Tuesday 28 November 2017

मोदींच्या मतदारसंघात 'फॉरेन रिटर्न' उमेदवार

मोदींच्या मतदारसंघात 'फॉरेन रिटर्न' उमेदवार


पुढील महिन्यात गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. गेली अनेक वर्ष भाजपची एकहाती सत्ता असलेल्या गुजरातमध्ये राहुल गांधींनी प्रचाराचा धडाका उडवून दिला असून अनेक ठिकाणी भाजप उमेदवारांच्या विरोधात तरुणांची फौज उतरवली आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत आणखी एका चेह-याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गुजरातमध्ये श्वेता ब्रम्हभट्ट या नावाची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. श्वेताचा फोटो किंवा तिला पाहिल्यानंतर ती मॉडेल असल्याचा अनेकांचा समज होतो. पण श्वेता राजकारणात सक्रीय असून यंदाच्या गुजरात निवडणुकीत काँग्रेसने तिला मणीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उच्चशिक्षित असलेल्या श्वेताने इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केले आहे. रविवारी रात्री श्वेताला मणीनगरमधून उमेदवारी जाहीर झाली. तिच्या उमेदवारीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्वेताला तिकिट दिले म्हणून आंदोलनही केले. येत्या 14 डिसेंबरला मणीनगरमध्ये मतदान होणार असून तिच्यासमोर भाजपाच्या सुरेश पटेल यांचे आव्हान आहे. श्वेताचे वडिल नरेंद्र ब्रम्हभट्टही काँग्रेसमध्ये सक्रीय असून त्यांनी 2000 साली काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. वडिलांच्या प्रेरणेमुळे मी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला असे श्वेताना सांगितले. श्वेतला कॉर्पोरेट क्षेत्रात काम करायचे होते. बीबीएमध्ये पदवी घेतल्यानंतर तिने लंडनच्या  विद्यापीठातून मास्टर्सची पदवी घेतली. त्यानंतर एचएसबीसी आणि डाराशॉमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केले. त्यानंतर समाजकारण आणि कॉर्पोरेट क्षेत्र असे दोन पर्याय समोर असताना तिने समाजकारणाची निवड केली. 2012 मध्ये श्वेताला विधानसभा निवडणूक लढवायची संधी होती पण करीयर महत्वाचे असल्याने तिने ऑफर नाकारली. अनेक दशकांपासून मणीनगर हा भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे इथे निवडणूक कशी जिंकणार या प्रश्नावर श्वेताना सांगितले कि, माझ्या मतदारसंघातील 75 टक्के मतदार चाळीशीच्या आतील आणि महिला आहेत. महिला आणि तरुणाईला सक्षम करण्याला माझे पहिले प्राधान्य असेल. निवडणुकीत हेच दोन घटक माझे मुख्य बलस्थान आहेत असे श्वेताना सांगितले. लोक नेत्यांना आदर्श मानतात त्यामुळे आम्हाला काही चांगली उदहारण समोर ठेवायची आहेत. मतभेदांनाही राजकारणात वाव असला पाहिजे. समाजवाद, धर्मनिरपेक्षता, विचारधारा आणि लोकशाही या आधारावर मी काँग्रेसची निवड केली असे श्वेताना सांगितले.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) 




====================================================================

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.