उमेदवारांना सर्व करारांची माहिती देणे बंधनकारक
राज्य निवडणूक आयोगाकडून शपथपत्राचा सुधारीत विहित नमुना जारी
महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाच्या एकत्रित शपथपत्राचा सुधारीत नमुना विहित नमुना राज्य निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आला आहे. महापालिका निवडणूक लढविणा-या उमेदवारांना आता कुटुंबातील सर्वांचे मागील ३ वर्षाचे उत्पन्न व आयकर रिटर्न भरल्याची माहिती नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाच्या एकत्रित शपथपत्रात देणे बंधनकारक केले असून गुन्हेगारी स्वरूपाच्या फौजदारी खटल्यांच्या माहिती बरोबर दिवाणी खटल्यांची देखील माहिती द्यावी लागणार आहे. तसेच उत्पन्नाचे स्तोत्र विविध करारनामा करून मिळवले जाते त्याची माहिती देणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. विविध प्रकारचे करारनामे केले असतील तर सर्व माहिती नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाच्या एकत्रित शपथपत्रात द्यावी लागणार आहे. एकत्रित शपथपत्राचा सुधारीत विहित नमुना निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आला आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने लोकप्रहरी विरुद्ध केंद्र शासन रिट याचिका क्र. ७८४/२०१५ मध्ये १६ फेब्रुवारी २०१८ रोजी दिलेल्या निर्णयातील निर्देशाप्रमाणे तसेच निवडणूक आयोगाने विहित केलेल्या शपथपत्रातील सुधारणा सूचना या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने सुधारित शपथपत्र विहित नमुना जारी केला आहे. सदरील शपथपत्र विहित नमुना प्रमाणे येथून पुढील सर्व महापालिकांच्या निवडणुकीत नामनिर्देशनपत्रा सोबत तपशीलवार माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाच्या एकत्रित शपथपत्रातील महत्वाचे बदल-
* यापूर्वीचे नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाच्या शपथपत्र विहित नमुना रद्द* महापालिकांच्या यापुढील सर्व निवडणुकांसाठी सुधारीत विहित नमुना शपथपत्र बंधनकारक
* महापालिका निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाच्या शपथपत्र सुधारीत विहित नमुना जारी
* फौजदारी खटल्यांच्या माहिती बरोबर वसुलीबाबत सर्व दिवाणी खटल्यांची देखील माहिती द्यावी लागणार
* विविध प्रकारचे करारनामे केले असतील तर सर्व माहिती द्यावी लागणार
* उमेदवारांना आता कुटुंबातील सर्वांचे उत्पन्नाचे स्तोत्र व मागील ३ वर्षाचे उत्पन्न व आयकर रिटर्न भरल्याची माहिती शपथपत्रात देणे बंधनकारक
* परदेशातील जंगम/स्थावर मिळकत असेल तर तपशील देणे बंधनकारक तसेच वास्तव्य असेल तर तात्पुरता पत्ता माहिती द्यावी लागणार
* उमेदवार स्वतः अथवा अवलंबित असणारे कौटुंबिक सदस्यांचे ज्या कंपनीत/फर्म/भागीदारी संस्थामध्ये भागीदार/संचालक असतील त्या संस्थेचा मागील ३ वर्षांचा कराराबाबत तपशील द्यावा लागणार
मागील ३ वर्षाचे उत्पन्नाचे तपशील-
मागील ३ वर्षाचे उत्पन्नाचे तपशील द्यावे लागणार असून यामध्ये शेती,नोकरी,व्यवसाय,भांडवली नफा,अकृषिक जमिनी,व्यापारी व निवासी गाळे,इमारती, बक्षीस/देणगी, इतर उत्पन्न, एकूण उत्पन्न तसेच आयकर विभागाला रिटर्न दाखल केलेच दिनांक व पावती क्रमांक अशा वर्गवारीत सर्व माहितीचा तपशील देणे बंधनकारक करण्यात आले आहे.उमेदवार व अवलंबून असणारे कौटुंबिक सदस्यांचे सर्व प्रकारच्या करारांची माहिती-
