Tuesday 7 March 2023

kasba-by-election-hindu-mahasabha-president-anand-dave-आनंद दवे यांच्या कुटुंबियांच्या मतांची फाटाफूट! घरातील मते मिळवण्यातही अपयश

300 मतांचा टप्पा गाठण्यातही दमछाक; नाराज ब्राम्हण समाजाची संख्या नगण्य!


ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व का डावलले गेले असा प्रश्न उपस्थित करून ब्राम्हण महासंघ व हिंदू महासभेचे अपक्ष उमेदवार आनंद दवे यांनी कसबा पेठ विधासभा मतदारसंघातील पोट निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून नाराज ब्राम्हण समाजाचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न केला मात्र मतदानातून नाराज ब्राम्हण समाजाची संख्या नगण्य असल्याचे मतदानाच्या निकालावरून स्पष्ट झाले. केंद्र निहाय मतदानाचा तपशील पाहिला तर आनंद दवे यांच्या कुटुंबियांच्या मतांची फाटाफूट झाल्याचे समोर आले आहे तर घरातील मते मिळवण्यातही अपयश आल्याचे देखील स्पष्ट होत आहे. 297 म्हणजेच 300 मतांचा टप्पा गाठण्यातही दमछाक झाल्याचे पहावयास मिळाले. 
     ब्राह्मण समाजाच्या उमेदवाराला डावलून भाजपकडून दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आली त्यामुळे हिंदू महासभेकडून विरोध व निषेध म्हणून आनंद दवे निवडणूक रिंगणात उतरले. रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर कसबा मतदारसंघातील ब्राह्मण समाज नाराज झाला असल्याचे म्हणणे त्यांनी रेटून धरले. आर्थिक आरक्षणाचा मुद्दा, पुनेश्वर मुक्तीचा मुद्दा, तसेच कसब्याचा विकास या मुद्द्यावर ही पोटनिवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले मात्र प्रत्यक्षात आनंद दवे यांच्या पाठीशी अवघे 297 मतदार उभे राहिले. जनमताचा कौल काय आहे आणि आनंद दवे यांच्या भूमिकेला मतदार पाठीशी घालणार नाही हे भाजपने जाणले होते त्यामुळे त्यांना उमेदवारी मागे घेण्याबाबत कोणताही संदेश दिला गेला नाही. 
   दवे यांनी उमेदवारी अर्ज भरताना हिंदू महासभेकडून आमदार मुक्ता टिळक यांचे पोस्टर त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच जय पुण्येश्र्वरची पोस्टरबाजी करण्यात आली होती. कोणत्याही मुद्यावर विरोध-प्रतीविरोध करून कायम इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमध्ये त्यांना चर्चेत राहावयास आवडते. आगामी काळात राजकीय पक्ष देखील उभारण्याचा दवे यांचा संकल्प आहे. मात्र पहिल्याच निवडणुकीत पाचशे मतांचाही टप्पा न गाठणारे दवे आगामी काळात निवडणुकांमध्ये कितपत रस घेतील याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. ब्राह्मण समाज नाराज असल्याचा आभास निर्माण करण्यात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात त्यांना थोडेफार यश आले होते हे मात्र नाकारता येत नाही.  
    कसबा पेठ विधासभा मतदारसंघातील पोट निवडणुकीत 300 मतांचा टप्पा गाठताना आनंद दवे यांना मतदारांनी मतदान करताना एकाच मतदानकेंद्रावर केंद्र क्र. 100 - सदाशिव पेठ येथे सर्वाधिक म्हणजे 13 मतदारांनी मतदान केले आहे तर केंद्र क्र. 260 - गुरुवार पेठ येथील केंद्रावर 11 मतदारांनी मतदान केले मात्र आनंद दवे यांच्या कुटुंबियांची नावे असलेल्या केंद्र क्र. 258 - गुरुवार पेठ सेंट हिल्डास स्कूल या मतदान केंद्रात अवघे 6 मतदारांनी मतदान केले असून त्यांच्या कुटुंबियांमध्ये घरातील 12 जणांचे मतदान आहे. त्यामुळे घरातीलच सदस्यांनी त्यांना मतदान केले नसल्याचे स्पष्ट होत आहे. 
      कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात दवे आडनावाचे 624 मतदार असून त्यांच्या घरात 12 मतदार आहेत. दवे परिवाराचीही मते त्यांना मिळाली नाहीत.कसबा पेठ विधासभा मतदारसंघातील एकूण 270 मतदानकेंद्रापैकी 135 मतदान केंद्रावर त्यांना जास्तीत जास्त 13 तर कमीतकमी 1 मत प्राप्त झाले आहे. या मतदारसंघातील बुधवार पेठ व दांडेकरपूल या भागात त्यांना एकही मत मिळाले नाही.
     कसबा पेठ विधासभा मतदारसंघातील प्रमुख 17 भागाप्रमाणे आनंद दवे यांना मिळालेले मतदान पाहता सर्वाधिक 81 मते सदाशिव पेठ भागातील मतदान केंद्रावर मिळाली असून त्यांच्या राहत्या भागातील गुरुवार पेठ भागात केवळ 28 मतदारांनी मत दिले आहे. अन्य भागाप्रमाणे आनंद दवे यांना मतदान असे शुक्रवार पेठ-45, शनिवार पेठ-37, गुरुवार पेठ-28, नारायण पेठ-20, कसबा पेठ-14, महात्मा फुले पेठ-12, रविवार पेठ-9, सेनादत्त पेठ-8, गणेश पेठ-5, भवानी पेठ-4, घोरपडे पेठ-4, रास्ता पेठ-4, दत्तवाडी-3, नवी पेठ-2 असे मतदान झाले आहे. तसेच त्यांना पोस्टल केवळ 1 मत मिळाले आहे. एकूण 297 मतांचा हिशोब आपण अशाप्रकारे केंद्र निहाय निकालपत्रात पाहू शकतो.

