Thursday 2 March 2023

Kasba Bypoll Election Result 2023; 32 वर्षांनंतर कसब्यात निकालाची पुनरावृत्ती, भाजपच्या गडाला सुरुंग!

काँग्रेसचे रविंद्र धंगेकर विजयी; भाजपचे रासने यांचा दारूण पराभव


कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणूक 2023 निकाल


संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या कसबापेठ पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा दारूण पराभव केला. तब्बल 28 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या गडाला रवींद्र धंगेकर यांनी सुरुंग लावला आहे. या मतदारसंघात 32 वर्षांनंतर कसब्यात निकालाची पुनरावृत्ती झाली आहे. पराभवाची चाहूल लागताच विशिष्ट समाजाला गुलाबी गोडी लावण्याचा भाजपचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने पदाधिकारी तोंडघशी पडले आहेत. दरम्यान पहिल्या फेरीपासून अगदी शेवटच्या २१ व्या फेरीपर्यंत रवींद्र धंगेकर यांनी आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीचा अपवाद वगळता प्रत्येक फेरीत धंगेकर रासनेंना वरचढ ठरले. शनिवार-सदाशिव आणि नारायण पेठ जो भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा त्यातही जनेतने धंगेकरांना साथ दिली. अपेक्षेप्रमाणे रविवार-शुक्रवार पेठ तसेच लोहियानगर आणि मोमिनपुरा भागातून रवींद्र धंगेकर यांच्यावर जनतेने विश्वास ठेऊन त्यांना भरघोस मतदान केले. अखेर रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांना 10 हजार 915 मतांनी पराभवाची धूळ चारत विधानसभेत पाऊल ठेवले आहे.
     मतदारांना गृहित धरणे भाजपला महागात पडले आहे. कसबापेठ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचा विजय आगामी काळातील निवडणुकांसाठी अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपचे अनेक दिग्गज नेते मैदानात असताना आणि दुसरीकडे स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली संपूर्ण ताकद झोकून दिल्यानंतरही रविंद्र धंगेकर यांनी ही किमया नेमकी कशी साधली, याबाबत आता राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. 
     पुणे महापालिकेत तब्बल ५ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या रविंद्र धंगेकर यांचा जनसंपर्क कमालीचा आहे. अगदी रात्री १२ वाजताही एखाद्या नागरिकाने मदतीसाठी फोन केला तर धंगेकर यांच्याकडून त्याला प्रतिसाद दिला जातो, अशी त्यांची मतदारसंघात ख्याती आहे. तसंच इतक्या वर्ष नगरसेवक म्हणून काम करूनही चारचाकी गाडीचा वापर न करता ते दुचाकीनेच मतदारसंघात फिरणे पसंत करतात. त्यामुळे नागरिकांचे नेमके काय प्रश्न आहेत, हे जाणून घेत त्याची सोडवणूक करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या धंगेकर यांची लोकांची असलेली नाळ अधिकच घट्ट झाली त्यामुळे त्यांना पराभूत करणे भाजपला जिकरीचे गेले. तीन दशकांपूर्वी म्हणजे १९९१ मध्ये पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव काँग्रेसचे वसंत थोरात यांनी केला होता. आता त्याची पुनरावृत्ती झाली आहे. मात्र यावेळी कारणे वेगळी आहेत. पोटनिवडणुकीत सत्ताधारी जिंकतात असे सर्वसाधारणपणे मानले जाते. मात्र कसब्यातील हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागणार आहे. 
     जनतेने माझ्यावर मतांचा पाऊस पाडला. खरंतर पहिल्या दिवसांपासून जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती. कामाचा माणूस निवडून द्यायचा हे जनतेने ठरवलं होतं. जनतेने माझ्यावर आता मोठी जबाबदारी टाकलीये. जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी इथून पुढच्या सव्वा वर्षात १८-१८ तास काम करेन, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे. तर जनतेचा कौल मला मान्य आहे. मी कुठे कमी पडलो, याचे मी आत्मचिंतन करेल. भाजप नेतृत्वाने मला उमेदवारी दिली. माझ्यावर विश्वास टाकला, याबद्दल नेतृत्वाचे मी आभार मानतो. धंगेकरांना विजयासाठी शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रिया भाजपचे पराभूत उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केली आहे.