उमेदवार व अवलंबून असणारे कौटुंबिक सदस्यांचे सर्व प्रकारच्या करारांची माहिती तपशील देखील देणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्याही शासकीय व निमशासकीय विभागाबरोबर केलेल्या करारांचे स्वरूप व तपशील, करार कालावधी, करार रक्कम, आज पर्यंतची कराराची सद्यस्थिती पूर्णत्वास/अपूर्ण याची माहिती. तसेच कराराबाबत विवादास्पद तपशील देखील देणे बंधनकारक आहे. शासकीय व निमशासकीय विभागाबरोबरच स्थानिक स्वराज संस्था, सार्वजनिक उपक्रम, सहकारी संस्थ संस्थांबरोबर केलेल्या मागील ३ वर्षांची करारांची माहिती द्यावी लागणार आहे.कंपनीत/फर्म/भागीदारी संस्थामध्ये भागीदार/संचालक असतील त्या संस्थेचा मागील ३ वर्षांचा कराराबाबत तपशील-
उमेदवार स्वतः अथवा त्याची पत्नी/पती/अवलंबित असणारे कौटुंबिक सदस्यांचे ज्या कंपनीत/फर्म/भागीदारी संस्थामध्ये भागीदार/संचालक असतील त्या संस्थेचा मागील ३ वर्षांचा कराराबाबत तपशील द्यावा लागणार आहे. कंपनी/फर्म/भागीदार संस्थेचे नाव व कौटुंबिक सदस्य भागीदार असेल तर माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सदरील माहिती देताना संबंधित कंपनी/फर्म/भागीदारी संस्था यांचे शासकीय व निमशासकीय विभागाबरोबरच स्थानिक स्वराज संस्था, सार्वजनिक उपक्रम, सहकारी संस्थ संस्थांबरोबर केलेल्या मागील ३ वर्षांची करारांची माहिती द्यावी लागणार आहे.परकीय गुंतवणुकीचा तपशील-
परकीय गुंतवणुकीचा (जंगम/स्थावर) तसेच तपशील देखील परदेशात तात्पुरते रहिवासी असेल तर पत्ता आदी तपशील शपथपत्रात देणे बंधनकारक करण्यात आले आहे.वसुलीबाबत दिवाणी दाव्याचा तपशील-
उमेदवाराविरुद्ध सुरु असलेले वसुलीबाबत दिवाणी दाव्याचा तपशील देखील द्यावा लागणार असून यामध्ये संबंधित न्यायालय नाव, दाव्याचा क्रमांक, दावा रक्कम, दाव्याची सद्यस्थिती अशा स्वरुपात आता दिवाणी दाव्यांची माहिती तपशील द्यावा लागणार आहे. यापूर्वी केवळ फौजदारी गुन्हेगारी स्वरूपाच्या दाव्यांची माहिती घेण्यात येत होती.विहित नमुन्यातील सुधारित शपथपत्राचे "प्राब" कडून स्वागत
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्रा सोबत शपथपत्र घेण्यात येते यामध्ये परिपूर्ण माहिती तपशिलाचा अभाव होता. या त्रुटींमुळे उमेदवारांचे व कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न लपविले जात होते. लोकप्रहरी व प्राब या संस्थेसह अनेक संस्थांनी निवडणूक शपथपत्र तपशीलात सुधारणा करण्याची मागणी केल्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाने केलेले सुधारित शपथपत्र विहित नमुन्याचे पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेतर्फे अध्यक्ष चंद्रकांत भुजबळ यांनी स्वागत केले आहे.Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
सुधारित शपथपत्र---
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
=====================================================================
पुनर्प्रकाशित---
महापालिका निवडणूक नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) आवश्यक कागदपत्रे...अर्ज प्रक्रिया...जनहितार्थ माहिती
नामनिर्देशन पत्र दाखल करताना आवश्यक कागदपत्रे...