अपक्ष उमेदवार आनंद दवे यांच्या मतांचा शोध

मतदान केंद्र क्र. 

मतदान केंद्राचा तपशील

मते

100 - सदाशिव पेठ

झाशीची राणी, मनपा शाळा क्र.4 तळमजला, तात्पुरता अतिक्रमण कार्यालय पी एम सी हॉल, सदाशिव पेठ, पुणे-30

13

260 - गुरुवार पेठ

इपीफणी, इंग्लिंश मिडिअम स्कुल, सेंट हिल्डास स्कूल आवार , पश्चिमेकडील इमारत खोली क्र.3, गुरुवार पेठ, पुणे-42

11

38 - सदाशिव पेठ

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महात्मा फुले सभागृहाची डावी बाजूकडील स्पेस हॉल. जोंधळे चौक,कुमठेकर रोड, 708, सदाशिव पेठ, पुणे-30

8

74 - बुधवार पेठ

नुतन मराठी विदयालय प्रशालातळमजला, खोली क्र. 2, 212, बुधवार पेठ, पुणे-2

8

137 - शुक्रवार पेठ

आदर्श विदयालय, मुलींचे हायस्कूल, अध्यापक कक्ष (स्टाफ रुम) , शुक्रवार पेठ, पुणे-2

6

138 - शुक्रवार पेठ

आदर्श विदयालय, मुलींचे हायस्कूल, अभ्यास कक्ष (स्टडी रुम) , शुक्रवार पेठ, पुणे-2

6

189 - महात्मा फुले पेठ

मनपा शाळा नं.95  दगडी शाळा  तळमजला, खोली नं.1, महात्मा फुले पेठ, पुणे-42

6

258 - गुरुवार पेठ

इपीफणी, इंग्लिंश मिडिअम स्कुल, सेंट हिल्डास स्कूल आवार , पश्चिमेकडील इमारत खोली क्र.1, गुरुवार पेठ, पुणे-42

6

12 - कसबा पेठ

आर सी एम गुजराथी हायस्कुलपश्चिम मुखी, तळमजला, जिमन्यास्टीक हॉल लगत, टेनिस  हॉल, विभागणी करूनं कसबा पेठ, पुणे-11

5

99 - सदाशिव पेठ

झाशीची राणी, मनपा शाळा क्र.4 शांताबाई लिमये हॉल, सदाशिव पेठ, पुणे-30

5

140 - शुक्रवार पेठ

पुणे इंग्लिश स्कूल, सरस्वती मंदीर, तळमजला, खोली क्र.2, शुक्रवार पेठ, पुणे-2

5

75 - बुधवार पेठ

नुतन मराठी विदयालय प्रशाला, तळमजला, खोली क्र. 3, 212 बुधवार पेठ, पुणे-2

5

89 - सदाशिव पेठ

रेणुका स्वरुप मुलींचे हायस्कूल, तळमजला, खोली क्र. 3, सदाशिव पेठ, पुणे-30

5

142 - शुक्रवार पेठ

पुणे इंग्लिश स्कूल, सरस्वती मंदीरतळमजला, खोली क्र.4, शुक्रवार पेठ, पुणे-2

5

96 - सदाशिव पेठ

पुणे विदयार्थीगृह शिशू निकेतन, तळमजला, खोली क्र.3, सदाशिव पेठ, पुणे-30

4

24 - शनिवार पेठ

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नवीन मराठी प्राथमिक स्कूल, उत्तरेकडील इमारत, तळमजला, खोली क्र.2, शनिवार पेठ,पुणे-30

