Tuesday 7 November 2017

जेजुरीसह 17 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी 10 आणि 13 डिसेंबरला मतदान ; ठाणे जिल्हा परिषदेसाठी 13 डिसेंबरला मतदान; बृहन्मुंबईतील प्रभाग क्रमांक 21 व 62 च्या पोटनिवडणुकीसाठी 13 डिसेंबरला मतदान

ठाणे जिल्हा परिषदेसाठी 13 डिसेंबरला मतदान

ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पाच पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच इतर विविध ठिकाणच्या आठ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या 53; तर त्यांतर्गतच्या शहापूर (जागा 28), मुरबाड (16), कल्याण (12), भिवंडी (42) आणि अंबरनाथ (8) या पाच पंचायत समित्यांच्या एकूण 106 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मतदान केंद्रांची यादी व मतदार केंद्रनिहाय मतदार यादी 20 नोव्हेंबर 2017 रोजी प्रसिद्ध होईल. नामनिर्देशनपत्रे 23 नोव्हेंबर 2017 ते 28 नोव्हेंबर 2017 या कालावधीत स्वीकारली जातील. नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी संकेतस्थळाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
वाशीम जिल्हा परिषदेच्या पांगरी नवघरे (ता. मालेगांव) निवडणूक विभागाच्या रिक्त पदासाठीदेखील 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होत आहे. चाणजे (ता. उरण, जि. रायगड), माटणे (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग), पानेवाडी (ता. नांदगाव, जि. नाशिक), कोठली खु. (ता. नंदुरबार, जि. नंदुरबार), किल्लारी (ता. औसा, जि. लातूर), मलकापूर (ता. अकोला, जि. अकोला) आणि मार्डी (ता. मारेगाव, जि. यवतमाळ) या निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होईल


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

निवडणूक कार्यक्रमाचा तपशील:·         मतदान केंद्रे व मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्धी करणे- 20 नोव्हेंबर 2017
·         नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 23 नोव्हेंबर 2017 ते 28 नोव्हेंबर 2017
·         नामनिर्देशनपत्रांची छाननी- 29 नोव्हेंबर 2017
·         अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 04 डिसेंबर 2017
·         अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 07 डिसेंबर 2017
·         मतदानाचा दिनांक- 13 डिसेंबर 2017
·         मतमोजणीचा दिनांक- 14 डिसेंबर 2017


Political Research and Analysis Bureau (PRAB)
===========================================================

17 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी 10 आणि 13 डिसेंबरला मतदान


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

राज्यातील विविध 17 नगरपरिषदा/ नगरपंचायतींचे सदस्य व अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच जेजुरी नगरपरिषदेचे अध्यक्ष व इतर विविध ठिकाणच्या 10 सदस्यांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी दोन टप्प्यांत 10 डिसेंबर व 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त  सहारिया यांनी केली.
सर्व संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबक नगरपरिषदेचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी 10 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2017 पर्यंत असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 नोव्हेंबर 2017 रोजी होईल. न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 28 नोव्हेंबर 2017; तर अपील असलेल्या ठिकाणी अपिलाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 10 डिसेंबर 2017 रोजी मतदान होईल. 11 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
डहाणू, जव्हार, हुपरी, जत, नंदुरबार, नवापूर, तळोदा, किनवट, चिखलदरा, पांढरकवडा व आमगांव या 11 नगरपरिषदांचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी; तसेच वाडा, फुलंब्री, सिंदखेडा व सालेकसा या चार नगरपंचायतींचे सदस्य आणि अध्यक्षपदांसाठी 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होईल. नामनिर्देशनपत्रे 18 ते 24 नोव्हेंबर 2017 या कालावधीत स्वीकारली जातील. 25 नोव्हेंबर 2017 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान 13 डिसेंबर 2017 रोजी होईल. मतमोजणी 14 डिसेंबर 2017 रोजी होईल.

Political Research and Analysis Bureau (PRAB)

==========================================================

बृहन्मुंबईतील प्रभाग क्रमांक 21 व 62 च्या पोटनिवडणुकीसाठी 13 डिसेंबरला मतदान

  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 आणि 62 च्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे

या पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 20 ते 27 नोव्हेंबर 2017 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. त्यांची छाननी 28 नोव्हेंबर 2017 रोजी होईल. 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. निवडणूक चिन्हांचे वाटप 2 डिसेंबर 2017 रोजी होईल. मतदान 13 डिसेंबर 2017 रोजी होईल. मतमोजणी 14 डिसेंबर 2017 रोजी होईल.


Political Research and Analysis Bureau (PRAB)

==========================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.