(१) ज्या प्रभागातून निवडणूक लढवावयाची आहे त्या प्रभागाचा क्रमांक व जागा क्रमांक स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.
(२) उमेदवार व प्रस्तावक यांचे नाव ज्या प्रभागाच्या मतदार यादीमध्ये आहे त्या प्रभागाचा अनुक्रमांक व मतदार यादीचा भाग क्रमांक व अनुक्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
(३) सर्व उमेदवारांनी, मग तो अपक्ष उमेदवार असो अथवा पक्षाचा पुरस्कृत उमेदवार असो, तीन चिन्हांची निवड करणे आवश्यक आहे.
(४) बंधपत्रे / कजवरोखे/भाग यांचे मूल्य सूचीतील कंपन्याच्या बाबतीत शेअर बाजारामधील सध्याच्या बाजारभाव मूल्यानुसार व सूचीबाह्य कंपन्याच्या बाबतीत पुस्तकी मूल्यानुसार देण्यात यावे.
(५) जंगम व स्थावर मालमत्तेचा तपशील देताना प्रत्येक बाबींचा तपशील स्वंतंत्रपणे द्यावा.
(६) अवलंबन म्हणजे उमेदवाराच्या मिळकतीवर अवलंबून असलेली व्यक्ती
(७) नामननर्देशनपत्रा सोबतच्या शपथपत्रामधील कोणत्याही रकान्यातील माहिती न भरल्यास अथवा रिक्त ठेवल्यास राज्य निवडणूक आयोगाच्या क्रमांक-राननआ/नप-२०१५/प्र.क्र.५/का-६, नर्द.२७/०३/२०१५ अनुसार नामनिर्देशनपत्र नाकरण्यास पात्र होऊ शकते. लागू नसलेल्या अथवा निरंक माहिती असलेल्या रकान्यामध्ये तसे स्पष्ट नमूद करणे आवश्यक आहे.
(८) पक्षाचा उमेदवार जाहीर करण्याबाबतच्या जोडपत्र-१ वर पक्षाचे अध्यक्ष, सचिव अथवा अशी सूचना पाठविण्यास अधिकृत केलेल्या पक्षाच्या अन्य पदाधीकार्यांची शाईने अथवा बॉलपॉईंट पेनने स्वाक्षरी केलेली असावी.
(९) पक्षाचा उमेदवार जाहीर करण्याबाबतच्या जोडपत्र-२ वर पक्षाचे अध्यक्ष, सचिव अथवा अशी सूचना पाठविण्यास प्राधिकृत केलेल्या पक्षाच्या अन्य पदाधिकाऱयांची शाईने अथवा बॉलपॉईंट पेनने स्वाक्षरी केलेली असावी. तसेच सदर सूचनापत्र नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3.00 वाजेपयंत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे पोहोचवणे आवश्यक आहे. कोणताही रकाना रिक्त ठेवू नये. लागू नसल्यास अथवा निरंक असल्यास तसे स्पष्ट नमूद करावे.
अधिक माहितीसाठी संपर्क- चंद्रकांत भुजबळ , फोन- ९४२३२३५३३
Political Research and Analysis Bureau (PRAB)
काय आहेत सोशल मीडियाबाबतच्या सूचना ?
१ उमेदवार म्हणून फॉर्म २६ भरताना प्रत्येकानं आपल्या सोशल मीडिया नेटवर्किंग अकाउंट्सची माहिती द्यावी.
२ आचारसंहितेदरम्यान टीव्ही, केबलवर जाहिराती दाखवण्यापूर्वी उमेदवाराला राजकीय जाहिरातींना आधीच मंजुरी (प्री-सर्टिफिकेशन) घ्यावी लागते. अन्यथा पेड न्यूजचा आरोप होतो. सोशल मीडियावरील जाहिरातींसाठीही ही मंजुरी घ्यावी. कुठल्याही वेबसाइटवर जाहिरात करण्यापूर्वी प्री-सर्टिफिकेशन करून घ्यावं.
