Wednesday, 22 March 2017

zp election 2017 जिल्हा परिषद संख्येनुसार पक्षाचे बलाबल.....10 जिल्हा परिषदांवर भाजप एक नंबरवर

जिल्हा परिषद संख्येनुसार पक्षाचे बलाबल.....

10 जिल्हा परिषदांवर भाजप एक नंबरवर

25 पैकी दहा जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांवर भाजपनं बाजी मारली आहे. 6 ठिकाणी आपले अध्यक्ष बसवून राष्ट्रवादीनं दुसरा क्रमांक पटकावला आहे. 5 जिल्हा परिषदांवर काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. तर 4 ठिकाणी शिवसेनेचे. त्यामुळे नगरपालिका, महापालिका आणि आता जिल्हा परिषदांमध्येही भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राज्यात समोर येताना दिसत आहे.

अनेक ठिकाणी काँग्रेसनं शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. तर भाजपनंही मुख्य विरोधक असलेल्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन काही ठिकाणी सत्ता हस्तगत केली आहे.

मुंडे भावाबहिणींच्या वादामुळे प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्हा परिषदेत पंकजा मुंडेंनी सुरेश धस यांना आपल्या जाळ्यात ओढून धनंजय मुंडेंना धक्का दिला. त्यामुळे राष्ट्रवादीचे जास्त सदस्य असूनही भाजपचा अध्यक्ष विराजमान झाला आहे.

नाशिकमध्ये भाजपला दूर ठेवण्यासाठी चक्क शिवसेना-काँग्रेस आणि माकप अशी आघाडी बघायला मिळाली. तर सोलापुरात भाजपनं काँग्रेससोबत महाआघाडी करुन राष्ट्रवादीचा दणदणीत पराभव केला.

जिल्हा परिषद संख्येनुसार पक्षाचे बलाबल

भाजप – 10
राष्ट्रवादी – 6
काँग्रेस – 5
शिवसेना – 4

विभागनिहाय निकाल

कोकण –
शिवसेना – 1
काँग्रेस – 1
राष्ट्रवादी – 1

पश्चिम महाराष्ट्र –
भाजप – 3
राष्ट्रवादी – 2

उत्तर महाराष्ट्र –
शिवसेना – 1
भाजप – 1
काँग्रेस – 1

मराठवाडा –
राष्ट्रवादी – 3
शिवसेना – 2
भाजप – 2
काँग्रेस – 1

विदर्भ –
भाजप – 4
काँग्रेस – 2
-------------------------------
कोणत्या जिल्हा परिषदेत कोणाचा अध्यक्ष?
पश्चिम महाराष्ट्र
पुणे – एकूण जागा : 75
अध्यक्ष -विश्वास उर्फ नाना देवकाते, राष्ट्रवादीउपाध्यक्ष – विवेक वळसे- पाटील, राष्ट्रवादीयुती/आघाडी – राष्ट्रवादीमोठा पक्ष – राष्ट्रवादी (44)

सातारा : एकूण जागा 64
अध्यक्ष –  संजीवराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादी
उपाध्यक्ष – वसंतराव मानकुमारे, राष्ट्रवादी
युती/आघाडी – राष्ट्रवादीमोठा पक्ष – राष्ट्रवादी (39)

कोल्हापूर : एकूण जागा 67 
अध्यक्ष – शौमिका अमल महाडिक, भाजपउपाध्यक्ष – सर्जेराव पाटील, राष्ट्रवादीयुती/आघाडी – भाजप-शिवसेनामोठा पक्ष – भाजप 14, 

सांगली: एकूण जागा 60 
अध्यक्ष –  संग्रामसिंह देशमुख, भाजपउपाध्यक्ष – सुहास बाबर, शिवसेना युती/आघाडी – शिवसेना-भाजपमोठा पक्ष – भाजप 

सोलापूर: एकूण जागा 68
अध्यक्ष –  संजय शिंदे,  भाजपउपाध्यक्ष – शिवानंद पाटीलयुती/आघाडी – भाजप महाआघाडीमोठा पक्ष – राष्ट्रवादी (23)

