Tuesday, 15 December 2020

सरपंचपदाची आरक्षण सोडत रद्द; सरपंच निवडीवर थेट परिणाम

निवडणुकीनंतर सरपंचांची सोडत काढण्याचा निर्णय


राज्यातल्या 14 हजार ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा उलटफेर करणारा निर्णय ग्रामविकास मंत्रालयाने घेतला आहे. ज्या आठ जिल्ह्यात निवडणुकीआधीच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले होते, तेथेही ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत पूर्ण होणार आहे. या निर्णयानंतर संबंधित जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने आदेश काढून जुने आरक्षण रद्द केले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदाची सोडत ही आधी होत असते. पण यात होणारा घोडेबाजार, खोटी जातप्रमाणपत्र दाखवण्याचे प्रकार समोर आले आहे. यामुळे राज्यातल्या 14 हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजेच जानेवारीत काढण्यात येणार आहे. अनेक राज्यांत अशी पद्धत असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. सरपंच निवडणुकीच्या निमित्ताने होणारा घोडेबाजार तसेच खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे सरपंचपद मिळविण्याचे प्रकार रोखण्यासाठी राज्यात प्रथमच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार सध्या निवडणूक होत असलेल्या १४ हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचांची आरक्षण सोडत जानेवारीमध्ये काढण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान तर १८ जानेवारीला मतमोजणी होईल. त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रचलित पद्धतीनुसार निवडणुकीपूर्वी सरपंच पदाची आरक्षण सोडत काढली जात होती. या वेळीही आठ जिल्ह्यांत जिल्हाधिका-यांनी त्या जिल्ह्यांत होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत काढली आहे. मात्र, आधीच आरक्षण सोडत काढल्याने सरपंच होण्यासाठी किंवा त्या पदावर आपल्या मर्जीतील व्यक्तीची वर्णी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होतो. तसेच बनावट जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणूक लढवून सरपंच होणा-यांचीही संख्या वाढत आहे. या प्रकारांना लगाम घालण्यासाठी आरक्षण सोडत पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महिन्यात राज्यभरात होणा-या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदाची सोडत निवडणूक झाल्यानंतर काढण्यात येईल, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली. नव्या पद्धतीमुळे योग्य उमेदवार सरपंच पदावर निवडून येईल आणि त्याला पूर्ण कार्यकाळ मिळेल तसेच निवडणुकीत त्याला पराभूत करण्यासाठी होणारे अभद्र प्रयत्न टाळता येतील, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार असून 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

ग्रामपंचायत सदस्य आता सातवी उत्तीर्णच हवा

देशाचे भवितव्य ठरवणाऱ्या, कायदे बनवणाऱ्या आमदार, खासदारांना निवडणूक लढण्यासाठी शिक्षणाची अट नाही. मात्र ग्राम पंचायत सदस्य होण्यासाठी  किमान सातवी उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने गेल्या आठवडय़ात काढलेल्या या आदेशाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या आदेशानुसार ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढण्यासाठी  किमान सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याशिवाय  उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. गेल्या सरकारने सरपंचाची निवड थेट निवडणुकीद्वारे करण्याचा कायदा केला होता. आता निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंच निवडण्यात येणार आहे. त्यासाठी सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ नुसार अधिसूचना काढण्यात आली. त्यात कलम १३ च्या पोट कलम २ अ मध्ये सरपंच या शब्दाऐवजी सदस्य हा शब्द टाकण्यात आला आहे. म्हणजेच सदस्यांना सातवीचा वर्ग उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २४३ के व २४३ झेडए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पर्यवेक्षण, संचालन व नियंत्रण यांची संपूर्ण जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील उमेदवारांसाठी शैक्षणिक अट आवश्यक मानली जाते, त्यासाठी कायदा केला जातो. परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवणाऱ्यांसाठी शैक्षणिक अर्हता निर्धारित केली जात नाही. कारण, अशी शैक्षणिक अट घालण्यासाठी राज्यघटनेच्या कलम ८३/१७३ किंवा लोकप्रतिनिधी कायद्यात बदल करण्यासाठी दुरुस्ती करावी लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ डिसेंबपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. १५ जानेवारीला मतदान होणार आहे. जो उमेदवार १९९५ नंतर जन्मलेला असेल  आणि ज्याला सदस्य किंवा सरपंच म्हणून नियुक्त करायचे असेल तो उमेदवार सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  निवडणूक अर्ज भरताना अर्जदार २१ वर्षांपेक्षा कमी वयाचा नसावा, उमेदवाराचे नाव मतदार यादीत असावे. संसदेच्या माध्यमातून खासदार आणि विधिमंडळाच्या माध्यमातून आमदार कायदा बनवतात. हे कायदे देशाचे आणि राज्याचे भवितव्य निर्धारित करतात.  इतकी महत्त्वाची जबाबदारी असलेल्या लोकप्रतिनिधींना त्यांची शैक्षणिक पात्रता विचारली जात नाही. मात्र, केवळ गावापुरते मर्यादित अधिकार असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांसमोर शैक्षणिक अट घालण्यात आली आहे, असा आक्षेप ग्रामीण स्तरातून होत आहे.

जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पोचपावती आवश्यक

राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मूभा आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 11 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 30 डिसेंबर 2020 पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. राखीव जागांवर निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशपत्र दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाबाबतचा पुरावा सादर करण्याबरोबरच एक हमीपत्रही देणे आवश्यक राहील. विजयी झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले जाईल, असे या हमीपत्रात नमूद करावे लागेल.

ग्रामपंचायत निवडणुकीत अखेर ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास परवानगी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना उडालेला गोंधळ, नेटवर्कची समस्या आणि इंटरनेटचे स्पीड यामुळे अनेक उमेदवार अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन अखेरच्या क्षणी राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईनसह ऑफ लाईन देखील अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी बुधवार (दि.30) अखेरची मुदत असून, इच्छुक उमेदवारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. यंदा राज्या निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीत केवळ ऑनलाईन पध्दतीने चे उमेदवारी अर्ज स्वीकारणे बंधनकारक केले. परंतू उमेदवारी अर्ज भरण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाची असलेली पंचायत इलेक्शन ही वेबसाईट अत्यंत स्लो काम करत असल्याने तसेच ग्रामीण भागात पुरेसे इंटरनेट उपलब्ध नसल्यामुळे उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी आता रात्रपाळी करावी लागली. तर दुसरीकडे जात पडताळणी करता कराव्या लागणाऱ्या अर्जासाठी ची वेबसाईट देखील अडखळत असल्याने आणि उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करता येत नसल्याने उडालेला गोंधळ लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने आज सायंकाळी या दोन्ही प्रक्रिया ऑनलाइन बरोबरच ऑफलाइन देखील करण्यास परवानगी दिली. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळावर पुरेसे स्पीड मिळत नसल्याने एक अर्ज भरण्यासाठी तीन-चार तासांचा वेळ लागत होता. उमेदवारांना रात्रभर नेट कॅफे, महा ई सेवा केंद्रांमध्ये थांबावे लागत असून , काही उमेदवार दोन दोन दिवस प्रयत्न करूनही त्यांचे अर्ज भरले जात नव्हते. राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते किंवा जात पडताळणी समितीकडे अर्ज केल्याची पोहोच पावती जोडणे बंधनकारक आहे , अन्यथा हे उमेदवार निवडणुकीत अपात्र ठरतात जात पडताळणीसाठी ऑनलाईन पद्धतीने बार्टी कडे अर्ज करावा लागतो त्यासाठीची वेबसाईट देखील अत्यंत धिम्या गतीने काम करत असल्याने उमेदवारांची अडचण झाली . त्यामुळे सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचे प्रक्रिया ऑनलाइन अर्ज भरताना प्रचंड गोंधळ उडाला. जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य निवडणूक आयोगाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी आयोगाने ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