३ सोशल मीडियाद्वारे जो प्रचार कराल, त्यासाठी आलेल्या खर्चाची माहिती आयोगाला द्यावी. रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल अॅक्ट१९५१ अंतर्गत कलम-७७(१) नुसार निवडणुकीसाठी उमेदवार जो खर्च करेल, त्याची तपशीलवार माहिती ७५ दिवसांत सबमिट करणं आवश्यक आहे.
४ इंटरनेट वा सोशल मीडियावरील कंटेटसाठीही आचारसंहिता आहे. उमेदवार आणि राजकीय पक्षाव्यतिरिक्त अन्य कुणी कंटेट पोस्ट करत असेल, तर माहिती-तंत्रज्ञान खात्याच्या सल्लानुसार त्याबाबत माहिती प्रसारित करावी.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका घोषित झाल्या आहेत आणि त्यांची आचारसंहिताही लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांना काही तत्वं पाळणं बंधनकारक असतं. पण यासंदर्भात योग्य माहिती नसल्यामुळे अनावधानानं उमेदवारांकडून काही चुका होऊ शकतात. या टाळण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून संपेपर्यंत उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता लागू असताना काय करावं आणि काय करू नये, (Dos and Don'ts) याबाबत निवडणूक आयोगानं स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत काय करावं?
१ निवडणूक घोषित होण्यापूर्वी जे कार्यक्रम सुरू झाले आहेत, ते सुरू राहू शकतात.
२ नैसर्गिक संकटं वा रोगराई आल्यास जनतेला मदत करता येते. पुनर्वसनाचं कामही करता येऊ शकतं.
३ गंभीर आजारी व्यक्तींना उपचारांसाठी उचित मान्यता घेऊन रोख रक्कम वा वैद्यकीय मदत देता येते.
४ मैदानांसारखी सार्वजनिक ठिकाणं, हेलिपॅड हे सर्वच पक्षांच्या उमेदवारांना निःपक्षपातीपणानं वापरण्यास मिळावे.
५ इतर राजकीय पक्षांवरील टीका त्यांचं कार्य आणि धोरणं याबाबतच असावी.
६ प्रत्येक व्यक्तीच्या शांततापूर्ण जीवन जगण्याच्या अधिकाराचा आदर करावा.
७ स्थानिक पोलिसांकडून सभेची जागा, वेळ याबद्दल पूर्वसूचना देऊन योग्य त्या परवानग्या घ्याव्यात.
८ कोणतेही निर्बंध वा प्रतिबंधात्मक आदेश असतील, तर त्यांचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं. त्यात सूट हवी असल्यास तसा अर्ज करावा आणि संबंधितांकडून परवानगी मिळवावी.
९ सभेत लाउडस्पीकर वापरणे आणि अन्य प्रकारच्या सुविधांसाठी आधीच परवानगी घ्यावी.
१० सभेत अडथळे आणणाऱ्यांचा बंदोबस्त पोलिसांच्याच मदतीनं करावा.
११ मिरवणूक सुरू होण्याची वेळ, जागा, मार्ग, संपण्याची वेळ, जागा आधीच निश्चित असावी. त्यासंदर्भात पोलिसांकडून परवानगी घ्यावी.
१२ मिरवणुकीच्या मार्गातील वाहतुकीचे नियम आणि अन्य निर्बंध (असल्यास) यांचंही पालन करावं.
१३ मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा येऊ नये.
१४ मतदान शांतपणे पार पडण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावं.
१५ सर्व कार्यकर्त्यांनी ओळखपत्रं आणि बिल्ले ठळकपणे लावावी.
१६ मतदारांना दिल्या जाणाऱ्या नावाच्या चिठ्ठ्यांवर पक्षांची नावं किंवा चिन्हं नसावीत. या चिठ्ठ्या साध्या कागदावरच लिहाव्या.