कसबापेठ विधानसभा मतदारसंघ मतमोजणीतील टप्पे निहाय मते-

Candidate

Party

Round 1

Round 2

Round 3

Round 4

Round 5

Round 6

Round 7

Round 8

Round 9

Dhangekar Ravindra Hemraj

INC

5844

2751

2526

4389

4131

3431

2774

4623

4232

Hemant Narayan Rasane

BJP

2863

4095

3709

3111

2641

3930

4270

2554

3085

Tukaram Namdeo Daphal

SSP

13

3

3

5

3

7

7

5

11

Baljeet Singh Kochhar

PRP

6

0

2

1

4

2

1

1

1

Ravindra Vitthalrao Vedpathak

RMP

0

5

1

0

1

1

3

5

2

Anil Hatagale

IND

5

4

5

4

1

4

3

2

4

Abhijit Wamanrao Awade-Bichukale

IND

4

0

0

2

7

1

2

3

1

Amol S. Tujare

IND

0

1

1

0

1

3

2

1

1

Anand Kanhaiyalal Dave

IND

12

31

32

11

4

23

30

22

5

Ingale Ajit Pandurang

IND

0

0

1

2

0

0

2

0

4

Oswal Suresh Babulal

IND

2

3

2

3

4

1

6

5

1

Khisal Jalal Jafri (Laddu)

IND

4

3

0

0

2

1

0

1

2

Mote Chandrakant Rambhaji

IND

0

2

0

3

0

2

1

3

3

Riyaz Sayyadali Sayyad

IND

9

0

0

2

3

1

2

4

3

Santosh Choudary

IND

4

1

2

3

6

2

4

2

3

Husen Nasaruddin Shaikh

IND

5

4

4

19

13

5

6

14

14

NOTA

NOTA

86

84

95

97

52

80

113

64

56

Total

8857

6987

6383

7652

6873

7494

7226

7309

7428

Round 10

Round 11

Round 12

Round 13

Round 14

Round 15

Round 16

Round 17

Round 18

Round 19

Round 20

Total Votes

% of Votes

3585

2925

3885

3482

3845

3666

4160

3701

4139

4093

1012

73194

53.00

3764

3919

2863

3233

3382

2944

2740

2757

2789

2845

750

62244

45.07

10

4

10

7

12

8

10

18

6

9

1

152

0.11

3

1

7

7

2

3

5

2

1

1

0

50

0.04

1

1

3

5

2

3

1

3

1

2

0

40

0.03

1

3

6

7

4

14

14

22

1

3

1

108

0.08

4

7

3

4

0

2

3

3

0

1

0

47

0.03

1

0

2

2

2

4

2

3

1

2

2

31

0.02

33

20

8

9

15

2

4

1

4

28

2

296

0.21

1

0

5

0

1

2

5

2

1

0

0

26

0.02

10

3

0

5

5

2

1

4

2

1

0

60

0.04

0

3

1

1

1

2

5

1

9

10

2

48

0.03

1

2

5

3

1

2

3

4

2

0

1

38

0.03

3

1

4

7

5

0

3

6

5

4

0

62

0.04

1

3

3

10

6

6

5

5

2

3

1

72

0.05

11

11

23

20

13

9

15

22

12

15

3

238

0.17

90

81

76

104

60

43

52

41

49

56

18

1397

1.01

7519

6984

6904

6906

7356

6712

7028

6595

7024

7073

1793

138103

100%

२७ बनावट मतदान

कसबा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी (२ मार्च) झाली. त्यानुसार या मतदारसंघात १४०१ जणांनी ‘नोटा’ पर्याय वापरला, तर २२ मते बाद झाली आहेत. तसेच ११ अपक्षांना मिळून एकूण १०३२ मते मिळाली आहेत. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांच्यावर विजय मिळविला. या मतदार संघात दोन लाख ७५ हजार ७१७ मतदार आहेत. त्यापैकी एक लाख ३६ हजार ९८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी ५१.६ टक्के मतदान झाले होते. त्यापैकी धंगेकर यांना ७३ हजार ३०९, तर रासने यांना ६२ हजार ३९४ मते मिळाली. काँग्रेस, भाजप व्यतिरिक्त सैनिक समाज पक्षाचे तुकाराम डाफळ यांना १५३, प्रभुद्ध रिपब्लिक पार्टीचे बलजितसिंग कोच्चर यांना ५१, राष्ट्रीय मराठा पक्षाचे रवींद्र वेदपाठक यांना ४१ मते मिळाली. बिचकुलेला ४७ मते ‘बिग बॉस’फेम अभिजीत बिचुकले याने या मतदार संघात अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. त्याला ४७ मते मिळाली. याशिवाय ११ अपक्षांना मिळून १०३२ मते मिळाली. २२ मते बाद ठरली, तर २७ बनावट मतदान झाले अशी माहिती कसबा निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.

भाजपला अतिआत्मविश्वास नडला

मतदारांना गृहीत धरणे, अति आत्मविश्वास, लादण्यात आलेला उमेदवार, त्यातून निर्माण झालेली नाराजी, निवडणुकीत अवलंबलेली साम, दाम, दंड, रणनीती, मतदारांना दाखविण्यात आलेली प्रलोभने, वैयक्तिक जनसंपर्काचा अभाव आदी कारणांमुळे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला. प्रचारात जुन्या जाणत्यांना डावलल्याची किंमतही भाजपला मोजावी लागली.

