Friday, 19 April 2019

Survey reveals reasons for dwindling voters’ turnout

Corrupt candidates, faraway polling booths, heat and holiday mood are few of the reasons why citizens refrain

PUNE MIRROR Dt-19 April 2019 page No. 8 Pub.
 |Vijay.Chavan@timesgroup.com
  TWEET @cvijayMIRROR


In 2014, the Modi brand of campaigning for Lok Sabha elections had drawn merely 54.10 per cent of voters — a figure that has been a cause of concern for Pune district election authority. Worried that the voters will decline further, it has now enlisted help from Political Research and Analysis Bureau (PRAB), a nongovernmental organisation (NGO) that has surveyed the exact reasons behind the low voters’ turnout.
The findings state that 4 per cent of Pune’s voters are averse to corrupt practices and have no faith in the system due to lack of honest candidates. The citizens are also displeased over the distance between polling booths and homes. The problem is pertinent in rural parts, affecting 6-15 per cent of locals, who avoid travelling because of inadequate transport. The problem is aggravated by missing or duplicate names on the voters’ lists. It affected 5-18 per cent of the locals. The treatment meted out to disabled voters has affected 4 per cent of the citizens. Other factors like heat and the holiday mood are the few other reasons why 3 per cent of the locals do not vote. This ratio is higher in rural areas.
Considering the outcome of this survey, the district election authority, headed by collector Naval Kishore Ram, has now decided to sensitise the voters through the Systematic Voters Education and Electoral Participation (SVEEP). The authority has created audio-visual clippings of celebrities, appealing voters to exercise their right by considering it as a national duty.
Talking to Pune Mirror, Chandrakant Bhujbal, director of PRAB, said, “We also noted that voters’ enrolment drive is restricted to students only. There is a huge section of the migrated population that are not a part of these campaigns. With systematic efforts, the percentage can be improved.”
He added that they have come up with remedial measures to undo the phenomenon. “We have suggested sensitisation of voters. The authorities also need to pay attention towards providing transport and aim at maintaining a flawless voters’ lists,” Bhujbal said.
The measures were formulated through the survey carried out by 122 volunteers who would visit each polling booth in all 20 Assembly constituencies. They obtained the opinion of at least 2-5 per cent voters — a set of 21 questions posed to 7,395 voters.
“We have sent out the findings and suggestions to the district collector to decide further course of action,” he said.
Deputy collector and co-coordinator of SVEEP Subhash Borkar said, “We had assigned the task to PRAB to know the exact reason of low turnout. We wanted to reform the system through the findings of this survey report.”
Now, the NGO is reaching out to 40 lakh voters to sensitise them about their right to vote. “We are conducting street plays and also connecting people through mass media and social media appeals. Election clubs of celebrities and election literacy clubs have been formed. The areas where there is very low percentage have been equipped with a special squad to communicate the locals,” he added.
Other recommendations include establishing a permanent mechanism for voter registration, transport facilities and sensitisation of upwardly mobilised and middle-class citizens.

यापूर्वीचे संबधित ब्लॉग खालीलप्रमाणे-

THURSDAY, 11 APRIL 2019

स्वीप कार्यक्रम व्यवस्थापन समिती मतदार जनजागृती अभियानांतर्गत (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण उपक्रम



पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या वतीने

अल्प मतदान झालेल्या केंद्रातील मतदारांचे सर्वेक्षण व जनजागृती



स्वीप (SVEEP - Systematic Voters’ Education and Electoral Participation)  कार्यक्रम व्यवस्थापन समिती मतदार जनजागृती अभियानांतर्गत पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या वतीने अल्प मतदान झालेल्या केंद्रातील मतदारांचे सर्वेक्षण व जनजागृती प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा निवडणूक अधिकारी नवलकिशोर राम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग, स्वीप कार्यक्रम व्यवस्थापन समितीचे मुख्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर व समन्वयक अधिकारी श्रीमती आशाराणी पाटील आणि स्वीप कार्यक्रम व्यवस्थापन समिती संपर्क अधिकारी यशवंत मानखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 करीता मतदार जनजागृती अभियान अंतर्गत लोकसभा निवडणूक 2014 मधील अल्प मतदान झालेल्या मतदान केंद्रातील मतदारांचे सर्वेक्षण व जनजागृती करून अल्प मतदानाच्या प्रमाणाची कारणे व उपाय योजनांचा अहवाल तयार करण्यात आलेला आहे सदर अहवाल नुकताच सुपूर्त करण्यात आला. पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या वतीने दरवर्षी मतदार जनजागृती व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येतात.  

सर्वेक्षण अहवालात काय आहे?- 

1. लोकसभा निवडणुकीतील अल्प मतदान प्रमाणाचे सर्वेक्षण करण्याचा उद्देश
2. लोकसभा निवडणुक 2014 मतदान दृष्टीक्षेप 
3. कमी मतदान झालेल्या प्रमाणानुसार मतदान केंद्र संख्या दर्शवणारा तक्ता
4.  मतदान केंद्रांमध्ये 62 टक्के पेक्षा कमी मतदान झालेले आहे या मतदान केंद्रावरील स्थिती व तपशील दर्शवणारा तक्ता
5.  मतदारांनी सर्वेक्षणा दरम्यान मतदान न करण्याची दिलेली कारणे
6. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
7. मतदान जनजागृती अभियानांतर्गत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वेक्षणातील उपाययोजना
8. मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत निरुत्साहाची कारणे व मतदार यादीतील दोष
9. लोकसभा निवडणूक 2014 मध्ये अल्प मतदान झालेला भाग
10. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 मधील  मतदारसंघ निहाय मतदानाचे प्रमाण दर्शविणारा तक्ता
11. लोकसभा निवडणूक 2014 मध्ये काही कारणांनी मतदानात सहभाग न घेतलेल्या मतदारांची संख्या व प्रमाण तक्ता
12. विधानसभा मतदारसंघ निहाय अल्प मतदानाचे प्रमाण असलेली मतदान केंद्र तपशील
(1) 195 - जुन्नर विधानसभा मतदारसंघ
(2) 196 - आंबेगाव विधानसभा मतदारसंघ
(3) 197 - खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ
(4) 198 - शिरूर विधानसभा मतदारसंघ
(5) 199 - दौंड विधानसभा मतदारसंघ
(6) 200 - इंदापूर विधानसभा मतदारसंघ
(7) 201 - बारामती विधानसभा मतदारसंघ
(8) 202 - पुरंदर विधानसभा मतदारसंघ
(9) 203 - भोर विधानसभा मतदारसंघ
(10) 204 - मावळ विधानसभा मतदारसंघ
(11) 205 - चिंचवड विधानसभा मतदारसंघ
(12) 206 - पिंपरी विधानसभा मतदारसंघ
(13) 207 - भोसरी विधानसभा मतदारसंघ
(14) 208 - वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ
(15) 209 - शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
(16) 210 - कोथरुड विधानसभा मतदारसंघ
(18) 212 - पर्वती विधानसभा मतदारसंघ
(19) 213 - हडपसर विधानसभा मतदारसंघ
(20) 214 - पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ
(21) 215 - कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ
13. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 मधील मतदारसंघ निहाय मतदानाचे प्रमाण तक्ता.
14. लोकसभा निवडणूक 2014 मध्ये काही कारणांनी मतदानात सहभाग न घेतलेल्या मतदारांची संख्या व प्रमाण.
15. सर्वेक्षण कार्यपद्धत व संदर्भ
==================