Friday, 11 December 2020

पुणे जिल्ह्यांतील 748 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान


कोरोनाचे संकट आणि लाॅकडाऊन यामुळे रखडलेल्या जिल्ह्यातील तब्बल पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे 748 ग्रामपंचायतींचा निवडणुक रणसंग्राम अखेर जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. तर 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात निम्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. यंदा मार्च महिन्यात कोरोनाचे संकट आले. त्यानंतर केंद्र शासनाने लाॅकडाऊन जाहिर केले. यामुळे जिल्ह्यातील एप्रिल ते जून 2020 आणि नंतर जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 748 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडल्या. यामुळे शासनाने या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले. राज्यात पदवीधर, शिक्षक आमदारकीचा निवडणुका झाल्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकाचा रणसंग्राम गाजणार आहे.
पुणे जिल्ह्यातील निवडणुका होणा-या तालुकानिहाय ग्रामपंचायती-
खेड - 91, भोर- 73, शिरूर- 71, जुन्नर- 66, पुरंदर- 68, इंदापूर- 60, मावळ - 57, हवेली- 54, बारामती- 52, दौंड - 51, मुळशी - 45, वेल्हा - 31, आंबेगाव- 29, पिंपरी-चिंचवड- 1 , एकूण : 748 

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम- 

तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणे :- १५ डिसेंबर
उमेदवारी अर्ज दाखल करणे :- २३ डिसेंबर ते 30 डिसेंबर
उमेदवारी अर्जांची छाननी :- 31 डिसेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत :- 4 जानेवारी 2021
मतदान :- 15 जानेवारी 2021
मतमोजणी :- 18 जानेवारी

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व  ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल, असे त्यांनी सांगितले. विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत. निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234. 
      दरम्यान एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या/ नवनिर्मित 1 हजार 566; तसेच जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधित मुदत संपणाऱ्या/ नवनिर्मित 12 हजार 667 अशा एकूण 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी या मतदार याद्या तयार केल्या जातील. यातील एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोवीडची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता; तर 19 नोव्हेंबर 2020 रोजी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्यात आली. या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेल्या विधानसभेच्या मतदार याद्यांवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेच्या या मतदार याद्या 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित होत्या; परंतु भारत निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार याद्या 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्या आहेत. मतदार याद्यांत नाव नोंदविलेल्या सर्वांना मतदान करता यावे किंवा निवडणूक लढविता यावी, हे लोकशाहीचे मुलभूत तत्व आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमासह 5 फेब्रुवारी 2020 च्या आदेशान्वये तयार केलेल्या मतदार याद्यादेखील रद्द केल्या होत्या. आता निवडणूक प्रक्रिया रद्द झालेल्या ग्रामपंचायतींसह एकूण 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम राबविण्यात आला आहे.

उमेदवारी अर्ज भरताना......

उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराला लागणारी माहिती आरक्षण वर्ग, वॉर्ड क्रमांक, जागा क्रमांक, जन्मतारखेचा पुरावा (जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला), जातीचा दाखला झेरॉक्‍स, जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी पोचपावती, पॅन कार्ड, आधार कार्ड, शैक्षणिक अहर्ता, मुलांच्या जन्मतारखा व नाव, गुन्हे दाखल असेल तर याची सविस्तर माहिती, केस नंबर कलम कोर्टात दाखल झालेली तारीख, उमेदवाराची पत्नी/पती, मुले व्यवसाय करीत असेल व इन्कम टॅक्‍स भरत असेल तर त्याची चार वर्षाची रिटर्न फाईल केल्याचा दिनांक व पावती, बचत खाते मुदत ठेवी यांची माहिती (उमेदवार पती/पत्नी मुले), शेअर्स, म्युचअल फंड, कर्जरोखे, पोस्ट एफडी, कंपन्यांमधील गुंतवणूक, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट यातील गुंतवणूक यांचा तपशील द्यावा. एलआयसी पॉलिसी तपशील (उमेदवार पती/पत्नी मुले), दुचाकी, चारचाकी, व्यावसायिक गाड्यांचे नंबर व खरेदी किंमत (उमेदवार पती/पत्नी मुले), सोने, चांदी, हिरे यांची माहिती, शेती, एनए जमीन, घर, कमर्शिअल मालमत्ता यांचे गुंठे, स्क्वेअर फूटामध्ये माहिती (उमेदवार पती/पत्नी मुले), मालमत्ता खरेदीची असेल तर खरेदीचा दिनांक, खरेदीची किंमत, मालमत्ता खरेदी करण्यासाठी चार रकमेचा स्तोत्र उदाहरणार्थ कर्ज सोनेतारण स्वअर्जित (मालमत्ता विकून) भागीदारी, हातउचल इत्यादी, जॉइंट व्हेंचर असेल तर त्याचा तपशील, बक्षीसपत्र मालमत्ता असेल तर त्याची झेरॉक्‍स, कर्ज रक्कम बॅंकेचे नाव कर्जाचा प्रकार (उमेदवार पती-पत्नी मुले) कर्ज शिल्लक रक्कम, देणे रक्कम गृहनिर्माण विभाग पाणीपुरवठा वीजबिल महसूल देणे दूरध्वनी स्थानिक स्वराज्य संस्था कर माहिती, आयकर, संपत्ती कर, सेवा कर, सेल टॅक्‍स जीएसटी इत्यादी कर माहिती, उमेदवार पती-पत्नी मुले यांच्या शासकीय कामाचा ठेका घेतला असेल तर त्याची वर्कऑर्डर झेरॉक्‍स, कंपनी फार्म भागीदार व्यवसाय असेल तर व्यवसायाचे नाव पत्ता व तीन वर्षे करार तपशील, उमेदवाराचे विरुद्ध वसुलीबाबत दिवानी दाव्याचा तपशील (न्यायालय केस नंबर रक्कम सद्यस्थिती), निवडणुकीसाठी नवीन खाते उघडावे लागेल (राष्ट्रीयीकृत बॅंक शेड्युल बॅंक) ही सर्व माहिती उमेदवाराचा ऑनलाइन फॉर्म भरताना लागणार आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