हिंदू महासभेच्या आनंद दवेंच डिपॉझिट जप्त

ब्राह्मण समाजाच्या मतांवर भिस्त असलेल्या हिंदू महासभेच्या आनंद दवेंच डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यांना केवळ 296 एवढी मते मिळाली.  उठसुठ हिंदू आणि ब्राह्मण समाजाचा नेता म्हणून प्रसारमाध्यमांवर इशारा देणारे दवे यांचे जनमत मतपेटीतून दिसून आल्याने त्यांचा किती प्रभाव आणि राजकीय मूल्य आहे हे स्पष्ट झाले आहे. नोटा आणि आनंद दवे यांची मते एकत्र केली तरी भाजपचे विजयाचे गणित पूर्ण होऊ शकत नाही. त्याप्रमाणेच अभिजीत बिचुकले यांना अवघी 47 मते मिळाली. यांच्यासह कसब्यातील डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. तुकाराम ढपाळ, बलजित सिंह कोचर, रविंद्र वेदपाठक, अमोल तुजारे, पांडुरंग इंगळे, चंद्रकांत मोटे, संतोष चौधरी. 

कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूक-2023 भागाप्रमाणे सविस्तर निकाल

मतदान केंद्र

कॉंग्रेस

भाजप

मताधिक्य

अपक्ष

नोटा

एकूण वैध

एकूण

धंगेकर

रासने

धंगेकर

रासने

बिचकुले

दवे

 अन्य अपक्ष

सदाशिव पेठ

9167

12058

 

2891

9

81

115

284

21714

21747

कसबा पेठ

8067

3899

4168

 

6

14

51

112

12149

12172

महात्मा फुले पेठ

7101

4510

2591

 

4

12

105

91

11823

11852

भवानी पेठ

6813

5805

1008

 

4

4

86

67

12779

12806

शुक्रवार पेठ

5683

6217

 

534

6

45

56

183

12190

12206

बुधवार पेठ

5459

4261

1198

 

2

20

30

106

9878

9892

घोरपडे पेठ

4758

2861

1897

 

0

4

36

59

7718

7737

रविवार पेठ

4696

3220

1476

 

2

9

32

57

8016

8026

गणेश पेठ

4268

2680

1588

 

0

5

34

60

7047

7058

गुरुवार पेठ

3919

3130

789

 

0

28

35

61

7173

7183

शनिवार पेठ

3142

4944

 

1802

0

37

23

112

8258

8264

रास्ता पेठ

2885

1800

1085

 

6

4

21

36

4752

4761

दत्तवाडी

2443

1291

1152

 

2

3

25

48

3812

3827

सेनादत्त पेठ

2022

2290

 

268

6

8

15

41

4382

4393

नारायण पेठ

1590

2548

 

958

0

20

11

70

4239

4241

नवी पेठ

685

456

229

 

0

2

5

6

1154

1156

दांडेकरपूल

496

274

222

 

0

0

7

4

781

782

Total EVM

73194

62244

17403

6453

47

296

687

1397

137865

138103

Total Postal Ballot

115

150

 

 

0

1

8

4

278

300

Votes Polled

73309

62394

 

 

47

297

695

1401

138143

138403

Rejected Votes 22

डिपॉझिट कधी जप्त होते 

लोकसभा आणि विधानसबा निवडणुकीमध्ये सामान आणि एससी-एसटी वर्गातील उमेदवारांसाठी वेगवेगळी अनामत रक्कम निश्चित केलेली आहे. तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व वर्गातील उमेदवारांसाठीत सारखीच अनामत रक्कम निश्चित केलेली असते. लोकसभा निवडणुकीत सामान्य वर्गातील उमेदवाराला २५ हजार तर एससी-एसटी वर्गातील उमेदवारांना १२ हजार ५०० रुपये डिपॉझिट रक्कम जमा करावी लागते. तर विधानसभा निवडणुकीती सामान्य वर्गातील उमेदवारांना १० हजार आणि एससीएसटी वर्गातील उमेदवारांनी ५ हजार रुपये जमा करावे लागतात. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जर कुठल्याही उमेदवाराला त्या जागेवर पडलेल्या एकूण मतांपैकी १/६ म्हणजेच १६.६६ टक्के मते मिळाली नाहीत तर त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाते. जर कुठल्याही जागेवर १ लाख मते पडली आणि तिथे पाच उमेदवारांना १६ हजार ६६६ पेक्षा कमी मते मिळाती तर त्या सर्वांची अनामत रक्कम जप्त केली जाते. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवण्यासाठी १/६ मते मिळवण्याची आवश्यकता असते. उमेदवाराला जेव्हा एकूण मतदानाच्या १/६ टक्क्यांपेक्षा मते मिळतात तेव्हा त्यांची डिपॉझिट रक्कम परत केली जाते.- जिंकणाऱ्या उमेदवरालाही त्याची डिपॉझिट रक्कम परत दिली जाते. त्याला १/६ टक्क्यांहून कमी मते मिळाली तरी ही रक्कम परत केली जाते. मतदान सुरू होणयापूर्वी जर कुठल्याही उमेदवाराचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकांना अनामत रक्कम परत केली जाते. उमेदवाराचं नामांकन रद्द झाल्यावर किंवा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर डिपॉझिट रक्कम परत केली जाते.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण" 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.