लोकसभा निवडणुकीतील अल्प मतदान झालेल्या प्रमाणाचे सर्वेक्षण करण्याचा उद्देश - 

पुणे जिल्ह्यामधील 21 विधानसभा मतदारसंघामध्ये 3 पूर्ण लोकसभा मतदारसंघ असून 1 मावळ मतदारसंघामध्ये 3 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. एकूण 4 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृती व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी स्वीप (SVEEP - Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रम व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. या समितीमार्फत विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांना आवाहन करण्यात आले. या आवाहनाला बहूतांश स्वयंसेवी संस्थांनी प्रतिसाद दिला. स्वीप कार्यक्रम व्यवस्थापन समितीचे उपजिल्हाधिकारी तथा मुख्य समन्वयक सुभाष बोरकर, जिल्हा निवडणूक अधिकारी नवलकिशोर राम आणि उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांच्या मार्गदर्शनामुळे गेल्या लोकसभा निवडणूकीत मतदानाचे प्रमाण कमी झालेल्या मतदानकेंद्रावर कारणांचा शोध घेण्याचे सूनिश्‍चित करण्यात आले. मतदान न केलेल्या मतदारांकडून कारणे जाणून घेऊन त्यावर उपाय योजना राबविण्याचा संकल्प केल्याने या कार्याची जबाबदारी नेहरू युवा केंद्राचे प्रमुख व स्वीपचे सहाय्यक श्री. यशवंत मानखेडकर यांनी स्वीकारून मतदारांमध्ये प्रबोधनात्मक उपक्रम राबविणारी संस्था पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) ची निवड करण्यात आली. त्यांच्या आग्रहास्तव संबंधित जबाबदारी स्वीकारण्याची तयारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भुजबळ यांनी स्वीकारली. प्रामुख्याने स्वीप कार्यक्रम व्यवस्थापन समितीचे उपजिल्हाधिकारी तथा मुख्य समन्वयक सुभाष बोरकर यांची सर्वेक्षणाची मूळ संकल्पना असल्याने त्यांनी अपेक्षित सर्वेक्षणाबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये सर्व भागात शहर व ग्रामीण भागासह दूर्गम भाग आणि शहरातील दूर्लभ व झोपडपट्टी भागामध्ये सर्वेक्षणाचे नियोजन त्यांनी अचूकपणे करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. पुणे शहर व जिल्ह्यातील 21 पैकी 20 विधानसभा मतदारसंघात लोकसभा मतदारसंघ निहाय सर्वेक्षण करून अल्प कालावधीत या निवडणूकीत उपाययोजना व प्रबोधन करण्याचे कार्य पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) यासंस्थेच्या वतीने करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. मतदारांमध्ये जनजागृती व प्रबोधनात्मक उपक्रमांचा या अहवालात जाणीवपूर्वक उल्लेख व विस्तारीत वृत्त व छायाचित्रे टाळण्यात आलेली आहेत. मुख्य उद्देश मतदान न केलेल्या मतदारांचा शोध घेणे व त्यामागील कारणे जाणून घेणे हा असल्याने तसेच त्यांच्यामध्ये असलेले गैरसमज दूर करणे व मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे ही भावना मतदारांमध्ये जागृत करून सध्याच्या वातावरणात राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधींच्या अविश्‍वासार्ह वातावरणामुळे निराश झालेल्या काही मतदारांमध्ये मतदान करण्याची भावना निर्माण करण्यात यश मिळाल्याचा आनंद सर्व स्वीम व्यवस्थापन कमिटी पदाधिकारी व सदस्य आणि संस्थेला झाला आहे. सर्वेक्षणाबरोबरच मतदारांमध्ये मतदान करण्याबद्दल जनजागृती करून मतदान प्रक्रियेचे स्वरूप व ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी यंत्राबाबत प्रबोधन करण्यात आले. या उपक्रमामुळे निश्‍चितच लोकसभा निवडणुकीमध्ये 23 व 29 एप्रिल 2019 रोजी होणार्‍या मतदानाच्या टक्केवारीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.
==================

