Friday, 3 March 2023

Chinchwad Bypoll Election Result 2023; चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय

हुजूरपागा शाळेच्या विद्यार्थिनी अश्विनीताई झाल्या आमदार


चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी ३६ हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आणि पुण्यातील हुजूरपागा शाळेची एक विद्यार्थिनी महाराष्ट्र विधानसभेतील आमदार झाल्या. पुण्याच्या हुजूरपागा शाळेत दहावीचे शिक्षण घेतलेल्या अश्विनीताई आमदार झाल्याने माजी विद्यार्धिनीनी आनंद व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 
     चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अश्विनी जगताप ३६ हजार १६८ मतांच्या फरकाने सहज विजयी झाल्या. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत झाली. यात दोन लाख ८७ हजार १४५ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना एक लाख ३५ हजार ४९४ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना ९९ हजार ४२४ मते मिळाली. बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४० हजार ७५ मते मिळाली. 
सर्वप्रथम टपाली मतदान मोजण्यात आले. या ३४७ मतांपैकी ४५ मते अवैध ठरली आणि ३०२ मते मोजण्यात आली. त्यात जगताप यांना १६९, काटे यांना ९२ आणि कलाटे यांना ३० मते मिळाली. मामुर्डी, विकासनगर, किवळे भागातील मतमोजणी सर्वप्रथम झाली. पहिल्या फेरीत जगताप यांना ४,१६७; काटे यांना ३,६४८ आणि कलाटे यांना १,६७४ मते मिळाली. त्यानंतर रावेत, पुनावळे, चिंचवड, काळेवाडी, रहाटणी, वाकड भागांतील मतमोजणी झाली. या ठिकाणीही जगताप यांची आघाडी कायम राहिली. 
   निवडणुकीच्या मतमोजणीत अश्विनी जगताप यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली. आणि शेवटपर्यंत ही आघाडी कायम ठेवली. मतमोजणीच्या २० ते २२ व्या फेरीतच त्यांनी नाना काटेंना मोठ्या फरकाने मागे टाकलं आणि विजयी आघाडी मिळवली होती. पिंपळे गुरव आणि सांगवी येथील मतपेट्या मतमोजणीसाठी उघडण्यापूर्वीच अश्विनी जगताप या विजयी होणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. विशेष म्हणजे नाना काटे आणि राहुल कलाटे यांचे वर्चस्व असतानाही अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली. रावेत, मामुर्डी, किवाळे, वाकड, थेरगाव, रहाटणी आणि कालाटेवाडीत जगताप यांनी लक्षणीय आघाडी घेतली होती.
     अखेरच्या २५ ते ३७ फेऱ्यांच्या तिसऱ्या टप्प्यात पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, सांगवी भागांतील मतमोजणी झाली. या ठिकाणी जगताप यांना मोठी आघाडी मिळाली. त्यातील सर्वाधिक मते पिंपळे गुरव भागातील आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर जगताप यांच्या तुलनेत विरोधकांना निम्मीही मते मिळू शकली नाहीत. मागील २०१९च्या निवडणुकीत दिवंगत आमदार जगताप यांना १ लाख ५० हजार ७२३ मते मिळाली होती, तर राहुल कलाटे यांना १ लाख १२ हजार २२५ मते मिळाली होती. ३८ हजार ४९८ मतांनी जगताप यांनी विजय मिळविला होता. या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ४९४ मते मिळाली. त्या ३६ हजार १६८ मतांनी विजयी झाल्या. काटे आणि कलाटे यांच्या मतांची बेरीज केली असता १ लाख ३९ हजार ४९९ मते होतात. या दोघांमधील मतविभागणीमुळे भाजपचा विजय सुकर झाल्याचे स्पष्ट होते; परंतु कलाटे यांना मिळालेल्या मतांमुळे भाजपचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. 
    चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निर्मिती २००९ मध्ये झाली. तेव्हापासून चार निवडणुका झाल्या. राज्यातील सर्वात मतदारसंख्या असलेला हा मतदारसंघ आहे. चिंचवड मतदारसंघात महापालिकेचे १३ प्रभाग येतात. एका प्रभागातून चार असे ५२ नगरसेवक पालिकेवर निवडून जातात. मागीलवेळी एकट्या भाजपचे ३३ नगरसेवक निवडून आले होते. लक्ष्मण जगताप यांची मोठी ताकद, कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आणि आदरयुक्त दरारा होता. त्यांच्याविरोधात जाण्याचे कोणी धाडस करत नव्हते. सुरुवातीपासून जगताप घराण्याचे चिंचवडवर वर्चस्व राहिले. पोटनिवडणुकीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप विजयी झाल्या. मात्र, तिरंगी लढत होवूनही मतांमध्ये १५ हजारांनी घट झाली आहे.