4

28 - शनिवार पेठ

न्यू इंग्लिश स्कूल रमणबागपश्चिमेकडील इमारत, तळमजलाखोली क्र. 8, 345 शनिवार पेठ, पुणे-30

4

41 - नारायण पेठ

एस एन डी टी कन्या शाळा, दक्षिणेकडील इमारत, तळमजला, खोली क्र.2, 591, नारायण पेठ, पुणे-30

4

255 - गुरुवार पेठ

सेंट हिल्डास स्कूल तळमजला, खोली क्र.1, 775,  गुरुवार पेठ, पुणे-42

4

132 - शुक्रवार पेठ

शिवाजी आयटीआय स्कूल, तळमजला, खोली क्र.1, 626 शुक्रवार पेठ, पुणे-2

3

143 - सदाशिव पेठ

स.प. महाविदयालय, तळमजला खोली क्र,एम11, सदाशिव पेठ, पुणे-30

3

178 - शुक्रवार पेठ

शिवाजी मराठा हायस्कूलतळमजला, खोली नं.8, शुक्रवार पेठ, पुणे-2

3

21 - शनिवार पेठ

अहिल्यादेवी मुलींचे हायस्कूलतळमजला खोली नं.2, 393 शनिवार पेठ,पुणे-30

3

22 - शनिवार पेठ

अहिल्यादेवी मुलींचे हायस्कूलतळमजला खोली नं.3, 393 शनिवार पेठ,पुणे-30.

3

23 - शनिवार पेठ

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नवीन मराठी प्राथमिक स्कूल, उत्तरेकडील इमारत, तळमजला, खोली क्र.1, शनिवार पेठ

3

27 - शनिवार पेठ

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, दक्षिणेकडील इमारत, तळमजला, खोली क्र. 6, 345 शनिवार पेठ,पुणे-30-

3

31 - नारायण पेठ

मनपा शाळा क्र.7, कै.वा.ब.गोगटे विदया निकेतन, दक्षिणेकडील इमारत, तळमजला, खोली क्र.1, नारायण पेठ, पुणे -30

3

40 - नारायण पेठ

एस एन डी टी कन्या शाळा, उत्तरेकडील इमारत, तळमजला, खोली क्र.1,  591, नारायण पेठ, पुणे-30

3

43 - नारायण पेठ

एस एन डी टी कन्या शाळा, दक्षिणेकडील इमारत, तळमजला, खोली क्र.4, 591, नारायण पेठ, पुणे-30

3

45 - शनिवार पेठ

एन एम व्ही शिशू शाळा, शनिवार पेठ, तळमजला, खोली क्र 3, शनिवार पेठ, पुणे-30

3

82 - सदाशिव पेठ

एमईएस मुलांचे भावे हायस्कूल तळमजला, पश्चिम खोली क्र 3, पेरुगेट, सदाशिव पेठ, पुणे-30

3

93 - सदाशिव पेठ

गोपाळ हायस्कूल, तळमजला, खोली क्रमांक 3, 1347, सदाशिव पेठ, पुणे-30

3

94 - सदाशिव पेठ

पुणे विदयार्थीगृह शिशू निकेतन, तळमजला, खोली क्र.1., सदाशिव पेठ, पुणे-30

3

97 - सदाशिव पेठ

मनपा शाळा क्र.4 विश्रामबाग वाडा वार्ड ऑफीस, कचरा वाहतूक विभागविश्रामबागवाडा, अतिक्रमण विभाग शनिपार, तळमजला,खोली क्र.1, शनिपार, सदाशिव पेठ, पुणे-30

3

98 - सदाशिव पेठ

मनपा शाळा क्र.4 विश्रामबाग वाडा वार्ड ऑफीस, अतिक्रमण विभाग, विश्रामबागवाडा, अतिक्रमण विभाग शनिपारतळमजला, खोली क्र.2, शनिपार, सदाशिव पेठ, पुणे-30

3

164 - सदाशिव पेठ

बालविकास मंदीर लोकमान्य नगर, वसाहत, विदयामंदीर, तळमजला, खोली नं.2, सदाशिव पेठ, पुणे-30

3

32 केंद्रावर प्रत्येकी 2 मते

64

67 मतदानकेंद्रावर प्रत्येकी 1 प्रमाणे मते

67

पोस्टल मत

1

एकूण प्राप्त मते

297

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण" 




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.