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष-

* मतदारयादी किमान 5 टक्के ते 18 टक्के दोषपूर्ण (मयत, दुबार, स्थलांतरित नावे)
* मतदान केंद्रावर जाण्याचे अंतर जास्त व प्रवास साधन अपेक्षापूर्ती नसल्याने शहरात 6 टक्के तर ग्रामीण भागात 15 टक्के मतदारांचे मतदानाकडे दुर्लक्ष. 
* रुग्ण/वयोवृद्ध/अपंग/इतर घटकांना कुटुंबातून योग्य मदत/सहकार्य मिळत नसल्याने 2 टक्के मतदार मतदानापासून वंचित.
* अपरिचित उमेदवार व भ्रष्टाचारामुळे राजकीय व्यवस्थेविरुद्ध चीड/स्थानिक प्रश्न म्हणून राजकीय पदाधिकारी/पक्षांवर रोष असलेल्या मतदारांचे प्रमाण 4 टक्के आहे.
* सलग सुट्टी/आयपीएल क्रिकेट/मनोरंजन कार्यक्रम/बाहेर गावी पर्यटन/परदेशात/उच्च शिक्षण व नोकरी निमित्त बाहेर गावी अशा स्वरूपांच्या मतदारांचे शहरात 3 टक्के प्रमाण हे ग्रामीण भागाच्या (1.5 टक्के) दुप्पटीने जास्त आहे.  
* स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना राजकीय पदाधिकारी जास्त सक्रीय असून केंद्रावर जाण्याचे अंतर जास्त व प्रवास साधन अपेक्षापूर्ती करीत असल्याने लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान जास्त होते. 
* सर्व घटकांचा विचार केला तरच मतदानाची टक्केवारी वाढू शकते.
* शाळा, महाविद्यालयामध्ये जनजागृती करून केवळ युवा मतदारांपर्यंत प्रसार होत आहे, इतर मतदारांच्या वर्गवारीनुसार मतदान प्रक्रियेतील त्यांच्या अडचणी जाणून त्या प्रकारे सुविधा देण्याची गरज असून प्रशासकीय व सर्वसामान्यांचा व्यवस्थेतील सक्रीय सहभागच मतदानाची टक्केवारी वाढवू शकेल.
==================

मतदार यादीतील दोष काय आहेत-

* दुबार नावे वगळली नाहीत
* काही मयत नावे वगळली नाहीत
* स्थलांतरित झाल्यामुळे परगावी/दुसर्‍या जिल्ह्यात नाव दाखल तरीही     मूळ गावात दुबार नाव
* मतदारयादी पुनर्निरीक्षण कामात काही बीएलओ यांचा हलगर्जीपणा 
* ठराविक स्थानिक लोकप्रतिनिधीचा हस्तक्षेप व दबावामुळे बीएलओ यांच्याकडून दुर्लक्ष
* मतदान केंद्र माहिती ओळख चिठ्ठी पोहोच कार्यात अनियमितता
* मतदारयादीत नाव असूनही केंद्र माहिती सुविधांचा अभाव 
* पुरवणी यादीतील मतदारांची नावे मुळ अंतीम यादीत समावेश होण्यास विलंब. 
==================