अहमदनगर: एकूण जागा 72
अध्यक्ष –   शालिनी विखे-पाटील, काँग्रेस उपाध्यक्ष –  राजश्री घुले – राष्ट्रवादीयुती/आघाडी – काँग्रेस- राष्ट्रवादी मोठा पक्ष – काँग्रेस (23)

मराठवाडा
औरंगाबाद -एकूण जागा 62
अध्यक्ष –  देवयानी पाटील डोनगांवकर, शिवसेना उपाध्यक्ष – केशवराव तायडे पाटील, काँग्रेस युती/आघाडी – शिवसेना – काँग्रेस मोठा पक्ष – भाजप 

जालना एकूण जागा 56
अध्यक्ष –   अनिरुद्ध खोतकर शिवसेनाउपाध्यक्ष – सतीश टोपे – राष्ट्रवादी युती/आघाडी – शिवसेना-काँग्रे-राष्ट्रवादी मोठा पक्ष – भाजप  

परभणी एकूण जागा 54
अध्यक्ष – उज्वला राठोड, राष्ट्रवादीउपाध्यक्ष – भावना नखाते, राष्ट्रवादी युती/आघाडी – काँग्रेस – राष्ट्रवादीमोठा पक्ष – राष्ट्रवादी  

हिंगोली एकूण जागा 52
अध्यक्ष – शिवराणी  नरवाड, शिवसेनाउपाध्यक्ष – अनिल पतंगेयुती/आघाडी – शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मोठा पक्ष – शिवसेना 

बीड एकूण जागा- 60
अध्यक्ष –  सविता गोल्हार, भाजपउपाध्यक्ष –  जयश्री राजेंद्र मस्के, शिवसंग्रामयुती/आघाडी – भाजप,शिवसेना, शिवसंग्राम आणि राष्ट्रवादीतून बंडखोर सुरेश धस एकत्रमोठा पक्ष- राष्ट्रवादी- 

नांदेड एकूण जागा : 63
अध्यक्ष –  शांताबाई जवळगावकर, काँग्रेस उपाध्यक्ष – समाधान जाधव, राष्ट्रवादी
युती/आघाडी –  काँग्रेस – राष्ट्रवादीमोठा पक्ष- काँग्रेस 28

उस्मानाबाद एकूण जागा – 55
अध्यक्ष – नेताजी पाटील – राष्ट्रवादीउपाध्यक्ष – अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील – राष्ट्रवादीयुती/आघाडी – मोठा पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस – 

लातूर जिल्हा परिषद – एकूण जागा : 58
अध्यक्ष – मिलिंद लातुरे, भाजपउपाध्यक्ष – रामचंद्र तिरुकेयुती/आघाडी – भाजप स्वबळावर सत्ता स्थापनमोठा पक्ष- भाजप- 36

उत्तर महाराष्ट्र
नाशिक  – एकूण जागा : 73
अध्यक्ष – शीतल सांगळे  (शिवसेना)उपाध्यक्ष – नयना गावित (काँग्रेस)युती/आघाडी – शिवसेना -काँग्रेस – माकप युतीची सरशीमोठा पक्ष- शिवसेना 

जळगाव – एकूण जागा : 67
अध्यक्ष – उज्वला पाटील, भाजपउपाध्यक्ष – नंदकिशोर महाजन, भाजपयुती/आघाडी – भाजपने काँग्रेसची मदत घेतलीमोठा पक्ष- भाजप 

कोकण
सिंधुदुर्ग :एकूण जागा : 50
अध्यक्ष – रेश्मा सावंत,  काँग्रेसउपाध्यक्ष -रणजित देसाई, काँग्रेसयुती/आघाडी – काँग्रेस स्वबळावर सत्तामोठा पक्ष- काँग्रेस – 

रत्नागिरी :एकूण जागा : 55
अध्यक्ष –   स्नेहा सावंत, शिवसेना उपाध्यक्ष – विजय खेराडे, शिवसेना युती/आघाडी –  शिवसेना स्वबळावर सत्ता मोठा पक्ष- शिवसेना

