Wednesday 29 November 2017

रजनीकांतची राजकारणात थर्टी फर्स्टला 'एंट्री' ; शिवाजीराव गायकवाड ते दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हा अद्भूत प्रवास

रजनीकांतची राजकारणात 'एंट्री' लवकरच होणार


रजनीकांत यांचा राजकारणात थर्टी फर्स्टला प्रारंभ




राजकारणात थोडा उशीरच;पण थर्टी फर्स्टला करणार घोषणा: रजनीकांत

अभिनेता कमल हसन पाठोपाठ सुपस्टार रजनीकांत सुद्धा राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. सुपरस्टार रजनीकांत 31 डिसेंबर रोजी आपल्या राजकीय वाटचालीची घोषणा करणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत रजनीकांत राज्यातील आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. रजनीकांत त्यांच्या राजकीय वाटचालीची घोषणा करतील. या सवांद कार्यक्रमात १८ जिल्ह्यातील १ हजारहून अधिक चाहते उपस्थित आहेत. रजनीकांत यांच्या या घोषणेनंतर त्यांचा राजकारणातील प्रवेश निश्चित झाला असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठी पोकळी तयार झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी अनेक राजकीय नेते प्रयत्न करत आहेत. याआधी अभिनेता कमल हसन यांनी राजकारणाचे रणशिंग फुंकले होते. त्यानंतर आता रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरूवात झाली होती. रजनीकांत नवा पक्ष स्थापणार की इतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे ३१ डिसेंबरलाच समजेल. रजनीकांत यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपने त्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हा यात यश आले नव्हते. रजनीकांत एखाद्या पक्षात प्रवेश करतात की दक्षिणेतील अन्य सिनेस्टार प्रमाणे स्वत:चा पक्ष काढतात याकडे केवळ तामिळनाडूचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.  रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार आहेत, अशा चर्चांना मागील काही दिवसांपासून उधाण आले होते. मात्र, त्यावर रजनीकांत यांनी उघडपणे आपले मत व्यक्त केले नाही. त्यामुळे मध्यंतरी त्यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबतच्या चर्चा काही कालावधीसाठी थांबल्या होत्या. त्यानंतर आता त्यांचे बंधू सत्यनारायण राव यांनी रजनीकांत राजकारणात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच रजनीकांत आपल्या राजकारणातील प्रवेश आणि राजकीय पक्षाची घोषणा जानेवारीमध्ये करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, रजनीकांत नेमक्या कोणत्या पक्षात जाणार किंवा ते एखाद्या नव्या पक्षाची स्थापना करणार का, याकडे त्यांच्या चाहत्यांसह इतर राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.

शिवाजीराव गायकवाड ते दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हा अद्भूत प्रवास..



