumbai हे पुणे येथे दाखल झाले असून "पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)" संस्थेला भेट देऊन निवडणूक विषयक माहिती जाणून घेण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भुजबळ यांनी त्यांचे स्वागत करून महाराष्ट्रातील राजकीय सद्यस्थितीची माहिती व सर्वेक्षण अहवाल सुपूर्त केले.  Mr. Kieran Drake –Minister Counsellor, British High Commission in New Delhi यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ब्रिटिश उच्च आयोगातील अधिकारी पुणे येथे ९ आणि १० एप्रिल २०१९ या दोन दिवसांच्या दौऱ्यात शहर व जिल्ह्यात पाहणी करणार आहेत. तसेच मान्यवरांकडून माहिती जाणून घेणार आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकांचा अभ्यास व निरीक्षण करण्यासाठी "पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)" संस्थेने निमंत्रित केलेले होते. उमेदवारांच्या प्रचार रॅली, सभा, कशास्वरुपात असतात. तसेच उमेदवारांच्या भेटींचे देखील नियोजन संस्थेतर्फे करण्यात आलेले होते. मंगळवार दिनांक ९ एप्रिल २०१९ रोजी सकाळी मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे व पार्थ पवार यांच्या रॅलीतील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या सहभागाचे निरीक्षण नोंदवले. पुणे शहरातील मुख्य वर्तमानपत्रातील संपादकांशी भेटी घेऊन माहिती जाणून घेण्यात आली तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या भेटी आणि मुख्यमंत्री यांची प्रचार सभा व इतर उमेदवारांचे प्रचार उपक्रमांसह स्थिती जाणून घेणार आहेत. महाराष्ट्रातील राजकारण, लोकसभा निवडणुक, प्रचार पद्धत, निपक्ष निवडणूक प्रक्रिया, मतदारांचा मतदानातील सहभाग, राजकीय घडामोडी, राजकीय सद्यस्थिती याबाबत ते मान्यवरांशी सवांद साधून चर्चा करणार आहेत. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.