विधानसभा निवडणूक-२०१७;पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल
गोवा, मणिपूरमध्ये भाजपला सर्वाधिक मतं
मणिपूरसारख्या राज्यात भाजपचं काहीही अस्तित्व नसताना मोदी लाटेच्या जोरावर भाजप सर्वात जास्त मतं मिळवणारा पक्ष ठरला. मणिपूरमध्ये सर्वात जास्त जागा मिळवलेल्या काँग्रेसने 35.1 टक्के, तर भाजपने 36 टक्के मतं मिळवली.
गोव्यातही भाजपची पिछेहाट झाली असली तरी मतं मात्र सर्वाधिक मिळवली आहेत. गोव्यात सुभाष वेलिंगकरांचं बंड भाजपच्या अंगलट आल्याचं चित्र आहे. कारण काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या असल्या तरी मतं मात्र भाजपला जास्त मिळाली आहेत. भाजपला 32.5 टक्के तर काँग्रेसला 28.4 टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे गोवा सुरक्षा मंच आणि भाजपात जे मतविभाजन झालं, त्याचा फायदा थेट काँग्रेसला झाला.भाजपने देशातील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशची सत्ता काबीज केली. तर उत्तराखंड काँग्रेसकडून हिरावून घेतलं. शिवाय काँग्रेसनेही मुसंडी घेत मणिपूर, गोवा आणि पंजाबमध्ये सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला.काँग्रेसने तीन राज्यात मुसंडी मारली असली तरी मताधिक्य मात्र 2012 च्या निवडणुकांच्या तुलनेत कमी झाल्याचं चित्र आहे. कारण मणिपूर आणि गोवा या राज्यात सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवलेल्या काँग्रेसपेक्षा भाजपचं मताधिक्य जास्त आहे.
2012 चं चित्र काय होतं?
उत्तर प्रदेश :
सपा- 224बसपा 80भाजप 47काँग्रेस 28रालोद- 09इतर- 15
एकूण – 403
--------------------------------------------------------
पंजाब :
काँग्रेस 46भाजप 12शिरोमनी अकाली दल 56इतर 3
एकूण – 117
--------------------------------------------------------
उत्तराखंड :
भाजप 31काँग्रेस 32बसपा 3इतर- 4
एकूण- 70
--------------------------------------------------------
गोवा :
भाजप 21गोवा फॉरवर्ड पार्टी 2काँग्रेस 9महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी 3इतर 5
एकूण – 40
--------------------------------------------------------
मणिपूर :
काँग्रेस 42तृणमूल काँग्रेस 7MSCP 5नागा पीपल्स फ्रंट 4इतर 2
एकूण- 60
--------------------------------------------------------
उत्तर प्रदेश
देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 403 जागांच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाने एकहाती विजय मिळवत तब्बल 325 जागा जिंकल्या.उत्तर प्रदेशात सत्ता स्थापनेसाठी 202 जागांची गरज आहे. मात्र भाजपने त्यापुढे मजल मारुन तब्बल 305 जागी विजय मिळवला.यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये 1991 मध्ये राम मंदिराच्या आंदोलन काळात झालेल्या निवडणुकीत भाजपला 221 जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजपने त्यापुढे मोठी झेप घेत तब्बल 300 चा आकडा ओलांडला आहे.
उत्तर प्रदेशात कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप – 312 +( अपना दल 9, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 4) = 325
समाजवादी पक्ष – 47
काँग्रेस – 7
बसपा – 19
राष्ट्रीय लोक दल – 1
इतर -04
उत्तर प्रदेश मताधिक्य : भाजपला 2012 च्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये 25 टक्के अधिक मताधिक्य मिळालं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या जनतेने सर्वात जास्त मतं भाजपच्या पारड्यात टाकली होती. तेच चित्र या निवडणुकीत पाहायला मिळालं.भाजपला 2012 मध्ये 47 जागा आणि 15 टक्के मतं मिळाली होती. यावेळी 39.7 टक्के मतं आणि 312 जागा मिळाल्या.काँग्रेसला 2012 मध्ये 11.5 टक्के मतं आणि 28 जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी 6.2 टक्के मतं आणि केवळ 7 जागा मिळाल्या आहेत.2012 मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या बसपाने 25.9 टक्के मतं आणि 80 जागा मिळवल्या होत्या. तर यावेळी 22.2 टक्के मतं आणि केवळ 19 जागांवर समाधान मानावं लागलं.2012 साली समाजवादी पार्टी 29.1 टक्के मताधिक्क्यासह सत्तेत आली होती. त्यावेळी सपाने 224 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला होता. तर यावेळी केवळ 47 जागा मिळाल्या तर 21.8 टक्के मतं मिळाली.
उत्तर प्रदेश ( एकूण जागा: 404; बहुमत: 203 )
--------------------------------------------------------
उत्तराखंड
उत्तराखंडमध्ये भाजपने मोठी उसळी घेत सत्ताधारी काँग्रेस आणि मुख्यमंत्री हरिश रावत यांना दणका दिला. भाजपने विधानसभेच्या 71 जागांपैकी 57 जागा मिळवत एकहाती सत्ता काबिज केली.काँग्रेससाठी धक्कादायक म्हणजे मुख्यमंत्री हरिश रावत लढवत असलेल्या दोन्ही जागी त्यांचा पराभव झाला.
