Tuesday 14 November 2017

राणेंच्या रिक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी 7 डिसेंबरला पोटनिवडणूक

राणेंच्या रिक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी 7 डिसेंबरला पोटनिवडणूक


काँग्रेसला सोडचिट्ठी देत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या 7 डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
 नारायण राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी सात डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. सात तारखेलाच निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणेंनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.21 सप्टेंबर रोजी नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देताना आमदारकी सोडली होती. 12 वर्षात काँग्रेसमध्ये झालेली ससेहोलपट, खदखद त्यावेळी राणेंनी व्यक्त केली होती.नारायण भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सुरु असतानाच त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत एनडीएला पाठिंबा जाहीर केला.सभापतींकडे राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा पाठवला होता. 7 जुलै 2022 पर्यंत विधानपरिषदेच्या या आमदारकीची टर्म आहे.

मतदान कार्यक्रम

अधिसूचना जारी करण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2017
नामनिर्देशनाची अंतिम मुदत – 27 नोव्हेंबर 2017
अर्जांची छाननी – 28 नोव्हेंबर 2017
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत – 30 नोव्हेंबर 2017
मतदान – 7 डिसेंबर 2017 – सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
मतमोजणी – 7 डिसेंबर 2017 – संध्याकाळी 5 वाजता

गेल्या 22 सप्टेंबर रोजी काॅग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत नारायण राणे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या 7 डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे.या निवडणूकीचा कार्यक्रम केंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.त्यानुसार येत्या 20 नोव्हेंबरला याची अधिसूचना जारी करण्यात येणार असून,29 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. गुरूवारी 7 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान घेण्यात येवून सायंकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरूवात होईल.नारायण राणे यांना भाजपने मंत्रिपदाची ऑफर दिली आहे. मात्र शिवसेनेच्या तीव्र विरोधामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. दुसरीकडे राणे आणि शिवसेनेचे असलेले नाते विचारात घेतले असता विधांपरिषदेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना भाजपला कदापि समर्थन देणार नसल्याचे संकेत आहेत. त्यामुळे राणे यांना या निवडणुकीत निवडून आणणे भाजपला सोपे नाही. निवडणूक एकाच जागेसाठी असल्याने निवडून येणासाठी 145 मतांची गरज आहे. भाजपाकडे 122 आमदार असले तरी 23 मते कुठून आणायची असा प्रश्न भाजप पुढे आहे.

विधानसभेतील पक्षीय बलाबल पुढील प्रमाणे-

भाजप-122
शिवसेना-63
काॅग्रेस-42
राष्ट्रवादी-41
शेकाप-3
बविआ-3
एमआयएम-2
अपक्ष-7
सपा-1
मनसे-1
रासपा-1
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया-1

Political Research and Analysis Bureau (PRAB)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.