Wednesday, 9 December 2020

पुणे जिल्ह्यातील 756 गावांचे सरपंचपद खुले तर महिलांसाठी 383 सरपंचपद आरक्षित

पुणे जिल्ह्यातील 1408 ग्रामपंचायतींपैकी 1400 गावातील सरपंचपदाचे आरक्षण सोडत जाहीर

पुणे जिल्ह्यातील 1 हजार 408 ग्रामपंचायतींपैकी 1 हजार 400 गावातील सरपंच पदाचे आरक्षण आज काढण्यात आली आहे. दर पाच वर्षांनी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले जाते. आरक्षण जाहीर झाल्यानंतर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपासून या नवीन आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात येते.  पुणे जिल्ह्यातील 756 गावांचे सरपंचपद खुले असून 383 महिलांसाठी आरक्षित आहे. डिसेंबर अखेरपर्यंत पुणे जिल्ह्यातील 749 ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येत आहे. यापैकी मुदत शिल्लक असलेल्या ग्रामपंचायतींचा अपवाद वगळता अन्य सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. आगामी 2021 वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी 8 ग्रामपंचायती नव्याने अस्तित्वात आलेल्या आहेत. त्यामुळे आज या नवीन ग्रामपंचायतींचे आरक्षण काढण्यात आलेले नाही. उर्वरित 1 हजार 400 पैकी 114 ग्रामपंचायती या आदिवासी क्षेत्रातील (पेसा क्षेत्र) आहेत, त्यामुळे या पेसा क्षेत्रातील सर्वच्या सर्व ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे अनुसूचित जमातीसाठी (एस.टी.) राखीव ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या कारभाऱ्यांची आरक्षण सोडत काढण्यात आली नाही. या पैकी केवळ 58 जागा महिलांसाठी निश्‍चित करण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींपैकी खुल्या गटासाठी ७५६ ग्रामपंचायतींचे सरपंच पद असणार असून, त्यामध्ये ३८३ महिलांना संधी मिळणार आहे. इतर मागास प्रवर्गासाठी ३४७ जागा या आरक्षित आहेत. त्यामध्ये १७७ महिला असणार आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंचपदाच्या २३९ जागांपैकी १२४ महिला सरपंचांची निवड होणार आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या ५८ जागांपैकी ३० जागा या महिलांसाठी राखीव असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 1 डिसेंबर प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे. दि. 1 ते 7 डिसेंबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करून घेणे. तर 10 डिसेंबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे प्रवर्गनिहाय नवे आरक्षण खालीलप्रमाणे-:
● अनुसूचित जमाती (एस.टी.) :- 58 (महिलांसाठी-33)
● पेसा क्षेत्र (फक्त एस.टी.) :- 114 (महिलांसाठी-58)
● नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) :- 347 (महिलांसाठी-177)
● सर्वसाधारण (खुले) :- 756 (महिलांसाठी-383)
● आरक्षण काढण्यात येणाऱ्या ग्रामपंचायती :- 1400
● महिलांसाठी राखीव गावांची संख्या :- 717 (सर्व प्रवर्ग मिळून)
● खुल्या गटासाठीच्या ग्रामपंचायती :- 683 (सर्व प्रवर्ग मिळून) 

हवेली तालुक्‍यातील या 54 ग्रामपंचायतींची होणार निवडणूक-

आळंदी म्हातोबाची, कुंजीरवाडी, लोणी काळभोर, तरडे, थेऊर, अष्टापूर, भवरापूर, हिंगणगाव, कोरेगांवमुळ, नायगांव, न्हावी सांडस, पेठ, प्रयागधाम, ऊरूळी कांचन, सांगवी सांडस, शिंदेवाडी, शिंदवणे, वळती, सोरतापवाडी, बकोरी, भावडी, बिवरी, डोंगरगांव, केसनंद, शिरसवडी, तुळापूर, वढू खुर्द, बहुली, खडकवाडी, कुडजे, मांडवी बुद्रुक, मांडवी खुर्द, सांगरूण, औताडे हंडेवाडी, शेवाळेवाडी, वडाचीवाडी, वडकी, डोणजे, घेरासिंहगड, गोऱ्हे बुद्रुक, गोऱ्हे खुर्द, सोनापूर, आंबी, जांभळी, मणेरवाडी, वरदाडे, आर्वी, गाऊडदरा, खेडशिवापूर, कोंढणपूर, रहाटवडे, शिवापूर, श्रीरामनगर, मांजरी खुर्द.

शिरूर तालुक्‍यात या ग्रामपंचायतींची होणार निवडणूक-

शिरूर तालुक्‍यात नव्याने तीन ग्रामपंचायती स्थापित झाल्या आहेत. त्यामध्ये मूळ टाकळी हाजी ग्रामपंचायतीमधून विभाजन होऊन नव्याने माळवाडी आणि म्हसे बुद्रुक या दोन, तर मूळ जांबुत ग्रामपंचायतीमधून विभाजन होऊन सरदवाडी ही एक अशा एकूण तीन ग्रामपंचायत नव्याने स्थापन झाल्या आहेत.
शिरूर तालुक्‍यातील लक्षवेधी ग्रामपंचायतींमध्ये - सणसवाडी, पाबळ, न्हावरा, तळेगाव ढमढेरे, केंदूर, जांबुत, शिक्रापूर, करंदी, कारेगाव, कवठे यमाई, वडगाव रासाई, कोरेगाव भिमा, पिंपळे जगताप आणि टाकळी हाजी या सर्व ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

