Thursday 30 November 2017

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौरांना हायकोर्टाचा दिलासा; सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौरांना हायकोर्टाचा दिलासा; सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द 

मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर हायकोर्टाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक रद्द करण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने रद्द केला. देवळेकर यांनी मागील दोन निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या जातींची प्रमाणपत्र लावल्याचा आरोप करत प्रतिस्पर्धी भाजप उमेदवाराने न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीत कल्याण सत्र न्यायालयानं त्यांची निवडणूकच रद्द केली होती, त्यामुळं महापौरांचं नगरसेवकपद रद्द झालं होतं.मात्र या याचिकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला. त्यामुळे देवळेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.आज महापौर केडीएमसीत येताच शिवसैनिकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. जे आपल्याला रणांगणात हरवू शकले नाहीत, ते आता अशा कुरबुरी करत असून त्यांना कधीही यश येणार नाही, असं म्हणत महापौर देवळेकर यांनी यावेळी विरोधकांवर पलटवार केला.( सुधारित वृत्त २२/१/१८)
=====================================================

कडोंमपाचे महापौर राजेंद्र देवळेकरांचं नगरसेवकपद रद्द


कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. कारण की, कडोंमपाचे शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देवळेकर यांच्यासह शिवसेनेलाही मोठा धक्का बसला आहे.निवडणूक अर्जासोबत राजेंद्र देवळेकर यांनी दोन जातवैधता प्रमाणपत्र जोडल्यानं त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय कोर्टानं दिला आहे.दरम्यान, या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदतही दिली आहे.या निकालानंतर राजेंद्र देवळेकर म्हणाले की, माननीय कल्याण न्यायालयानं माझी निवडणूक रद्दबातल ठरवण्याचा निर्णय दिला. परंतु त्याच न्यायालयानं या निर्णयास अपील पिरियडपर्यंत म्हणजेच उच्च न्यायालयात अपील करेपर्यंत या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात मला स्थगिती मिळेल असा विश्वास आहे.


   POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

                 पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.