राहुल कलाटे यांचेसह 26 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

चिंचवड विधानसभेत भाजपच्या अश्विनी जगताप यांचा 36 हजार 168 मतांनी दणदणीत विजय झाला. मविआचे बंडखोर राहुल कलाटेंमुळे हा विजय सुकर झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटेंच्या पराभूताला तेच कारणीभूत ठरल्याचे मविआचा दावा आहे. मविआची डोकेदुखी वाढवणाऱ्या कलाटेंचे मात्र डिपॉझिट जप्त झाले आहे. कलाटेंना 44 हजार 82 मते पडली. पण डिपॉझिट राखण्यासाठी 47 हजार 833 इतकी मते आवश्यक होती. हा आकडा पार करु न शकल्याने कलाटे यांचं डिपॉझिट जप्त झाले. चिंचवडमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार नाना काटे यांना 99343 मते पडली आहेत. नाना काटे यांना एकूण मतदानाच्या 1/6  टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे नाना काटे यांचे डिपॉझिट जप्त होणार नाही. तर कलाटे यांना अनामत रक्कम वाचवण्याकरता 3751 मतांची गरज होती. कलाटेंसह 26 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाले.
   चिंचवडमध्ये डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांची नावे- प्रफुल्ला मोतलिंग, मनोज खंडगळे, तुषार लोंढे, सतिश कांबिये, अजय लोंढे, अनिल सोनवणे, अमोल सूर्यवंशी, किशोर काशीकर, गोपाळ तंतारपाले, चंद्रकांत मोटे, जावेद शेख, दादाराव कांबळे, बालाजी जगताप, सुभाष बोधे, डॉ.मिलिंदराजे भोसले, मिलिंद कांबळे,  मोहन म्हस्के, रफिक कुरेशी, रविराज काटे, श्रीधर साळवे, सतिश सोनावणे, सुधीर जगताप, हरिश मोरे यांचा समावेश आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक-2023 निकाल

अ.क्र.

उमेदवाराचे नाव

पक्ष

पोस्टल मते

मतदान

प्रमाण

1

अश्विनी जगताप

भाजप

169

135603

47.2

2

नाना काटे

राष्ट्रवादी

92

99435

34.6

3

राहुल कलाटे

अपक्ष

30

44112

15.4

4

सुभाष बोधे

अपक्ष

0

660

0.23

5

गोपाळ तंतारपाले

अपक्ष

2

439

0.15

6

सिद्धिक इस्माईल शेख

अपक्ष

1

398

0.14

7

प्रफुल्ला मोतलिंग

महा लोकहितवादी पा.

1

379

0.13

8

बालाजी जगताप

अपक्ष

1

340

0.12

9

किशोर काशीकर

अपक्ष

0

316

0.11

10

श्रीधर साळवे

अपक्ष

0

316

0.11

11

दादाराव कांबळे

अपक्ष

0

305

0.11

12

डॉ. मिलिंदराजे भोसले

अपक्ष

0

276

0.1

13

अमोल सूर्यवंशी

अपक्ष

0

259

0.09

14

रफिक कुरेशी

अपक्ष

0

184

0.06

15

मनोज खंडगळे

एएसपी

1

174

0.06

16

तुषार लोंढे

बहुजन भा पार्टी

0

122

0.04

17

रविराज काळे

अपक्ष

0

121

0.04

18

हरिश मोरे

अपक्ष

0

117

0.04

19

सतिश कांबिये

बहुजन मुक्ती पार्टी

1

115

0.04

20

जावेद शेख

अपक्ष

0

113

0.04

21

सुधीर जगताप

अपक्ष

1

112

0.04

22

अजय लोंढे

अपक्ष

0

106

0.04

23

मिलिंद कांबळे

अपक्ष

1

97

0.03

24

मोहन म्हस्के

अपक्ष

0

82

0.03

25

शेख सो युनुस

अपक्ष

0

74

0.03

26

सतिश सोनावणे

अपक्ष

0

49

0.02

27

चंद्रकांत मोटे

अपक्ष

1

48

0.02

28

अनिल सोनवणे

अपक्ष

0

45

0.02

29

नोटा

1

2731

0.95

Total

302

287128

 


