Tuesday 21 November 2017

२०१८ या आगामी वर्षांत राज्यसभेच्या 6 आणि विधान परिषदेच्या २१ जागांसाठी निवडणूक

पुढील २०१८ वर्षांत राज्यसभेचे सहा खासदार आणि विधान परिषदेच्या २१ आमदार निवृत्त होणार 

सन 2018 मध्ये निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी


.क्र. सदस्यांचे नाव,            पक्ष,       सदस्यत्वाची मुदतसंपण्याचा दिनांक

(1) श्रीमती वंदना हेमंत चव्हाण      नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी    2 एप्रिल, 2018
(2) श्री.डी.पी.त्रिपाठी               नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी    2 एप्रिल, 2018
(3) श्रीमती रजनी अशोकराव पाटील   इंडियन नॅशनल काँग्रेस    2 एप्रिल, 2018
(4) श्री. अनिल यशवंत देसाई        शिवसेना                2 एप्रिल, 2018
(5) श्री.राजीव रामकुमार शुक्ला       इंडियन नॅशनल काँग्रेस    2 एप्रिल, 2018
(6) श्री.अजयकुमार शक्तीकुमार संचेती  भारतीय जनता पार्टी      2 एप्रिल, 2018

सन 2018 मध्ये निवृत्त होणार्या सदस्यांची पक्षनिहाय संख्या


क्रमांक            पक्षाचे नाव           सदस्य संख्या
1.             नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी :       2
2.             इंडियन नॅशनल काँग्रेस :        2
3.             भारतीय जनता पार्टी :         1
4.             शिवसेना :                   1

               एकूण :                     6
===================================================== 
राज्यसभेचे वंदना चव्हाण आणि डी. पी. त्रिपाठी (राष्ट्रवादी), रजनी पाटील आणि राजीव शुक्ला (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना), अजयकुमार संचेती (भाजप) हे सहा सदस्य निवृत्त होत आहेत. राज्यसभेवर निवडून येण्याकरिता पहिल्या पसंतीच्या ४२ मतांची आवश्यकता आहे. सदस्यसंख्येनुसार भाजपचे तीन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य निवडून येऊ शकतो. शिवसेनेकडे २१ मते अतिरिक्त असली तरी शिवसेना दुसरा उमेदवार उभा करण्याचे धाडस करेल का, यावर बरेच अवलंबून असेल.
===================================================== 

गुप्त मतदानात मतांची फोडाफोड करून जयंत पाटील पुन्हा चमत्कार करणार का? 

पुढील वर्षांत राज्यसभेचे सहा खासदार आणि विधान परिषदेच्या २१ आमदारांची मुदत संपत असून, निवडणुकांना अद्याप काही कालावधी असला तरी इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.  विधान परिषदेचे विधानसभा सदस्यांमधून निवडून येणारे ११ सदस्य, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील प्रत्येकी दोन, स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील सहा सदस्य निवृत्त होत आहेत. विधानसभेतून निवडून येणाऱ्या ११ सदस्यांसाठी चुरस होण्याची चिन्हे आहेत. निवडून येण्याकरिता पहिल्या पसंतीच्या २७ मतांची आवश्यकता आहे. भाजपचे १२२ आमदार असून, छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने पाचवी जागा निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. शिवसेनेचे दोन तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकत्रित तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. पाचवी जागा निवडून आणण्याकरिता भाजपला १३५ मतांची आवश्यकता भासेल. पाचव्या जागेकरिता भाजपकडून आर्थिकदृष्टय़ा तगडय़ा उमेदवाराला उतरविले जाईल, अशी शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी आघाडीत राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. यंदा काँग्रेसच्या दोन उमेदवारांना राष्ट्रवादीने पाठिंबा द्यावा, असे ठरले आहे. हे आश्वासन कसे पाळले जाते यावर आघाडीच्या तिसऱ्या उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे.नाशिक, लातूर-उस्मानाबाद-बीड, परभणी-हिंगोली, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक होत आहे. गेल्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांमध्ये राजकीय संदर्भ बदलले आहेत. भाजपचे संख्याबळ वाढल्याने या निवडणुकीत भाजपला चांगल्या जागा मिळू शकतात.
निवृत्त सदस्यांमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य
निवृत्त होणाऱ्या २१ सदस्यांमध्ये सर्वाधिक आठ सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी चार सदस्य निवृत्त होत आहेत. शिवसेना (दोन), शेकाप, लोकभारती आणि अपक्ष प्रत्येकी एक सदस्य निवृत्त होत आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून येतील. रायगडमधील शेकापचे नेते जयंत पाटील यांनी लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये पक्षाकडे दोन किंवा तीनपेक्षा जास्त मते नसतानाही ११वा उमेदवार म्हणून विजय प्राप्त केला होता. सर्व राजकीय पक्षांमध्ये असलेल्या सलोख्याच्या संबंधामुळेच जयंत पाटील यांना विजय मिळविणे शक्य झाले होते. गुप्त मतदानात मतांची फोडाफोड करून जयंत पाटील पुन्हा चमत्कार करणार का, असा प्रश्न आहे.
निवृत्त होणारे आमदार-
सुनील तटकरे, जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडित, निरंजन डावखरे, जयंत जाधव, बाबाजानी दुर्राणी, अनिल तटकरे (राष्ट्रवादी), माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, दिलीप देशमुख (काँग्रेस), भाई गिरकर, महादेव जानकर, प्रवीण पोटे, मितेश भांगडिया (भाजप), अनिल परब आणि डॉ. दीपक सावंत (शिवसेना), कपिल पाटील (लोकभारती), जयंत पाटील (शेकाप), अपूर्व हिरे (अपक्ष) असे २१ आमदार निवृत्त होत आहेत.
सन 2018 मध्ये निवृत्त होणार्या सदस्यांची पक्षनिहाय सदस्य संख्या
मांक               पक्षाचे नाव                   सदस्य संख्याक्र
1.               नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी :               8
2.               इंडियन नॅशनल काँग्रेस :               4
3.               भारतीय जनता पार्टी :                 4
4.               शिवसेना :                           2
5.                पीझंट्स अॅन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया : 1
6.                लोकभारती :                         1
7.               अपक्ष :                             1
                 एकूण :                            21 
=====================================================


महाराष्ट्र विधानपरिषदेतील मतदार संघनिहाय जागांचे विवरण

अनुक्रमांक मतदारसंघाचे नाव     एकूण जागा
1. विधानसभा सदस्यांद्वारा निर्वाचित        30
2. स्थानिक प्राधिकारी संस्थाद्वारा निर्वाचित        22
3. पदवीधरांद्वारा निर्वाचित                 07
4. शिक्षकांद्वारा निर्वाचित                 07
5. नामनियुक्त                         12
एकूण                                 78 
=====================================================

अधिक माहितीसाठी संपर्क : श्री.चंद्रकांत भुजबळ
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
फोन नं- 020-24481671 ई.मेल.- prab.election@gmail.com
वेबसाईट- prabindia.com / prabindia.org

Political Research & Analysis Bureau (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे महाराष्ट्र 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.