Thursday 9 August 2018

हरिवंश सिंह राज्यसभेचे उपसभापती

राज्यसभेच्या उपसभापतीपदी एनडीएचे हरिवंश सिंह


राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार हरिवंश नारायण सिंह हे विजयी झाले. हरिवंश सिंह यांना 125 मतं मिळाली तर बीके हरिप्रसाद यांना 105 मतं मिळवता आली. 245 सदस्यांच्या राज्यसभेत सध्या 244 खासदार आहेत, तर एक जागा रिक्त आहे. पण 230 खासदारांनीच मतदानात सहभाग घेतला. एनडीएच्या या विजयात सर्वात मोठं योगदान बीजू जनता दलाचं आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरिवंश नारायण सिंह यांचे अभिनंदन केले. राज्यसभा उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून हरिवंश नारायण सिंह यांना, तर संयुक्त पुरोगामी आघाडीकडून बी. के. हरिप्रसाद यांना उमेदवारी दिली होती. राज्यसभेत आज निवडणूक घेण्यात आली. सुरुवातीला आवाजी मतदान घेण्यात आलं. मात्र, कोणताही निर्णय होऊ न शकल्यानं मतदान घेण्यात आलं. एनडीएच्या हरिवंश नारायण सिंह यांना १२५ मते मिळाली. तर यूपीएचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांना १०५ मते मिळाली. त्यानंतर राज्यसभेच्या उपसभापतिपदी हरिवंश सिंह हे विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यांचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी अभिनंदन केले. 'हरिवंश हे एनडीएचे उमेदवार होते. पण आता उपसभापतिपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ते आता कोणत्याही एका पक्षाचे नाहीत. त्यांनी चांगलं काम करावं. आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठिशी आहेत,' असं आझाद म्हणाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हरिवंश सिंह यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीत भाजपचा फायदाच फायदा झाला आहे. राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडूसह आता उपसभापती देखील भाजपच्या पसंतीचा आहे. राज्यसभेची सदस्य संख्या २४४ आहे. जर सभागृहात सर्व सदस्य उपस्थित असते तर विजयासाठी १२३ मतांची गरज असती. 

कोण आहेत हरिवंश?

बिहाराचे प्रतिनिधित्व करणारे हरिवंश सिंह माजी पत्रकार आहेत. हरिवंश नारायण सिंह यांचा जन्म 30 जून 1956 रोजी बलिया जिल्ह्यातील सिताबदियारा गावात झाला होता. हरिवंश जेपी आंदोलनामुळे प्रेरित झाले होते. त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात एमए आणि पत्रकारितेत डिप्लोमाचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात टाइम्स समूहातून केली होती. भाजप नेहमी मित्र पक्षांना बाजूला ठेवतो ही तक्रार दुर करण्यासाठी जेडीयूच्या सिंह यांचे नाव निश्चित करण्यात आले. उत्तर प्रदेशमधील बलिया येथे राजपूत कुटुंबात जन्मलेल्या सिंह यांनी बनारस हिंदू विद्यापीठात शिक्षण घेतले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी एका बँकेत काम केले. त्यानंतर पत्रकारीतेत प्रवेश केला. १९८९ मध्ये त्यांनी प्रभात वृत्तपत्रात काम करण्यास सुरुवात केली. या दैनिकाचे ते संपादक देखील होते. त्यांनी ‘मैंने दुनिया देखी’नावाचे पुस्तक लिहले. पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या सिंह यांनी जेडीयूने राज्यसभेची २०१४ मध्ये उमेदवारी दिली. हरिवंश हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे अतिशय जवळचे आहेत. जयप्रकाश नारायण आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याशी देखील त्यांचे जवळचे संबंध होते. यानंतर हरिवंश सिंह यांच्याकडे धर्मयुग या साप्ताहिकाची जबाबदारी सोपवण्यात आली. 1981 पर्यंत हरिवंश सिंह धर्मयुगचे उपसंपादक होते. यानंतर त्यांनी पत्रकारिता सोडली आणि 1981 पासून 1984 पर्यंत हैदराबाद, पाटणामध्ये बँक ऑफ इंडियात नोकरी केली. 1984 मध्ये ते पुन्हा एकदा पत्रकारितेत परतले आणि 1989 पर्यंत त्यांनी 'आनंद बाजार पत्रिका'च्या 'रविवार' या साप्ताहिकाचे सहाय्यक संपादक म्हणून काम केलं.हरिवंश सिंह यांची जेडीयूचे सरचिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली. 2014 मध्ये जेडीयूने हरिवंश यांना राज्यसभेसाठी नामांकित केलं. अशाप्रकारे हरिवंश सिंह पहिल्यांदा संसदेत पोहोचले. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.