Thursday 30 November 2017

मतदान नोंदणी प्रक्रिया ; नवीन मतदार नोंदणीसाठी

मतदान नोंदणी प्रक्रिया
नवीन मतदार नोंदणीसाठी..

जन्माच्या पुराव्यासाठी अर्जदार ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणाचा पुरावा असणेही गरजेचे आहे.निवडणूक आयोगातर्फे दिल्या जाणाऱ्या मतदार ओळखपत्रासाठी अर्जदारांना सर्वप्रथम नमुना अर्ज भरणे गरजेचे असते. या अर्जामध्ये अर्जदाराचे नाव, पत्ता, त्याचे वय आणि त्याचे छायाचित्र असणे आवश्यक असते. त्यानुसारची कागदपत्रे अर्ज भरताना सादर करावी लागतात.


====================================================================

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

=====================================================================
वयासाठी आवश्यक कागदपत्रे
मतदार ओळखपत्रासाठी सर्वात महत्त्वाची कागदपत्रे म्हणून १८ वर्षे पूर्ण केलेल्या वयाचा पुरावा असणे गरजेचे आहे. यासाठी पालिकेतर्फे देण्यात येणारे जन्म प्रमाणपत्र किंवा शैक्षणिक संस्थेने दिलेले जन्मदिनांक प्रमाणपत्र या अर्जाबरोबर जन्माचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो किंवा जर अर्जदार इयत्ता दहावी उत्तीर्ण असेल तर ती जन्मतारीख नमूद केलेली दहावीची गुणपत्रिका असणे गरजेचे आहे किंवा जन्मतारीख नमूद केलेली आठवीची गुणपत्रिका आवश्यक कागदपत्रासाठी गरजेचे ठरते.
राहत्या ठिकाणाच्या पुराव्यासाठीची कागदपत्रे
जन्माच्या पुराव्यासाठी अर्जदार ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणाचा पुरावा असणेही गरजेचे आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने विविध कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार यासाठी बँक, किसान, डाक कार्यालयाचे पासबुक हे पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत; तर इन्कम टॅक्स विभागाचे आदेश, पासपोर्ट, वाहन परवाना किंवा रेशन कार्ड हेही वापरता येऊ  शकते. याशिवाय अर्जदाराच्या नावावर किंवा त्याच्या पालकांच्या नावावर फोन, पाणी, वीज, गॅस जोडणीचे बिलही राहत्या पुराव्यासाठी ग्राह्य़ धरले जातात. मुख्य म्हणजे, जी व्यक्ती बेघर असतात, त्यांनी नमूद केलेल्या पत्त्यावर मतदान केंद्रीय कार्यालयातील रात्री भेटी देऊन ते व्यक्ती त्या ठिकाणी राहतात की नाही, याची नोंद केली जाते.
प्रक्रिया
विहित अर्जानुसार संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा अर्ज जवळच्या विधानसभा निवडणूक कार्यालय किंवा आयोजित विशेष मोहिमेतील अधिकाऱ्याकडे सादर करणे गरजेचे असते. हा अर्ज सादर केल्यानंतर निवडणूक अधिकारी दिलेल्या अर्जातील पत्त्यावर भेट देऊन खातरजमा करत असतात. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर हा अर्ज भरला जाऊन एक क्रमांक दिला जातो. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित अर्जदाराचा अहवाल निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठविण्यात येतो. त्याचे ओळखपत्र तयार केले जाते. या ओळखपत्रावर होलोग्राम स्टिकर लावण्यात येतो. त्यानंतर ओळखपत्राची संपूर्ण तयारी पूर्ण करून संबंधित ओळखपत्र बुथ लेव्हल ऑफिसरकडे पाठविण्यात येते. ते हे ओळखपत्र संबंधित अर्जदारांना प्रदान करतात. जर ही संपूर्ण प्रRिया विशेष मोहिमेच्या माध्यमातून राबविण्यात आली, तर यास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. इतर वेळेस साधारण सहा ते सात महिन्यांच्या कालावधीत ही संपूर्ण प्रक्रिया राबविली जाते.