१७ प्रचाराचा कालावधी आणि मतदानाच्या दिवशी वाहनांवरील निर्बंधांचं पूर्णपणे पालन करावं.
१८ निवडणूक आयोगाकडून वैध अधिकारपत्र मिळालेल्यांशिवाय अन्य कुणीही मतदान कक्षात जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
१९ निवडणूक वा मतदानाबाबात तक्रार असल्यास योग्य आणि सक्षम अधिकाऱ्यांच्याच ती निदर्शनास आणून द्यावी.
२० निवडणूक आयोग आणि आयोगानं नेमलेल्या सर्वच अधिकाऱ्यांच्या आदेश, सूचनांचं काटेकोर पालन करावं.
२१ आपण एखाद्या मतदारसंघातील उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी वा मतदार नसल्यास प्रचाराचा कालावधी संपल्यावर त्या मतदारसंघात थांबू नये.
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत काय करू नये?
१ सत्ताधारी किंवा सरकारच्या कामगिरीची कोणतीही जाहिरात सरकारी खर्चानं करू नये.
२ मतदार असल्याशिवाय मतदान कक्षात आणि योग्य अधिकारपत्राशिवाय मतमोजणीच्या ठिकाणी जाऊ नये.
३ सरकारी कामांची निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिसळ / गल्लत करू नये.
४ मतदारांना पैसे वा अन्य कुठल्याही प्रकारचं प्रलोभन वा आमीष दाखवू नये.
५ मतदारांच्या जातीय समूह भावनांना आवाहन करू नये.
६ जातीय, धार्मिक वा भाषक गटांमध्ये तणाव निर्माण होईल, असं कुठलंही कृत्य करू नये.
७ इतर पक्षाचे नेते वा कार्यकर्ते यांच्या खासगी आयुष्यावर टीका करू नये.
८ इतर पक्षांचे नेते वा कार्यकर्ते यांच्यावर विपर्यस्त माहिती किंवा आंधळेपणाने झालेले आरोप यांच्याबाबत टीकाटिप्पण्णी करू नये.
९ कोणत्याही प्रार्थनास्थळाचा वापर भाषणं, पोस्टर लावणे, प्रचारगीतं वाजवणे अशा प्रकारच्या प्रचारासाठी करू नये.
१० मतदारांना प्रलोभन दाखवणं, दडपण आणणं, घाबरवणं, तोतयेगिरी, मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतरात प्रचार करणं या गोष्टी करू नयेत. मतदानापूर्वीच्या ४८ तासांत सार्वजनिक सभा घेणं, मतदारांसाठी वाहनाची व्यवस्था करण्यासही मनाई आहे.
११ लोकांच्या मतांच्या वा त्यांच्या कामांच्या निषेधासाठी घरासमोर निदर्शनं, धरणे देऊ नयेत.
१२ स्थानिक कायद्यांनुसार कुठल्याही व्यक्तीची मालमत्ता विशेष परवानगीशिवाय ध्वजदंड लावणे, निशाणं फडकावणं, सूचना वा घोषणा लिहिण्यासाठी वापरू नये.
१३ इतर राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या सभा वा मिरवणुकांत अडथळा आणू नये.
१४ अन्य पक्षांच्या सभा सुरू असतील, त्या ठिकाणांहून मिरवणुका नेऊ नयेत.
१५ शस्त्र म्हणून वापर करता येईल अशी कुठलीही गोष्ट मिरवणुकीत जवळ बाळगू नये.
१६ इतर उमेदवारांची पोस्टर फाडू नये, खराब करू नयेत.
१७ मतदानाच्या दिवशी नावांच्या चिठठ्या दिल्या जातात, अशा ठिकाणी पक्षाचं नाव, निशाणी वा प्रचार होईल असं कुठलंही साहित्य वापरू नये.