खेड तालुक्‍यातील या 162 ग्रामपंचायतींची सोडत

सर्वसाधारण : कान्हेवाडी तर्फे चाकण, खराबवाडी,वराळे, येलवाडी , सिध्देगव्हाण, साबळेवाडी,भोसे, केळगाव, धानोरे, चिंबळी , बोरदरा, संतोष नगर, शिंदे, वासुली,पाळु, तोरणे बु.,शिवे,देशमुखवाडी,गडद,औंढे,कुरकुंडी, कोरेगाव खुर्द,तिफणवाडी,कान्हेवाडी बु.,कोहिंडे बु., गारगोटवाडी,चास,मोहकल, चांडोली,खरपुडी बु., जऊळके बु,राक्षेवाडी,वरची भाबुंरवाडी, खालची भाबुंरवाडी, गोसासी, चिंचबाई वाडी ,वाकळवाडी, वरुडे,
 सर्वसाधारण महिला : वेताळे, साबुर्डी, कमान, बुरसेवाडी ( बिबी ),वाशेरे,तळवडे, आखरवाडी,रानमळा, पापळवाडी, बहिरवाडी, मिरजेवाडी, पाडळी, सांडभोरवाडी,माजंरेवाडी,टाकळकरवाडी,जऊळुके खु., खरपुडी खु., पिपंरी बु., पुर,गाडकवाडी,निमगाव,दावडी,बहुळ, सोळु, च-होली खु.,शेलगाव, भांबोली, आसखेड खु.,आसखेड बु., धामणे, टेकवडी, हेद्रूज, वहागाव, कोळीये, आंबोली,औदर,चिखलगाव,कळमोडी, वाळद, किवळे, कोये
नागरीकांचा मागास प्रवर्ग : येणिये बु., कडुस, दोंदे, सायगाव, गुळाणी , वाफगाव, चिंचोशी, रेटवडी, जैदवाडी,कोहिणकरवाडी, वाकी बु., सावरदरी,चांदुस, दौंडकरवाडी, वडगाव घेनंद, गोलेगाव,मरकळ,कोयाळी तर्फे चाकण, पिंपळगाव तर्फे खेड.
नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला : पाईट,वाडा, सुपे,आडगाव,अनावळे,अहिरे,रौधंळवाडी, वि-हाम,कुडे खु.,येणिये खु.,कडधे,वडगांव पाटोळे, कडाचीवाडी,कुरुळी, निघोजे,म्हाळुंगे, रोहकल,शेलु. 
बिगर अनुसुचित क्षेत्रातील अनुसुचित जमाती  : भोरगिरी, खरोशी,धुवोली,धामणगाव खु.,परसुल,खरपुड,घोटवडी,कुडे बु., वांद्रा,साकुर्डी,दरकवाडी, कोयाळी तर्फे वाडा,आंबेठाण, रासे, वाकी खु.,सातकरस्थळ
बिगर अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती महिला : खालुंब्रे, सांगुर्डी, कंरजविहिरे, कनेरसर, पागंरी, टोकावडे,डेहणे, नायफड, शिरगाव, भोमाळे, एकलहरे, शेंदुंर्ली, मोरोशी,आव्हाट,गोरेगाव,सुरकुंडी, देवोशी,वाघु. 
अनुसुचित जाती :  मेदनकरवाडी,बिरदवडी,शिरोली, वाजवणे. 
अनुसुचित जाती महिला :  नाणेकरवाडी, मोई, कोरेगाव बु., आंभु, होलेवाडी.

मुळशीत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर 

या आरक्षण सोडतीत लवळे , सुस , भरे , बावधन बु. , भुगाव , हिंजवडी आदी मोठ्या ग्रामपंचायतींची आरक्षणे सर्वसाधारण पडल्याने या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीत स्पर्धकांची संख्या अधिक असणार आहे. 
आरक्षणनिहाय ग्रामपंचायतीची नावे पुढीलप्रमाणे -अनुसुचित जमाती - कुंभेरी व संभवे. अनुसुचित जमाती स्त्री - कोळवडे व ताम्हिाणी. अनुसुचित जाती - चांदे , काशिंग, भादस , उरवडे व दखणे. अनुसुचितजाती स्त्री - भांबर्डे, वातुंडे, जांबे, चांदिवली, कासारसाई व पिरंगुट. नागरीकांचा मागास प्रवर्ग - मांरुजी ,कासारअंबोली, बार्पे, चाले, भालगुडी, रिहे, चिखलगाव, वांजळे, मुलखेड, कातरखडक, टेमघर, लव्हार्डे व आंदगाव. नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री - तव, आंबवणे, पाथरशेत, पोमगाव, जातेडे, नाणेगाव,म्हाळुंगे, मुगावडे, माण, असदे, अकोले, पिंपळोली व घोटावडे. सर्वसाधारण - मूगाव, भोयणी, भोडे-वेडे, जामगाव, वांद्रे, अंबडवेट, कोंढूर, वाळेण,आंदेशे, जवळ, लवळे, शेडाणी, मुळशी खु., शेरे, माले, पौड, सूस, भरे, बावधन बु., भूगाव, वडगाव, हिंजवडी, नेरे, खेचरे, वारक, कुळे व मुठासर्वसाधारण स्त्री - बेलावडे, आडमाळ, निवे, डावजे, मोसे खु., माळेगाव, धामण ओहोळ, कोंढावळे, खारावडे, वेगरे, कोळवण, नांदगाव, दासवे,मांदेडे, खांबोली, साठेसाई, वळणे, आंबेगाव, नांदे, खुबवली, हाडशी, भुकूम, रावडे, दारवली, चिंचवड, बोतरवाडी व मारणेवाडी.

इंदापुर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर

सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आज दि .८ डिसेंबर रोजी इंदापुर तालुक्याचे तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या अध्यक्षतेखाली जाहिर करण्यात आली. सोडतीनुसार सर्वसाधारण नागरिकांचा प्रवर्गासाठी (३०), सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी (३२), नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गासाठी(१५),महिलांचा इतर मागास प्रवर्गासाठी(१६), अनुसूचित जाती नागरिकांचा साधारण प्रवर्ग व अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलासाठी प्रत्येकी (१०) सरपंच पदे आरक्षित करण्यात आली आहेत. तालुक्यातील भिगवण जवळील डिकसळ गावाच्या एकमेव ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गाचे सरपंचपद राखीव असणार आहे.
आरक्षणनिहाय ग्रामपंचायतींची नावे खालीलप्रमाणे-:
सर्वसाधारण नागरिकांचा प्रवर्ग -शेटफळगढे,पिंपळे, भिगवण,कुंभारगाव, अकोले, भादलवाडी, डाळज नं.३, पळसदेव,लोणीदेवकर,सणसर,जाचकवस्ती, कुरवली, तावशी, हगारेवाडी,घोरपडवाडी,वालचंदनगर,निमसाखर,कचरवाडी,गोतोंडी,वरकुटे खुर्द, जाधववाडी,अगोती नं.१,पिंपरी खुर्द,शहा,तरंगवाडी, झगडेवाडी, वडापुरी,शेटफळ हवेली,सुरवड, टण्णू.
सर्वसाधारण महिला प्रवर्ग- डाळज नं.३, डाळज नं.२, बळपुडी,काझड,निंबोडी,पवारवाडी,बेलवाडी,थोरातवाडी,चिखली,न्हावी,शेळगाव,सराफवाडी,शिरसटवाडी,निरवांगी,दगडवाडी,कौठळी,गंगावळण, कळाशी, कालठण नं१,अजोती,माळवाडी,बिजवडी,कांदलगाव,पंधारवाडी,बाभुळगाव,बावडा,भोडणी,निरनिमगाव,लुमेवाडी,गोंदी ओझरे,पिंपरी बुद्रुक, गिरवी.
नागरिकांच्या इतर मागास प्रवर्ग- तक्रारवाडी, म्हसोबाची वाडी,भावडी,आनंदनगर,लासुर्णे, मानकरवाडी,व्याहाळी,निमगाव केतकी,खोरोची,पडस्थळ,सरडेवाडी,गोखळी,भांडगाव,चाकाटी,पिठेवाडी.
महिलांचा इतर मागास प्रवर्ग- मदनवाडी,शिंदेवाडी,बोरी, कळस,रुई,भरणेवाडी,रेडा,रेडणी,बोराटवाडी,अगोती नं.२, गलांडवाडी नं.२,अवसरी, वकीलवस्ती,लाखेवाडी,कचरवाडी,सराटी.
अनुसूचित जाती नागरिकांचा साधारण प्रवर्ग- पोंदवडी,वरकुटे बुद्रुक,लाकडी,जांब,अंथुर्णे, कडबनवाडी,रणमोडेवाडीचांडगाव,कालठण नं.२,भाटनिमगाव.