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================
मतदार म्हणून कोण पात्र आहे ?
             प्रत्येक नागरिक ज्याने वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहे (प्रत्येक वर्षाच्या  जानेवारी,  महिन्याच्या एक तारखेला  जर मतदार अपात्र ठरला नाही तर तो नोंदणी करु शकतो.) अटी खालीलप्रमाणे -
·         सार्वत्रिक निवासाच्या जागी फक्त नोंदणी करता येईल.
·         एकाच जागेवर नोंदणी करता येईल.
·         अनिवासी भारतीयांच्या पासपोर्टवर जो पत्ता दिला असेल त्या निवासी पत्यानुसार नोंदणी.
·         सरकारी सेवेत असलेले मतदार त्यांच्या राहत्या घराच्या पत्यावर नोंदणी करु शकतात.
मतदार म्हणून कोण अपात्र आहे ?
             प्राधिकृत न्यायालयाने मानसिक स्थैर्यता नसलेला आणि अपात्र म्हणून घोषित केलेला किंवा निवडणुक संदर्भात भ्रष्टाचाराचे आरोप सिध्द झाले असल्यास असा मतदार नोंदणी करु शकत नाही.
18 वर्षे पात्र वय हे कुठल्या तारखेपासून ग्राहय धरण्यात येत असते ?
             आरपी कायदा 1950 च्या सेक्शन 14 नुसार पात्र दिनांक म्हणजे प्रत्येक वर्षाच्या जानेवारी महिन्याची 1 तारीख ज्या दिवशी मतदार यादी तयार केली जाते किंवा पुनर्तयार केली जाते.
जर तुम्ही आज वयाची 18 वर्ष पूर्ण केली असतील तर तुम्हाला मतदार म्हणून नोंदणी करता येते का ?
             नाही. प्रत्येक वर्षीच्या जानेवारी महिन्यात मतदार यादी जेव्हा तयार होते तेव्हाच नोंदणी करता येते.
मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी मला निवासी पत्त्याचा कुठला पुरावा दयावा लागेल ?
             पासपोर्ट, बॅक पासबुक, वाहन परवाना इत्यादी कागदपत्र निवासी पुरावा म्हणून सादर करता येतील किंवा कुठलेही सरकारी कागदपत्र जे नोंदणीकृत आहे.
भारतीय अनागरिक मतदार होऊ शकतात का ?
             नाही. जो भारताचा नागरिक नाही त्याला मतदार म्हणून नोंदणी करता येणार नाही.  आरपी कायदा 1950 च्‍या कलम 326 सेक्‍शन 16 मध्‍ये यासंदर्भात विस्‍तृत माहिती दिली आहे.
भारतीय अनिवासी नागरिकांना मतदार होता येते का ?
             हो. लोकप्रतिनिधी सुधारित कायदा 2010 मध्ये दिलेल्या तरतुदींनुसार, असा नागरिक ज्याने इतर देशांचे नागरिकत्व घेतले नाही परंतु भारतीय नागरिक आहे आणि तो त्याच्या भारतातील निवासस्थानी विशिष्ट कालावधीत राहत नसेल परंतु त्याचे निवासस्थान भारतामध्ये असून एका विशिष्ट मतदारसंघाअंतर्गत येते  आणि यांची नोंद त्याच्या पासपोर्टमध्ये झाली आहे अशांना मतदार होता येते.
जर मी दिल्लीमध्ये कामाला आहे  आणि वास्तव्याला आहे तर मी माझ्या मूळ गावात मतदान करु शकतो का ?
             नाही. जर तुम्ही दिल्लीमध्ये वास्तव्यास आणि नोकरीस आहात तर तुम्हाला सेक्शन 19 बी अंतर्गत दिल्ली येथे निवासी मतदार संघात नोंदणी करावी लागेल.
नागरिक एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी करु शकतो का ?
             नाही. आरपी कायदा 1950 च्या सेक्शन 17 आणि 18 नुसार मतदाराला एकाच ठिकाणी मतदानासाठी नोंदणी करता येते.
मी नवीन मतदार म्हणून मतदार ओळखपत्र कसे मिळेल ?    पात्र मतदार नोंदणीसाठी विविध उपलब्ध माध्यमे कोणती ?
             तुम्हाला यासाठी फॉर्म 6 भरुन निवासी मतदार संघाच्या कार्यालयात  निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडे  (ईआरओ) जमा करावा लागेल. यानंतर तुमचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट होईल. खालील विविध प्रकार फॉर्म 6 भरण्यासाठी आहेत.