१८ एका जागी स्थिर वा वाहनांवर लावलेल्या लाउडस्पीकरचा वापर सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीशिवाय करायचा असल्यास संबंधित अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घ्यावी.
१९ संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय सभा-मिरवणुकांत लाउडस्पीकरचा वापर करू नये. लाउडस्पीकरची परवानगी स्थानिक कायदे, जागेची सुरक्षा, हवामान, सण वा परीक्षेचे दिवस आदी घटकांवर अवलंबून असते, हे लक्षात घ्यावे.
२० निवडणुकीच्या काळात दारूचे वाटप करू नये.
२१ सरकारी सुरक्षा असलेल्या व्यक्तीनंही सुरक्षा रक्षकांसह मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आतील भागात प्रवेश करू नये.
२२ खासगी सुरक्षा व्यवस्था वापरणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची नेमणूक निवडणूक वा मतदान वा मतमोजणी प्रतिनिधी म्हणून करू नये.
=
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो
Political Research and Analysis Bureau (PRAB)
नामनिर्देशनपत्र / शपथपत्र /पक्षाचे जोडपत्र भरण्या करिता सूचना

....नाहीतर नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) अवैध (बाद) होईल!
नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) भरताना खालील सर्व कागदपत्रांची व माहितीची पूर्तता केली आहे का ?
नसेल केली तर करावी जेणेकरून आपला अर्ज अवैध (बाद) ठरणार नाही याची काळजी घ्यावी
===========00-===========
'सोशल मीडिया आणि निवडणूक आचारसंहिता'..... “पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’ (चंद्रकांत भुजबळ) ही अचूक सर्वेक्षण अंदाज वर्तविणारी एकमेव विश्वसनीय संस्था आहे.
'सोशल मीडिया आणि निवडणूक आचारसंहिता'
सोशल मीडियाद्वारे लोकांशी संवाद साधणं, माहिती आणि विचारांची देवाण-घेवाण करणं सोपं होतं. सोशल मीडियाचा प्रभाव वाढला असून निवडणूक प्रचारातही या मीडियाचा वापर होतोय. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात सोशल मीडियाच्या (use of Social Media during Election code of conducts) वापरासाठीही निवडणूक आयोगानं काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.काय आहेत सोशल मीडियाबाबतच्या सूचना ?
१ उमेदवार म्हणून फॉर्म २६ भरताना प्रत्येकानं आपल्या सोशल मीडिया नेटवर्किंग अकाउंट्सची माहिती द्यावी.
२ आचारसंहितेदरम्यान टीव्ही, केबलवर जाहिराती दाखवण्यापूर्वी उमेदवाराला राजकीय जाहिरातींना आधीच मंजुरी (प्री-सर्टिफिकेशन) घ्यावी लागते. अन्यथा पेड न्यूजचा आरोप होतो. सोशल मीडियावरील जाहिरातींसाठीही ही मंजुरी घ्यावी. कुठल्याही वेबसाइटवर जाहिरात करण्यापूर्वी प्री-सर्टिफिकेशन करून घ्यावं.
३ सोशल मीडियाद्वारे जो प्रचार कराल, त्यासाठी आलेल्या खर्चाची माहिती आयोगाला द्यावी. रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल अॅक्ट१९५१ अंतर्गत कलम-७७(१) नुसार निवडणुकीसाठी उमेदवार जो खर्च करेल, त्याची तपशीलवार माहिती ७५ दिवसांत सबमिट करणं आवश्यक आहे.
४ इंटरनेट वा सोशल मीडियावरील कंटेटसाठीही आचारसंहिता आहे. उमेदवार आणि राजकीय पक्षाव्यतिरिक्त अन्य कुणी कंटेट पोस्ट करत असेल, तर माहिती-तंत्रज्ञान खात्याच्या सल्लानुसार त्याबाबत माहिती प्रसारित करावी.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका घोषित झाल्या आहेत आणि त्यांची आचारसंहिताही लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांना काही तत्वं पाळणं बंधनकारक असतं. पण यासंदर्भात योग्य माहिती नसल्यामुळे अनावधानानं उमेदवारांकडून काही चुका होऊ शकतात. या टाळण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून संपेपर्यंत उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता लागू असताना काय करावं आणि काय करू नये, (Dos and Don'ts) याबाबत निवडणूक आयोगानं स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत काय करावं?