रायगड : एकूण जागा : 59
अध्यक्ष – आदिती तटकरे – राष्ट्रवादीउपाध्यक्ष – अस्वाद पाटील – शेकापयुती/आघाडी – शेकाप – राष्ट्रवादी आघाडीमोठा पक्ष- शेकाप 

विदर्भ
चंद्रपूर : एकूण जागा : 56
अध्यक्ष –  देवराव भोंगळे, भाजपउपाध्यक्ष – कृष्णा सहाय, भाजपयुती/आघाडी – भाजपमोठा पक्ष- भाजप (33)

अमरावती : एकूण जागा : 59
अध्यक्ष –   नितीन गोंडाने, काँग्रेसउपाध्यक्ष – दत्ता ढोमने, शिवसेनायुती/आघाडी – काँग्रेस – शिवसेनामोठा पक्ष- काँग्रेस 

बुलडाणा : एकूण जागा : 60
अध्यक्ष –   उमा तायडे, भाजपउपाध्यक्ष – उपाध्यक्ष मंगला रायपूरे, राष्ट्रवादीयुती/आघाडी –  भाजप-राष्ट्रवादी आघाडीमोठा पक्ष- भाजप 

यवतमाळ : एकूण जागा : 60
अध्यक्ष –   माधुरी आडे, काँग्रेसउपाध्यक्ष – श्याम जयस्वाल, भाजपयुती/आघाडी –  काँग्रेस -राष्ट्रवादी- भाजपा एकत्र मोठा पक्ष- शिवसेना 

वर्धा : एकूण जागा : 52
अध्यक्ष – नितीन मडावी भाजपउपाध्यक्ष – कांचन नांदुरकरयुती/आघाडी – भाजप स्वबळावर सत्ता मोठा पक्ष- भाजप 