1.         (अ) ऑनलाईन अर्ज भरणे :- www.eci.nic.in किंवा www.ceodelhi.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे, "ऑनलाईन व्होटर रजिस्ट्रेशन" यावर क्लिक करुन नोंदणी करणे. (ब) युजर नेम आणि पासवर्ड टाकून इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटला साईनअप करणे. (क) पासपोर्ट साईज रंगीत छायाचित्र अपलोड करुन दिलेल्या जागी भरणे. (ड) निवासी आणि  वयाचा पुरावा अपलोड करणे, प्रत्येक मतदार संघाचा नियुक्त अधिकारी त्यांच्या निवासस्थानावरुन संबंधित कागदपत्र गोळा करु शकतो.
2.         टपालाद्वारे (अ)संबंधित राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावरुन (www.eci.nic.in ) फॉर्म 6 डाऊनलोड करुन तो भरुन संबंधित कागदपत्र संलग्नित करुणे आवश्यक. (ब) कार्यवाही पूर्ण झालेला फॉर्म तुमच्या मतदारसंघात किंवा बीएलओ यांच्याकडे पाठवावा.
मी माझ्या नावाची दुरुस्ती कशी करु शकतो किंवा इतर माहितीमध्ये जर मला चुका आढळल्यास नवीन मतदार ओळखपत्रामध्ये त्या न येण्यासाठी काय करावे लागेल ?
       वय, नाव किंवा पत्यातील शब्दाच्या चुका इत्यादी या सर्वसाधारण चुका असून यासाठी फॉर्म 8 भरणे जरुरी आहे यासाठी शाळा सोडल्याचा दाखला ज्यामध्ये तुमची जन्मतारीख  दिली असेल निवासी पत्याचा पुरावा ज्यामध्ये तुमचा निवासी पत्ता अचूक असेल असे पुरावे दाखल करणे आवश्यक. चुका दुरुस्त्या या विनामूल्य असून जर तुम्ही चुकांसाठी जबाबदार आढळला तर तुम्हाला तुमच्या मतदार नोंदणी केंद्रात 25 रुपये रोख देऊन मतदार ओळखपत्र प्राप्त करता येईल यासाठी पैसे भरल्यानंतर पावती घेणे आवश्यक आहे.
   अनिवासी भारतीय नागरिक मतदार म्हणून नोंदणी कशी करु शकतील ?
       जर अनिवासी भारतीयांचा वैध पासपोर्ट गहाळ झाल्यास अनिवासी भारतीयांनी (तो/तिने) विहीत प्रारुप फॉर्म 6ए भरुन मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे जमा करण्यापूर्वी भारतातील निवासाचा दिलेला पत्ता तपासावा. अर्जदाराला हा अर्ज टपालाद्वारे संबंधित ईआरओकडे जमा करता येईल.
निवडणूक मतदार यादीतील तुमचे नाव कसे तपासता येईल ?
             प्रत्येक राज्यांच्या सीईओच्या संकेतस्थळावर जाऊन,"चेक युवर नेम इन द व्होटरर्स लिस्ट" किंवा एसएमएसद्वारा तपासायचे असल्यास टाईप EPIC<SPCE>Voter ID No आणि 9211728082 या नंबरवर पाठवावा.
तुमचा नोंदणी  अर्ज कुठल्या टप्प्यात आहे हे तुम्हाला कसे कळेल ?
             प्रत्येक राज्याच्या सीईओच्या संकेत स्थळावर जाऊन "नो द स्टेटस ऑफ युवर फॉर एनरॉलमेंट" यावर क्लिक करुन तुम्हाला माहिती मिळू शकेल.
मी अलिकडेच माझे निवासस्थान बदलले आहे माझ्याजवळ जुन्या पत्याचा फोटोसहित पुरावा आहे मला वर्तमान पत्त्याचे फोटोसहित कार्ड कसे मिळू शकेल ?
             जर तुम्ही नोंदणीकृत मतदार आहात आणि नवीन स्थानावर राहायला आलात तर सर्वप्रथम तुम्हाला मतदारसंघ एक आहे का हे तपासून पाहावे लागेल जर मतदारसंघ वेगळा असल्यास तुम्हाला विहित नुमना फॉर्म 6 भरुन स्वत: किंवा टपालाद्वारे किंवा ऑनलाईन अर्ज पाठवावा लागेल. (2,3,4 आणि 5 प्रश्नांची उत्तरे बघा)  फक्त नवीन निवासस्थानाचा पुरावा तुम्हाला सादर करणे आवश्यक आहे जसे की विद्युत बिल इत्यादी.
मी अलिकडेच विवाहीत झालेलो आहे माझ्या पत्नीला माझ्या निवासस्थानावर मतदार नोंदणी करता येईल का ?
             यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहे.
(अ)      जर तुमची पत्नी सर्वप्रथम मतदान करणार असेल तर तिला फॉर्म 6 ची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. (ब) जर तुमची पत्नी पूर्वीच मतदार झालेली असल्यास परंतु मतदारसंघ वेगळा असल्यास तिला फक्त निवासस्थान बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. (क) जर ती एकाच मतदारसंघामध्ये मतदार म्हणून हक्क बजावत असेल तर तिला फक्त निवासी पत्ता बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल यासाठी तिने फॉर्म 8 ए भरणे आवश्यक आहे. (ड) यासाठी विवाह प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
मतदार/दुरुस्त्या/निवासी पत्ता बदल इत्यादीसाठीची नोंदणी आवश्यक विविध फॉमर्स कुठले आहेत  आणि ते कुठून मिळतील ?
·         नवीन मतदारांसाठी फॉर्म 6.
·         अनिवासी नागरिकांसाठी अर्ज 6 ए .
·         जर तुम्हाला मतदार यादीमध्ये किंवा मतदार मतदाता कार्डवर दुरुस्त्या करायच्या असल्यास फॉर्म 8.
·         मतदार संघाअंतर्गत पत्ता बदल करायचा असेल फॉर्म 8 ए भरावे लागतील हे सर्व फॉर्म तुमच्या अखत्यारी क्षेत्रातील जिल्हा निवडणूक कार्यालय, निवडणूक नोंदणी अधिकारी किंवा बूथ लेव्हल ऑफिसरकडे दाखल करु शकता.
मी माझे जुने मतदान ओळखपत्र हरवले आहे मला नवीन कसे मिळेल ?
             तुम्हाला जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर अर्ज करुन तुमच्या क्षेत्रातील ईआरओ/एईआरओकडे 25 रुपये जमानत भरुन नवीन कार्ड घेता येऊ शकेल. नवीन ईपीआयसी कार्ड केव्हा मिळेल याच्या तारखा मोठया वृत्तपत्रांमध्ये छापल्या जातील.
मतदान केंद्रे/मतदार यादी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांची नांवे त्यांचे दूरध्वनी क्रमांक या संदर्भातील माहिती कुठे व कशी मिळू शकतील ?
             भारतीय निवडणूक आयोग हा नागरिकांना माहिती आणि सेवा देण्यास कटिबध्द असून यासाठी आयोगाच्या  संकेत स्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे.
तक्रार निवारण यंत्रणा कशी उपलब्ध आहे ?
             मतदार यादी, मतदार ओळख पत्र किंवा तत्सम निवडणूकीसंदर्भात जर तक्रारी असतील तर तुम्हाला खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल.
अ.क्रं..
अधिकारी
पद
1
मुख्य निवडणूक अधिकारी
राज्य पातळी वरील
2
जिल्हा निवडणूक अधिकारी
जिल्हा पातळी वरील
3
निवडणूक वित्तीय अधिकारी
मतदार संघ पातळीवर
4
सहाय्यक मतदार अधिकारी
तालुका/ जिल्हा पातळीवर
5
निवडणूक नोंदणी अधिकारी
मतदार पातळीवर
6
पीठासीन अधिकारी
मतदान केंद्र पातळीवर
7
क्षेत्रीय अधिकारी
समूह मतदान केंद्र पातळीवर

    प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सीईओच्या संकेत स्थळावर विस्तृत माहिती उपलब्ध आहे.
    प्रत्येक निवडणुकीमध्ये आयोगातर्फे निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येते. निरीक्षक हे दुसऱ्या राज्यातील नागरी सेवा अधिकारी असतात.  जर तुम्हाला निवडणूकीसंदर्भात काही तक्रारी असतील तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता.
९०२९९०१९०१ वर मिस्ड कॉल देऊन आताच प्रतिज्ञा करा. "मी मतदान करणारच". जगाला दाखवून द्या कि मी महाराष्ट्राचा जागरूक मतदार आहे. अभिमानाने महावोटर व्हा.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.