१ निवडणूक घोषित होण्यापूर्वी जे कार्यक्रम सुरू झाले आहेत, ते सुरू राहू शकतात.
२ नैसर्गिक संकटं वा रोगराई आल्यास जनतेला मदत करता येते. पुनर्वसनाचं कामही करता येऊ शकतं.
३ गंभीर आजारी व्यक्तींना उपचारांसाठी उचित मान्यता घेऊन रोख रक्कम वा वैद्यकीय मदत देता येते.
४ मैदानांसारखी सार्वजनिक ठिकाणं, हेलिपॅड हे सर्वच पक्षांच्या उमेदवारांना निःपक्षपातीपणानं वापरण्यास मिळावे.
५ इतर राजकीय पक्षांवरील टीका त्यांचं कार्य आणि धोरणं याबाबतच असावी.
६ प्रत्येक व्यक्तीच्या शांततापूर्ण जीवन जगण्याच्या अधिकाराचा आदर करावा.
७ स्थानिक पोलिसांकडून सभेची जागा, वेळ याबद्दल पूर्वसूचना देऊन योग्य त्या परवानग्या घ्याव्यात.
८ कोणतेही निर्बंध वा प्रतिबंधात्मक आदेश असतील, तर त्यांचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं. त्यात सूट हवी असल्यास तसा अर्ज करावा आणि संबंधितांकडून परवानगी मिळवावी.
९ सभेत लाउडस्पीकर वापरणे आणि अन्य प्रकारच्या सुविधांसाठी आधीच परवानगी घ्यावी.
१० सभेत अडथळे आणणाऱ्यांचा बंदोबस्त पोलिसांच्याच मदतीनं करावा.
११ मिरवणूक सुरू होण्याची वेळ, जागा, मार्ग, संपण्याची वेळ, जागा आधीच निश्चित असावी. त्यासंदर्भात पोलिसांकडून परवानगी घ्यावी.
१२ मिरवणुकीच्या मार्गातील वाहतुकीचे नियम आणि अन्य निर्बंध (असल्यास) यांचंही पालन करावं.
१३ मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा येऊ नये.
१४ मतदान शांतपणे पार पडण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावं.
१५ सर्व कार्यकर्त्यांनी ओळखपत्रं आणि बिल्ले ठळकपणे लावावी.
१६ मतदारांना दिल्या जाणाऱ्या नावाच्या चिठ्ठ्यांवर पक्षांची नावं किंवा चिन्हं नसावीत. या चिठ्ठ्या साध्या कागदावरच लिहाव्या.
१७ प्रचाराचा कालावधी आणि मतदानाच्या दिवशी वाहनांवरील निर्बंधांचं पूर्णपणे पालन करावं.
१८ निवडणूक आयोगाकडून वैध अधिकारपत्र मिळालेल्यांशिवाय अन्य कुणीही मतदान कक्षात जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
१९ निवडणूक वा मतदानाबाबात तक्रार असल्यास योग्य आणि सक्षम अधिकाऱ्यांच्याच ती निदर्शनास आणून द्यावी.
२० निवडणूक आयोग आणि आयोगानं नेमलेल्या सर्वच अधिकाऱ्यांच्या आदेश, सूचनांचं काटेकोर पालन करावं.
२१ आपण एखाद्या मतदारसंघातील उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी वा मतदार नसल्यास प्रचाराचा कालावधी संपल्यावर त्या मतदारसंघात थांबू नये.
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत काय करू नये?
१ सत्ताधारी किंवा सरकारच्या कामगिरीची कोणतीही जाहिरात सरकारी खर्चानं करू नये.