लोकसभा निवडणूक 2014 मध्ये अल्प मतदान झालेला भाग खालीप्रमाणे- 

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघापैकी 20 मतदारसंघातील मागील लोकसभा निवडणूक 2014 मध्ये अल्प मतदान झालेल्या केंद्रावरील सुक्ष्म सर्वेक्षण करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात येणार्‍या विधानसभा मतदारसंघात दुर्गम भागामध्ये तसेच प्रमुख काही गावांमध्ये अल्प मतदान झाल्याचे दिसून आले. पुणे शहरातील अल्प मतदान झालेल्या भागांमध्ये पर्वती विधानसभा क्षेत्रातील बिबवेवाडी, घोरपडेपेठ, गुलटेकडी, हिंगणे खुर्द, अप्पर व लोअर इंदिरानगर, महर्षीनगर, मुकुंदनगर, पद्मावती, पर्वती जनता वसाहत आणि लक्ष्मीनगर, सहकारनगर, सिंहगडरोड परिसर या भागात अल्प मतदान झालेले आहे. तसेच पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा क्षेत्रातील वानवडी, कॅम्प परिसर, कोरेगाव पार्क, भवानी पेठ भाग, घोरपडी, ताडीवाला रोड, रास्तापेठ भाग, वाडिया कॉलेज परिसर या भागात अल्प मतदान झालेले आहे. कोथरूड विधानसभा क्षेत्रातील पाषाण, एरंडवणा, जयभवानीनगर, कोथरूड, बाणेर, बालेवाडी समाविष्ट असलेला भाग, औंध, पौड फाटा, कर्वे रोड, कर्वेनगर काही भाग, सिंधू सोसायटी औंध आदि या भागात अल्प मतदान झालेले आहे. शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रातील औंध गाव, पुणे विद्यापीठ परिसर, रेंजहिल्स या भागात अल्प मतदान झालेले आहे. वडगावशेरी विधानसभा क्षेत्रातील येरवडा परिसर, वडगावशेरी भाग, खराडी, आणि समाविष्ट लोहगाव भाग या भागात अल्प मतदान झालेले आहे.भोसरी विधानसभा क्षेत्रातील इंद्रायणीनगर भोसरी परिसर, कुदळवाडी, तळवडे व दिघी गावठाण भाग, चक्रपाणी वसाहत रस्ता भोसरी कृष्णानगर, चिखली, नेवाळे वस्ती, दिघी रोड भोसरी, धावडे वस्ती, निगडी गावठाण, नेहरुनगर, मासुळकर कॉलनी, म्हेत्रेवस्ती, लांडेवाडी भोसरी भाग, अजंठानगर, सॅन्डविक कॉलनी, सेक्टर रोड अजमेरा कॉलनी या भागात अल्प मतदान झालेले आहे चिंचवड विधानसभा क्षेत्रातील चिंचवडगाव, विकासनगर, काळेवाडी, नवी सांगवी, विजयनगर काळेवाडी, जयमल्हारनगर, संतोषनगर थेरगाव परिसर, तापकीर नगर, थेरगाव भाग, सांगवी गाव, वाकड, पिंपळे सौदागर व गुरव काही भाग, श्रीनगर रहाटणी, कस्पटे वस्ती, सुदर्शन नगर, कीर्तिनगर थेरगाव परिसर या भागात अल्प मतदान झालेले आहे. मावळ विधानसभा क्षेत्रातील शिरगाव, महागाव, वडगाव, देहूरोड, लोणावळा काही भाग, धालेवाडी, माळवाडी, शिलींब, उधेवाडी, कुरवंदे, कान्हे, वाळकाईवाडी या भागात अल्प मतदान झालेले आहे. जुन्नर विधानसभा क्षेत्रातील आगर (विठ्ठलवाडी), राजूर, अंजनाळे, ढोलवाड, जुन्नर काही परिसर, ओतुर भाग, इंगलोन, खटकळे, डिंगोरे, वरवली (नारायणगांव), घाटघार, रणमाळवाडी (बेल्हा), धालेवाडी हवेली, चव्हाद, कातेडे, माणकेश्वर, अहिनावेवाडी, हिवरे मिन्हेर, हडसर, आलमे, केवडी, तालमचीवाडी या भागात अल्प मतदान झालेले आहे. 
==================

