रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती
25 जुलैला शपथविधी
मिळाली 7 लाख 2 हजार 44 मते
देशाच्या 14 व्या राष्ट्रपती निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उमेदवार रामनाथ कोविंद यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. कोविंद यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्यवा (यूपीए) उमेदार मीरा कुमार यांचा पराभव केला आहे.
राष्ट्रपतिपदासाठी 17 जुलै रोजी झालेल्या मतदान झाले होते. संसदेच्या हॉल क्रमांक 62 मध्ये आज (गुरुवारी) राष्ट्रपतीपदासाठीची मतमोजणी झाली. कोविंद यांना 65.35 ( 7 लाख 2 हजार 44 मते) तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मीरा कुमार यांना एकूण 34.35 (3 लाख 67 हजार 314) टक्के मते मिळाली.
रामनाथ कोविंद यांच्या रुपाने देशाला दुसरा दलित राष्ट्रपती मिळाला आहे. ते येत्या 25 जुलै रोजी राष्ट्रपतिपदाची शपथ घेतील. दरम्यान, या निवडणुकीसाठी देशातील विविध राज्यांतील 776 खासदार आणि 4120 आमदारांनी मतदान केले होते.
राष्ट्रपतिपदासाठी मतमोजणी पूर्ण झाली आहे. रामनाथ कोविंद यांना 65.35 तर मीरा कुमार यांना 34.35 टक्के मते मिळाली. रामनाथ कोविंद यांच्या रुपाने देशाला दुसरा दलित राष्ट्रपती मिळाला आहे. त्याचप्रमाणे आंध्रप्रदेश, अरूणाचल प्रदेश, बिहार, आसाम या राज्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे.देशाचे १४ वे राष्ट्रपती राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उमेदवार रामनाथ कोविंद विजयी झालेत. त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला.१७ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये रामनाथ कोविंद विजयी झालेत. संसद भवनात आज सकाळपासून मतमोजणी सुरु होती. यामध्ये कोविंद यांना ६५.३४ टक्के मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांना एकूण ३४.३५ टक्के मते मिळाली.या निवडणुकीसाठी विविध राज्यांतील ४१२० आमदार आणि ७७६ खासदारांना मतदान करण्याचा अधिकार होता. त्यापैकी ९९ टक्के आमदार-खासदारांनी १७ जुलै रोजी मतदानाचा हक्क बजावला होता.

यापूर्वीच्या राष्ट्रपतींना किती मतं मिळाली?
वर्ष 2012 : राष्ट्रपती निवडणुकीत यूपीएच्या प्रणव मुखर्जी यांना 7,13,763 म्हणजे सुमारे 69% मतं मिळाली होती, तर एनडीएचे पीए संगमा यांना 3.15 लाख म्हणजे सुमारे 31% मतं मिळाली होती.
वर्ष 2002 : राष्ट्रपती निवडणुकीत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना 9,22, 884 म्हणजेत सुमारे 89 टक्के मतं मिळाली होती. तर लक्ष्मी सहगल यांना 1,07,366 म्हणजेच 11% टक्के मतं मिळाली होती.
वर्ष 1997 : राष्ट्रपती निवडणुकीत के आर नारायणन यांना 9.56 लाख म्हणजेच सुमारे 95 टक्के मतं मिळाली होती. तर टीएन शेषन यांना सुमारे 50, 631 म्हणजेच केवळ 5% मतं मिळाली होती.
वर्ष 1992 : राष्ट्रपती निवडणुकीत शंकर दयाल शर्मा यांना 6.75 लाख म्हणजेच 66% मतं मिळाली होती. तर जीजी स्वेल यांना 3.46 लाख म्हणजे सुमरे 34% मतं मिळाली होती.
गेल्या ४३ वर्षांत कोणत्या राष्ट्रपतींना मिळाले सर्वाधिक मतं
राष्ट्रपती निवडणुकीत केवळ १९७७ असं वर्ष होतं, ज्यावर्षी नीलम संजीव रेड्डी यांची सर्वोच्च पदावर बिनविरोध निवड झाली होती.