दौंड तालुक्यातील 80 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर

दौंड तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत आज दौंड शहरातील राज्य राखीव गटाच्या मंगलमुर्ती सुहाग्रहात पार पडली. अनुसुचित जमाती साठी दोन, अनुसुचित जातीसाठी बारा, नागरीकांचा इतर मागास प्रवर्ग (ओबीसी )साठी 21 गावे आरक्षित झाली असून खुला प्रवर्गासाठी 44 गावांमध्ये सरपंच पदाची संधी उपलब्ध झाली आहे. दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी ही आरक्षण सोडत जाहीर केली. तालुक्यातील जाती निहाय ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर झालेली गावे पुढील प्रमाणे-.
अनुसूचित जाती प्रवर्ग महिला- निरगुडे, जंक्शन,सपकळवाडी, उद्धट,पिटकेश्वर ,कळंब, गलांडवाडी नं.१, तरटगाव, हिंगणगाव, नरसिंहपूर.
अनुसुचित जमाती-राजेगाव, अनुसुचित जमाती महिला- पाटेठाण.
अनुसूचित जाती महिला राखीव- पडवी, खोर, दहिटणे, बिरोबावाडी, जिरेगाव तर अनुसूचित जाती- कानगाव, कोरेगाव भिवर. पांढरेवाडी, नायगाव, कुरकुंभ.
नागरिकांचा इतर मागासवर्ग महिला प्रवर्ग 11 जागा- बोरीभडक, गोपाळवाडी, लोणारवाडी, खुटबाव, मळद, शिरापूर ,लडकतवाडी, नानगाव, गार, खोपोडी ,एकेरीवाडी,
नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग सर्वसाधारण- गिरिम, हिंगणीबेर्डी, कडेठाण, नानविज, पिलानवाडी, टेळेवाडी ,आलेगाव, खामगाव, उंडवडी पेडगाव.
खुला प्रवर्ग महिला- भरतगाव, चिंचोली, देवकरवाडी,  कासुर्डी, कौठडी, कुसेगाव, खानोटा, मलठण ,नंदादेवी ,पाटस, पिंपळगाव,पानवली, रावणगाव ,सहजपूर ताम्हाणवाडी, वाटलुज, वासुंदे, वरवंड, केडगाव, खडकी, राहू, रोटी, हिंगणीगाडा.
नागरिकांचा खुला प्रवर्ग- बोरीपार्धी ,बोरीबेल, भांडगाव, डाळिंब, दापोडी, देलवडी, देऊळगाव गाडा, देऊळगाव राजे ,गलांडवाडी, हातवळण, लिंगाळी, मिरवडी, टाकळी, नांदूर, नाथाचीवाडी, पारगाव, सोनवडी, वाळकी, यवत, वडगावभांडे, बोरीऎंदी, खोरवडी, सोनवडी, वाळकी, यवत.
एकुण 80 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यापैकी 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुक होणार आहेत.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

Saturday, 5 December 2020

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक 2020; महाविकास आघाडीची बाजी तर भाजपाला धक्का

सहापैकी चार जागा महाविकास आघाडीला 

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपाच्या गडाला खिंडार पाडले आहे. पुणे पदवीधर मतदार संघात एक लाख २२ हजार १४५ अशी सर्वाधिक मते घेत महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. भाजपाच्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते पडली आहेत. विजयासाठी एक लाख १५ हजार मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनंतर नागरिकांतून झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा पार धुव्वा उडाला. विधान परिषदेच्या सहापैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. नागपूर आणि पुणे या आपल्या पारंपरिक पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला. ही निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित लढले. नागपूर, पुणे आणि औरंगाबाद या तिन्ही पदवीधर मतदारसंघांत राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने विजय मिळवला. यापैकी नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपकडे होते. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीला सार्वत्रिक निवडणुकीचे स्वरूप आले होते. दोन्ही बाजूने मोठय़ा प्रमाणावर पैशांचे वाटप झाल्याचे आरोप होत आहेत. याशिवाय, या निवडणुकीला जातीय वळणही मिळाले होते. करोना संकटामुळे महानगरपालिकांसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. परंतु टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी पहिलीच निवडणूक विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या माध्यमातून झाली. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अरुण लाड सुमारे ४९ हजार मतांनी विजयी झाले. पुणे मतदारसंघातून गेल्या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विजयी झाले होते. या वेळी भाजपने आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचे टाळून बाहेरून आलेल्या संग्राम देशमुख यांना रिंगणात उतरविले होते. परंतु हा प्रयोग फसला. या निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीने आपली सर्व यंत्रणा उतरवली होती, तर भाजपने संपूर्ण मतदारसंघ ढवळून काढला होता. परंतु नागपूरप्रमाणेच हाही पारंपरिक मतदारसंघ भाजपला गमवावा लागला. पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर, तर अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष किरण सरनाईक यांचा विजय झाला. अमरावतीची जागा शिवसेनेला गमवावी लागली. शिवसेनेने लढविलेली एकमेव जागाही गमवावी लागल्याने भाजपने चिमटा काढला आहे. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल विजयी झाले असले तरी तो पक्षापेक्षा पटेल यांचा व्यक्तिगत विजय मानला जातो. दरम्यान भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजपला पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एक एकेट्याने लढा असे आव्हान महाविकास आघाडीतील तीन ही पक्षांना केले. त्या विधानावर राज्याचे मंत्री विश्वजीत कदम यांना विचारले असता ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हेच यावरचे उत्तर आहे. वर्षभरात हे सरकार पडेल अशी अफवा परसरवली जात होती. पण हे सरकार टिकले. विजयाकडे वाटचाल करत आहे, त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेवर प्रत्युत्तर देणं गरजेचं वाटत नाही, अशी खिल्ली त्यांनी उडवली. काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीचा विजयोत्सव लाडू वाटून साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक मतदार संघाचे विजयी जयंत आसगावकर, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्यमंत्री विश्वजीत कदम बोलत होते.

