Wednesday 22 March 2017

लातूर, चंद्रपूर, परभणी महापालिका निवडणूक जाहीर; १९ एप्रिलला मतदान तर २१ ला निकाल

लातूर, चंद्रपूर, परभणी महापालिका निवडणूक जाहीर;
१९ एप्रिलला मतदान तर २१ ला निकाल

या तिन्ही महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.राज्य निवडणूक आयोगाने चंद्रपूर, लातूर आणि परभणी महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या तिन्ही महापालिकांसाठी पुढील महिन्यात १९ एप्रिलला मतदान तर २१ एप्रिल रोजी मतमोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या तिन्ही महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्यात नुकताच १० महापालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यापाठोपाठ आता या तीन महापालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत.चंद्रपूर महानगरपालिकेची 29 एप्रिल, लातूर महानगरपालिकेची 20 मे आणि परभणी महानगरपालिकेची मुदत 15 मे रोजी संपत आहे. भारत निवडणूक आयोगाने 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभा मतदार संघाची मतदार यादी या महानगरपालिका निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. इच्छूक उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे 27 मार्च ते 3 एप्रिल  या कालावधीत सादर करता येतील. नामनिर्देशनपत्रे रविवारी . 2 एप्रिलपर्यंत स्वीकारण्यात येतील. 28 मार्च रोजी गुढी पाडव्याची सुट्टी असल्याने त्या दिवशी नामनिर्देनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत; परंतु रविवारी 2 एप्रिल रोजी ती स्वीकारण्यात येतील.
त्याबरोबरच  सांगली- मीरज- कुपवाड महानरपालिकेतील प्रभाग क्र. 22ब, जळगाव महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 24अ आणि कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 46 च्या रिक्तपदासाठीदेखील 19 एप्रिलला मतदान होईल. तसेच  धुळे जिल्हा परिषदेच्या शिरूड (ता. धुळे) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या दानापूर (ता. तेल्हारा) निवडणूक विभागाच्या; तर अकोट (जि. अकोला) पंचायत समितीच्या कुटासा निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील 19 एप्रिलला मतदान होणार आहे. 21 एप्रिलला मतमोजणी होईल.  
 या महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे 
- नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 27 मार्च ते 3 एप्रिल  
- नामनिर्देशनपत्रांची छाननी- 5 एप्रिल  
- उमेदवारी मागे घेणे- 7 एप्रिल  
- निवडणूक चिन्ह वाटप- 8 एप्रिल  
- उमेदवारांची अंतिम यादी- 8 एप्रिल  
- मतदान- 19 एप्रिल (सकाळी 7.30 ते सायं. 5.30)
- मतमोजणी- 21 एप्रिल  


लातूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 70

राष्ट्रवादी काँग्रेस- 13
काँग्रेस- 49
शिवसेना- 06
रिपाइं- 02

लातूर महानगरपालिकेत सध्या काँग्रेसच्या महापौर विराजमान आहे. मागील वेळेस भाजपाला लातूरमध्ये खातेही उघडता आले नव्हते. आता खरी लढत भाजपा आणि समोर उर्वरित सर्व पक्ष अशी होणार आहे.

परभणी महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 65

राष्ट्रवादी काँग्रेस- 30
काँग्रेस- 23
शिवसेना- 8
भाजप- 2
अपक्ष- 2

परभणी महानगरपालिकेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौर विराजमान आहे.

चंद्रपूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 66

काँग्रेस- 26
भाजप- 18
शिवसेना- 5
राष्ट्रवादी- 4
मनसे- 1
बीएसपी-1
अपक्ष- 10
भारिप बहुजन महासंघ- 1

सध्या चंद्रपूर पालिकेत भाजपचा महापौर आहे. पालिकेतील सत्ता सर्वपक्षीय आहे. काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर दोन गट आहेत. माजी खासदार नरेश उगलीया यांचा गट तर रामू तिवारी यांचा दुसरा गट आहे. रामू तिवारी यांच्या गटातील 12 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं महापौर भाजपचा आहे.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.