उत्तराखंडमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप – 57
काँग्रेस – 11
अपक्ष – 2
एकूण – 70
उत्तराखंड मताधिक्य : उत्तराखंडमध्ये सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवलेल्या भाजपला 2012 साली केवळ 33 टक्के मताधिक्य होतं. तर यावेळी 46.5 टक्के मतं मिळाली आहेत.उत्तराखंडमध्ये भाजपला 33 टक्के मताधिक्य आणि 31 जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी 46.5 टक्के मतं आणि 51 जागा मिळवल्या आहेत.सत्ताधारी काँग्रेसाल 2012 साली 34 टक्के मताधिक्य आणि 32 जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी फक्त 0.5 टक्के मतं मिळाली आणि 21 जागा मिळवता आल्या.
उत्तराखंड ( एकूण जागा: 71; बहुमत: 36 )
--------------------------------------------------------
पंजाब
पंजाब विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाला मोठा धक्का बसला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसने बहुमताचा 59 हा आकडा सहजरित्या पार केला आहे.काँग्रेसने 70 जागा जिंकल्या असून 7 जागांवर उमेदवार आघाडीवर आहे. तर आम आदमी पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर शिरोमणी अकाली दल आणि भाजप युतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत.
काँग्रेस : 77
आम आदमी पक्ष : 20
अकाली दल 15 + भाजप 3 : 15
लोक इन्साफ पार्टी : 02
पंजाब मताधिक्य:सत्ताधारी अकाली दल-भाजप युती, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात त्रिशंकू लढत होईल, अशी शक्यता असताना काँग्रेसने सर्वांना धोबीपछाड देत पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली. मात्र 2012 च्या तुलनेत मताधिक्य कमी झालं आहे.2012 साली काँग्रेसला 40 टक्के मतं आणि 46 जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी 38.5 टक्के मतं आणि 77 जागा मिळाल्या.अकाली दलला 2012 साली 35 टक्के मताधिक्य आणि 56 जागा मिळाल्या होत्या. यावेळी 25.2 टक्के मतं आणि केवळ 15 जागा मिळाल्या.अकाली दलसोबत युती असलेल्या भाजपचंही मताधिक्य पंजाबमध्ये कमी झालं. 2012 साली 7 टक्के मताधिक्य आणि 12 जागा होत्या. तर यावेळी 5.4 टक्के मताधिक्य आणि केवळ 3 जागांवर विजय मिळवता आला.
पंजाब ( एकूण जागा: 117; बहुमत: 59 )
--------------------------------------------------------
गोवा
उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भाजपला गोव्यात काँग्रेसनं काँटे की टक्कर दिली. गोव्याच्या 40 जागांच्या विधानसभेत काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने 17 जागांवर विजय मिळवला. मात्र 13 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला सत्ताधारी भाजप सत्तेसाठी छोट्या पक्षांशी युती करण्याची शक्यता आहे.
गोव्यात कुणाला किती जागा?
भाजप – 13
काँग्रेस – 17
राष्ट्रवादी काँग्रेस -1
महाराष्ट्रवादी गोमंतक – 3
गोवा फॉरवर्ड पार्टी – 3
अपक्ष/इतर – 3
गोवा मताधिक्य: गोव्यात सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला. इथे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष झाला आहे. पण भाजपचं मताधिक्य काँग्रेसपेक्षा अधिक आहे.भाजपला गोव्यात 2012 साली 34.7 टक्के मतं आणि 21 जागांवर विजय मिळाला होता. तर यावेळी 32.5 टक्के मतं आणि 13 जागांवर विजय मिळाला.गोव्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला 2012 साली 30 टक्के मतं आणि 9 जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी 28.4 टक्के मताधिक्य आणि 17 जागा मिळाल्या आहेत.
गोवा ( एकूण जागा: 40; बहुमत: 21 )
--------------------------------------------------------
मणिपूर
मणिपूरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला भाजपने कडवी झुंज दिली. 60 जागांच्या मणिपूर विधानसभेत काँग्रेसने 26 जागांवर विजय मिळवला, तर भाजपला 21 जागा जिंकता आल्या.मणिपूरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 31 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे स्थानिक पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत आहेत.
मणिपूरमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप – 21
काँग्रेस – 28
नागा पीपल्स फ्रंट – 4
नॅशनल पीपल्स पार्टी – 4
तृणमूल काँग्रेस -1
अपक्ष – 1
लोकजनशक्ती पार्टी – 1
मणिपूर मताधिक्य : मणिपूरमध्ये मताधिक्याच्या बाबतीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला भाजपने मात देत 36.3 टक्के मतं खेचून आणली.मणिपूरमध्ये भाजपला 2012 मध्ये केवळ 2 टक्के मतं मिळाली होती, तर खातंही उघडता आलं नव्हतं. तर यावेळी 36.3 टक्के मताधिक्य आणि 21 जागांवर विजय मिळवला आहे.2012 साली 42.4 टक्के मताधिक्य मिळवत सत्तेत विराजमान झालेल्या काँग्रेसच्या पारड्यात यावेळी मणिपूरच्या जनतेने केवळ 35.1 टक्के मतं टाकली आहेत. 2012 साली काँग्रेसने 42 जागांवर विजय मिळवला होता, तर यावेळी 28 जागा मिळवल्या.
मणिपुर ( एकूण जागा: 60; बहुमत: 31 )
--------------------------------------------------------
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.