महाविकास आघाडीचे अरूण लाड यांना ४८ हजार ८२४ मतांचे मताधिक्य

पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत दहा वीस नव्हे, तर तब्बल ६२ उमेदवार रिंगणात होते़ यातील प्रमुख लढत ही महाविकास आघाडीचे अरूण लाड व भारतीय जनता पक्षाचे संग्राम देशमुख यांच्यामध्येच होती़ मात्र ही लढतही एकतर्फी झाल्याचे दिसून आले असून, लाड यांना देशमुख यांच्यापेक्षा पहिल्याच पसंती क्रमांकांच्या मतमोजणीत तब्बल ४८ हजार ८२४ मते मिळाली आहेत़पदवीधर मतदार संघातील मतमोजणी प्रक्रिया गुरूवारी सकाळी सुरू झाल्यावर प्रारंभी टपाली मते व सर्व जिल्ह्यातील मते एकत्र करण्यात आली़ यानंतर २ लाख ४७ हजार ५० मतपत्रिका ११२ टेबलवर मोजणीसाठी वितरित करण्यात आल्या़ यावेळी प्रथम वैध व अवैध मतपत्रिका निवडण्यात आल्या़ यामध्ये २ लाख २८ हजार २७२ मते वैध मतदान ठरले. त्यामुळे विजयी उमेदवारास १ लाख १४ हजार १३७ हा विजयी कोटा ठरविण्यात आला. शुक्रवारी (४ डिसेंबर) पहाटेपर्यंत हे काम सुरू होते़ दरम्यान याच प्रक्रियेत लाड यांना मिळालेली मते पाहता त्यांचा विजय हा निश्चित मानला गेला़. लाड यांना पहिल्या पसंती क्रमांकाच्या मतमोजणीतच निश्चित कोट्यापैकी अधिकची ८ हजार ८ मते अधिक मिळाली़ त्यामुळे दुसऱ्या पसंती क्रमांकाची मते मोजण्याची आवश्यकताच पडली नाही़. भाजपचे संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ इतकी मिळाली असूनत्या खालोखाल मनसेच्या उमेदवार अ‍ॅड़ रूपाली ठोंबरे पाटील यांना ६ हजार ७१३ मते मिळाली आहेत़ तर संभाजी ब्रिगेडचे डॉ़ श्रीमंत कोकाटे यांना ६ हजार ५७२ मते मिळाली.

सर्वाधिक मते मिळविणारे पहिले 10 उमेदवार-

अरूण गणपती लाड (महाविकास आघाडी) १२२१४५
संग्राम देशमुख (भारतीय जनता पक्ष) ७३३२१
अ‍ॅड़ रूपाली पाटील ठोंबरे (मनसे) ६७१३
डॉ़ श्रीमंत कोकाटे (अपक्ष) ६५७२
प्रा़ शरद पाटील (जनता दल सेक्युलर) ४२५९
सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी) ३१३९
अरूण (अण्णा) लाड (अपक्ष) २ हजार ५५४
डॉ़ अमोल पवार (आम आदमी पार्टी) ११२१
धनंजय घोंडकर (अपक्ष) ९८९
कृपाल पळूसकर (संभाजी ब्रिगेड) ८४३

पुणे शिक्षक मतदारसंघात महा-आघाडीचे जयंत आसगावकर यांचा 10 हजार 626 मतांनी विजय

पुणे शिक्षक मतदारसंघात महा-आघाडीचे जयंत आसगावकर यांनी विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत कडवी झुंज द्यावी लागली. आसगावकर यांनी 33 फेरीपर्यंत निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न केल्याने अखेर प्रतिस्पर्धी उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्या मतांमधील दुस-या पसंतीच्या मतांचे वाटप करण्यात आले. यामध्ये आसगावकर यांनी 25 हजार 985 मते घेतल्याने अखेर तब्बल 36 तासानंतर विजय निश्चित झाला. एकूण उमेदवारांची संख्या अधिक असल्याने वैध, अवैध आणि पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा निश्चित करण्यासाठी गुरूवारी रात्रीचे साडे आकरा वाजले. यामध्ये शिक्षक मतदार संघात पहिल्या पसंतीच्या मताथमध्ये निवडून येण्यासाठी संबंधित उमेदवाराला 25 हजार 114 हा अकडा पार करणे आवश्यक होते. परंतु पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये सुरूवातीपासूनच आघाडीवर आसलेले आसगावकर यांना पहिल्या पसंतीत केवळ 16 हजार 874 मते मिळाली. यामुळे नियमानुसार निवडणूक यंत्रणेला दुस-या पसंतीची मते मोजावी लागली. यामध्ये देखील 33 व्या फेरीपर्यंत आसगावकर यांना 25 हजारांचा कोटा पूर्ण करता आला नाही. 33 व्या फेरीत आसगावकर यांना 22 हजार 345, सावंत यांना 15 हजार 357 तर भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांना 7 हजार 294 मते मिळाली. यामुळेच आसगावकर यांच्या विजयासाठी शेवटची 34 फेरीची म्हणजे सावंत यांच्या दुस-या पसंतीची मते मोजावी लागली. यात आसगावकर यांनी मतांचा निश्चित केलेला कोटा पूर्ण करत 25 हजार 985 मते घेतली. तर सावंत यांना 15 हजार 357 मते मिळाली. यामुळे आसगावकर यांचा 10 हजार 626 मतांनी विजय झाला.

सर्वाधिक मते मिळविणारे 10 उमेदवार     पसंतीची मते 
1) जयंत आसगावकर ( विजयी उमेदवार) 16874
2) दत्तात्रय सावंत (विद्यमान शिक्षक आमदार) 11024
3) जितेंद्र पवार (भाजप पुरस्कृत) 5795
4) गोरखनाथ थोरात 4515
5) प्रकाश पाटील 2365
6) रेखा पाटील 1689
7) तानाजी नाईक 696
8) नंदकिशोर गायकवाड 643
9) नितीन पाटील 637
10) सुभाष जाधव 610

