पुण्याच्या नगरसेविका किरण जठार यांचे जात प्रमाणपत्र अवैध; भाजपाला दुसरा धक्का
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक १ च्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका किरण निलेश जठार यांचा महार जातीचा दावा जिल्हा जात पडताळणी समितीने अवैध ठरवलं आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. भाजपाला हा दुसरा मोठा धक्का बसला असून या पूर्वी नगरसेविका फरजाना आयुब शेख यांचा जातीचा दाखला विभागीय जात पडताळणी समितीने अवैध ठरविला आहे.
https://imojo.in/1gdby2
https://imojo.in/coopebook
https://imojo.in/prabindiaEBook
====================================================================
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook
================================================
=====================================================================
किरण निलेश जठार यांनी आपण महार असल्याचा दावा केला होता. त्याआधारावर त्यांनी भाजपतर्फे प्रभाग क्र १ मधून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्या विजयी झाल्या होत्या. मात्र नुकतेच जिल्हा जात पडताळणी समितीने त्यांचा हा दावा अवैध ठरविला असून त्याबाबतचा स्वतंत्र आदेश काढण्यात आला आहे.
या निर्णयामुळे जठार यांचे नगरसेवकपद धोक्यात आले असून भाजपाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. या पूर्वी वडगाव शेरी मतदार संघातील फुलेनगर नागपूर चाळ प्रभाग क्रमांक दोनच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका फरजाना आयुब शेख यांचे जात प्रमाणपत्र बोगस ठरविण्यात आले होते. प्रचंड मताधिक्याने पुणे महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपाला धक्का बसला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------
भाजप नगरसेविकेचा जातीचा दाखला अवैध
वडगाव शेरी मतदार संघातील फुलेनगर नागपूर चाळ प्रभाग क्रमांक दोनच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका फरजाना आयुब शेख यांचा जातीचा दाखला विभागीय जात पडताळणी समितीने अवैध ठरविल्याने त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. याशिवाय कळस धानोरी प्रभाग एकच्या नगरसेविका किरण नीलेश जठार यांनीदेखील जातीचा बनावट दाखला सादर केल्याचे समोर आले आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. त्यामुळे भाजपच्या दोन नगरसेविकांचे पद धोक्यात आले आहे.
तसेच कळस धानोरी प्रभाग एकच्या नगरसेविका किरण जठार यांचेही जात प्रमाणपत्र पडताळणी सुनावणी लवकरच होणार आहे. जठार यांनी महापालिका निवडणुकीत बनावट जातीचा दाखला सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांनी पुणे शहर तहसील कार्यालय आणि महापालिकेच्या उपायुक्त (निवडणूक) यांना दिला आहे..
पुणे महापालिका निवडणुकीत फरजाना शेख या प्रभाग दोनमधून इतर मागासवर्गीय महिला गटातून भाजप-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून विजयी झाल्या. त्यांनी जात प्रमाणपत्राची पडताळणी केली नव्हती. त्यामुळे वकील भगवान जाधव आणि अर्चना कुचेकर यांनी तक्रार केली होती.
शेख यांनी जातीचा दाखला मिळविण्यासाठी वडीलांचे शॉप अॅक्ट प्रमाणपत्र लावले होते. त्या प्रमाणपत्रावर ‘दर्जी’(शिंपी) असा उल्लेख होता. केवळ या उल्लेखामुळे जात स्पष्ट होत नसल्याने जात पडताळणी समितीने घेतलेल्या सुनावणीत त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरविण्यात आला. त्यामुळे शेख यांचे पद धोक्यात आले आहे.
तसेच कळस धानोरी प्रभाग एकच्या नगरसेविका किरण जठार यांचेही जात प्रमाणपत्र पडताळणी सुनावणी लवकरच होणार आहे. जठार यांनी महापालिका निवडणुकीत बनावट जातीचा दाखला सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांनी पुणे शहर तहसील कार्यालय आणि महापालिकेच्या उपायुक्त (निवडणूक) यांना दिला आहे..
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.