Friday, 17 March 2017

zp election 2017 पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपच क्रमांक 1

पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपच क्रमांक 1
राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये 284 पंचायत समित्यांमध्ये झालेल्या सभापती आणि उपसभापतिपदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हाच "क्रमांक 1'चा पक्ष म्हणून पुढे आला आहे. भाजपने सर्वाधिक 87 सभापतिपदांवर विजय संपादन केला; तर तीन जागा सहयोगी पक्षांना मिळाल्या. अशा एकूण 90 सभापतिपदांवर भाजपला यश मिळाले. उपसभापती निवडीत भाजपने स्वबळावर 87 जागी विजय संपादन केला; तर 6 उपसभापतिपदे भाजपच्या सहयोगी पक्षांना मिळाली. अशा एकूण 93 ठिकाणी भाजपने यश संपादन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यांना 66 सभापतिपदे मिळाली; तर उपसभापतिपदासाठी 65 जागी विजय संपादन केला. कॉंग्रेसचे 54 ठिकाणी सभापती निवडून आले; तर 48 ठिकाणी उपसभापती निवडून आले. शिवसेनेला 49 ठिकाणी सभापती; तर 53 ठिकाणी उपसभापती निवडूण आणता आले. विविध आघाड्यांच्या खात्यात 18 सभापती; तर 20 उपसभापतिपदे गेली. तीन सभापतिपदे आणि 4 उपसभापतींची पदे ही अपक्षांकडे आली. नुकत्याच झालेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 831 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीला 674, कॉंग्रेसला 591 जागी; तर शिवसेनेला 581 जागी विजय संपादन करता आला होता. राज्यात पंचायत समिती सभापती – उपसभापती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पहिला नंबर पटकावला असून सर्वाधिक 86 पंचायत समित्यांमध्ये भाजपचे सभापती निवडून आले आहेत तर 92 ठिकाणी भाजपचे उपसभापती निवडून आले आहेत. भाजपाच्या सहयोगी पक्ष – आघाडय़ांचा विचार करता भाजप व मित्रांच्या सभापतींची संख्या शंभरपेक्षा जास्त आहे. भाजपने पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत पहिला क्रमांक राखला. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ अशा सर्व विभागांमध्ये पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे कार्यकर्ते निवडून आले. राज्यात पंचवीस जिल्ह्यांपैकी एकोणीस जिल्ह्यांमध्ये भाजपने किमान एक पंचायत समिती सभापतीपद जिंकले आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात दोन, जळगाव जिल्ह्यात दहा, वर्धा जिल्ह्यात आठपैकी आठ, चंद्रपूर जिल्ह्यात पंधरापैकी अकरा, जालना जिल्ह्यात आठपैकी चार, औरंगाबाद जिल्ह्यात नऊपैकी पाच, लातूर जिल्ह्यात दहापैकी सात, सोलापूरमध्ये तीन, कोल्हापूरमध्ये तीन तर सांगली जिल्ह्यात दहापैकी पाच पंचायत समित्यांचे सभापती भाजपने जिंकले. राज्यामध्ये गेल्या महिन्यात 25 जिल्हा परिषदा व 283 पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या होत्या व त्यांचा निकाल 23 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला होता. भाजपने जिल्हा परिषदांमध्ये व पंचायत समित्यांमध्ये अन्य प्रमुख राजकीय पक्षांच्या तुलनेत अधिक जागा जिंकून प्रथम स्थान मिळवले होते. पंचायत समिती सदस्यांच्या एकूण 2990 जागांपैकी भाजपाने 831 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस (591), राष्ट्रवादी (674) आणि शिवसेना (581) हे अन्य पक्ष भाजपच्या तुलनेत सदस्य संख्येच्या बाबतीत मागे पडले होते. त्याचेच प्रतिबिंब मंगळवारी राज्यात ठिकठिकाणी झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीत पडले.


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.