चिंचवड विधानसभा निवडणूक-2019 मधील भागानुसार निकाल आकडेवारी

भागाचे नाव

एकूण मतदान

झालेले मतदान

लक्ष्मण जगताप

राहुल कलाटे

पिंपळे गुरव

६९४६७

३८७०५

२७१६२

९६५१

थेरगाव

५९५६७

३२१२८

१४८४४

१५५४३

काळेवाडी

५०२२४

२६५५८

१२२४०

१२६१०

वाकड

४८०७८

२४५८७

१०५९०

१२७६१

पिंपळे सौदागर

३७११७

१७१२७

१०५९०

१२७६१

चिंचवडगाव

३६८४०

२१४६७

१३१९५

७३०६

रहाटणी

३६१३९

१९४६२

१००४६

८५३२

सांगवी गाव

३३९००

१८९६६

९६७६

८२९१

जैन शाळा

२४८४८

१३३५०

६८९१

५६०४

वाल्हेकरवाडी

२४५४५

१३८३३

६६७९

६२७०

विकासनगर, किवळे

२३९४०

१२१४०

५३१४

५६९३

पिंपळे निलख

१९४१३

१०६३६

५६४४

४३७४

नवी सांगवी

१७८७८

९०५६

५६६०

३०५०

रावेत

१४८९१

७९३७

४५४०

२९०६

प्रेमलोक पार्क

६६८५

३६२६

२०३७

१३८३

पुनावळे

६४११

३८२३

१५५९

२०१०

भोईरनगर

६१३२

३३१३

१६८२

१३२१

मामुर्डी

२२३२

१०३६

५४६

३८८

पोस्टल

 

६२४

२३५

२३१

टक्केवारी

१००

५३.७०%

५४.१४%

४०.३१%


चिंचवड विधानसभा निवडणूक-2023 मधील भागानुसार निकाल आकडेवारी

भागाचे नाव

एकूण मतदान

झालेले मतदान

अश्विनी जगताप

नाना काटे

राहुल कलाटे

पिंपळे गुरव

७०१२०

३७५२४

२५२८१

९२५६

२१६४

काळेवाडी

६५२३२

३३९७८

१४४१८

१४६७७

३९६०

थेरगाव

६२४३४

३३३७१

१४४२१

११००६

६८७६

वाकड

६०४४७

२८५७४

११२९१

४२२०

१२२४६

पिंपळे सौदागर

३९६७४

१७६२९

७३३४

९३६९

६९४

चिंचवडगाव

३५६६५

१८३२४

९७४६

६२६२

१८८४

सांगवी गाव

३४८७४

१७३०६

८३००

६६५१

१८३९

रहाटणी

२८४१०

१५६३४

६०५५

७६३४

१६२१

वाल्हेकरवाडी

२७८२२

१४१३६

५९५६

५६०६

२१०८

जैन शाळा

२७७५०

१३०१९

६३९५

४५०८

१७४४

विकासनगर, किवळे

२६८७०

१३१८६

५३६८

५२३६

१९२६

रावेत

२२९७४

१०७५७

५३६५

३५९८

१५३९

पिंपळे निलख

२२२०४

११४७७

५११७

४२७१

१७५६

नवी सांगवी

१७१२९

८०९२

४७४२

२१९७

९९१

पुनावळे

१००२०

५५१०

१९४८

१९१५

१४८६

प्रेमलोक पार्क

७०३५

३२४७

१५६०

१११४

४६८

भोईरनगर

६२६०

२९६५

१२३३

१०४३

५५१

मामुर्डी

४०३४

२०९४

९०४

७८०

२२९

पोस्टल

 

३४७

१६९

९२

३०

टक्केवारी

१००

५०.४७%

४७.२१%

३४.६२%

१५.३६%


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण" 



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.