गेल्या ४३ वर्षांत कोणत्या राष्ट्रपतींना सर्वाधिक मतं मिळाली---
- ज्ञानी झैल सिंह (१९८२) - ७२.७३ टक्के
- आर. वेंकटरमण (१९८७) - ७२.२८ टक्के
- शंकर द्याल शर्मा (१९९२) - ६५.८७ टक्के
- के आर नारायणन (१९९७) - ९४.९७ टक्के
- ए पी जे अब्दुल कलाम (२००२) - ८९.५७ टक्के
- प्रतिभा पाटील (२००७) - ६५.८२ टक्के
- प्रणव मुखर्जी (२०१२) ६९.३१ टक्के
नारायणन यांच्याशिवाय केवळ दोन माजी राष्ट्रपतींना म्हणजेच डॉ. राजेंद्र प्रसाद आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांना ९० टक्क्यांहून अधिक मतं मिळाली होती. प्रसाद यांना १९५७ मध्ये ९८.९९ टक्के आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांना १९६२ मध्ये ९८.२४ टक्के मतं मिळाली होती.
कोण आहेत रामनाथ कोविंद?
रामनाथ कोविंद यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील परौख गावी जन्म.
कानपूर विद्यापीठातून एलएलबीपर्यंतच शिक्षण
1977 ते 1979 मध्ये दिल्लीच्या हायकोर्टात वकिली.
1994 आणि 2000 साली उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर नियुक्ती
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम पाहिलं
भाजप दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष
8 ऑगस्ट 2015 पासून बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत
कोण आहेत मीरा कुमार?
मीरा कुमार 1973 मध्ये भारतीय विदेश सेवेत रुजू
माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या.
1985 मध्ये राजकीय कारकीर्द सुरु, लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा खासदारपदी
1990 मध्ये काँग्रेसच्या कार्यकारणी समिती सदस्य होत्या
1996 आणि 1998 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत विजयी
2004 च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सामाजिक न्याय मंत्री पदाची सुत्रे
2009 मध्ये लोकसभा अध्यक्षा. देशाच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांची किमान १० मते फुटली!
क्रॉस व्होटिंग
निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाली. किमान १० राज्यांत मीरा कुमार यांना त्यांच्या काँग्रेस पक्षाकडून पूर्ण मते मिळाली नाहीत. या क्रॉस व्होटिंगचे अनेक राजकीय पैलू आहेत. विशेषकरून गुजरातमध्ये. कारण, याच वर्षी येथे राज्यसभेच्या तीन जागांसाठी विधानसभेची निवडणूक होणार आहे. कोविंद यांना ११६ आमदारांचे क्रॉस व्होट मिळाले, असा दावा भाजपचे महासचिव भूपेंद्र यादव यांनी केला आहे. सर्वाधिक काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केली.
गुजरात, गोवा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, त्रिपुरा दिल्लीत कोविंद यांना अपेक्षेपेक्षाही अधिक मते पडली. गुजरातमध्ये शंकरसिंह वाघेला यांच्या समर्थक आमदारांनी मीरा कुमार यांच्याऐवजी कोविंद यांना मत दिले. गुजरातमध्ये कोविंद यांना १३२ आणि मीरा कुमार यांना ४९ मते पडली आहेत. राज्यात काँग्रेसचे ५७ आमदार आहेत. दिल्लीत भाजपचे चार आमदार आहेत पण कोविंद यांना सहा मते पडली. हे दोन मत आम आदमी पक्षाच्या दोन आमदारांचे आहेत. पश्चिम बंगालमध्ये कोविंद यांना ११ आणि मीरा कुमार यांना २७१ मते पडली. येथे भाजप आणि घटक पक्षांचे मत आहेत. त्रिपुरात आघाडी नसतानाही कोविंद यांना मते पडली. ही मते टीएमसीच्या बंडखोर आमदारांचे असावेत, असे मानले जाते. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे १८५ आमदार आहेत. तरीसुद्धा कोविंद यांना २०८ मते पडली. गोव्यातही त्यांना अपेक्षेपेक्षा पाच जास्त मते पडली. गोव्यात काँग्रेसचे ११ आमदार आहेत, पण मीरा कुमार यांना ११ मतेच पडली. आसाममध्ये भाजपचे ८७ आमदार असूनही कोविंद यांना ९१ मते पडली, तर उत्तर प्रदेशात मीरा कुमार यांना ७४ मते पडायला हवी होती, पण त्यांना ६५ मतेच मिळाली.
राजस्थान: १० भाजप आमदारांनी काँग्रेसच्या मीरा कुमार यांना मत दिले. त्यांना राजस्थान, हिमाचल, सिक्कीम नागालँडमध्ये क्रॉस व्होट मिळाले. राजस्थानात काँग्रेसचे २१, बसप आमदार आहेत, पण कुमार यांना ३४ मते पडली.