पुणे शिक्षकची २ हजार ७८४ मते बाद तर पदवीधरची १९ हजार ४२८ मते बाद 

पुण्याच्या शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघात तब्बल २२ हजार २१२ मते बाद ठरली आहेत. पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघात मतदान करताना सुमारे तीन ते चार टक्के मतपत्रिका चुकीच्या पद्धतीने मतदान केल्याने बाद ठरल्या. माध्यमिक शिक्षक, पदवीधर मतदार असताना मतदान करताना पसंतीक्रम लिहिण्याऐवजी उमेदवारापुढे त्याचा अनुक्रमांक लिहिणे, आयोगाने दिलेला पेन वापरण्याऐवजी स्वतःच्या पेनाचा वापर करणे, पसंती क्रमांकाऐवजी ‘बरोबर’ अशी खूण करणे, मतपत्रिकेतील मोकळ्या रकान्यात पसंती क्रमांकाऐवजी उमेदवाराच्या नावावरच क्रमांक लिहिणे, ज्या उमेवाराला पहिल्या पसंतीचे मतदान करायचे त्या उमेदवारांच्या समोर पसंती क्रमांक एक लिहिण्याऐवजी त्याच उमेदवाराचा क्रमांक लिहीणे, एकाच वेळी अनेक उमेदवारांना एकाच क्रमांकाची पसंती देणे अशा ‘चुका’ शिक्षित मतदारांनी केल्या. पुणे शिक्षक मतदारसंघात एकूण ५२ हजार २८७ शिक्षकांनी मतदान केले. त्यापैकी २ हजार ७८४ मते अवैध ठरली. एकूण ५० हजार २२६ वैध मते ठरली. यामुळे शिक्षक मतदार संघात पहिल्या पसंतीत निवडून येण्यासाठी २५ हजार ११४ हा मतांचा कोटा निश्चित झाला. पुणे पदवीधर मतदारसंघात एकूण २ लाख ४७ हजार ६८७ मतदान झाले. त्यापैकी तब्बल १९ हजार ४२८ मते बाद ठरली. वैध मतांची संख्या २ लाख २८ हजार २५९ झाली. त्यामुळे पहिल्या पसंतीत निवडून येण्यासाठी १ लाख ११ हजार ३७ हा मतांचा कोटा निश्चित झाला.

नागपुरात काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पर्यायाने भाजपाचे प्राबल्य असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना ६१७०१ मते मिळाली आहेत. तर विरोधी भाजपाचे उमेदवार संदीप जोशी यांना ४२९९१ मते मिळाली आहेत. संदीप जोशी यांचा १८७१० मतांनी पराभव झाला आहे. नागपूर हा भाजपाचा गड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, काँग्रेसने या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुस-या क्रमांकावर होते. हीच आघाडी कायम राहिली आणि भाजपाच्या जोशी यांना मोठ्या मतफरकाने पराभव पत्करावा लागला. कोरोनामुळे फारशी अपेक्षा नसतानादेखील मतदारसंघातील सहाही जिल्ह्यात ६४ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. विशेष म्हणजे ग्रामीण भागातूनदेखील जोरदार प्रतिसाद मिळाला. नागपूर पदवीधर मतदारसंघाची रचना झाल्यापासून जनसंघ आणि नंतर भाजपने हा मतदारसंघ पारंपरिकदृष्टय़ा आपल्याकडे कायम राखला होता. परंतु काँग्रेसने यंदा तो प्रथमच जिंकला. नागपूर या गडातच भाजपचा १८ हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला. नागपूरमध्ये माजी आमदार अनिल सोले यांच्याऐवजी संदीप जोशी यांना उमेदवार मिळवून देण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. पण जोशींना भाजपाचा बालेकिल्ला राखता आला नाही. नागपूरमधील भाजपाच्या पराभवाची कारणमीमांसा सुरु आहे. सोशल मीडियावर नागपूरकर तर्कवितर्क लढवत आहेत. यामध्ये बरेच जण संदीप जोशी यांना पराभवाचे कारण मानत आहे. 

औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण यांची हॅट्ट्रीक

भाजप आणि महाविकास आघाडीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची असणारी मराठवाड पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी हॅट्ट्रीक साधली. त्यांनी भाजपच्या शिरीष बोराळकर यांचा पराभव केला. मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजयासाठी 109409 मताचा कोटा ठरवण्यात आला होता. पाचव्या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना 116638 तर शिरीष बोराळकर यांना 58743 मते मिळाली. सतीश चव्हाण 57895 मतांनी विजयी झाले. औरंगाबाद पदवीधरसाठी दुपारी तीन वाजता मजमोजणीला सुरुवात झाली. सतीश चव्हाण पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. पहिल्या फेरीत सतीश चव्हाण यांना 27850 तर शिरीष बोराळकर यांना 11558 मते मिळाली होती. दुसऱ्या फेरीअखेर 28930 मतांनी सतीश चव्हाण आघाडीवर होते. तिसऱ्या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना 42 हजार मतांची आघाडी मिळाली होती. तिसरी फेरीत सतीश चव्हाण यांना 26739 तर शिरीष बोराळकर 14471 मते मिळाली. या फेरीत चव्हाण यांना 12268 मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे तिसऱ्या फेरीअखेर सतीश चव्हाण 41198 मतांनी आघाडीवर होते. चव्हाण यांना एकूण 81216 मते तर शिरीष बोराळकर 40018 मते पडली. तिसऱ्या फेरीत 5374 मते अवैध ठरली. थ्या फेरीअखेर सतीश चव्हाण 53611 मतांनी आघाडीवर होते. त्यांना 107916 मते तर शिरीष बोराळकर यांना 54305 मते पडली. या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना 12 हजार मतांची आघाडी मिळाली होती. या फेरीअखेर भाजपच्या सर्व प्रतिनिधींनी मतदान केंद्र सोडले. पाचव्या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना 116638 तर शिरीष बोराळकर यांना 58743 मते मिळाली. यासोबतच सतीश चव्हाण यांचा 57895 मतांनी विजय झाल्याचे निश्चित झाले. या निवडणुकीत सचिन ढवळे यांना 11702, नागोराव पांचाळ यांना 8993, रमेश पोकळे यांना 6712, सिद्धेश्वर मुंडे यांना 8053 मते मिळाली. या मतमोजणीत एकूण 241908 मतांची मोजणी करण्यात आली. तर 23092 मते अवैध ठरली.

अमरावतीत शिवसेनेचा धक्कादायक पराभव

अमरावती शिक्षक मतदारसंघात चुरशीच्या लढाईत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी झाले आहेत. सरनाईक यांनी विद्यमान आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांना पराभूत केले असून सरनाईक यांना १५ हजार ६०६ मते तर देशपांडे यांना ९ हजार १९१ मते मिळाली आहेत. विजयासाठी १४ हजार ९१५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. अमरावतीचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. त्यात १५ हजार ६०६ मतांसह सरनाईक यांनी विजयाला गवसणी घातली. प्रा. देशपांडे यांना ९ हजार १९१ मतांपर्यंतच मजल मारता आली. या मतदारसंघात एकूण २९ हजार ८२९ मते वैध ठरली होती. त्यामुळे विजयासाठी १४ हजार ९१५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. तो मॅरेथॉन मतमोजणीनंतर सरनाईक यांनी पूर्ण केला .विधान परिषदेची पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमधील निवडणुकीचे निकाल धक्कादायक असले तरीही अमरावतीने शिवसेना आणि भाजपावर मोठी नामुष्कीची वेळ आली त्यामध्ये उमेदवार मतमोजणीतच बाद ठरला. देशपांडे यांना राष्ट्रवादीचे बंडखोर चंद्रशेखर उर्फ शेखर भोयर यांच्यामुळे फटका बसल्याचे दिसत आहे. भोयर २५व्या फेरीपर्यंत टक्कर देत होते. ते बाद झाल्यानंतर सरनाईक व देशपांडे यांच्यात लढत होती व त्यात सरनाईक यांनी कोटा पूर्ण करत विजय साकारला. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

