Monday, 15 April 2019

योगी आदित्यनाथ, मायावतींवर प्रचारबंदी; निवडणूक आयोगाची कारवाई

आता वाचाळवीर नेत्यांवर प्रचारबंदी


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाने आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारला आहे. निवडणूक आयोगाने  लोकसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांना तीन दिवसांची प्रचारबंदी घातली आहे. तर मायवती यांना दोन दिवसांच्या प्रचारावर बंदी घातली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ आणि मायावती यांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ आणि मायावती यांच्यावर आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला. तसेच, याप्रकरणी योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार मोहिमेवर पुढील 72 तास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे उद्या (16 एप्रिल) सकाळी 6 वाजल्यापासून योगी आदित्यनाथ निवडणूक प्रचार, रोड शो किंवा मुलाखत अशा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराशी निगडीत कोणत्याही कार्यक्रमात सहभाग घेऊ शकणार नाहीत. याशिवाय, मायावती यांच्यावरही आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा ठपका ठेवण्यात आला असून, त्यांना उद्या (16 एप्रिल) सकाळी 6 वाजल्यापासून 48 तास रोड शो किंवा मुलाखत अशा लोकसभा निवडणूक प्रचाराशी संदर्भात गोष्टी करता येणार नाहीत. धर्माच्या नावावर मतं मागत आचारसंहितेचं उल्लंघन करणं बसपा प्रमुख मायावती आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भोवलं आहे. निवडणूक आयोगाने मायवती यांना दोन दिवस तर योगींना तीन दिवस निवडणूक प्रचार करण्यास बंदी घातली आहे. या काळात हे दोन्ही नेते कोणताही रोड शो करू शकणार नाहीत. त्यांना निवडणूक प्रचार सभाही घेता येणार नसून निवडणूक रॅलीतही भाग घेता येणार नाही. १६ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजल्यापासून ही बंदी लागू होणार आहे. मायावती आणि योगींवर निवडणूक आयोगाने घातलेली बंदी ही २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात मोठी कारवाई आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार योगी आदित्यनाथ १६, १७ आणि १८ एप्रिल रोजी तर मायावती १६ आणि १७ एप्रिल रोजी प्रचार करू शकणार नाहीत. बंदीच्या काळात या दोन्ही नेत्यांना सोशल मीडियाचा वापर करता येणार नाही. त्यांना या काळात कोणतीही मुलाखत देता येणार नाही, असं आयोगानं स्पष्ट केले आहे. 

आरोप काय होते? 

मायावती यांनी उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये निवडणूक प्रचार सभेदरम्यान मुस्लिम समुदायाला सपा-बसपा महाआघाडीलाच मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. धर्माच्या नावावर मतदान मागण्याच्या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी मायवतींवर कारवाई करण्यात आली आहे. तर योगी यांनी विरोधकांना 'अली' आवडतो तर आम्हाला 'बजरंग' बली आवडतो, असं विधान करत धर्माच्या नावावर मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे दोन्ही नेत्यांकडून निवडणूक आयोगानं खुलासा मागत त्यांना फटकारले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मायावती यांच्या देवबंदमधील भाषणावर आक्षेप घेतला होता. धर्माच्या नावावर मतदान मागणाऱ्यांविरोधात आयोग काय कारवाई करत आहे? असा सवाल न्यायालयाने केला होता. या नेत्यांना केवळ नोटीस बजावण्यात आली आहे. कठोर कारवाई का केली जात नाही? असा सवाल करत न्यायालयाने आयोगाला फटकारले होते. त्यानंतर आयोगानं ही कारवाई केली. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.