तिसऱ्या टप्प्यासाठी ३९३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल
लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील तिसऱ्या टप्प्याअंतर्गत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी 14 मतदारसंघात 197 उमेदवारांनी तर आजपर्यंत एकूण 393 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. चौथ्या टप्प्यासाठी आज 16 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. तिसऱ्या टप्प्यात मतदारसंघनिहाय आज दाखल आणि कंसात आजपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. जळगाव मतदारसंघात आज 14 (आजपर्यंत 22 उमेदवार), रावेर-9 (16), जालना-18 (39), औरंगाबाद 16 (42), रायगड 15 (27), पुणे-34 (47), बारामती-18 (31), अहमदनगर- 19 (31), माढा-12 (41), सांगली-11 (21), सातारा 3 (12), रत्नागिरी-सिंधुदुर्ग-6 (13), कोल्हापूर 9 (26) आणि हातकणंगले मतदारसंघात आज 13 उमेदवारांनी तर आजपर्यंत 25 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. उद्या दि. 5 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील अर्जांची छाननी होणार असून 8 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे.
चौथ्या टप्प्यासाठी आज 16 नामनिर्देशनपत्रे दाखल
चौथ्या टप्प्यात 17 मतदारसंघात आज 16 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली असून आतापर्यंत एकूण 25 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. मतदारसंघनिहाय आज दाखल आणि कंसात आजपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. दिंडोरी मतदारसंघात आज एक (1), नाशिक 1 (4), पालघर 2 (3), भिवंडी 1 (1), कल्याण 2 (2), ठाणे 1 (1), मुंबई उत्तर (1), मुंबई उत्तर-पूर्व 1 (1), मुंबई उत्तर-मध्य 1 (2), मुंबई दक्षिण-मध्य 1 (1), मुंबई दक्षिण 1 (3), मावळ 1 (1), शिरुर 2 (2), शिर्डी 1 (2). चौथ्या टप्प्यात 2 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया 9 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या टप्प्यातील अर्जांची छाननी 10 एप्रिल रोजी होणार असून 12 एप्रिलला अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी १४ हजार ९१९ मतदान केंद्र
44 हजार ईव्हीएम आणि 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात मतदारसंघांमध्ये दि. 11 एप्रिल रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण 116 उमेदवार आहेत. सात मतदारसंघात 14 हजार 919 मतदान केंद्र आहेत तर 1 कोटी 30 लाख 35 हजार मतदार आहेत. त्यामध्ये 66 लाख 71 हजार पुरुष तर 63 लाख 64 हजार महिला आणि 181 तृतीयपंथी मतदार आहेत. सुमारे 44 हजार ईव्हीएम यंत्र आणि 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत. सुमारे 73 हजार 837 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.राज्यात एकूण 4 टप्प्यात मतदान होणार असून वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघांमध्ये 11 एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. वाढते तापमान लक्षात घेता या मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी तसेच सावलीची व्यवस्था करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.मतदानासाठी लागणारे साहित्य जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गडचिरोली- चिमूर या नक्षलग्रस्त भागात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 अशी करण्यात आली आहे. वर्धा मतदारसंघात सुमारे 2 हजार 26 एवढे मतदान केंद्र असून 8 लाख 93 हजार पुरुष तर 8 लाख 48 हजार महिला मतदार आहेत. या मतदार संघात 17 लाख 41 हजार एकूण मतदार आहेत. रामटेक मतदार संघात 2 हजार 364 मतदान केंद्र असून 9 लाख 96 हजार पुरुष तर 9 लाख 24 हजार महिला असे एकूण 19 लाख 21 हजार मतदार आहेत. नागपूर मतदारसंघात 2 हजार 65 मतदान केंद्र आहेत. 10 लाख 96 हजार पुरुष तर 10 लाख 63 हजार महिला असे एकूण 21 लाख 60 हजार एकूण मतदार आहेत. भंडार-गोंदिया मतदारसंघात 2 हजार 184 मतदान केंद्र आहेत. 9 लाख 5 हजार पुरुष तर 9 लाख 3 हजार महिला असे एकूण 18 लाख 8 हजार मतदार आहेत.गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी 1 हजार 881 मतदान केंद्र असून 7 लाख 99 हजार पुरुष आणि 7 लाख 80 हजार महिला असे एकूण 15 लाख 80 हजार मतदार आहेत. चंद्रपूर मतदार संघामध्ये 2 हजार 193 मतदान केंद्र असून 9 लाख 86 हजार पुरुष आणि 9 लाख 22 हजार महिला असे एकूण 19 लाख 8 हजार मतदार आहेत. यवतमाळ-वाशिम मतदार संघामध्ये 2 हजार 206 मतदान केंद्र आहेत. 9 लाख 93 हजार पुरुष मतदार तर 9 लाख 21 हजार महिला असे एकूण 19 लाख 14 हजार मतदार आहेत. ज्या मतदारसंघात 15 पेक्षा जास्त उमेदवार आहेत, अशा मतदान केंद्रांवर 2 बॅलेट युनिट बसविण्यात येतात. त्यासोबत 1 कंट्रोल युनिट असते. पहिल्या टप्प्याकरिता 26 हजार बॅलेट युनिट आणि 18 हजार कंट्रोल युनिट देण्यात आले असून 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. बहुतांश सर्वच मतदान केंद्रांवर राखीव यंत्र देण्यात आली आहेत.POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.