शिवसेनेने पाठिंबा काढला तरी भाजपच राहील सत्तेवर; भाजपने खेचली 22 मते
महायुतीकडे १८६ मते असताना महाराष्ट्रातून काेविंद यांना २०८ मते मिळाली.राज्यात भाजपचे संख्याबळ १२२ असून शिवसेना ६३ आमदारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेस ४२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार आहेत. शिवसेनेने पाठिंबा काढला तरी रासपसह भाजपचे १२३ अाणि या निवडणुकीत विराेधकांची मिळवलेली २२ मतांच्या जाेरावर भाजप बहूमताचा १४५ हा अाकडा गाठू शकते.
भाजपा आणि शिवसेनेचे मिळून १८५ आमदार आहेत. त्यामुळे कोविंद यांना युतीच्या संख्याबळापेक्षा २३ मते अधिक मिळाली, असा तर्क दिला जात असला तरी तो वस्तुस्थितीला धरून नाही. कारण, राज्यातील ७ अपक्ष आमदार हे भाजपासोबत असून त्यांचे नेते आ.रवि राणा यांनी ते कोविंद यांना मतदान करणार हे आधीच जाहीर केले होते. याचा अर्थ भाजपा, शिवसेना आणि अपक्षांचे मिळून १९२ संख्याबळ होते. शिवाय, समाजवादी पार्टीचे मुलायमसिंग यादव यांनी कोविंद यांना पाठिंबा दिला होता हे लक्षात घेता राज्यातील सपाचे एकमेव आमदार अबु आझमी हे कोविंद यांच्या पाठीशी होते. ते आणि बहुजन विकास आघाडीचे दोन सदस्य (एकूण ३, मात्र १ गैरहजर) गृहित धरता एकूण संख्याबळ १९७ होते. कोविंद यांना २०८ मते मिळाली. म्हणजे त्यांना अपेक्षेपेक्षा ११ मते जादा पडली.
दुसरीकडे, काँग्रेस आघाडीचा विचार करता काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादीचे ४१, शेकाप-३, एमआयएम २, माकपा १, आणि भारिप-बहुजन महासंघ १, असे एकूण ९० संख्याबळ होते. मात्र, मीरा कुमार यांना ७७ मते मिळाली म्हणजे आघाडीची १३ मते फुटली. कोविंद यांना मिळालेली ११ जादा मते आणि आघाडीची फुटलेली १३ मते यात दोनचा फरक हा बाद मतामुळे आला असावा. दोन मते बाद ठरली आणि एक सदस्य अनुपस्थित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मिळून ८३ मते होती. मात्र, मीरा कुमार यांना त्यापेक्षा पाच मते कमी पडली. त्यामुळे या दोन्ही पक्षांची मते फुटली हे स्पष्टच आहे.कोविंद यांना जी २०८ मते मिळाली त्यातून शिवसेनेची ६३ मते वगळली तरी भाजपा आणि मित्र पक्षांची १४५ मते होतात. भाजपाची स्वत:ची १२२ मते आहेत. याचा अर्थ शिवसेना वगळून कोविंद यांना भाजपाच्या बाहेरची २३ मते मिळाली.
विधानसभेतील एकूण जागा – २८८राष्ट्रपतीपदासाठी मतदान – २८७मीराकुमार यांना मिळालेली मते – ७७रामनाथ कोविंद यांना मिळालेली मते – २०८बाद ठरलेली मते – २कोविंद यांना किमान १० मते जास्त मिळाली.
कोविंद यांच्या बाजूने
भाजप, तेदेपा, शिवसेना, जदयू, अण्णाद्रमुक, टीआरएस, वायएसआर काँग्रेस, इंनॅलोकदल व एनडीएचे घटक पक्ष. शिवाय सपाचा मुलायम व शिवपाल यांचा गट. मीरा कुमार यांच्या बाजूने : काँग्रेस, राजद, एनसीपी, डावे पक्ष, तृणमूल, आपसह १८ विरोधी पक्ष.

संसदेतील मतदान
- ७६८ खासदारांनी मतदान केले. (मूल्य : ५,४३,७४४)
- ५२२ मते कोविंद यांना पडली. (मूल्य : ३,६९,५७६)
- २२५ मते मीरा कुमार यांना मिळाली. (मूल्य : १,५९,३००)
- २१ मते अवैध ठरली. (मूल्य : १४,८६८)
राज्यातील मतदान
- एकूण मते : ४,०८३ (मूल्य : ५,४६,५५६)
- कोविंद यांना : २४०८ (३,३२,४६८)
- मीरा कुमारना : १६१९ (२,०८,०१४)
- अवैध ठरली ५६ मते. (६,०७४)
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.