रामोजी राव आणि जिजाबाई गायकवाड या महाराष्ट्रीय दांपत्याचा चार मुलांपैकी सर्वात धाकटा मुलगा म्हणजेच शिवाजीराव गायकवाड. याचा जन्म १२ डिसेंबर १९५० मध्ये बंगलोर येथील म्हैसूरमध्ये म्हणजे आताच्या कर्नाटक राज्यात झाला. त्याला दोन मोठे भाऊ आणि एक बहीण होती.
शिवाजी गायकवाड ऊर्फ रजनीकांतचे वडील बेंगलोर येथे पोलीस कॉन्स्टेबल होते. महाराष्ट्रातील सर्वात शूर व्यक्तिमत्त्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून रजनीकांतच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव शिवाजीराव ठेवले. कर्नाटक राज्यात राहात असलेले गायकवाड कुटुंबीय घरात मराठी आणि बाहेर कन्नड भाषा बोलत.
गायकवाड कुटुंबीयांचे पूर्वज पुरंदर तालुक्यातील जेजुरी (पुणे) गावातील मावडी कडे पठार येथील मूळ रहिवासी. त्यांचे पूर्वज शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते. स्वत:चा मुलुख सोडून त्यांच्या पुढील पिढया कर्नाटकात स्थायिक झाल्या. रजनीकांत अवघ्या ९ वर्षाचा असताना त्याचे मातृछत्र हरपले.
रजनीकांतचे प्राथमिक शिक्षण ‘गावीपुरम गव्हर्नमेंट कन्नडा मॉडेल प्रायमरी’ शाळेत झाले. पुढील शिक्षण आचार्य पाठशाला पब्लिक स्कूलमध्ये झाले. या शैक्षणिक कारकिर्दीत रजनीकांत यांनी शाळेच्या अनेक नाटकांमध्ये कामे केली. तसेच घरची परिस्थिती गरिबीची असल्याने बेंगलोर आणि चैन्नई या दोन्ही ठिकाणी सुतारकाम, गोण्या नेण्याचे, हमालीचे काम केले.
रोज १८० गोण्या नेल्यानंतर दिवसाच्या शेवटी सहा रुपये मिळत असत. शेवटी बेंगलोर ट्रान्सपोर्ट सव्‍‌र्हिसमध्ये त्याने कंडक्टरचीही नोकरी केली. ही त्याची शेवटची नोकरी. अशातच अभिनय प्रशिक्षण शिबिराची मद्रास फिल्म इन्स्टिटय़ूटची जाहिरात आली. घरच्यांचा विरोध असतानाही रजनीकांतसोबत काम करणा-या राज बहादूर या मित्राने रजनीकांतला प्रोत्साहन दिले. त्याचे पैसेही भरले.
मद्रासला जाण्याचेही पैसे दिले. या इन्स्टिटय़ूटमध्ये राहून प्रशिक्षण घेत असताना आणि रंगभूमीवर काम करणा-या रजनीकांतमधील अभिनय गुण हेरून तामिळ चित्रपट दिग्दर्शक के. बालचंदर यांनी त्याला तामिळ शिकून घेण्यास सांगितले.
१९७५ साली तामिळ चित्रपट अपूर्वा रागनां या चित्रपटात के. बालचंदर यांनी रजनीकांतला छोटीशी भूमिका दिली. विद्या या अभिनेत्रीच्या मवाली पतीची ती भूमिका होती. चित्रपट त्याकाळी वादग्रस्त ठरला. कारण यात वयात खूप अंतर असलेल्या स्त्री-पुरुषांच्या नातेसंबंधाचं चित्रीकरण होतं. पण टीकाकारांनी, समीक्षकांनी या वेगळ्या विषयाची खूप प्रशंसा केली. रजनीकांतच्या पहिल्याच चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. यात उत्कृष्ट तामिळ चित्रपट हा पुरस्कारही होता.
यातल्या रजनीकांतच्या कामाची खूप प्रशंसा झाली. नाटय़क्षेत्रात आल्यावरच एका नाटकात असलेल्या व्यक्तिरेखेचे रजनीकांत हे नाव शिवाजीराव गायकवाड याने धारण केले. रजनीकांत हे नाव आजच्या घडीला जगातील चित्रपटसृष्टीत कौतुकाने आणि आदराने घेतले जाते.
रजनीकांत यांनी सुरुवातीच्या काळात स्त्रीयांवर अत्याचार करणा-या पुरुषांच्याच भूमिका जास्त केल्या. के. बालचंदर यांना आपल्याला घडविण्याचं श्रेय रजनीकांत देत असला तरी त्याला एस. पी. मुथ्थुरामन यांनी १९७८ साली तर रजनीकांतचे तामिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेत मिळून २० चित्रपट प्रदर्शित झाले. यात त्याची दुय्यम भूमका होती. तिथूनच लोकप्रिय झाली.
रजनीकांतची सिगारेट ओढण्याची, माचीस पेटवण्याची, गॉगल घालण्याची ती विशिष्ट शैली. १९७८ साली आलेला ‘बैरवी’ हा चित्रपट रजनीकांत नायक म्हणून पहिला चित्रपट ठरला. याचे दिग्दर्शक होते एम. भास्कर. नायक म्हणून आलेल्या पहिल्याच चित्रपटात रजनीकांतच्या नावापुढे सुपरस्टार असं लिहिलं गेलं. चित्रपटाचा वितरक एस. थानू याने रजनीकांतचा ३५ फूट कटआऊट बनवला. अशा काही प्रथा रजनीकांतच्या चित्रपटाने पाडल्यानंतर आलेल्या ‘वण्णाकट्टरीच्या कवाल्ये’ या चित्रपटात रजनीकांत यांच्या एण्ट्रीलाच खास गाणं टाकण्यात आलं. त्यानंतर कुठच्याही चित्रपटातील रजनीकांतची एण्ट्री ही स्पेशल करण्यात आली.
१९८० पर्यंत रजनीकांत अनेक महत्त्वाचे पुरस्कार आणि ५० यशस्वी चित्रपट देऊन दक्षिणेतील यशस्वी सुपरस्टार झाला होता. १९८३ मध्ये रजनीकांतने अमिताभ बच्चनसोबत ‘अंधा कानून’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपटही खूप यशस्वी झालाय. रजनीकांतने अमिताभ बच्चनसोबत ‘हम’ चित्रपटही केला. तामिळ भाषेतील सन्मानीय पुरस्कारासह रजनीकांतला भारत सरकारने पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे मानाचे पुरस्कारही दिले आहेत.


Real Name: Shivaji Rao Gaikwad
Date of Birth : 12.12.1950
Time of Birth : 11:54 P.M.
Place of Birth : Bangalore
Star/Rasi: Sirvana/Magaram
Name of Spouse : Mrs. Latha Rajinikanth,
Date of Marriage: 26.02.1981 4:30 A.M
Place of Marriage: Thirupathi
Date of Reception : 14.03.1981 6:00 A.M
Place of Reception : Taj Coromandal, Chenna
Names of Children: Aishwarya & Sowandarya
Address : 18, Raghava Veera Avenue, Poes Garden, Chennai-86
Father's Name: Ramoji Rao
Mother's Name: Rambhai
Brother's Name : Sathya Narayana Rao & Nageshwara Rao
Guru : K.Balachandar


                                    POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

                                                पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.