गडचिरोली : एकूण जागा : 51
अध्यक्ष –   योगिता भांडेकर, भाजप उपाध्यक्ष – अजय कंकलावार, आदिवासी विद्यार्थी संघयुती/आघाडी –  भाजप आणि आदिवासी विद्यार्थी संघ एकत्र मोठा पक्ष- भाजप 
----------------------------------------------------------
    जिल्हा परिषद    अध्यक्ष (पक्ष)     उपाध्यक्ष (पक्ष)
1    रायगड    आदिती तटकर (राष्ट्रवादी)        अस्वाद पाटील (शेकाप)
2    रत्नागिरी    स्नेहा सावंत (शिवसेना)        विजय खेराडे (शिवसेना)
3    सिंधुदुर्ग    रेश्मा सावंत (काँग्रेस)        रणजित देसाई (काँग्रेस)
4    सांगली    संग्रामसिंग देशमुख (भाजप)    सुहास बाबर (शिवसेना)
5    सातारा    संजीवराजे नाईक-निंबाळकर (राष्ट्रवादी)    वसंतराव मानकुमारे (राष्ट्रवादी)
6    कोल्हापूर    शौमिका महाडिक (भाजप)        सर्जेराव पाटील (शिवसेना)
7    पुणे    विश्वास उर्फ नाना देवकाते (राष्ट्रवादी)    विवेक वळसे-पाटील (राष्ट्रवादी)
8    सोलापूर    संजय शिंदे (भाजप)        शिवानंद पाटील (भाजप)
9    अमरावती    नितीन गोंडाने (काँग्रेस)        दत्ता ढोमने (शिवसेना)
10    बुलडाणा    उमा तायडे (भाजप)        मंगला रायपूरे (राष्ट्रवादी)
11    वर्धा    नितीन मडावी (भाजप)        कांचन नांदुरकर (भाजप)
12    चंद्रपूर    देवराव भोंगळे (भाजप)        कृष्णा सहाय (भाजप)
13    यवतमाळ    माधुरी आडे (कॉग्रेस)        श्याम जयस्वाल (भाजप)
14    गडचिरोली    योगिता भांडेकर (भाजप)        अजय कंकलावार(स्थानिक.आ)
15    नाशिक    शीतल सांगळे (शिवसेना)        नयना गावित (काँग्रेस)
16    जळगाव    उज्वला पाटील (भाजप)        नंदकिशोर महाजन (भाजप)
17    अहमदनगर    शालिनीताई विखे पाटील (काँग्रेस)    राजश्री घुले (राष्ट्रवादी)
18    औरंगाबाद    देवयानी पाटील (शिवसेना)        केशवराव ताटडे (काँग्रेस)
19    जालना    सतिश टोपे (राष्ट्रवादी)        समाधान जाधव (शिवसेना)
20    परभणी    उज्वला राठोड (राष्ट्रवादी)        भावना नखाते (राष्ट्रवादी)
21    हिंगोली    शिवराणी नरवाडे (शिवसेना)        अनिल पतंगे (राष्ट्रवादी)
22    बीड    सविता गोल्हार (भाजप)        जयश्री म्हस्के (शिवसंग्राम)
23    नांदेड    शांताबाई जळगावकर (काँग्रेस)    समाधान जाधव (राष्ट्रवादी)
24    उस्मानाबाद    नेताजी पाटील (राष्ट्रवादी)        अर्चना पाटील (राष्ट्रवादी)
25    लातूर    मिलिंद लातुरे (भाजप)        रामचंद्र तिरूके (भाजप)
-----------------------------------------------------
जिल्हा परिषद निवडणुकांतील ठळक बाबी :
*पश्चिम महाराष्ट्रातील 6 पैकी 3 जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता, नगरमध्ये काँग्रेस तर पुणे-साताऱ्यात राष्ट्रवादीचा अध्यक्ष
*उत्तर महाराष्ट्रात शिवेसना-भाजप समसमान, नाशिकमध्ये शिवसेनेचा तर जळगावात भाजपचा अध्यक्ष, नाशिकमध्ये काँग्रेसच्या मदतीने भुजबळांच्या गडावर शिवसेनेचा झेंडा
*कोकणात भाजपचा एकाही झेडपीत अध्यक्ष नाही, 
*सिंधुदुर्गात काँग्रेस, रत्नागिरीत शिवसेना तर रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा अध्यक्ष
*मराठवाड्यात 8 पैकी केवळ दोनच ठिकाणी भाजपचा अध्यक्ष, औरंगाबाद,जालना, हिंगोलीत शिवसेना, परभणी, उस्मानाबादेत राष्ट्रवादी तर नांदेडमध्ये काँग्रेस
*विदर्भात भाजपचा आवाज, गडचिरोली, बुलडाणा, चंद्रपुरात भाजपचा अध्यक्ष, तर अमरावती यवतमाळमध्ये काँग्रेसचं पारडं जड
*यवतमाळमध्ये शिवसेनेविरोधात भाजपची काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ, अध्यक्षपद काँग्रेसकडे, तर उपाध्यक्ष भाजपचा, तर जळगावात भाजप-काँग्रेस आणि शिवसेना-राष्ट्रवादी अशी विचित्र आघाडी
*हिंगोली, जालन्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपला रोखलं, हिंगोलीत अध्यक्षपद शिवसेनेकडे, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला, रावसाहेब दानवेंना होमग्राऊंडवर धक्का
*बीडमध्ये राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांनी करुन दाखवलं, धनंजय मुंडेंना धक्का देत राष्ट्रवादीच्या 5 सदस्यांचं भाजपला मतदान, पंकजांच्या हेलिकॉप्टरमधून राष्ट्रवादीचे 5 सदस्य भाजपच्या गोटात
*सोलापुरात मोठा पक्ष राष्ट्रवादी, मात्र झेडपी अध्यक्ष भाजप महाआघाडीचा! तर साताऱ्यात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता,
*अहमदनगरमध्ये अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नीची निवड
*उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर भाजपच्या मदतीने राष्ट्रवादीचा झेंडा, तर बुलडाण्यात राष्ट्रवादीकडून परतफेड, वर्धा जिल्हा परिषदेत भाजपची पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता
--------------------------------------------


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.