सर्वेक्षण कार्यपद्धत व संदर्भ ....असे केले सर्वेक्षण

* पुणे लोकसभा निवडणूक 2014 मधील मतदानाच्या प्रमाणाचे विश्‍लेषण करून अल्प  (62 टक्के च्या आतमधील) मतदान झालेल्या मतदान केंद्रातील भागात सर्वेक्षण करण्यात आले.  
* अल्प मतदान केंद्र विधानसभा मतदारसंघ निहाय निर्धारित करण्यात आली. 
* 2014 मधील निवडणूकीतील निश्‍चित केलेली मतदान केंद्र व त्यांचा भाग सर्वेक्षणासाठी निश्‍चित करण्यात आला. 2014 च्या अंतिम मतदार यादीतील संबंधित मतदारांच्या काही प्रमाणात प्रश्‍नावलीतून मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला.
* संबंधित मतदार यादीतील मतदारांची वर्गवारी करून मतदान न करणार्‍या मतदारांचा प्रश्‍नावलीतून शोध घेण्यात आला व मतदान न करण्याची कारणे समजावून घेण्यात आली. 
* मतदान न केलेल्या व प्रत्यक्ष भेटलेल्या मतदारांना त्यांच्या गैरसमजूती दूर करून त्यांचे मतदानाविषयी महत्व व कर्तव्य समजावून सांगून त्यांचे प्रबोधन व जनजागृती करण्यात आली. 
* पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील 20 मतदारसंघात सर्वेक्षण करण्यात आले. अल्प काळात माहितीचा अभाव व संबंधित मतदारसंघातील असहकार्यामुळे खडकवासला मतदारसंघातील कोणत्याही भागामध्ये सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. उर्वरित सर्व मतदारसंघामध्ये अहवालात नमुद केलेल्या मतदान केंद्र निहाय सखोल सर्वेक्षण करण्यात आले आहे. 
* संबंधित मतदार केंद्र निहाय यादीमधील मतदारांमध्ये प्रश्‍नावलीतून मतदान विषयी 21 प्रश्‍नांद्वारे अपेक्षित त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वेक्षणातून निष्कर्ष व उपाय योजना आणि प्रशासकीय त्रुटी निदर्शनास आल्या त्या अल्प काळातील छोट्याशा अहवालामध्ये नमूद करण्यात आला आहे. 
* सर्वेक्षणासंदर्भातील अधिक तपशील वार माहिती प्राब या संस्थेकडे उपलब्ध आहे. 
* सर्वेक्षण 27 मार्च 2019 ते 8 एप्रिल 2019 या कालावधीमध्ये करण्यात आले. यामध्ये 13 दिवसांच्या कालावधीमध्ये सर्वेक्षणाबरोबरच संबंधित मतदारांमध्ये जनजागृती व प्रबोधन करण्यात आले. 
* सर्वेक्षणात एकूण 122 सहकार्‍यांचा सहभाग, स्थानिक नागरिकांचा सहभाग, संबंधित मतदान केंद्रावर सरासरी 2 ते 5 टक्के मतदारांकडून प्रश्‍नावलीतून माहिती घेण्यात आली. या दरम्यान 7395 मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला.
* या अहवालामध्ये विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाचे प्रमाण, झालेले मतदान, मतदान केंद्र तत्कालिन यादी, निवडणूक विषयक इतंभूत माहितीचे स्त्रोत व संदर्भ केंद्रीय निवडणूक आयोग संकेतस्थळ व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय व संबंधित सहकारी कर्मचारी अधिकारी वर्ग यांनी माहिती उपलब्ध करून दिलेल्या आधारावर सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच नमूद केलेली अनुषंगिक अधिकृत आकडेवारी निवडणूक कार्यालयातून घेण्यात आलेली आहे. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================




अल्प मतदान झालेल्या मतदान केंद्रातील मतदारांचे सर्वेक्षण व जनजागृती करून अल्प मतदानाच्या प्रमाणाची कारणे व उपाय योजनांचा अहवाल पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या वतीने पुणे शहर पोलीस आयुक्त मा. डॉ. के. वेंकटेशम यांना देताना अध्यक्ष चंद्रकांत भुजबळ

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.