हैदराबाद मनपा निवडणूकीत भाजपची 4 वरून 48 जागी मुसंडी, एमआयएमला 44 जागा

हैदराबाद मनपा निवडणूकीत भाजपला 48 जागा

हैदराबादचे भाग्यनगर असे नामांतर करण्याचे सूतोवाच करणाऱ्या भाजपला तेथील मनपा निवडणुकीत बहुमत मिळू शकले नाही. मात्र पक्षाने ४ जागांवरून ४८ जागा जिंकण्यापर्यंतची मोठी मजल मारली आहे. सर्वात मोठा पक्ष तेलंगण राष्ट्र समितीला (टीआरएस) ५५ जागा व असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने ४४ जागा जिंकल्या. भाजपने आपल्या जागांत १२ पटींनी वाढ केली आहे. मनपा निवडणुकीत भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा व इतर केंद्रीय मंत्र्यांना प्रचारात उतरवले होते. दरम्यान, यूपीतील विधान परिषद निवडणुकीत भाजपने ६ पैकी ३ जागा जिंकल्या. मात्र वाराणसीत समाजवादी पार्टीची सरशी झाली. हैदराबाद महापालिका निवडणुकीत एकूण 150 जागांसाठी तब्बल 1,122 उमेदवार मैदानात होते. भाजपने या निवडणुकीत आपली ताकद पणाला लावल्याचे दिसून येत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2016 मध्ये झालेल्या ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपला केवळ 3 जागा मिळवता आल्या होत्या. तर काँग्रेसला सुद्धा केवळ 2 जागा मिळाल्या होत्या. टीआरएसला सर्वाधिक 99 आणि एमआयएमला 44 जागांवर विजय मिळाला होता. ग्रेटर हैदराबाद मनपा (जीएचएमसी) देशातील सर्वात मोठ्या मनपांपैकी एक आहे. त्यात ४ जिल्हे आहेत. त्यात तेलंगणचे ४ लोकसभा व २६ विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१८ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस येथे मतटक्क्यात दुसऱ्या स्थानी असली तरी त्याचे विजयात रूपांतर होऊ शकले नव्हते. ६ महिन्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक लाभ झाला होता. राज्यात सक्षम विरोधी पक्ष नसल्याचा फॅक्टर भाजपसाठी फायदेशीर ठरत आहे. हैदराबादच्या स्थानिक निवडणुकीत भाजपच्या प्रचाराची जबाबदारी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी घेतली होती. 29 नोव्हेंबर रोजी त्यांनी हैदराबादचा दौरा केला आणि मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सिकंदराबाद येथे रोड शो केला होता. मग, पत्रकार परिषदेत त्यांनी टीआरएस आणि एमआयएमवर हल्लाबोल केला होता. टीआरएसने एमआयएमशी तडजोड करून बंद खोलीत ईलू-ईलू करत जागा वाटल्या होत्या असा आरोप त्यांनी यावेळी केला होता.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

Thursday, 3 December 2020

धुळे-नंदुरबार विधान परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का, भाजपचे उमेदवार अमरीश पटेल विजयी

काँग्रेसचे अभिजित पाटील यांचा पराभव 

धुळे-नंदुरबार विधान परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार अमरीश पटेल यांनी काँग्रेसचे उमेदवार अभिजित पाटील यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. दरम्यान पटेल यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या स्थानिक निवडणुकीला सामोरे जात असून पहिल्याच निवडणुकीत पराभवाला सामोरे जात आहे. धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषद पोट निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. भाजप उमेदवार अमरीश पटेल यांना 332 मते तर महाविकास आघाडीच्या उमेदवार अभिजीत पाटील यांना 98 मते पडली आहे. मतमोजणीत 4 मते बाद करण्यात आली आहेत. अमरीश पटेल यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा 30 सप्टेंबर 2019 या दिवशी राजीनामा दिला होता. त्यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी 14 डिसेंबर 2021 या दिवशी पूर्ण होत होता. मात्र तत्पूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्याने केवळ 12 महिन्यांचा कालावधी निवडून आलेल्या उमेदवाराला मिळणार आहे. काँग्रेसला अलविदा म्हणत भाजपमध्ये आलेल्या अमरीश पटेल यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. 12 मार्च 2020 हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. 13 मार्च 2020 ला अर्जाची छाननी झाली. 16 मार्च 2020 या दिवशी निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या जागेसाठी 30 मार्च 2020 ला मतदान प्रक्रिया तर 31मार्चला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार होता . मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही निवडणूक दोन महिने पुढे ढकलण्यात आली होती. धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले 412 तर स्वीकृत 28 सदस्य असे एकूण 440 सदस्य मतदानासाठी पात्र होते. मात्र, धुळे महानगरपालिकेतील लोकसंग्राम पक्षाच्या सदस्या हेमा अनिल गोटे ,तसेच शिंदखेडा नगरपरिषदेतील भाजपचे स्वीकृत सदस्य राजेंद्र भामरे यांनी राजीनामा दिला होता तर धुळे महानगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत सदस्य सोनल शिंदे यांना विभागीय आयुक्तांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने अपात्र ठरविले होते त्यामुळे विधान परिषदेसाठी मतदान करणार्‍या सदस्यांची संख्या 437 होती. धुळे-नंदुरबार विधान परिषद मतदार संघात भाजपचे 199 काँग्रेसचे 157,राष्ट्रवादी काँग्रेसचे 36, शिवसेनेचे 20, एमआयएमचे 9, समाजवादी पक्षाचे 4, बसपा , मनसेचा प्रत्येकी एक, अपक्ष 10 सदस्य मतदार होते. 437 मतदारांपैकी 434 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता म्हणजेच 99 टक्के मतदान झाले होते.

विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघ निवडणुकांची मतमोजणी सुरू

राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघासाठी आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान झाले होते. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठीचे मतदान झाले. आज या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघातील निकाल जाहीर झालेला असून इतर मतरादरसंघाची मतमोजणी सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्या नंतर ही पहिली मोठी निवडणूक होती. महाविकास आघाडीने म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मिळून उमेदवार दिला होता. यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने ताकद पणाला लावली होती. विधानपरिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसेल. तसेच काय निकाल लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदारसंघनिहाय औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के, पुणे पदवीधर 50.30 टक्के, नागपूर पदवीधर 54.76 टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================
पदवीधर मतदारसंघ; 

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================