२ मतदार असल्याशिवाय मतदान कक्षात आणि योग्य अधिकारपत्राशिवाय मतमोजणीच्या ठिकाणी जाऊ नये.
३ सरकारी कामांची निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिसळ / गल्लत करू नये.
४ मतदारांना पैसे वा अन्य कुठल्याही प्रकारचं प्रलोभन वा आमीष दाखवू नये.
५ मतदारांच्या जातीय समूह भावनांना आवाहन करू नये.
६ जातीय, धार्मिक वा भाषक गटांमध्ये तणाव निर्माण होईल, असं कुठलंही कृत्य करू नये.
७ इतर पक्षाचे नेते वा कार्यकर्ते यांच्या खासगी आयुष्यावर टीका करू नये.
८ इतर पक्षांचे नेते वा कार्यकर्ते यांच्यावर विपर्यस्त माहिती किंवा आंधळेपणाने झालेले आरोप यांच्याबाबत टीकाटिप्पण्णी करू नये.
९ कोणत्याही प्रार्थनास्थळाचा वापर भाषणं, पोस्टर लावणे, प्रचारगीतं वाजवणे अशा प्रकारच्या प्रचारासाठी करू नये.
१० मतदारांना प्रलोभन दाखवणं, दडपण आणणं, घाबरवणं, तोतयेगिरी, मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतरात प्रचार करणं या गोष्टी करू नयेत. मतदानापूर्वीच्या ४८ तासांत सार्वजनिक सभा घेणं, मतदारांसाठी वाहनाची व्यवस्था करण्यासही मनाई आहे.
११ लोकांच्या मतांच्या वा त्यांच्या कामांच्या निषेधासाठी घरासमोर निदर्शनं, धरणे देऊ नयेत.
१२ स्थानिक कायद्यांनुसार कुठल्याही व्यक्तीची मालमत्ता विशेष परवानगीशिवाय ध्वजदंड लावणे, निशाणं फडकावणं, सूचना वा घोषणा लिहिण्यासाठी वापरू नये.
१३ इतर राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या सभा वा मिरवणुकांत अडथळा आणू नये.
१४ अन्य पक्षांच्या सभा सुरू असतील, त्या ठिकाणांहून मिरवणुका नेऊ नयेत.
१५ शस्त्र म्हणून वापर करता येईल अशी कुठलीही गोष्ट मिरवणुकीत जवळ बाळगू नये.
१६ इतर उमेदवारांची पोस्टर फाडू नये, खराब करू नयेत.
१७ मतदानाच्या दिवशी नावांच्या चिठठ्या दिल्या जातात, अशा ठिकाणी पक्षाचं नाव, निशाणी वा प्रचार होईल असं कुठलंही साहित्य वापरू नये.
१८ एका जागी स्थिर वा वाहनांवर लावलेल्या लाउडस्पीकरचा वापर सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीशिवाय करायचा असल्यास संबंधित अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घ्यावी.
१९ संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय सभा-मिरवणुकांत लाउडस्पीकरचा वापर करू नये. लाउडस्पीकरची परवानगी स्थानिक कायदे, जागेची सुरक्षा, हवामान, सण वा परीक्षेचे दिवस आदी घटकांवर अवलंबून असते, हे लक्षात घ्यावे.
२० निवडणुकीच्या काळात दारूचे वाटप करू नये.
२१ सरकारी सुरक्षा असलेल्या व्यक्तीनंही सुरक्षा रक्षकांसह मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आतील भागात प्रवेश करू नये.
२२ खासगी सुरक्षा व्यवस्था वापरणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची नेमणूक निवडणूक वा मतदान वा मतमोजणी प्रतिनिधी म्हणून करू नये.
“पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’ (चंद्रकांत भुजबळ)
ही अचूक सर्वेक्षण अंदाज वर्तविणारी एकमेव विश्वसनीय संस्था आहे

No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.