Wednesday, 5 July 2017

पुण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे पद रद्द, जातीचे प्रमाणपत्र अवैध

पुण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे पद रद्द, जातीचे प्रमाणपत्र अवैध
नगरसेवक किशोर धनकवडे यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र अवैध


पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किशोर धनकवडे यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवल्यामुळे आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यांचे नगरसेवक पद रद्द केले आहे. राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते. किशोर धनकवडे हे प्रभाग ३९ अ मधून मागास प्रवर्गातून निवडून आले होते. त्यांनी महापालिका निवडणुकीत सादर केलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव आयुक्त कुणाल कुमारांकडे मंजुरीसाठी देण्यात आले होते.
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किशोर उर्फ बाळासाहेब धनकवडे यांनी कुणबी जात प्रमाणपत्र सादर केले होते. पण तो जातीचा दाखला अवैध ठरला होता.
दरम्यान, निवडणुकीसाठी बहुतांश नगरसेवकांनी चुकीची माहिती देऊन कुणबी जात प्रमाणपत्र घेतल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते मृणाल ढोले-पाटील यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती. कुणबी जातीचे प्रमाणपत्र सादर करून निवडून आलेल्या नगरसेवकांच्या प्रमाणपत्राची चौकशी आणि तपासणी व्हावी, अशी मागणीही त्यांनी समितीकडे केली होती. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे धनकवडे यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अर्जावर समितीपुढे गेल्या महिन्यात सुनावणी झाली. त्यांनी सादर केलेला कुणबी जातीचा दाखला समितीकडून अवैध ठरवण्यात आला होता. निवडणूक शाखेने धनकवडे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे पाठवला होता.






http://prabindia.blogspot.in/2017/06/blog-post.html








प्रभाग क्रमांक 39 धनकवडी आंबेगाव पठार
अ – ओबीसी किशोर धनकवडे
ब – ओबीसी महिला आश्विनी भागवत
क – ओपन महिला श्रद्धा परांडे
ड – सर्वसाधारण विशाल तांबे

प्रभाग क्रमांक 39 -
प्रभाग क्रमांक 39 गट "अ' मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किशोर धनकवडे 16099 मतांनी निवडून आले. त्यांनी दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारापेक्षा तब्बल आठ हजार जास्त मते मिळवली. दुसऱ्या क्रमांकावर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अभिषेक तापकीर यांना 8762 मते मिळाली. त्यापाठोपाठ शिवसेनेचे अनिल बटाणे यांना 3411, मनसेचे ऋषी सुतार 1365 मते मिळाली. या गटात नोटाची मते 643 होती.
प्रभाग क्रमांक 39 गट "ब' मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अश्‍विनी भागवत 11451 मतांनी विजयी झाल्या. भाजपच्या मोहिनी देवकर यांना दुसऱ्या क्रमांकाची 11046 मते मिळाली. शिवसेनेच्या निकीता पवार यांना 4338 तर किरण परदेशी यांना 2403 मते मिळाली. नोटाची मते दखल घेण्याजोगी 1046 इतकी होती.
प्रभाग क्रमांक 39 गट "क' मध्ये भाजपच्या वर्षा तापकीर यांनी 12135 मते घेऊन विजय मिळवला. त्यांना राष्ट्रवादीच्या श्रध्दा परांडे यांनी टक्कर दिली. परांडे यांना 10486 मते मिळाली. शिवसेनेच्या तेजश्री भोसले यांना 3830, सुवर्णा चव्हाण 1672, ज्योती कोंडे 1534 मते मिळाली. येथे नोटाची 627 मते होती.
प्रभाग क्रमांक 39 गट "ड' मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विशाल तांबे यांनी विजयाची हॅट्रीक नोंदवली. त्यांना 11621 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे गणेश भिंताडे यांना 10308 मते मिळाली. यापाठोपाठ शिवसेनेचे सुनिल खेडेकर 6279 व मनसेचे चंद्रकांत गोगावले 1493 मते मिळवली. या प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तीन उमेदवार निवडून आले.

प्रभाग ३९ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी तीन, तर भाजपने एक जागा मिळविली. अ गटात भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे किशोर धनकवडे यांच्यात लढत झाली. पहिल्या तीन फेऱ्यांत धनकवडे यांचा विजय निश्‍चित झाला होता. तापकीर यांचा सात हजार मतांनी दारुण पराभव झाला. ब गटात पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या असलेल्या परंतु भाजपच्या तिकिटावर लढलेल्या मोहिनी देवकर यांचा राष्ट्रवादीच्या तरुण उमेदवार अश्‍विनी भागवत यांनी चारशे मतांनी पराभव केला.
शिवसेनेच्या निकिता पवार यांनी घेतलेल्या सुमारे चार हजार मतांमुळे भाजपला फटका बसला. क गटात भाजपच्या वर्षा तापकीर या दीड हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या; परंतु शिवसेनेचा उमेदवार स्वतंत्र लढल्याने त्यांचे मताधिक्‍य कमी झाले. राष्ट्रवादीच्या श्रद्धा परांडे यांनी दहा हजार ४८६ मते मिळवत जोरदार लढत दिली. ड गटात भाजपच्या गणेश भिंताडे यांचा पराभव करत राष्ट्रवादीचे विशाल तांबे विजयी झाले. शिवसेनेचे सुनील खेडेकर यांनी सहा हजार २०० मते घेतली. ही विभागणी भिंताडे यांनाच नुकसानीची ठरली. भाजप-शिवसेनेची युती तटल्याचे आणि ‘नोटा’ या पर्यायाचा वापर याचे परिणाम तिन्ही प्रभागांत दिसून आले.





Political Research and Analysis Bureau (PRAB)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 


https://imojo.in/prabindiaEBook
================================================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.